पुण्यात २ बड्या नेत्यांना धक्का :महापौर पद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित

Date:

मुंबई- महापौरपदाची आरक्षण सोडत आज (गुरुवारी) जाहीर झाली असून, यामध्ये पुणे आणि मुंबई महापालिकांसाठी सर्वसाधारण महिला वर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे.यामुळे महापौर पदाचे दावेदार असलेल्या २ बड्या नेत्यांना जोरदार धक्का बसला आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणे निश्चित मानले जात होते. मात्र, आरक्षण निश्चित न झाल्याने महापौरपदासाठीचे नाव जाहीर होण्यास विलंब होत होता. अखेर आज मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.

पुणे महापालिकेत यापूर्वी २०१२ आणि २०१७ या निवडणुकांमध्ये महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण होते. मात्र, यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. यामुळे महापालिकेच्या नेतृत्वात महिला सत्तेची संधी निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेत एससी महिला आणि ओबीसी पुरुष आरक्षण न निघाल्याने त्या वर्गातील इच्छुकांमध्ये नाराजी होती. मात्र, यंदाच्या सोडतीत सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत भाजपकडून अधिकृत महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

महापालिकानिहाय आरक्षणाचा प्रवर्ग
SC – 3, ST – 1, OBC – 8, Open – 17

महापौर पदासाठी आरक्षण
अनुसूचित जमातीसाठी राखीव महापालिका – कल्याण-डोंबिवली
अनुसचित जातीसाठी राखीव महापालिका – ठाणे (सर्वसाधारण), जालना (महिला), लातूर (महिला).
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला आरक्षण) – जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, अकोला.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) – पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर,
सर्वसाधारण महिला आरक्षण – पुणे, धुळे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, नांदेड-वाघाळा, मालेगाव, मीरा- भाईंदर, नागपूर, नाशिक.
सर्वसाधारण प्रवर्ग – छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, अमरावती, वसई-विरार, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी-निजामपूर.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...