‘ग्लोबल गणेश फेस्टिवल’मध्ये परदेशी नागरिकांसाठी दोन दिवस हेरिटेज वॉक व गणपती दर्शन; २०० जणांचा उत्स्फूर्त सहभाग

Date:

पुणे: पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे पेशवेकालीन त्रिशुंड गणपती मंदिर, ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन व इतिहास जाणून घेत, श्रीमंत भाऊ रंगारी भवनातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अनुभवतानाच श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन आणि पुण्याच्या गणेशोत्सवाची भव्यता, ऐतिहासिक ठेवा पाहून परदेशी पाहुणे हरखून गेले.

निमित्त होते, राष्ट्रप्रथम ट्रस्ट, सदैव फाउंडेशन व अमित फाटक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्लोबल गणेश फेस्टिव्हल अंतर्गत पुण्यात शिकणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकचे! महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सांस्कृतिक विभागाचे या महोत्सवाला विशेष सहकार्य लाभले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांत शिकणाऱ्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांसाठी हा हेरिटेज वॉक व गणपती दर्शनाचे आयोजन केले आहे.

उपक्रमाच्या पहिल्या दिवशी आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, युगांडा, घाना, तुर्कीस्थान, कझाकिस्थान, भूतान, नेपाळ, म्यानमार आदी देशांतील जवळपास २०० नागरिक सहभागी झाले. पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, उपसंचालक शमा पवार, फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अनिरुद्ध येवले, समन्वयक महेश साने, कार्यकारी अधिकारी ऋषिकेश कायत, प्रसिद्धीप्रमुख जीवराज चोले, चिन्मय वाघ, त्रिशुंड गणपती मंडळाचे सचिन पवार, सोहम पवार आदी उपस्थित होते.

दुपारी २ वाजता सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर येथून या हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. तत्पूर्वी याठिकाणी पारंपरिक पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. त्रिशुंड गणपतीचे दर्शन घेऊन मंदिराचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घेतला. श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा यांच्या वतीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर झाली. इटली येथील अभिनेत्री एना मारा यांनीही मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करत लक्ष वेधून घेतले. टाळ्यांची उत्स्फूर्त दाद देत अनेकांनी हा अविस्मरणीय क्षण आपल्या डोळ्यांत अन कॅमेरात साठवून घेतला.

ग्रामदैवत कसबा गणपतीचे उत्सव मंडपात दर्शन घेतल्यानंतर मूळ मंदिराविषयी माहिती घेतली. एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या प्रांगणात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योजक पुनीत बालन यांनी परदेशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीचे दर्शन, तसेच ऐतिहासिक भाऊ रंगारी भवनाची माहिती घेत स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जाणून घेतली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची भव्यता अनुभवत, गर्दीतून मार्ग काढत परदेशी विद्यार्थ्यांनी बाप्पाची आरती केली. 

गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मंडई ते स्वारगेट अशी मेट्रो सफारी घडवण्यात आली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेतला. शुभारंभ लॉन्स येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने हेरिटेज वॉकची सांगता झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात पुण्यात आम आदमी पार्टीचा बैलगाडी मोर्चा

सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला आम आदमी पार्टीचे...

पुण्यात पहिली ‘रोबोटिक-आसिस्टेड’ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी.पारंपारिक ‘ओपन-हार्ट’ सर्जरीला आधुनिक पर्याय

पिंपरी,पुणे दि २५ मे, २०२६- पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुण्यात पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीला (Open-Heart Surgery) हा एक सुरक्षित, जलद आणि आधुनिक पर्याय ठरला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका ४६ वर्षीय महिलेला 'रुमॅटिक हार्ट डिसीज' (Rheumatic Heart Disease - RHD) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाच्या झडपांना (व्हॉल्व्हला) होणारा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा मिट्रल व्हॉल्व्ह म्हणजे 'रक्तप्रवाह नियंत्रित करणारा पडदा खराब झाला होता. हा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती. पारंपारिक पद्धतीनुसार, अशा शस्त्रक्रियेसाठी छातीचे हाड (Breastbone) मधोमध कापून 'ओपन-हार्ट सर्जरी' करावी लागते. यामध्ये रुग्णाला खूप जास्त वेदना होतात, बरे होण्यास अनेक महिने लागतात आणि छातीवर मोठी जखम (डाग) राहते. पारंपारिक पद्धतीला फाटा देत डीपीयूच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये छातीचे मुख्य हाड न कापता, बरगड्यांच्या मधून लहान छिद्र पाडून ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. हाडांना कोणतीही इजा न झाल्यामुळे पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीच्या तुलनेत रुग्णाचा त्रास आणि वेदना खूपच कमी झाल्या. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णामध्ये अतिशय जलद सुधारणा झाली आणि ती अवघ्या काही दिवसांतच स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. या शस्त्रक्रियेनंतर छातीवर कोणताही मोठा किंवा विद्रूप डाग राहिला नाही, एकंदरीत, कमीत कमी त्रासाच्या या सुरक्षित उपचारामुळे रुग्ण अवघ्या अवघ्या दोन आठवड्यांतच आपल्या नेहमीच्या कामावर परतणे सहज शक्य झाले. "डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पहिली ऐतिहासिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. वेणूराज वारके आणि यांच्या बहुविभागीय तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःहून चालण्या-बोलण्यास आणि दैनंदिन हालचाली करण्यास सक्षम झाला. तिसऱ्या दिवशी रुग्णाने हॉस्पिटलच्या जिममधील पुनर्वसन (Rehabilitation) सुविधेतही सहभाग घेतला. महिन्यांऐवजी अवघ्या काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे निरोगी व्यक्तीसारखा धावपळ करू लागला. "पुण्यातील पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नेहमीच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा मेळ घालून रुग्णांना सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे." – मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) "हा टप्पा आमच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाची साक्ष देतो. आम्ही हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, ECMO अशा सर्व प्रगत कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया करत आहोत. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावला आहे."...

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे-ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम...

बड्यांची बडी हॉटेल्स ,पब रात्री दीड वाजेपर्यंत अन..खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, ठेले रात्री १० च्या आत बंद

पुणे- शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स,...