पुणे- एका विभागासाठी कचरा संकलनाचे टेंडर महापालिकेने काढून त्यासाठी ७४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे . या दृष्टीने संपूर्ण महापालिका हद्दीत कचरा संकलनाची टेंडर्स काढून महापालिकेच्या तिजोरीतील ४०० कोटी लुटण्याचा डाव मांडला गेला असल्याचा आरोप आज येथे मनसे च्या हेमंत संभूस यांनी केला आहे.
आज संभूस यांनी महापालिकेच्या पत्रकार कक्षात येऊन याबाबतची माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली.प्रत्यक्षात जे टेंडर काढलेय त्यातच ३७ कोटी लाटण्यात येईल आणि ते यशस्वी झाले कि हाच प्रकार सर्व विभागात राबविला जाईल . म्हणजे जवळपास ५० टक्के खर्चात महापालिका स्वतःची यंत्रणा उभारून , रोजगार निर्माण करून हे काम करू शकणार असेल तर ठेकेदार कशाला / तर हि ५० टक्के रक्कम लाटायला असेच त्याचे उत्तर येईल असे हि संभूस म्हणाले .२३ गावे जी महापालिकेत समाविष्ट झाली तेथील कचरा संकलनासाठी असलेल्या १५० घंटागादुयाही सामावलेल्या आहेत .यात वाढ केली कामगार ,बिगारी , डीझेल आदी खर्च जरी समाविष्ट केला तरी तो या टेंडर च्या ५० टक्केहून कमी रकमेत भागविता येतो . असे संभूस म्हणाले .