गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा-पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

Date:

पुणे : “समाजात कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी, लहान मुलांसाठी असे वेगवेगळे सेल सुरु करून त्यामार्फत अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा आणि शहराला सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. मात्र, समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे,” असे मत पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात फिक्की फ्लो संस्थेच्या वतीने आयोजित मार्गदर्शन सत्रात डॉ. व्यंकटेशम बोलत होते. हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी फिक्की फ्लो पुणेच्या चेअरपर्सन रितू छाब्रिया, सदस्य अनिता सणस यांच्यासह इतर पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. व्यंकटेशम म्हणाले, “महिला सुरक्षा, गुन्हेगारीला आळा, वाहतूक कोंडी, सायबर गुन्हेगारी आदी गोष्टींवर पुणे पोलीस चोवीस तास काम करीत आहे. नागरिकांना चांगले आणि सुरक्षित आयुष्य कसे जगता येईल, यासाठी सतत नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी पोलीस काका, दामिनी पथक यांसारखे विशेष विभाग कार्यरत आहेत. या सगळ्या उपक्रमांना नागरिकांची साथ मिळाली, तर शहर गुन्हेगारी मुक्त व्हायला वेळ लागणार नाही.” महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल फिक्की कडूनही गौरविण्यात आल्याचे डॉ. व्यंकटेशम यांनी नमूद केले.
पुणे शहराला सुरक्षित बनविण्यासाठी पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन रितू छाब्रिया यांनी दिले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सॅन होजेत मराठी संस्कृतीचा जागतिक जल्लोष”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “NAFA 2026” फिल्म फेस्टिव्हलला उपस्थितीची...

महिलांच्या कायदे निर्मितीतील योगदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे.दि.१५: महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कायद्यांमध्ये बदल झाले असले, तरी...

रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सूचवा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न पुणे, दि....

वि. दा. सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दहा वेळा दया याचीका दिली होती

राहुल गांधी विरुद्ध सावरकर मानहानी खटला : पुणे न्यायालयातील...