एलपीएफ तर्फे ८२५ मुलींना शिष्यवृत्ती
पुणे,: लीला पुनावाला फाऊंडेशनतर्फे (एलपीएफ) पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील मुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. एस. जी. बरवे सभागृह, अल्प बचत भवन येथे हा कार्य़क्रम नुकताच पार पडला. यावेळी ८२५ मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली.
यंदाच्या ८२५ मुलींना धरुन, मागील २० वर्षात तब्बल ५,५०० मुलींनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात अभियांत्रिकी, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, डिप्लोमा इन इंजिनीरिंग, विज्ञान, फार्मसी, नर्सिंग आणि पदव्युत्तर विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
प्रेक्षकांशी संवाद साधताना, एल. पी. एफ.च्या अध्यक्षा पद्मश्री लीला पूनावाला म्हणाल्या, “माझ्या फाऊंडेशनमधील साडेपाच हजार मुलींनी पंधरा वर्ष काम केले, तर भारताच्या अर्थव्यस्थेला त्या तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचं योगदान करतील. मुलींना मोलाचे सल्ले देताना, पूनावाला यांनी आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पार्टनर्सचे आभार व्यक्त केले. तसेच एल. पी. एफ.चे ट्रस्टीज आणि समितीचे देखील आभार मानले. याबरोबरच आय़केइए फाऊंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर पॅट्रीक वोबोनाॅय आणि प्रोग्रॅम कंट्रोलर निखिल कौशल यांचे विशेष आभार मानले. भाषणाचा समारोप करताना त्यांनी एल. पी. एफ.चे सन्माननीय फिरोझ पूनावाला यांचे खास आभार व्यक्त केले.
प्रमुख अतिथी, मिनोचेर पटेल (कॉर्पोरेट ट्रेनर, फाउंडर, डायरेक्टर, एकोल सॉलिटेयर) यांनी सांगितले, जास्तीत जास्त मुलींनी शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे. शिक्षणाला महत्व दिले तर तुम्ही मानसिक आणि आर्थिकरीत्या सशक्त रहालच पण आत्मसन्मानाने देखील जगाल”.