सेवानिवृत्त कर्मचारी वेतन व इतर सर्व बिले अदा केल्याने सेवानिवृत्त कर्मचारी आनंदात.
जुन्नर /आनंद कांबळे
भविष्य निर्वाह निधी व वेतनपथक(प्राथमिक) पुणे कार्यालयाच्या कामकाजाबाबत सेवानिवृत्त कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.
पेन्शन , रजारोखीकरण असे अनेक प्रश्नांना कर्मचारी सेवा निवृत्त झाला की त्याला सामोरे जावे लागते कधी कधी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला या सर्व गोष्टी साठी अनेक वेळा सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात .
त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी वैतागलेला असतो
परंतू पुणे जिल्हा परिषदेचे भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक (प्राथमिक) खाजगी हे कार्यालय अपवाद आहे ,असे मत प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आनंद कांबळे यांनी व्यक्त केले.
या कार्यालयाचे अधीक्षक राजेंद्र साठे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सेवा समाप्तीच्या शेवटच्या दिवशी भविष्य निर्वाह निधी ,निवृत्त कर्मचाऱ्यांना पहिल्याच महिन्यात पेन्शन मिळावी ,व त्याच महिन्यात रजा रोखीकरणाची रक्कम मिळावी यासाठी त्यांचा कटाक्ष असतो . त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्व लाभ वेळेत मिळाले आहेत.
सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रश्नाबाबत सुनील कुऱ्हाडे (शिक्षणाधिकारी प्राथमिक) पुणे जिल्हा परिषद यांचे या कामी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तर कार्यालयातील कर्मचारी शिंदे जगन्नाथ व नेटवटे यांचे सहकार्य केले.
अधीक्षक राजेंद्र साठे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याबाबत लक्ष घातल्याने , वेळेवर पेन्शन व इतर फायदे मिळत असल्याने सेवानिवृत्ती कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे