यावेळी निवडणुकीत: दुबई धमाका…ज्युपिटर धमाका… ‘जागर स्त्री शक्तीचा,खेळ सौभाग्यवतीचा’ हे ग्रँड आकर्षण

Date:

पुणे – महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्यापूर्वी अनेक माजी नगरसेवक, इच्छुक यांच्याकडून गेल्या महिनाभरापासून मतदारांना उत्तुंग भराऱ्या घ्यायला लावणाऱ्या सहली,आणि कार्यक्रमांचे आयोजने दिमाखात मंत्री महोदयांच्या उपस्थितीत होत असून आज असाच एक पण लक्षवेधी ठरेल असा कार्यक्रम दक्षिण पुण्यातील अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, नगरसेविका असलेल्या दाम्पत्याचे सुपुत्र जे निवडणूक लढविणार आहेत,त्यासाठी उमेदवारी मागत आहेत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे. जो सायंकाळी ५ वाजता होत आहे.दोघांना दुबई ची सहल, ९ जणांना ज्युपिटर, या शिवाय LED टीव्ही,फ्रीज,वाशिंग मशीन,साड्या,कुलर,शेगड्या अशी बक्षिसांची मोठ्ठी लय लुट ठेवण्यात आली आहे. प्रभाग ३९ मध्ये अप्पर सुपर पाण्याचे टाकी समोरील मैदान,अप्पर डेपो येथे आज हा लकी ड्रो काढण्यात येणार आहे.

दरम्यान प्रभाग ३६ मधून अनेक सहली गेल्या असून आता एका ने घरोघरी कॅलेंडर वाटप केले आहे.सुमारे २० हजार कॅलेंडर चे वाटप झाले आहे.

वारजे भागात प्रभाग ३० मधून देखील यापूर्वीच एका कार्यक्रमातून माजी नगरसेवकाने अशा पद्धतीने दुचाक्या,फ्रीज,वाशिंग मशीन वाटले असून लाडक्या बहिणीची आता सध्या तरी चंगळ सुरु आहे.त्याच बरोबर लहान मुलांसाठी देखील काही कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भेळपुरी रगडा पुरी,स्वीट डिशेश खायला ठेऊन,खेळण्या आणून कौटुंबिक कार्यक्रमांची लय लुट सुरु आहे.

विशेष म्हणजे जी मंडळी निवडणूक लढविणार आहेत त्यांच्याकडून हि आतिषबाजी होत असल्याने आता नाताळच्या सुट्टीत तिला आणखी बहर येत आहे .उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत त्यांच्या या खर्चाबाबत त्यांना कोणीही विचारणार नसल्याने बिनदिक्कत जाहिराती करत ते सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर मात्र हे कार्यक्रम बंद होती. आणि झाले तर त्याची नोंद निवडणूक आयोग घेईल.तोवर होऊ देत खर्च..आणि लोकही होऊ देत ऐश या पद्धतीने आनंद घेतआहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत २८,८४० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार !

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दहा वर्षांत सुमारे चार कोटी नव्या...

HCMTR आणि ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पांना गती; भूसंपादनातील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय

HCMTRच्या मार्गात १२ बदल; पीएमआरडीएच्या ८३ किलोमीटर रिंग रोडची...

आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय; मुलगी जिजाच्या संगोपनाची जबाबदारी...