व्हिडीओ व्हायरल करणारे मूर्ख लोक
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळालं. नाना पटोलेंनी अजित दादांना तुम्ही वयाबद्दल शरद पवारांना सांगण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगून बघा, असे वक्तव्य केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत अजित दादा म्हणाले- नानाला म्हणावं, तू किती पक्ष फिरून आला, हे आम्हाला माहीती आहे. तू मला कशाला शिकवतो. मुंबईत झालेल्या महिला निर्धार मेळाव्यानंतर बोलतांना अजित दादांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलं.
अजित पवारांनी मोदींनाही त्यांचे वय झालंय असं बोलावे अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले की, वय आपल्या सगळ्यांचे होणार आहे. परंतु ज्यावेळी होईल तेव्हा विचारू ना. 80 च्या पुढे गेल्यावर विचारू. आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसण्याचे कारण नाही. नाना, तू किती पक्ष फिरून आलाय आम्हाला माहिती आहे. तू कशाला आम्हाला शिकवतो असं त्यांनी म्हटलं.
आम्ही ज्या गाडीत बसलो, त्यात दाटीवाटीनं बसलो असा व्हिडिओ व्हायरल केला ते मुर्ख लोक आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात प्रत्येक गाडीत कुणी बसायचे, हे सगळे ठरलेले असते. आमचे सहकारी गिरीश महाजन यांना गाडी राहिली नाही, ताफा निघून गेला. त्यामुळे मी त्यांना गाडीत बसायला सांगितले. आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाही. सगळ्यांना पुढे घेऊन जाणारी माणसं आहोत. त्यामुळे अशा गोष्टींना फार महत्त्व देण्याची गरज नाही. जर आम्ही दोघेच बसलोय आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही घेत नाही असं झाले नाही. दुर्दैवाने जे असे व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यांची कीव येते. तुम्हाला बोलायचेच झाले तर विकासाबाबत बोला. जे गाडीत बसलेत त्यांना त्रास नाही, पण या लोकांना त्रास व्हायला लागला आहे, असं प्रत्युत्तर अजितदादांनी विरोधकांना दिलं.
काय म्हणाले होते नाना पटोले?
नाना पटोले म्हणाले होते की, वयोमानाच्या मर्यादा भाजपाने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वतः पद सोडलेले नाही. अजित पवार यांच्यात हिंमत असेल, तर आता पंतप्रधान मोदींना निवृत्त व्हा, असे त्यांनी बोलून दाखवावे. मग बघा त्यांचा 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो.