पुणे-गेल्या काही वर्षांत एकूणच बॉक्सिंग क्रीडाप्रकाराबाबत या खेळात येणा-या पिढीचा व खासकरुन त्यांच्या पालकांचा दृष्टीकोन बदलला आहे. पालकही मुलांना स्वतःच सर्वच बाजूला ठेऊन प्रोत्साहन देताना दिसतात. पण या खेळासाठी आपल्याकडे पुरेशा संस्था, गावपातळीवर खेळाडू तयार करण्याची क्षमता आहे का हे हि पाहायला हवे. त्यासाठी हौशी संस्थांनी पुढे येऊन राज्य, जिल्हा पातळीवर विविध खेळाडूंना एकत्र करून खेळाडूंना प्लॅटफॉर्म करून देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.असे मत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी येथे व्यक्त केले आहे.
आज पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन च्या वतीनं प्रॅक्टिस बाउन्स सेशन चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन कार्याध्यक्ष चे भरतकुमार व्हावळ, छत्रपती पुरस्कार विजेते सलमान शेख, पुणे शहर रिंग ऑफिशियल कमिशन चे चेअरमन श्री.सुरेशकुमार गायकवाड, पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन उपाध्यक्ष श्री. जीवनलाल निंदाने, पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन चे उपाध्यक्ष अशोक मेमजादे, पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशन चे कार्याध्यक्ष मदन वाणी, माजी राष्ट्रीय खेळाडू श्री कैलास गायकवाड, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना सचिव अभिमन्यू सूर्यवंशी व विजय गुजर, पुणे शहर चे तांत्रिकअधिकारी प्रदीप वाघे व राष्ट्रीय बॉक्सर हितेश निंदाने यावेळी उपस्थिती होते.
बागवे पुढे म्हणाले,’इंडियन बॉक्सिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना या दोन्ही महत्वाच्या संघटना सध्या बरखास्त असल्या मुळे राज्यात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या राज्यस्तरीय आणि देश स्तरीय स्पर्धा होत नसल्या मुळेआपण अशा प्रकारचे प्रॅक्टिस बाऊन्स आयोजित करून खेळाडूंना एक वेगळा स्तर निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत आहेत.सर्व स्तरातील खेळाडूंना एकत्र करून त्यांना राष्ट्रीय, जिल्हा पातळीवरील मोठ्या स्पर्धांसाठी तयार करण्यासाठी अशा पद्धतीच्या सेशन ची खूप गरज असते. यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या चुका सुधारण्याची त्यांना योग्य संधी मिळते. अत्यंत स्तुत्य अशा या उपक्रमासाठी नामवंत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक कृष्णा दास (मुंबई) यांनी आपल्या टीमसह प्रमुख उपस्थिती लावून खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले आहे .