वारसा प्रबोधनकारांचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची

Date:

मुंबई-मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या मनसेच्या उत्तर सभेत जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख त्यांनी केला. तसेच, जंत पाटलांना काहीही सांगा ते नेहमी चकीतचंदू असतात, असा टोलाही लगावला. राज यांच्या भाषणानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. ”वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत”, असे म्हणत पलटवारही केला.राज ठाकरेंनी २०१४ ला मोदींना पाठींबा दिला, २०१९ ला मोदींना विरोध केला. आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर घेतली आहे. वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची. तर, पुतण्या बाळासाहेब ठाकरेंचा, मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी असल्याची घणाघाती टीका पाटील यांनी केली आहे. तसेच, वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

जयंत पाटलांची मिमिक्री-अन जंत पाटील चकीतचंदू

“मी जेव्हा उघडपणे बोलत होतो, तेव्हा हे काही बोलले नाहीत आणि आता जंत पाटील म्हणतात, राज ठाकरे उत्तर प्रदेशात कधी गेले होते. उत्तर प्रदेशचे यांना काय कौतुक? जंत पाटील माझे भाषण नीट ऐकत जा. मी म्हटलं होतं, ज्या बातम्या कानावर येत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये विकास झाला असेल तर त्याचा मला आनंद आहे. मी जर तर बोलोलो होतो”, असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “तुम्हाला आठवत असेल तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मी सांगत होतो. मोदी पंतप्रधान होतील तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावं. त्या तीन राज्यांचा विकास करावा, त्या राज्यातील माणसे महाराष्ट्रातात येतात. त्या माणसांचे ओझे महाराष्ट्र सहन करू शकत नाहीत.”

यावेळी राज ठाकरेंनी जयंत पाटलांची मिमिक्रीदेखील केली. “जंत पाटलांना काहीही सांगा ते नेहमी चकीतचंदू असतात. गृहमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं, एकदा बेहराम पाड्यात जाऊन बघा, भीषण अवस्था आहे. तिकडे शस्त्र असतील, बॉम्ब असतील. हे नेहमी आश्चर्यचकीत असतात, यांना काहीच माहिती नसतं.”ते पुढे म्हणाले, “हे म्हणतात, संपलेल्या-विझलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार. येऊन बघा, हा काय संपलेला पक्ष आहे का? जंतराव हा विझलेला पक्ष नाही, समोरच्याला विझवणारा पक्ष आहे. यांच्या मतदारसंघाबाहेर यांना कोणी विचारत नाही. त्या सुप्रिया सुळेंनी तर काहीच बोलायची गरज नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत,” असा घणाघात त्यांनी यावेळी केला.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...