कर्णबधिर आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत सुहृद मंडळ प्रथम

Date:

विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे : कर्णबधिर विद्यार्थ्यांची आंतरशालेय एकांकिका स्पर्धा
पुणे : विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत हडपसरच्या सुहृद मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांनी मुलगी वाचवा ही एकांकिका सादर केली. घोले रस्त्यावरील पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे स्पर्धा संपन्न झाली.

स्पर्धेचे उद्घाटन अश्विनी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अ.ल. देशमुख, विद्या महामंडळ संस्थेचे कार्यवाह लिलाधर गाजरे, मुक बधिर विभागाचे महेंद्र अर्विकर व अश्विनी जोशी ,स्वाती साळवी, सुनीता  भांडगे , प्रवीण कदम हे उपस्थित होते. स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण प्रख्यात नाट्य व कला क्षेत्रातील मान्यवर, विनिता पिंपळखरे आणि सुधांशु पानसे आणि उषा उंडे यांनी केले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जोशी यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ विद्या महामंडळ संस्थेचे अध्यक्ष राम रानडे व रोटरी क्लब ऑफ शिवाजी नगरच्या सदस्या रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचे सांघिक प्रथम पारितोषिक हडपसरच्या सुहृद मंडळाला मिळाला मिळाले असून त्यांनी ‘मुलगी वाचवा’ ही एकांकिका सादर केली. अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टला द्वितीय पारितोषिक मिळाले असून त्यांनी ‘शब्दाविना बंध आनंदाचे’ ही एकांकिका सादर केली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन भांडारकरच्या सुहृद मंडळाचे अर्जुन मोरे यांना मिळाले, सर्वोत्कृष्ट लेखन धायरीच्या सुहृद मंडळच्या मोबाईल चांगले काम करतो या एकांकिकेला मिळाले. सर्वोत्कृष्ट नेपथ्य चिंचवडच्या मूकबधिर विद्यालयाला ‘बुद्धीची चातुर्य कथा’ या एकांकिकेला मिळाले. सर्वोत्कृष्ट संगीत अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टला तर सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून हडपसरच्या सुहृद मंडळाच्या वैष्णवी म्हस्के हिला ‘सून’ या पात्रासाठी मिळाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...