पुणे : बँक ऑफ इंडिया पुणे आंचलतर्फे कॉर्पोरेट सोसिअल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ५०० गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल अश्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच कोथरूड पोलीस स्टेशनला १८० फुल साईज् कॉटोन हॅण्ड ग्लोव्हज देण्यात आले. तसेच कॉरोना शी लढण्यासाठी डॉक्टर नायडू सांसर्गिक हॉस्पिटल ला इंडस्ट्रियल वॉशिंग मशीन देण्यात आले.
तरी या प्रसंगी पुणे महानगर पालिकेचे महापौर श्री.मुरलीधर मोहोळ , शिवसेना गटनेते श्री.पृथ्वीराज सुतार ,मनसे नेते किशोर शिंदे व संजय काळे , पुणे महापालिका आयुक्त श्री. शेखर गायकवाड साहेब , अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल मॅङम,सहाय्यक आरोग्य अधिकारी सौ. साबणे मॅडम ,कोथरूड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक सौ. जोशी मॅडम उपस्थित होते.
बँक ऑफ इंडिया चा वतीने महाप्रबंधक श्री. रमेश ठाकूर साहेब,उपमहाप्रबंधक श्री.कुलकर्णी साहेब , आंचलिक प्रबंधक श्री. राजेश इंगळे ,उपप्रबंधक श्री. सदाशिव कुलकर्णी, बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघटना चे सचिव कॉ . राणे, उपाध्यक्ष कॉ . ठोंबरे , ऑफिसर असो. चे सचिव श्री मादुर, विपणन विभागाचे अधिकारी श्री निलेश काळोखे, मंगेश वैद्य, निलेश वर्पे आणि सागर भालसिंग उपस्थित होते