पुणे ; महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत वडगाव शाखा कार्यालयाचे वडगावमधील मध्यवस्तीत स्थानांतरण करण्यात आले. या कार्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले.
वडगाव धायरी उपविभागातील वडगाव शाखा कार्यालय पूर्वी अभिरूची मॉलसमोर भाडेपट्टी तत्त्वावर होते. आता हे कार्यालय वडगावमधील महावितरणच्या मालकीच्या जागेमध्ये कृष्णकुंज सोसायटी, सिंहगड कॉलेज रस्ता, महादेव मंदिराजवळ येथे स्थानांतरीत करण्यात आले आहे. वडगाव परिसरातील सुमारे ३२ हजार ग्राहकांना वीज व विविध ग्राहकसेवा देणाऱ्या या कार्यालयासाठी नवीन वास्तू उभारण्यात आली आहे.
या वास्तुचे उद्घाटन करताना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी अभियंता व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी श्री. पवार यांनी तत्पर ग्राहकसेवेसोबतच तक्रारी व समस्यांचे विनाविलंब निराकरण करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमाला प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. रवींद्र बुंदेले, कार्यकारी अभियंता श्री. मनीषकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. अविनाश कलढोणे व श्री. राहुल यादव (स्थापत्य), श्री. विशाल लंके, वडगावचे शाखा अभियंता श्री. आतिश इंगळे व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.