पुण्यात निवडणुकीसाठी १२,५०० फौजदार आणि पोलिसांचे बळ…१५ पिस्तुलं आणि सव्वा कोटीची दारू पकडली

Date:


पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चे अनुषंगाने पुणे शहर
पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आलेल्या बंदोबस्ताचे नियोजन व
प्रतिबंधात्मक कारवाई

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ चेअनुषंगाने पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका निवडणुक प्रक्रिया आचारसंहिता लागु झाल्यापासुन निवडणुक मुक्त वातावरणात पारदर्शकपणे पार पडण्यासाठी पुणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये १४ पोलीस उप आयुक्त, ३० सहा. पोलीस आयुक्त, ०७ परिविक्षाधीन सहा. पोलीस आयुक्त, १६६ पोलीस निरीक्षक, ७२३ सहा. पोलीस निरीक्षक , पोलीस उप निरीक्षक १२,५००, पोलीस अंमलदार ३,२५० होमगार्ड व एसआरपीएफ ०४ कंपन्या असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शहराचे ८८ सेक्टर पाडण्यात आलेल्या आहेत व तेथे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. १०० पेक्षा जास्त संवेदनशील ठिकाणे निश्चित केले असुन त्याकरीता गुन्हे शाखा इतर शाखा कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
निवडणुक प्रक्रिया निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणामध्ये पार पडण्याच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये १८ स्थिर सर्वेलन्स पथके, १५ फिरते सर्वेलन्स पथके, १५ व्हिडिओ सर्वेलन्स पथके नेमलेले आहेत. स्थिर सर्वेलन्स पथकाकडुन ६७ लाख रुपये जप्त केलेले आहेत.
पुणे आयुक्तालयाकडुन भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे २०३१ कारवाई, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १२६ प्रमाणे ४०२, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १२८ प्रमाणे १६, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १२९ प्रमाणे २७८, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ (२) प्रमाणे ६२२, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १७० (१) प्रमाणे ३४, दारुबंदी कायदा कलम ९३ प्रमाणे ५६ कारवाया करण्यात आलेल्या आहेत असे एकुण ३,४३९ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये १७९ केसेस दाखल करुन त्यामध्ये १,२३,९०,०५० /- रुपये इतका किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अंमली पदार्थ कायदयान्वये १२६ ग्रॅम एमडी, ३ किलो ९४७ ग्रॅम गांजा, ७ किलो २८६ ग्रॅम नार्कोटिस्क पिल्स, २१२ टॅबलेट, ५७ ग्रॅम ७८० मिलीग्रॅम चरस असा एकण २६,८४,७२९/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मु.पो.का. कायदा कलम ५५ प्रमाणे ०१, मु.पो.का. कायदा कलम ५६ प्रमाणे ३१ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. एमपीडीए कायदया अन्वये १७ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.
आचासंहिता कालावधील भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये १५ अग्नि शस्त्रे व १५ काडतुसे जप्त करण्यात आलेले आहेत. २९ धारधार शस्त्र जप्त केलेले आहेत. शस्त्र परवाना धारकांचे ३,२९४ शस्त्रे जमा केलेली आहेत.
आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये ३१३ अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलेले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने ०६ दखलपात्र व ११ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मतदान स्लिप वाटप करणे, चांदीचे जोडवे वाटप करणे व पैसे वाटपाच्या गुन्हयामध्ये २,०६,३५०/- रु. जप्त केलेले आहेत. निवडणुक संदर्भाने हिंसाचाराचा कोणताही गुन्हा दाखल नाही. कायदा सुव्यवस्था व वाहतुकीचे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पुणे आयुक्तालमध्ये योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिवाळ्यासाठी एअर इंडियाने कॅनडाच्या उड्डाणात केली वाढ, मुंबई-टोरंटो दरम्यान नवीन विमानसेवा सुरू; तर दिल्ली-टोरंटो मार्गावर अगदी नवीन B787-9 विमानांची उड्डाणे

