शालेय तरुणांची साहित्यकृती कौतुकास्पद -दत्तात्रय जगताप यांचे मत

Date:

पुणे : “शालेय वयातील मुले कादंबरीसारखा साहित्य प्रकार लिहिताहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. एवढ्या कमी वयात सर्जनशीलतेचे, प्रगल्भतेचे दर्शन आपल्या लेखनातून तन्वीसारखे युवा लेखक घडवतात, तेव्हा त्यांच्यातील आत्मविश्वास पाहून हुरूप येतो. तन्वीने आपल्या अंतर्मनातील विचारांना सुंदर पद्धतीने शब्दबद्ध केले आहे. तिचे लेखन कौतुकास्पद आणि नव्या पिढीला लिहिण्यास उद्युक्त करणारे आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले.
तन्वी निमजे लिखित अभिषेक टाईपसेटर्स अँड पब्लिशर्स प्रकाशित ‘ऍस्ट्रो ऑफ अवर्स’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी जगताप बोलत होते. मंगळवारी नवी पेठेतील पत्रकारभवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला इंडियन बँकेचे विभागीय व्यवस्थापक मनीष कुमार, उपविभागीय व्यवस्थापक राजीव रंजन, सह-महाव्यवस्थापक रणजित सिंग, वरिष्ठ व्यवस्थापक वजाहत अली व तन्वीचे वडील सह-महाव्यवस्थापक प्रकाश निमजे, आई ज्योती निमजे, प्रकाशक मंगेश वाडेकर आदी उपस्थित होते.

दत्तात्रय जगताप म्हणाले, “दहावी-बारावीच्या दडपणात अनेकदा मुले गुंतून जातात. मात्र, तन्वीने त्यातून स्वतःला वेळ देत ‘ऍस्ट्रो ऑफ अवर्स’ कादंबरी लिहून पूर्ण केली. तिच्यातील लेखन प्रतिभा अचंबित करणारी आहे. काव्य, भावभावना अतिशय ओघवत्या शैलीत तिने उतरवल्या आहेत. इतर मुलांनीही यातून प्रेरणा घेत साहित्यकृती निर्माण कराव्यात.”
मनीष कुमार म्हणाले, “तन्वीला लहानपानापासून पाहत आहे. तिच्यातील बुद्धिमत्ता आणि क्रयशीलता, सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची तिची उर्मी वाखाणण्याजोगी आहे. अवघ्या १८ व्या वर्षी तिची कादंबरी प्रकाशित होत आहे, ही तिच्यासाठी मोठी गोष्ट आहे.” तन्वी निमसे म्हणाले, “लहानपणापासूनच वाचन करत होते. त्यातून लिखाणाची आवड जडली. दहावीनंतर सर्व पुस्तक लिहून काढले. पहिले पुस्तक प्रकाशित होताना आनंद वाटतो आहे.”
मंगेश वाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सतीश गेजगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश निमसे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...