बाबा बोडकेला न्यायालयाने गुन्हेगार ठरविलेले नाही
पुणे- बाबा बोडके आणि मुख्यमंत्री यांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु झाले … याबाबत पुण्यातील हावरे बिल्डर्सचे भागीदार असलेले मिहीर कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषद घेवून आपण मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागत असल्याचे सांगितले. ते म्हणाले मुख्यमंत्र्यांना आम्ही एका सामाजिक कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो. बाबा माझा नातेवाईक आहे , माझ्या पत्नीचा तो भाऊ आहे म्हणून तो माझ्याबरोबर होता . यात मुख्यमंत्र्यांचा काहीही संबध नाही . तो कुख्यात गुन्हेगार आहे आणि मुख्यमंत्री त्याच्यासोबत कसे? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांची माफी मागतो .त्यांना आमच्यामुळे त्रास झाला . पण बाबा ला न्यायालयाने दोषी ठरविलेले नाही. त्यामुळे त्याला कुख्यात गुन्हेगार वगैरे म्हणणे माझ्या मनाला पटत नाही .कोपर्डी घटनेतील मृत मुलीच्या नावाने आम्ही ‘श्रद्धा ‘ हि हेल्पलाईन सुरु करतो आहोत . 5 नोव्हेंबरला या हेल्पलाईन चे उद्घाटन केले जाणार आहे . प्रख्यात सरकारी वकील उज्वल निकम , अण्णा हजारे, डॉ. विजय भाटकर, सिंधुताई सपकाळ अशी नामांकीत मंडळी आणि मुख्यमंत्री यांना त्यासाठी निंन्त्री करण्यात आले आहे . कोपर्डी घटनेचा आमी निव्वळ निषेध करून थांबणार नाही तर त्यावर प्रत्यक्षात पुढे अशा घटना रोखण्यासाठी काय करता येईल ? यासाठी हेल्पलाईन हे पहिले पाऊल उचलले आहे . ज्याद्वारे पिडीत महिलांना मदतीचा हाथ देण्यात येईल आणि उद्वस्त होवू पाहणारी कुटुंबे सावरण्याचा प्रयत्न करण्यात येईल .
या पत्रकार परिषदेला हावरे बिल्डरच्या सौ. उज्वला हावरे , आणि कौस्तुभ देशपांडे हे देखील उपस्थित होते . पहा या पत्रकार परिषदेचा हा व्हिडीओ…..