सुधारित केबिन इंटिरिअर्ससह मुंबई-टोरंटो दरम्यान नवीन हंगामी सेवा दिल्ली-टोरंटो विमानांमध्ये नवीन केबिन सुविधा जानेवारी 2027 पासून टोरंटोसाठी 100% नवीन किंवा सुधारित सुविधांचा वापर या हिवाळ्यात मुंबई-टोरंटो विमानसेवा चालवणारी एकमेव विमान कंपनी उच्च-गुणवत्तेचे व्हिज्युअल साहित्य येथे उपलब्ध: https://we.tl/t-GFxaVvkCxaByGoai गुरुग्राम, 01 ऑगस्ट 2026: दिल्ली-टोरंटो मार्गावर एअर इंडियाने आपले अगदी नवीन B787-9 विमान आज सेवेत रुजू केले. यामुळे एअरलाइनची अद्ययावत केबिन सुविधा आणि प्रवासादरम्यानचा उत्कृष्ट अनुभव पहिल्यांदाच कॅनडापर्यंत पोहोचणार असून, प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आधारित, एअर इंडियाने 2026-27 च्या हिवाळी हंगामासाठी कॅनडातील आपल्या सेवांचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: मुंबई आणि टोरंटो दरम्यान नवीन थेट (नॉन-स्टॉप) सेवा भारत आणि कॅनडा दरम्यानच्या एकूण प्रवासी क्षमतेत दरमहा 4,400 जागांची (सीट्सची) वाढ टोरंटोसाठीच्या प्रीमियम श्रेणीतील जागांच्या क्षमतेत 71% वाढ नवीन, हंगामी मुंबई-टोरोंटो सेवा, सुधारित अंतर्गत सजावटीसह 25 ऑक्टोबर 2026 ते 26 मार्च 2027 दरम्यान एअर इंडिया मुंबई आणि टोरोंटो दरम्यान आठवड्यातून तीन वेळा थेट विमानसेवा सुरू करणार आहे. यामुळे भारत आणि कॅनडासाठी दर आठवड्याला जवळपास 2,000 जागांची भर पडेल. तसेच या दोन शहरांदरम्यान थेट विमानसेवा चालवणारी ही एकमेव विमान कंपनी ठरेल. एअर इंडियाच्या बोईंग 777-300ईआर विमानाद्वारे ही सेवा चालवली जाईल, ज्याच्या केबिनच्या अंतर्गत सजावटीत लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रायव्हसी स्लाइडिंग डोअर्ससह 8 आलिशान फर्स्ट क्लास स्वीट्स, बिझनेस क्लासमध्ये 40 फ्लॅट बेड्स आणि इकॉनॉमीमध्ये 280 जागांचा समावेश आहे. मुंबई आणि टोरोंटो दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुधारित B777-300ER विमानात वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीचाही लाभ मिळेल. एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली येथील प्रमुख केंद्रांच्या माध्यमातून, कॅनडाला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद, कोची, लुधियाना आणि वडोदरा यांसारख्या अनेक भारतीय शहरांशी सहजपणे जोडले जाणे शक्य होते. जानेवारी 2027 पासून टोरोंटोसाठी 100% नवीन किंवा सुधारित उत्पादनांचा वापर या हिवाळ्यात एअर इंडियाच्या दिल्ली-टोरोंटो मार्गावरील 10 साप्ताहिक उड्डाणांपैकी, 7 साप्ताहिक सेवा नवीन बोईंग 787-9 विमानांद्वारे चालवल्या जातील, ज्यात एअरलाइनची नवीन केबिन प्रॉडक्ट्स असतील. उर्वरित 3 साप्ताहिक सेवा सुरुवातीला बोईंग 777-300ईआर विमानांद्वारे चालवल्या जातील आणि ताफ्यात अधिक विमाने आल्यावर जानेवारी 2027 पासून त्या नवीन बोईंग 787-9 विमानांमध्ये रूपांतरित होतील. त्यामुळे, टोरोंटोला येणाऱ्या आणि जाणाऱ्या एअर इंडियाच्या सर्व उड्डाणांमध्ये पूर्णपणे नवीन किंवा लक्षणीयरित्या सुधारित केबिन इंटिरियर्स असतील, ज्यामुळे प्रवाशांना एकसारखा प्रीमियम अनुभव मिळेल. दिल्ली आणि मुंबईहून टोरोंटोसाठी नवीन तसेच अद्ययावत विमाने तैनात केल्यामुळे, एअर इंडियाला या हिवाळ्यात टोरोंटो मार्गावरील प्रीमियम श्रेणीतील जागांची क्षमता 71 टक्क्यांनी वाढवणे शक्य झाले आहे; परिणामी प्रवाशांना फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास आणि प्रीमियम इकॉनॉमीचे अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. एअर इंडियाचे मुख्य कमर्शिअल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले: "कॅनडा ही एअर इंडियाच्या सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपैकी एक आहे. येथील लोकांचे एकमेकांशी असलेले घनिष्ठ संबंध प्रवासाची मोठी मागणी निर्माण करतात, विशेषतः सणांचे दिवस आणि सुट्ट्यांच्या काळात. या हिवाळ्यात सुरू होणारी आमची हंगामी मुंबई-टोरंटो सेवा प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोय उपलब्ध करून देईल; हा असा काळ आहे जेव्हा अनेक लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्र-परिवाराला भेटण्यासाठी प्रवास करत असतात. त्याच वेळी, उत्तर अमेरिकेच्या मार्गावर आम्ही आमची अत्याधुनिक विमाने आणि विमानातील अद्ययावत सुविधा टप्प्याटप्प्याने सादर करत आहोत. जगातील सर्वात स्पर्धात्मक अशा लाँग-हॉल अर्थात दीर्घ पल्ल्याच्या बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेत सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा संकल्प यातून सिद्ध होतो. एकत्रितपणे, हे उपक्रम एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा कंपनी बनवण्यासोबतच भारताला जगाशी जोडणारे पसंतीचे माध्यम म्हणून प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल." टोरोंटोला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमानांचे वेळापत्रक: उड्डाण #कुठून कुठेप्रस्थानआगमनकिती वेळाविमानAI187दिल्ली-टोरांटो0145 Hrs0930 Hrsदररोजएकदम नवीनB787-9AI188टोरांटो-दिल्ली1230 Hrs1405 Hrs (+1)दररोजAI189दिल्ली-टोरांटो1025 Hrs2135 Hrsबुध, शुक्र, रविB777-300ERAI190टोरांटो-दिल्ली0035...

अमित शाह पुण्यात येणार म्हणून मध्यरात्री काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी

अक्षय जैन यांनी व्यक्त केला संताप पुणे, दि. १ ऑगस्ट...

१८ कथित बोगस अभियंत्यांना पदोन्नतीचे आदेश; ‘आप’चा गंभीर आरोप

उच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावला पुणे महापालिका प्रशासनाने...