संत गाडगे महाराज शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत रोपे वाटप

Date:

पुणे-पवित्र रमजान महिन्यानिमित्त पर्यावरण दिवसानिमित्त कोंढवा खुर्दमधील कौसर बागमधील आर सी किचनच्यावतीने संत गाडगे महाराज शाळेमधील विद्यार्थ्यांना महापौर प्रशांत जगताप यांच्याहस्ते मोफत रोपे वाटप करण्यात आले . या  आर सी किचनचे संचालक अब्दुल रहेमान शेख , नासीर शेख , अशफाक सय्यद आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी साईनाथ बाबर , परवेझ खान , अब्दुल रशीद इनामदार , ताहेरा पटेल , संजय सारोळकर आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी संत गाडगे महाराज शाळेच्या शिक्षिका उपस्थित होते .

   यावेळी महापौर प्रशांत जगताप  यांनी सांगितले की , वृक्षारोपण करणे  ही काळाची गरज असून आपण सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या सामाजिक कामात सहभागी झालात याचा मला विशेष आनंद होत आहे , आपणास दिलेले रोप आपण वृक्षारोपण करून त्याची देखभाल करा . आर सी किचनच्यातर्फे रोपे मोफत वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे , व्यावसायिक कामाबरोबर आपण पर्यावरणाचे रक्षण करण्याचे सामाजिक बंधन जपले आहे .

  यावेळी महापौर प्रशांत जगताप यांचे शाल , श्रीफळ व पुष्पगुछ देउन आर सी किचनचे संचालक नासीर शेख यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले . आर सी किचनने नुकत्याच आपल्या व्यवसायास प्रारंभ केला असून त्यांनी सामाजिक कामातही काम करणार असल्याचे यावेळी सांगितले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! अभिनेता सुरक्षित, हल्लेखोरांचा शोध सुरू

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून गोळीबार झाल्याचे वृत्त; चालकासह दोघे जखमी...

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे आयोजित आरोग्य शिबीरात ३५० महिलांची तपासणी

नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; श्री महालक्ष्मी...

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे सावट! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची...

पुण्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा! पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; तापमान ३४ अंशांवर

पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन दिवसही तापमान ३३ ते...