पुणे-मनोज जरांगे पाटील आज मोर्चा घेऊन मुंबईत दाखल होतील. या मोर्चाबाबत बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष म्हणाले की, या आंदोलनात तोडगा निघेल. याबाबत मला शंका आहे. तर जरांगेंच्या जेवणात जुलाबाचं औषध टाकलं जावू शकतं. त्यामुळे त्यांनी एकट्यात जेवण न करता सर्वांसमोर पंगतीत जेवण करावे, असा सल्ला आंबेडकरांनी दिला आहे.
भाजपने मराठा समाजाचा प्रश्न हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सोडला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ओबीसी समाज बांधवांना गोंजारलं जात आहे. भाजप हा माकडाचा खेळ करत असून हा खेळ ओबीसींनी ओळखायला हवा. कोणालाच आरक्षण द्यायचे नाही, तर सर्वांचे आरक्षण काढून हा भाजपचा डाव आहे. भाजप हा रामभक्त आहे, परंतु ओबीसी भक्त नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
मराठा आरक्षणाबाबत सरकार चॉकेलट देत आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही हे माहीत आहे. यामुळे सरकारने फसवाफसवी करायला नको. असे झाल्यास हा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण वेगळे आणि गरीब मराठ्यांचे आरक्षण वेगळे आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण देता येणे शक्य आहे. आरक्षणासाठी दोघे एकमेकांच्या विरोधात लढत राहणार आहे, असे करु नये.
पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात पॅरा 56 किंवा 57 मध्ये महत्वाचा मुद्दा आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा समाज श्रीमंत आहे. आमच्यासमोर तसा अहवाल आला. त्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले. हा सर्व खेळ भाजपचा आहे. अजित पवार यांचा आहे. एनसीपीचा आहे. सर्वोच्च न्यायालयापुढे असा अहवाल आला नसता तर… यामुळे यांच्यापासून गरीब मराठ्यांना सावध राहिले पाहिजे.