गुरुग्राम, २८ डिसेंबर २०२३ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक कंपनीने आज दिल्ली आयजीआय विमानतळावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना हिवाळ्यात त्यांच्या फ्लाइटच्या वेळांवर धुक्यामुळे मोठा परिणाम झाल्यास कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्या वेळांमध्ये बदल करण्याची किंवा बुकिंग रद्द करण्याची मुभा प्रवाशांना दिली जाणार आहे. हा गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या फॉगकेयर उपक्रमाचा भाग आहे.
एयर इंडियाद्वारे ग्रस्त प्रवाशांना सक्रिय सहकार्य केले जाईल व त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय वेळ बदलण्याची किंवा तिकिट रद्द करण्याच मुभा मिळेल.
धुक्यामुळे विमानसेवेला फटका बसल्याने प्रवाशांची गैरसौय कमी करण्यासाठी फॉगकेयर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नेटवर्कच्या वेळापत्रकाची अखंडता राखण्यास मदत होईल, असे एयर इंडियाचे प्रमुख ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोग्रा म्हणाले.
या विमानसेवांच्या प्रवाशांना विमानसेवेशी संबंधित वेळोवेळी माहिती दिली जाईल आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल याची काळजी घेण्यात येईल.
अधिक माहितीसाठी http://www.airindia.com or click on fr.airindia.com/1mw