प्रभू रामाला समर्पित ‘श्रीरामार्पण ‘ हा लतादीदींचा शेवटचा श्लोक
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी लतादीदींची कमी जाणवेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले…
मुंबई दिनांक १७ जानेवारी २०२४
भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांनी प्रभू रामाला समर्पित ‘श्रीरामार्पण ‘ हा शेवटचा श्लोक गायला होता. त्या श्लोकाचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केला. संपूर्ण देशवासीय २२ जानेवारीची वाट पाहत असून याप्रसंगी आम्हाला लतादीदींची कमी जाणवेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
श्रीरामार्पण श्लोकाची रचना बुध कौशिक ऋषींची आहे. संगीतकार मयुरेश पै तर व्हिडिओ निर्मिती श्वेता परुळकर यांची आहे. या व्हिडिओला युट्युबवर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी लतादीदी असायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी युट्युब कमेंट बॉक्समध्ये व्यक्त केली आहे. लतादीदींच्या आवाजातील हा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम भक्तांनी आभार मानले आहेत.