पुणे : पोलीस हा गणवेश घातलेला नागरिक आहे. पोलिसांनी पारदर्शक व न्यायाच्या पध्दतीने काम करावे. त्याचा जनतेला आधार वाटला पाहिजे. व गुन्हेगाराला भिती वाटली पाहिजे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
लोहगाव विमानतळ, कोरेगावपार्क पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदीश मुळीक, पोलीस आयुक्त श्रीमती रश्मी शुकला, पोलीस सहआयुक्त सुनिल रामानंद आदि उपस्थित होते तर कोरेगांव पार्क येथील कार्यक्रमात महापौर प्रशांत जगताप वरील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले की, सर्व नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन सुसज्ज इमारत झाली पाहिजे. सामान्य माणसाला न्याय / मदत मिळाली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. पोलीस स्टेशन हे समाजमंदिर असले पाहिजे. त्याचप्रमाणे पोलीसांनीही समाजाचे सेवक, सामान्य माणसाचे मदतनीस ही प्रतिमा निर्माण झाली पाहिजे असे प्रतिपादन केले.
सदरील दोन्ही पोलीस स्टेशनचे काम लवकरात-लवकर पूर्ण करावे. येथे येणाऱ्या नागरिकांनी वाहन पार्किंग बसण्याची व्यवस्था असली पाहिजे. कोरेगांव पार्क परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावले पाहिजे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. काही चुकीच्या प्रकारामुळे येथील राहणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी पोलीसांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी कोरेगांव पार्क ही उच्च लोकांची वस्ती आहे. या परिसरात पोलीस स्टेशनची नविन इमारत पूर्ण झाल्यानंतर संगणकीकरण, सीसीटीव्ही आदी कामे आपल्या आमदार निधीतून केली जातील. शहरातील वातावरण चांगले ठेवण्याचे काम पोलीस विभागानी केले असल्याचे सांगितले. तर महापौर प्रशांत जगताप यांनी शहरात चांगली कायदा व सुव्यवस्था राहावी. यासाठी चांगले अद्यावत यंत्रणा व वास्तू असणे आवश्यक आहे. याकरिता पोलीस विभागाला मनपातर्फे आवश्यक सहकार्य केले जाईल असे सांगितले.
प्रारंभी पोलीस आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. पुणे शहरासाठी सदरची दोन्ही पोलीस स्टेशनची वास्तू अद्यावत होणार आहे. हे काम पोलीस गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत होत असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार जगदीश मुळकी यांचेही समयोचित भाषण झाले.