टाटा टेक्नॉलॉजीजने इन्होवेन्ट 2023 चे विजेते घोषित केले, सर्व अंतिम स्पर्धकांना करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या

Date:

·         टाटा टेक्नॉलॉजीज इन्होवेन्ट ही जुलै 2023 मध्ये भारतातील तरुण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी तसेच त्यांची सृजनशीलता प्रदर्शित करणे आणि इलेक्ट्रिक वाहने, ऑटोनॉमस वाहने, सायबर सुरक्षा, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (GAI), आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) यांसारख्या क्षेत्रांत नावीन्यपूर्ण शोध लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता सुरु केली होती

·         हॅकाथॉनमध्ये भारतातील 229 महाविद्यालयांमधील 2,696 नवोदित अभियंत्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसला आणि त्यांनी 814 अद्वितीय प्रकल्प सादर केले, ज्याचा शेवट अंतिम डेमो डेमध्ये झाला

·         ग्रँड फिनाले डेमो डेचे आयोजन टाटा टेक्नॉलॉजीजच्या हिंजवडी, पुणे येथील मुख्यालयात करण्यात आले होते, जेथे शीर्ष 10 संघांनी त्यांच्या प्रोटोटाइपसह प्रेक्षकांना प्रभावित केले

·         पहिल्या तीन विजेत्या संघांना 4.5 लाख रुपयांची रोख बक्षिसे मिळाली आणि सर्व 10 सर्वोत्कृष्ट अंतिम स्पर्धकांना टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये करिअरच्या संधी देण्यात आल्या

·         टाटा टेक्नॉलॉजीजच्या विषय तज्ञांनी (SMEs) 590 तासांहून अधिक कालावधीत मार्गदर्शन केले – कार्यशाळा घेतल्या आणि प्रकल्प संघांना प्रशिक्षण दिले जेणेकरून ते आपल्या कल्पना पुढे नेऊ शकतील

पुणे18 जानेवारी 2024: जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजने इन्होवेन्ट हॅकॅथॉनच्या पहिल्या आवृत्तीच्या यशस्वी समारोपाची घोषणा केली आहे. हे एक नाविन्यपूर्ण व्यासपीठ आहे जे भारतातील तरुण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांची सृजनशीलता प्रदर्शित करण्याची आणि उत्पादन उद्योगासमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्याची संधी देते. ही संकल्पना कंपनीच्या शैक्षणिक योजनेशी संबंधित महत्वपूर्ण असा टप्पा आहे आहे, ज्यामुळे भारतातील युवा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य आणि सृजनशीलता निर्माण करण्यास मदत होऊ शकते, आणि त्यांना उत्तम करिअर्स घडवण्याकरता साहाय्य करू शकते. सर्वोत्कृष्ट 10 संघांनी हिंजवडी, पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजीज मुख्यालयात झालेल्या डेमो डे मध्ये भाग घेतला जिथे त्यांनी त्यांचे नाविन्यपूर्ण प्रोटोटाइप्स सादर केले आणि प्रेक्षकांना प्रभावित केले. अंतिम मूल्यमापन श्री. वॉरेन हॅरिस, सीईओ आणि एमडी – टाटा टेक्नॉलॉजीज, श्री. रवी अरोरा, वरिष्ठ उपाध्यक्ष व हेड, ग्रुप इनोव्हेशन – टाटा सन्स, श्री. स्वेन पॅटुश्का, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर – टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड, आणि श्री. ज्योतिन कुट्टी सस्ताभवन, चीफ सस्टेनॅबिलिटी ऑफिसर – टाटा मोटर्स यांच्या प्रतिष्ठित परीक्षक मंडळाद्वारे करण्यात आले.

बन्नरी अम्मान इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, इरोड, मधील विजयी संघ रोलेक्सला त्यांच्या नाविन्यपूर्ण ‘जेनेरेटिव्ह एआय फॉर कार डिझाईन – अनलीशिंग क्रिएटिविटी अँड एफिशिएंसी इन ऑटोमोटिव स्टाइलिंग’ इनोव्हेशनसाठी रुपये 3,00,000/- चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आरवीसीई, बँगलोर, मधील संघाने त्यांच्या इनोव्हेशन ‘डिझाईन अँड डेवलप ऍन ऑटोनोमस इलेक्ट्रिक वेहिकल (एइवी) फॉर इंडियन रोड्स’ साठी दुसऱ्या क्रमांकाचे रुपये 1,00,000/- चे रोख बक्षीस जिंकले. तिसरे बक्षीस 50,000/- रुपये वीआईटी, वेल्लोर, मधील थंडरबोल्ट संघाने त्यांच्या इनोव्हेशन ‘बॅटरी सिस्टिम अँड पम्पिंग स्टेशन फॉर बस यूझिंग वनैडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी’ साठी जिंकले. त्यांच्या प्रतिभेची ओळख त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्यात दिसून येते, त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीजने सगळ्या सर्वोत्कृष्ट 10 अंतिम स्पर्धकांना त्यांच्यासोबत करिअर सुरू करण्याची संधी दिली.

