अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख रुपये विम्याची रक्कम प्राप्त

Date:

पुणे- पुणे महापालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख रुपये विम्याची रक्कम प्राप्त झाली आहे.

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी र.रु.२५ लाखाचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे. याच धर्तीवर पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांसाठी वैयक्तिक अपघात विमा उतरविणेबाबत मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी विमा कंपनीस विनंती केली होती. त्यास अनुसरून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या शासकीय विमा कंपनीने र.रु.२७०/- एवढ्या अत्यल्प रकमेमध्ये कंत्राटी कामगारांसाठी १० लाखाचा वैयक्तिक अपघाती विमा देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी मनुष्यबळ पुरविणाऱ्या सर्व ठेकेदारांची बैठक बोलावून त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्याबाबतचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक ठेकेदारांनी आपल्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविला आहे.
नुकतेच मे.सिद्धीविनायक एन्टरप्रायजेस या पुणे महानगरपालिकेस कंत्राटी कामगार सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडील कंत्राटी कामगार कै.निवांत दशरथ अवसरे यांचे त्यांचे गावी जात असताना अपघात होवून निधन झाले. सदर कामगारास वैयक्तिक अपघात विम्याचे सुरक्षा कवच असल्याने पुणे महानगरपालिका व ठेकेदार संस्था यांच्या प्रयत्नाने त्यांचे पात्र वारसासाठी विमा क्लेम मान्य करून घेण्यात आला. या दिवंगत कामगाराच्या वारसास र.रु.१० लक्ष विम्याचा धनादेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) पवनीत कौर यांचे हस्ते दिवंगत कामगाराची पत्नी श्रीमती साक्षी निवांत अवसरे यांना दि.२१/०१/२०२६ रोजी देण्यात आला. यावेळी मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, उप कामगार अधिकारी बुगप्पा कोळी, ठेकेदार संस्थेचे प्रोप्रायटर श्री.दादासाहेब झेंडे तसेच दिवंगत कामगाराची पत्नी श्रीमती साक्षी निवांत अवसरे व वडील उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ठाकरेंचे 6 खासदार फुटले, लोकसभा अध्यक्षांची स्वतंत्र गटाला मंजुरी!

नवी दिल्ली- उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा...

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू

~ लाँच ऑफर: शून्य लॉगइन फी आणि ५० लाख रूपयांपर्यंत तात्काळ कर्ज मंजूरी ~ पुणे: आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“एबीएचएफएल”) या आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्‍या उपकंपनीने संपूर्ण भारतात वितरण नेटवर्कचा विस्तार करण्याच्या आपल्‍या व्यापक योजनेचा भाग म्हणून पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू केली आहे, ज्‍यासह महाराष्ट्रातील आपला विस्तार वाढवला आहे. या नवीन शाखेसह, एबीएचएफएलचे महाराष्ट्रातील एकूण नेटवर्क आता ३५ शाखांवर पोहोचले आहे, ज्यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील त्‍यांची उपस्थिती दृढ झाली आहे, तसेच ग्राहकांसाठी उपलब्धता अधिक सोपी झाली आहे. आयटी (माहिती तंत्रज्ञान), उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील प्रबळ उपस्थिती, तसेच मजबूत पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तारत चाललेली शहरी कनेक्टिव्हिटी यामुळे पुणे हे भारतातील सर्वात गतिमान निवासी बाजारपेठ राहिले आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणारे ग्राहक, पगारदार, स्वयंरोजगार असणारे व्यक्ती आणि महत्त्वाकांक्षी कुटुंबं, जी परवडणाऱ्या, अनौपचारिक आणि प्राईम हाउसिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घरांचा शोध घेत आहेत, त्यांच्याकडून गृहखरेदीसाठी सातत्याने मागणी दिसून येत आहे. आपल्या या नवीन शाखेच्या माध्यमातून एबीएचएफएल ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या गृहनिर्माण वित्त पुरवठा पर्यायांची (हाउसिंग फायनान्स सोल्युशन्स) उपलब्धता अधिक सहजसाध्य करेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैविध्यपूर्ण गृहखरेदीच्या गरजा अधिक सुलभतेने आणि सहजतेने पूर्ण करता येतील. एबीएचएफएल परवडणारी घरे, प्राईम हाऊसिंग, कन्स्ट्रक्शन फायनान्स आणि मालमत्तेवर कर्ज यांसह विविध ग्राहक घटकांसाठी तयार केलेल्या हाऊसिंग फायनान्‍स सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते. हे सोल्‍यूशन्‍स पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार व्यावसायिक, स्वयंरोजगार बिगर-व्यावसायिक आणि उदयोन्मुख उत्पन्न गटांच्या गरजा पूर्ण करतात. प्रबळ डिजिटल परिसंस्थेच्या पाठबळासह एबीएचएफएल विनासायास ऑनबोर्डिंग, जलद मंजूरी आणि सुधारित पारदर्शकता प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळतो. या लाँचच्या निमित्ताने, एबीएचएफएल शून्य लॉगइन फी सोबत ५० लाख रूपयांपर्यंतचे स्पॉट लोन सॅंक्शन (तात्काळ कर्ज मंजुरी) ऑफर करत आहे. ही ऑफर १७ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत वैध असेल, ज्यामुळे या नवीन शाखांमधील ग्राहकांना जलद आणि अधिक परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवणे शक्य होईल. या विस्तारीकरणाबाबत मत व्‍यक्त करत आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “महाराष्ट्र आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील प्रबळ मागणी आणि वाढत्या महत्त्‍वाकांक्षा पाहता ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमची प्रादेशिक उपस्थिती वाढवत आहोत. आमच्या वाढत्या वितरण नेटवर्कला प्रबळ डिजिटल क्षमतेची जोड देऊन ग्राहकांसाठी घर खरेदीचा प्रवास सोपा, जलद आणि त्रासरहित बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” आपल्या ‘हॅपी होम लोन जर्नी’ या आश्वासनाशी सुसंगत असलेला हा विस्तार एबीएचएफएलचे ग्राहक-केंद्रितता, जबाबदार कर्ज वाटप आणि वैविध्यपूर्ण व सखोल रिटेल पोर्टफोलिओच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला गती देण्यावर असणारा निरंतर भर सादर करतो.

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही-केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश पुणे -ऐतिहासिक वारसा...