वाहन नोंदणी प्रणालीत ‘बीएच सीरिज’चा तात्काळ समावेश करा :

Date:

  • राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना दीपक मोढवे-पाटील यांच्याकडून मागणीचे निवेदन
    पुणे- केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑगस्ट-२०२१मध्ये अधिसूचना काढून बीएच सीरिजची घोषणा केली. त्यानंतर राज्य सरकारनेही त्याला मंजुरी दिली आहे. मात्र, परिवहन विभागाच्या अखत्यारित असलेल्या ‘एसआयसी’ या संस्थेने वाहन नोंदणी प्रणालीत ‘बीएच सीरीज’चा समोवश केलेला नाही. परिणाम, पुणे- पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व शहरांमध्ये ही सीरीज अद्याप सुरू झालेली नाही. याबाबत परिवहन मंत्रालयाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
    याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्वच मोठी शहरे आता मेट्रोपोलिटीन झाली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून शहरांमध्ये नोकरी- व्यावसयाच्या निमित्ताने नागरिक वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे परराज्यात स्थलांतर करणाऱ्या वाहनधारकांना केंद्र सरकारने घोषणा केलेल्या ‘बीएच सीरीज’मुळे दिलासा मिळाला आहे. त्यांना दुसऱ्या राज्यांत गेल्यानंतर पुन्हा त्या वाहनांची नोंदणी करावी लागणार नाही. सरकारने बीएच सीरीजसाठी काही निकष ठरवले आहेत. त्यात ही सुविधा संरक्षण कर्मचारी, तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वैच्छिक आधारावर उपलब्ध राहणार आहे. चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांचे कर्मचारीही सुविधेचा लाभ घेवू शकतात. मात्र, नोंदणीप्रणाली अध्यावत नसल्याने अनेक वाहनधारक बीएच सीरीजपासून वंचित राहत आहेत.
    नोकरीसाठी परराज्यात स्थलांतर करणाऱ्यांना बीएच सीरीजचा फायदा होणार आहे. प्रत्येकवेळी नवीन राज्यात जाताना त्यांच्या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरित करण्याची प्रक्रिया टळणार आहे. सध्यस्थितीत दुसऱ्या राज्यांत गेल्यानंतर चारचाकी अथवा दुचाकी त्या शहरातील आरटीओ कार्यालयात नोंदणी करावी लाते. त्यासाठी खर्च व जुन्या आरटीओची एनओसी द्यावी लागते.
    त्यामुळे परिवहन विभागाने वाहनधारकांच्या सुविधेसाठी बीएच सीरीजचा समावेश वाहन नोंदणी प्रणालीत करावा, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही दीपक मोढवे-पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...