क्रांती व सुबोध म्हणतायेत ‘आता होऊ दे खुश्शाल खर्च’ किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी चित्रपटातील प्रमोशनल सॉंग

Date:

index0 index1 index2

अभिनयातील दमदार कामगिरीनंतर अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेता सुबोध भावे आता आपल्या स्वरांची किमया रसिकांना दाखवणार आहेत. १७ जून ला प्रदर्शित होणाऱ्या किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी या चित्रपटातील प्रमोशनल सॉंग या दोघांनी गायलं आहे. ‘आता होऊ दे खुश्शाल खर्च’ असे बोल असणारं हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिलं असून वैशाली सामंत यांचं संगीत या गाण्याला लाभलं आहे.
 
गायनाची ही नवी इनिंग आम्ही खूपच एन्जॉय केली, असं सांगत हे गाणं गाताना मजा आल्याचं सुबोध आणि क्रांतीने सांगितलं. तसेच हे फुल ऑन गाणं प्रत्येकालाच ठेका धरायला लावेल असा विश्वासही या दोघांनी व्यक्त केला.
 
ओम प्रॉडकशन्स प्रस्तुत व कांचन अधिकारी दिग्दर्शित किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी  हा सायबर क्राइमवर आधारलेला कॉमेडी क्राइम सिनेमा आहे. या चित्रपटाचा कथाविस्तार व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं आहे. लेखन आशिष पाथरे यांचं आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचं असून संकलन आनंद दिवान यांनी केलं आहे.  कांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी  या चित्रपटात सुबोध भावे, क्रांती रेडकर, मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या भूमिका आहेत. 
 
१७ जून ला किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

९९ रुपये लिटरचे डीझेल १५९ रुपये लिटरने का घेते महापालिका/PMPML ? फायदा कोणाला, तोटा कोणाला?

बाजारात ₹९९, महापालिकेला ₹१५९ प्रतिलिटर दराचा दावा; वर्षाला १५...

‘५०० कोटींचा आरोप १०० टक्के खोटा; भाजपचा काडीमात्र संबंध नाही!’ — आशिष शेलार

‘जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल कायदेशीर चौकशी करा’; शिंदेंवरील...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२६ - एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस...