शनिवारवाडा प्रांगणात ग्राम गुढी उभारून आनंदोत्सव

Date:

श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, बटाट्या मारुती ट्रस्ट आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : ढोल-ताशांचा गजर… रांगोळी, मंदिराला तोरण… पारंपरिक वेशात महिला पुरुष मुले… आणि पुष्पवृष्टी करीत ग्राम प्रदक्षिणा व ग्राम गुढीची उभारणी ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि रामनामाच्या गजरात संपूर्ण परिसर राममय झाला होता.

श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, बटाट्या मारुती ट्रस्ट आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार वाड्यावरील बटाट्या मारुती मंदिर येथे  ग्रामप्रदक्षिणा व ग्रामगुढी उभारण्यात आली. यावेळी  पुणे इस्कॉनचे अनंत गोपदास, रा.स्व. संघ पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा विभाग कार्यवाह राहुल पुंडे, रोटरी क्लब पुणे चे अध्यक्ष नरेंद्र पालसिंह बक्षी, श्रीराम पथकाचे विलास शिगवण, महेश शेठ, राहुल बोरा, नचिकेत फडके, देवेंद्र आठवले, अश्विनी देवळणकर, बटाट्या मारुती ट्रस्टचे योगेश समेळ, संजय पांडे यावेळी उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत नागरिकांना कृत्रिम हत्तीवरून साखर वाटण्यात आली.  

पुणे इस्कॉनचे अनंत गोपदास म्हणाले, आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे. या राष्ट्राचे दोन आत्मे आहेत प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण. जगावे ते श्रीरामासारखे आणि युद्धनीतीचा अवलंब करावा तो श्रीकृष्णासारखा. व्यक्तिगत जीवनात रामाप्रमाणे आणि समाज जीवनात कृष्णाप्रमाणे जगलो, तर भारत देश जगावर राज्य करेल. आज रामलल्ला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे’ हा नारा आपण पूर्ण केला परंतु अयोध्या तो बस झांकी है, काशी मथुरा बाकी है… हा नारा अजून पूर्ण करायचा आहे हे विसरू नका.

रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा अयोध्येला आले तेव्हा गुढ्या उभारून दाराला तोरण लावून त्यांचे स्वागत झाले. ती गुढी आज आपण ऐतिहासिक शनिवार वाडा येथे उभी केली आहे. ही गुढी म्हणजे श्रीरामांच्या अयोध्या आगमनाची आहे तशीच ती त्यांच्या प्राणप्रतिष्ठेची देखील आहे. ही प्राणप्रतिष्ठा म्हणजे श्रीरामांच्या आदर्शाची आपल्या मनामध्ये उभारणार आहे. प्रभू श्रीराम म्हणजे आपल्या देशाच्या अस्मितेचे, गौरवाचे प्रतीक, राष्ट्र मंदिराच्या प्राणाचे प्रतीक आहे. आज प्रभू श्रीरामांच्या आदर्शाची प्राणप्रतिष्ठा देशात नव्हे तर जगात लक्ष लक्ष ठिकाणी होत आहे. प्रभू श्रीरामांचे जीवन मूल्य जगण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे, असे ही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

US सिनेटमध्ये इराण युद्धाविरोधात प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

सिनेटच्या ठरावावर ट्रम्प यांची टीका; होर्मुझमधील जहाजांची वर्दळ तिप्पट,...

बरसो रे ..धरण क्षेत्रात ..मेघा..मेघा ….

पुण्यात रात्रभर ‘टिप टिप बरसा’ ; धरणांतील पाणीसाठा वाढीची...

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

सह धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश पुणे : कै. सौ. लक्ष्मीबाई...

देवेंद्र फडणविसांची तथाकथित दैवीशक्ती शेतकरी, महिला व तरुणांचे प्रश्न सोडवताना कुठे जाते?

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसचा शेतकरी मेळावा...