मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने शिवसेनेकडून पेढे वाटत,गुलाल उधळून आनंदोत्सव..!!

Date:

पुणे: मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी ते आझाद मैदान मुंबई पायी मोर्चा निघाला. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोर्चा मुंबईच्या वेशीवर वाशी येथे पोहचला असताना याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सकारात्मक चर्चा करत ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे. त्यांच्या सर्व पितृसत्ताक रक्त नातेवाईकांना,सगे सोयाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील वंचित घटकाला याचा फायदा होणार आहे. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीदिनी एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण बहाल केले आहे,या शासन निर्णयाचे स्वागत करीत पुण्यात शिवसेनेकडून फटाक्यांची आतषबाजी करीत, गुलाल उधळून,एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला .यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, प्रकाश तरवडे,नाना तरवडे,विक्रम घाडगे,सचिन भानगिरे,संदीप घुले, निवृत्ती तरवडे,संतोष रजपूत,दत्ता भानगिरे,अण्णा भानगिरे,रवींद्र भानगिरे , आकाश भानगिरे, मयुर तरवडे PMPML चे विजय पांढरे व असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’!

७ ते ९ ऑगस्टदरम्यान सॅनहोजेमध्ये तिसरा नाफा मराठी चित्रपट...

हरित क्रांतीचा नवा अध्याय; पाच लाख वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाला बळ

पाच लाख वृक्ष लागवडीचा टप्पा केला पार; सुयश चॅरिटेबल...

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावर पुन्हा सदस्यांचा विश्वास पुणे : अखिल...

पुण्यात येत्या 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

पुणे: मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि खडकवासला धरण साखळीतील...