१४ नोव्हेंबर २०२२, चेन्नई: हिंदुजा समूहाची प्रमुख कंपनी आणि भारतातील अग्रगण्य व्यावसायिक वाहन उत्पादक अशोक लेलँडने आज अनुक्रमे 9.15T, 10.25T आणि 11.28T GVW श्रेणी मध्ये 914, 1014 आणि 1114 मॉडेल्ससह “पार्टनर सुपर” हा एक नवीन आयसीव्ही प्लॅटफॉर्म सादर केला.
नव्याने सादर करण्यात आलेले प्लॅटफॉर्म ड्रायव्हरला सर्वोत्तम आराम देण्यासाठी समकालीन टिल्ट-एबल डे केबिनसह डिझाइन केले आहेत आणि त्यात सर्वोत्तम पेलोड क्षमता आहे. पार्टनर सुपर मानांकित लोड अॅप्लिकेशन्समध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल जसे की ई-कॉमर्स, बेव्हरेज, एफएमसीजी, व्हाईटगुड्स, पार्सल, फळे इत्यादी. अधिक चांगले मायलेज देणारी वाहने त्यांना हवी असतात. हे वेगवान आहे आणि अरुंद/गर्दी असलेल्या रस्त्यांमध्ये उत्तम दळणवळणाची खात्री देते.
या प्रसंगी बोलताना अशोक लेलँडच्या MHCV चे प्रमुख श्री संजीव कुमार म्हणाले, “ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी आणि ग्राहकांचा खर्च कमी करून सुधारणा करणारी सर्वोत्कृष्ट श्रेणीतील उत्पादने सादर करण्याची अशोक लेलँडची परंपरा आहे. पोर्टफोलिओ बळकट करण्यासाठी आणि ग्राहकांच्या सतत वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आयसीव्ही विभागामध्ये आमच्या उत्पादन योजनांचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आम्ही पार्टनर सुपर सादर केला आहे. वेगवेगळी उत्पादने सादर करून जागतिक स्तरावर आघाडीच्या १० सीव्ही प्लेयर्स मध्ये येण्याची आमची आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही ही गती कायम ठेवू इच्छितो.”
पार्टनर सुपर प्लॅटफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:
· समकालीन टिल्ट-सक्षम डे केबिन
· सर्वोत्तम श्रेणीतील पेलोड
· सर्वोत्तम मायलेज
· सर्वोत्तम-इन-क्लास पॉवर (104 kW (140 hp))
· लोडिंग स्पॅन पर्याय-4.3m (14 फूट), 5.2m (17 फूट), 6.2m (20 फूट) आणि 6.8m (22 फूट)
· प्रथम वर्ष विनामूल्य i-alert सदस्यता
· ४ वर्षे आणि ४ लाख किमी ड्राइव्हलाइन वॉरंटी