भाजपच्या आमदाराने पोलिसाच्या कानफडात मारली ती गुपचूप खाल्ली ..भाजपच्या पदाधिकारी यांच्या अधिपत्याखाली पुण्यातले पोलीस दादागिरी करतात– पत्रकारांनाही गुराढोराप्रमाणे मारलय काल
पोलिसांच्या माध्यमातून मोगलाई आणण्याचा प्रयत्न – पांढरे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा – माजी आमदार मोहन जोशी
पुणे-आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले- खोटं बोलावं पण रेटून बोलावं असं काम प्रशासन व भारतीय जनता पक्ष करत आहे. पोलिसांनी मला, माजी नगरसेवक, मंत्र्यांना अडवण्याचं काम केलं आहे. आता लोकशाही शिल्लक राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे आमदार रवींद्र धंगेकरांनी म्हणत महापालिका अधिकारी आणि पोलिसांचा निषेध केला आहे .
पुण्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई काल पाहायला मिळाली. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आशानगर येथील टाकी मनपाच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात येणार होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या उद्घाटनाला विरोध दर्शवण्यात आला. तसेच, रविंद्र धंगेकरांच्या नेतृत्वाखाली टाकीचे उद्घाटन झाल्याचे कार्यकर्त्यांकडून जाहीर करण्यात आले.यावेळी पोलिसांनी इंग्रजांच्या काळातील झोटिंग शाहीची अनुभूती पत्रकार आणि कार्यकर्त्यांना दिली.