पुणे- कात्रजजवळ 10 ते 12 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी अथवा जखमी झालेले वृत्त नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, कात्रज, गंधर्व लॉन्सजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे असंख्य गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. यामध्ये अचानक स्फोट झाला. एकामागून एक दहा ते बारा गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अजुनपर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीही घेण्यात आली आहे. सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान हि घटना घडल्याचे वृत्त आहे .मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज, गंधर्व लॉन्सजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे असंख्य गॅस सिलिंडरचा साठा करण्यात आला होता. यामध्ये अचानक स्फोट झाला. एकामागून एक १०/१२ गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. सिलिंडरचे हे स्फोट झाल्याने आसपासचा परिसर हादरला.आवाज ऐकू आले त्यावेळी बाहेर लहान मुले खेळत होती. त्यामुळे एकच धावपळ झाली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरातील घरावरील पत्रे उडाले. गाड्या जळून खाक झाल्या. परिस्थितीचे गांभिर्य पाहून परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. परिसरामध्ये रस्ते खूप अरूंद आहेत. . सध्या आग आटोक्यात आल्याचे अग्निशामन दलाकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळावर सहा अग्निशामन दलाच्या गाड्या आणि चार पाण्याचे बंब यांनी आग आटोक्यात आणली आहे.