कायदा व सुव्यवस्था राखणे सरकारची जबाबदारी आहे खात्याचा प्रमुख म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Date:

मुंबई, – दुपारी चालणारे सरकार आता सकाळी नऊ वाजता चालते, राज्यातील जनतेच्या हितासाठी चालत आहे की, वाझे प्रकरणांमध्ये स्वतःची अडचणींमधून सोडवणूक करण्यासाठी चालत आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारवर केली आहे.
वाझे प्रकरणांमध्ये अनेक बैठका होत असल्याचे दिसून येत आहे त्यावर दरेकर म्हणाले, आदरणीय पवार साहेबांपासून ते दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू आहे, निश्चितपणे या प्रकरणाचे धागेदोरे उच्च पोलिस अधिकाऱ्यांसहित इतर राजकीय नेत्यांसोबत पोहोचतात की काय आणि त्याच चिंतेमुळे या बैठका होत आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न जनतेसमोर उभं राहत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

सचिन वाझे प्रकरणामुळे अनिल देशमुख यांची उचलबांगडी होत असताना यामध्ये इतर कोणी उच्च अधिकारी आहे, तसेच राजकीय वरदहस्त कोणाचा आहे? असा सवाल करताना दरेकर यांनी केला तसेच या गोष्टी सुद्धा पुढे येण्याची आवश्यकता आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी स्वतः खात्याचा प्रमुख म्हणून राजीनामा द्यावा असे दरेकर यांनी सांगितले.

दरेकर म्हणाले की, पूजा हत्या प्रकरणात २० दिवस एफआयआरला लागले त्यानंतर २ दिवस मुख्यमंत्र्यांनी राजीनामा खिशात ठेवला तोपर्यंत सर्व पुरावे नष्ट झाले, तसेच या प्रकरणात नंबर प्लेट बघितल्या गेल्या, डिजिटल शूटिंग काढण्यात आल्या आहे, तसेच सचिन वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केल्याचा संशय एनआयने केला आहे, परंतु पोलिसांच्या रेकॉर्डवर काहीचनाही याचा अर्थ तुम्ही ते सगळे कागद घेतले आणि नष्ट केले का? असा सवाल दरेकर यांनी केला.

सरकार कारवाई उशिरा करत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. दस्तावेज, पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार गुन्हेगाराना वेळ तर देत नाही ना? अशा प्रकारची भूमिका सरकार घेत असल्याचे संजय राठोड प्रकारनावरून दिसून आले. या सर्व बाबीतून हे प्रकरण पूर्वनियोजित असल्याचा मोठा कट असावा अशा प्रकारचे चित्र प्रथमदर्शनी दिसून येते अशा प्रकारची टीका दरेकर यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...