पुणे-महाराष्ट्र कारागृह विभागातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी बजावलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल वर्ष २०२४ साठी राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक केंद्रीय गृह विभागाकडून गुरुवारी (ता. २५) जाहीर करण्यात आले आहे.राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या सेवा कालावधीत सचोटी व कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचा सन्मान झाला आहे, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.राष्ट्रपती पदक जाहीर केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे-
रुकमाजी भुमन्ना नरोड (तुरुंगाधिकारी श्रेणी-१, अहमदनगर जिल्हा कारागृह), सुनील यशवंत पाटील (तुरुंगाधिकारी श्रेणी-१, तळोजा मध्यवर्ती कारागृह), बळिराम पर्वत पाटील (सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह), सतीश बापूराव गुंगे (सुभेदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), सूर्यकांत पांडुरंग पाटील (हवालदार, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह),
नामदेव संभाजी भोसले (हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), संतोष रामनाथ जगदाळे (हवालदार, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह), नवनाथ सोपान भोसले (हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), विठ्ठल श्रीराम उगले (हवालदार, अकोला जिल्हा कारागृह).
राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक जाहीर झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कारागृह विभागाच्या वतीने अतिरिक्त पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) जालिंदर सुपेकर यांनी अभिनंदन केले आहे.