‘इंडियाआर्ट’मध्ये गणपती शिल्पांचे प्रदर्शन
पुणे, गणेशोत्सवानिमित्त भोसलेनगर येथील इंडियाआर्ट गॅलरीत ३ ते १६ सप्टेंबर या कालावधीत ‘ब‘ॉझ’मधील गणपती शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तपस सकरकार, सोमनाथ चक‘वर्ती, तन्वाय बॅनर्जी, चंदन रॉय आणि दिनेश सिंग या नामवंत शिल्पकारांनी साकारलेली गणेशाची ५१ मनोवेधक शिल्प प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याची माहिती गॅलरीचे संचालक मिलिंद साठे यांनी कळवलिी आहे.
कोलकत्याच्या ‘स्कल्पचर गॅलरी’चे संस्थापक तपस सरकार यांनी सिध्दीविनायक, हरिद्रा आणि बाल गणेशाची आकर्षक शिल्पे सादर केली आहेत. कोलकत्याच्या शासकीय कला महाविद्यालयाच्या सोमनाथ चक‘वर्ती यांनी सिध्दीदाता व सिध्दीविनायकाची सर्वांगसुंदर रुपे साकारली आहेत. नंदीवर आरूढ झालेला गणेश व जननी गणेश या सुंदर शिल्पांची निर्मिती शांतिनिकेतन विश्व भारती विद्यापीठाच्या तन्मय बॅनर्जी यांनी केली आहे.
‘ब‘ॉंझ’मधील भव्य मूर्ती साकारण्यासाठी प्रसिध्द असणार्या चंदन रॉय यांची बासरीवादन करणारा गणेश आणि सिध्दीदाता गणेश ही सुबक शिल्पे मांडली असून, मणिपूरच्या दिनेश सिंगने गणपतीची पितळ व स्टिलमधील लक्षवेधक मूर्ती सादर केल्या आहेत. सकाळी ११ ते रात्री ८ प्रदर्शनाची वेळ आहे.
इंडियाआर्ट गॅलरीचा पूर्ण पत्ता
इंडियाआर्ट गॅलरी,
प्लॉट नं. ३०, भोसलेनगर, पुणे-७
संपर्क ः ९३२५५३०५४७