पुणे:
श्री गुरुदेव दत्त मंडळ(ट्रस्ट)तर्फे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं.शौनक अभिषेकी यांचा सत्कार करण्यात आला. श्री गुरुदेव दत्त मंडळ(ट्रस्ट) आयोजित सांस्कृतिक महोत्सवात मंडळाचे अध्यक्ष अप्पा खिलारे, सचिव नागेश करपे, अजित सांगळे,शिरीष बोधनी, सप्रे गुरुजी यांनी हा सत्कार केला. हा कार्यक्रम दत्त जयंती निमित्त रविवारी,२४ डिसेंबर रोजी सायंकाळी कमला नेहरू पार्कजवळील दत्त मंदिरात झाला.
१९८४ मध्ये या महोत्सवाची सुरुवातच पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने झाली होती. त्या क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र शौनक अभिषेकी यांना यावेळी भेट देण्यात आले. पं.जितेंद्र अभिषेकी याना त्यावेळी साथसंगत करणारे मेघन श्रीखंडे हेही या सत्कार कार्यक्रमात उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश संजय यादव, स्वप्नील रास्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.’स्वराभिषेक’ हा भावसंगीत, नाट्यसंगीतावर आधारित कार्यक्रम पं.शौनक अभिषेकी यांनी सादर केला. रसिकांनी भरभरून दाद दिली.