मुंबई-केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नेटवर्क 18 द्वारा आयोजित मिशन स्वच्छता और पानी टेलिथॉन कार्यक्रमात शनिवारी सहभाग घेतला. भारतानं खुल्या जागेत हागणदारी मुक्तीचे लक्ष्य 2019 मध्ये, संयुक्त राष्ट्रद्वारा निर्धारित कालावधीच्या 11 वर्ष आधीच साध्य केले आहे, असे या कार्यक्रमात शेखावत यांनी सांगितले. या कामगिरीमुळे भारत इतर विकसनशील राष्ट्रांसमोर रोल मॉडेल ठरला आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीही महासागराचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केलं. आपले महासागर ही आपली अर्थव्यवस्था आहे आणि बालकांच्या आरोग्याचं जतन करणं देशाच्या हिताचे आहे असं ते म्हणाले.
जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित मिशन स्वच्छता और पानी टेलिथॉन कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ती मंत्री सहभागी झाले होते.