पुणे- गेली अडीच तीन महिने झाले , नगरसेवकांच्या ,जनतेच्या प्रश्नांना मुख्य सभे सारखे मिळणारे व्यासपीठ बंद झाले आहे. मग किमान ज्या त्या पक्षाच्या पातळीवर आयुक्तांनी पक्ष निहाय बैठका तरी बोलावून आपणा कोरोनाशी लढत देताना कशा पद्धतीने लढा दिला पाहिजे यावर सविस्तर चर्चा करायला हवी असे मत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी व्यक्त केले आहे . आणि याबाबत ची लेखी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. पुण्यात नगरसेवक ,प्रशासन सारेच आपापल्या पातळीवर चांगले काम करत आहेत तरीही कोरोनाशी लढाई मुश्कील असल्याचेच दिसते आहे . या परिस्थितीत दशा जाणून दिशा ठरविण्यासाठी तरी प्रशासनाने नाही मुख्य सभा तर किमान पक्षीय पातळीवर बैठक बोलाविली पाहिजे. कोरोनाला संपविण्यासाठी तपास ,शोध आणि कारवाई म्हणजे उपचार याच पद्धतीवर भर द्यायचा आहे .पण या पद्धतीने फाईट करण्यासाठी आपल्याला स्वॅब घेणारी आणि तपासणारी यंत्रणा भक्कम करावी लागेल शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तीच कोरोनाशी २ हाथ करावे लागतील असे सांगून अखेरीस तांबे यांनी पिंपरी महापालिके प्रमाणे पुणे महापालिकेने देखील सलून आणि पार्लर ला नियम अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी देखील केली आहे. नेमके तांबे यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ऐका आणि पहा ….