स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांत सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा पूर्ण

Date:



नवी दिल्ली- विक्रांत या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा 10 जुलै 22 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला, या  दरम्यान हवाई  वाहतूक सुविधा समन्वित उपकरणांसह बहुतांश उपकरणे आणि प्रणालींच्या एकात्मिक चाचण्या घेण्यात आल्या.जुलै ,22 च्या अखेरपर्यंत पर्यंत युद्धनौका नौदलाकडे  सुपूर्द  करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. आणि त्यानंतर   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑगस्ट ,22  मध्ये  ही युद्धनौका नौदलाच्या सेवेत औपचारिकरित्या दाखल  होणार आहे.

भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडने 76% पेक्षा जास्त स्वदेशी  सामग्री वापरत  केलेली  या  विमानवाहू जहाजाची स्वदेशी रचना आणि बांधणी  हे  ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया उपक्रम’ साठी देशातील संशोधनाचे  एक चमकदार उदाहरण आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात पूरक उद्योगांच्या विकासाबरोबरच,2000 हून अधिक कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या कर्मचार्‍यांना आणि पूरक  उद्योगांमध्ये सुमारे 12000 कर्मचार्‍यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन रचना  आणि बांधणी  क्षमतांमध्ये वाढ झाली आहे.

स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांतच्या पहिल्या टप्प्यातील सागरी चाचण्या 21 ऑगस्ट मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. त्यानंतर सागरी चाचण्यांचा  दुसरा आणि तिसरा टप्पा  अनुक्रमे  21 ऑक्टोबर आणि 22 जानेवारीला पूर्ण झाला. सागरी चाचण्यांच्या या तीन टप्प्यांदरम्यान, परिचालन  यंत्रसामग्री, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सूट्स, डेक मशिनरी, जीवरक्षक उपकरणे, जहाजाची  दिशादर्शक आणि दळणवळण प्रणालीची  क्षमता चाचणी घेण्यात आली.

***

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...