खडकवासला पुन्हा भरले,मुठा नदीत भिडे पुलासह अनेक मोटारी पाण्याखाली

Date:

पुणे,  – खडकवासला धरणातून नदीपात्रात 22,500 क्सुसेक्स एवढ्या वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील भिडे पूल पाण्याखाली गेला अनेक नदीकाठच्या मोटारी आणि खाद्य् पदार्थ विक्रीची दुकाने या पाण्याखाली बुडाली  . पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर धरणातून अधीक पाणी सोडण्यात येईल अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिलीत्यानंतर

खडकवासाला धरणातून  सायंकाळी चार नंतर 3100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला . या पाण्यामुळे नदीच्या पाण्यात कमालीची वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून सोडण्यात येणा-या पाण्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे डेक्कन जवळील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीपात्रात पार्क केलेल्या काही दुचाकी आणि चार चाकी गाड्या पाण्यात अडकल्या होत्या. त्यापैकी काही गाड्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात आल्याचे समजते.    मंगळवारी सकाळपासून शहराला पाणी पुरवठा करणा-या चार ही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून आज दुपारी चार वाजेपर्यंत या चारही धरणात 73.62 टक्के (21.46  टिएमसी ) पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती देण्यात आली   दरम्यान, पावसाचा जोर असाच राहिल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुण्यात पूर सदृश्य स्थिती हि निर्माण होवू शकते या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस या सर्वांना दक्षता घ्यावी लागणार आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...