महिंद्राने लाँच केली  XEV 9S — भारतातील नवी मोठी इलेक्ट्रिक ७-सीटर SUV

Date:

किंमत  ₹ 19.95 लाखांपासून

●        स्टायलिश, अस्सल SUV – अतिशय शांत आणि स्मूथ रायडिंग अनुभवासह

●        INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित, MAIAच्या बुद्धिमत्तेवर चालणारी

●        SUVs/MPVsच्या तुलनेत सर्वोत्तम स्पेस (Best in Space)

●        70 kWh बॅटरीची ओळख — वर्गातील सर्वोत्तम 180 kW पॉवर आणि 380 Nm टॉर्क

●        एकूण 6 व्हेरिएंट्स; टॉप–एंड ‘Pack Three Above 79 kWh’ ची किंमत एक्स–शोरूम ₹29.45 लाख

●        बुकिंग्स सुरू: 14 जानेवारी, 2026

●        डिलिव्हरी सुरू: 23 जानेवारी, 2026

बेंगळुरू, 27 नोव्हेंबर, 2025 : आजच्या धकाधकीच्या जीवनात एक गोष्ट आपल्याला जवळजवळ मिळतच नाही — ती म्हणजे स्पेस… थांबण्यासाठीची स्पेस, विचार करण्याची स्पेस, स्वतःसारखे राहण्याची स्पेस, आणि आपल्या प्रिय लोकांसोबत असण्याची स्पेस. आज ही हरवलेली भावना महिंद्रा परत आणत आहे — एका अर्थपूर्ण, ताज्या अनुभवासह: XEV 9S, भारताची पहिली इलेक्ट्रिक-ओरिजिन 7-सीटर SUV, जी INGLO आर्किटेक्चरवर जमिनीपासून उभी करण्यात आली आहे.

XEV 9S भारताची ‘मोठी नवी इलेक्ट्रिक’ म्हणून येत आहे — एक धाडसी कल्पना, जी स्मार्टपणे डिझाइन केलेल्या, प्रशस्त SUVमध्ये रूपांतरित केली आहे, त्या लोकांसाठी ज्यांचे जीवन, स्वप्ने आणि रोजचे प्रवास अधिक मोठे होत आहेत.

ही SUV कुटुंबे, निर्माते, प्रवासी आणि प्रत्येक भारतीयासाठी आहे — ज्यांना त्यांच्या कारमध्ये एकच गोष्ट हवी आहे:

जे करायचे आहे आणि जे बनायचे आहे, त्यासाठी भरपूर स्पेस.

MAIA या भारतातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह बुद्धिमत्तेने चालणारी आणि महिंद्राच्या अभिव्यक्तीपूर्ण डिझाइन फिलॉसॉफीने साकारलेली XEV 9S ही फक्त एक नवी गाडी नाही — ती इलेक्ट्रिक स्वातंत्र्याची एक नवी भावना निर्माण करते.

नवी मोठी इलेक्ट्रिक SUV

विशाल केबिन, स्मार्ट थ्री-रो इलेक्ट्रिक लेआउट, अतिशय शांत ड्राइव्ह आणि खुलेपणाची खास भावना — या सगळ्यांमुळे XEV 9S ही गाडी कुटुंबे, प्रवासी, निर्मात्यांना आणि रोज प्रवास करणाऱ्या भारतीयांना आतापर्यंत न मिळालेला आरामदायी अनुभव देते. बिनशर्त आराम. कोणतीही तडजोड नसलेली स्पेस. आणि लहान न वाटणारी इलेक्ट्रिक SUV.

आर. वेलूसामी, प्रेसिडेंट – ऑटोमोटिव्ह बिझनेस, महिंद्रा अँड महिंद्रा लि. आणि मॅनेजिंग डायरेक्टर, महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लि. म्हणाले: “तंत्रज्ञान तेव्हाच अर्थपूर्ण ठरते, जेव्हा ते माणसांच्या शक्यता वाढवते, असा आमचा विश्वास आहे. INGLO इलेक्ट्रिक–ओरिजिन प्लॅटफॉर्मवर तयार केलेली XEV 9S हेच करते — इतरांपेक्षा जास्त स्पेस देते आणि अतिशय स्मूथ, आवाजमुक्त राईड देते. MAIA ब्रेनमुळे या SUV ला अनेक हाय–टेक फीचर्स मिळतात आणि त्यामुळे आपल्या किमतीत ही सर्वात प्रगत SUV ठरते.”

नलिनीकांत गोल्लागुंटा, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – ऑटोमोटिव्ह डिव्हिजन, महिंद्रा अँड महिंद्रा लि. आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लि. म्हणाले:

“भारतीय मोबिलिटीचे भविष्य त्या ब्रँड्सचे असेल जे फक्त इलेक्ट्रिक वाहनं तयार करत नाहीत, तर संपूर्ण श्रेणीचाच नव्याने विचार करतात. XEV 9S सोबत आम्ही फक्त EV सेगमेंटमध्ये खेळत नाही — आम्ही त्याला व्यापक करत आहोत. ही SUV महिंद्रासाठी एका नव्या, मोठ्या इलेक्ट्रिक युगाची सुरुवात आहे — जे स्केलवर, उद्देशावर आणि भारत कसा प्रवास करतो याच्या खोल समजुतीवर आधारित आहे. ₹19.95 लाखांच्या आकर्षक प्रारंभिक किंमतीपासून हे हाय–टेक उत्पादन अधिक लोकांसाठी उपलब्ध होते. बुकिंग्स 14 जानेवारीपासून सुरू होतील आणि डिलिव्हरी 23 जानेवारीपासून सुरू होईल.”

प्रताप बोस, चीफ डिझाइन आणि क्रिएटिव्ह ऑफिसर – ऑटो आणि फार्म सेक्टर्स, महिंद्रा अँड महिंद्रा लि. म्हणाले: “XEV 9S डिझाइन करणे म्हणजे फक्त गाडीवर रेषा काढणे नव्हते, तर भावनांना आकार देणे होते. आम्हाला हे डिझाईन असे बनवायचे होते की आत पाऊल टाकताच ते आपले वैयक्तिक, शांत जागेसारखे वाटावे—आणि त्याच वेळी आधुनिक भारताची झलकही त्यात असावी. इलेक्ट्रिकने आम्हाला कॅनव्हास दिला; INGLO ने प्रकाश, स्पेस आणि आराम यांना मनासारखे आकार देण्याची मोकळीक दिली.

“परिणाम असा की, ही SUV आपले मोठेपणही सुंदरपणे दाखवते आणि आपले तंत्रज्ञान साधेपणाने मांडते. ती अभिव्यक्त आहे, शांत आहे आणि पूर्णपणे महिंद्राची ओळख जपते. ज्याच्या आकांक्षा दररोज मोठ्या होत आहेत, त्या भारतासाठी ही गाडी तयार आहे,

जागेला नवा आकार

XEV 9S ही महिंद्राच्या Heartcore Design फिलॉसॉफीची जिवंत प्रतिमा आहे. तिची दमदार उभी रचना, स्वच्छ आणि आकर्षक रेषा, ग्लॉसी फिनिश, तंत्रज्ञानाने भरलेली प्रशस्त केबिन आणि परफेक्ट प्रपोर्शन्स — हे सर्व मिळून एकच भावना देतात : ही खऱ्या अर्थाने प्रीमियम SUV आहे, जी स्पेस आणि उद्देश या दोन्हींची कमाल अनुभूती देते. XEV 9S म्हणजे चाकांवर फिरणारी शांत, सुसंस्कृत स्टाइल आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशातील सर्वांत मोठ्या SBI बँकेने प्रभावित ग्राहकांना माहिती दिली कि नाही ? शेअर मार्केटला ५ दिवसांनी कळवले

३.७५ लाख नोंदींच्या कथित डेटासंचातून ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती...

केदारनाथमध्ये हिमवृष्टीने थंडीचा कडाका; केरळमध्ये दरड कोसळून एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले!

मध्य प्रदेशात मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा; उत्तराखंडच्या...

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या १९१ पोलीस वीरांना पुण्यात मानवंदना; पोलीस स्मृतिदिनी शोक कवायत

पाषाण येथील पोलीस हुतात्मा स्मारकावर पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर...

विजयादशमी निमित्त पराक्रमी सेनाधिकारी सन्मान सोहळा

सैनिक मित्र परिवार, पुणे च्या वतीने आयोजन ; निवृत्त...