टाटा टेक्नॉलॉजीज इन्होवेन्ट सत्कार समारंभात बोलताना, श्री वॉरेन हॅरिस, एमडी आणि सीईओ – टाटा टेक्नॉलॉजीज म्हणाले, “टाटा टेक्नॉलॉजीजचे ‘इंजीनियरिंग ए बेटर वर्ल्ड’ हे उद्दिष्ट आमच्या पर्यावरणीय स्थिरतेसाठी नवनवीन ई-मोबिलिटी सोल्यूशन्स निर्माण करण्याच्या प्रतिबद्धतेचे प्रतिनिधित्व करते, ज्यात आमच्या संपूर्ण इकोसिस्टम समवेत अकॅडेमियादेखील सहभागी असते. इन्होवेन्ट हॅकॅथॉनसाठी प्रकल्प आमंत्रित करताना आम्ही प्रत्यक्ष जगातील काही आव्हाने विचारात घेतली आणि इनोव्हेटिव्ह इंजिनिअर्सनी या समस्यांसाठी जे नाविन्यपूर्ण आणि कमी खर्चिक उपाय योजले, ते फार प्रेरणादायी होते. याकरता मी सर्व विजेत्यांचे आणि सहभागींचे अभिनंदन करतो ज्यांनी अशी सृजनशील प्रतिभा आणि समस्यांचे नाविन्यपूर्ण समाधान करण्याकरता आवश्यक असा ‘कॅन-डू अटिट्यूड’ दाखवला.”

तरुण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण संस्कृती तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना, श्री संतोष सिंह, ईव्हीपी आणि ग्लोबल हेड, मार्केटिंग आणि बिझनेस एक्सिलेन्स – टाटा टेक्नॉलॉजीज म्हणाले, “एक मानवी ब्रँड म्हणून, आम्ही आमच्या ग्राहकांना भेडसावणाऱ्या व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्याकरता आवश्यक असे नवनवीन उपाय आणि उत्तम अनुभव देण्यावर भर देतो. आधुनिक काळातील विद्यार्थी पुढील काही वर्षांत काही सर्वात मोठे उपाय शोधतील. या तरुण अभियांत्रिकी मनांना पाठिंबा देणे, मार्गदर्शन करणे आणि त्यांना सक्षम करणे, त्यांना यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या तरुण नवोदितांनी दाखवलेला उत्साह आणि सर्जनशीलता आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे, आणि त्यांनी उत्तम जगाची निर्मिती करण्याच्या आमच्या  विश्वासात आणखी भर टाकली आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही विजेत्यांना फक्त रोख बक्षिसे आणि ज्ञानच नव्हे तर सर्व अंतिम स्पर्धकांना नोकरीच्या संधीही देऊ शकलो.”

टाटा टेक्नॉलॉजीज विजेत्या संघांचे हार्दिक अभिनंदन करते आणि इन्होवेन्ट हॅकॅथॉनच्या अभूतपूर्व यशासाठी सर्व सहभागींचे त्यांच्या असाधारण योगदान आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करते. 


टाटा टेक्नॉलॉजीजबद्दल:
टाटा टेक्नॉलॉजीज (BSE: 544028, NSE: TATATECH) ही एक जागतिक उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी आहे जी ग्राहकांना चांगली उत्पादने आणि उत्तम अनुभव देऊन सबंध जगाला चालना, उड्डाण करणे, तयार करणे आणि शेती करण्यास मदत करण्याचे आमचे ध्येय पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते. आम्ही त्या सर्व व्यवसायांचे भागीदार आहोत ज्यांच्यामध्ये काहीतरी उत्तम करण्याची प्रबळ इच्छा असते. उत्पादक कंपन्या उत्तम, सुरक्षित, आणि स्वच्छ उत्पादने तयार करण्यासाठी आणि त्यांच्या सर्व भागधारकांकरता जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आमच्यावर अवलंबून असतात, ज्यामुळे आमचे #EngineeringABetterWorld हे उद्दिष्ट साध्य होण्यात मदत होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....