पुणे- दि.२२ जानेवारी २०२३
आज विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध व संशोधनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे रहाण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा तरून पिढीने घ्यावा असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री व अखिल भारतीय मराठा शिक्षण परीषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यक्रमात आपल्या भाषणात व्यक्त केले.अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालय, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे आणि एस. एम. ई. चेंबर ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने पर्वती येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या संकुलात स्थापन करण्यात आलेल्या डीएसटी प्रयास शाळा,रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन व हेरीटेज क्लबच्या लोगोचे अनावरण शरद पवार यांचे हस्ते झाले. या वेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड,सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे चे अध्यक्ष दिलीप बंड , प्रतापराव पवार, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क चे कार्यकारी संचालक डॉ.राजेंद्र जगदाळे, एस एम ई चेंबर ऑफ इंडिया चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे , अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे संयुक्त चिटणीस ॲड. संदीप कदम व ॲड. भगवानराव साळुंखे, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार विजयसिंह जेधे, कमल व्यवहारे, अजय पाटील, नियामक मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले कि तरुणाईला उद्योजकतेची वाट दाखवून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी पारंपारिक शिक्षणा बरोबर नवतंत्रज्ञान आत्मसात करावे. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे, रोबोटिक्स, ऑटोमेशन, डेटासायन्स व आर्टिफियल इंटेलिजन्सचे युग आहे. राज्याच्या व देशाच्या औद्योगिक विकासामध्ये तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे करून नवतंत्रज्ञानाच्या सहायाने स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्टार्टअप व अन्य योजनांमुळे ८० टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.परंतु तरुणांनी नोकरीसाठी जगात कोठेही जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे.संशोधन व तंत्रज्ञानामुळे देशाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणांना नक्कीच यश मिळेल अशी आपेक्षा मा.शरद पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. प्रतापराव पवार म्हणाले कि स्टार्टअपमुळे तरुण उद्योजकांना उत्पादन निर्मितीची संधी मिळाली आहे इंडस्ट्रीज, उद्योजक, शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी या साठी एकमेकांशी सुसंवाद साधण्याची गरज आहे.सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क चे कार्यकारी संचालक डॉ.राजेंद्र जगदाळे आपल्या भाषणात म्हणाले कि नवीन उद्योग व्यावसाय सुरु करण्यासाठी आम्ही विविध स्तरावर प्रयत्न करत आहोत. स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नवीन उद्योजकांना संस्थेमार्फत सत्यात्याने प्रोत्साहन देण्यास आम्ही कटिबध आहोत. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा. सौ.प्रमिला गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगीतले की, उद्योजक होऊ इच्छीणाऱ्या तरुणांसाठी त्यांच्या स्वकल्पित प्रोडक्टचे प्रोटोटाईप करण्यासाठी लागणाऱ्या व्हर्टिकल मशिनिंग सेंटर, सीएनसी राऊटर, लेझर कटिंग मशीन, व्ह्याक्युम फोर्मिंग मशीन, ३ डी स्कॅनर व प्रिंटर इ. मशिन्स व इतर यंत्रसामुग्रीचा वापर करून विद्यार्थी व प्राध्यापक स्वतःचे स्टार्टअप सुरु करू शकतील.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिपक गायकवाड व डॉ. गायत्री कांबळे यांनी केले. तर परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.