लस खरेदीचे ग्लोबल टेंडर काढण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले महापालिका आयुक्तांना आदेश – सभागृहनेते गणेश बिडकर यांची माहिती
पुणे- लस खरेदीसाठी आज अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिल्याची माहिती विधान भवन येथे पुणे महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी सांगितले कालच बिडकर यांनी लास खरेदीची परवानगी राज्य सरकार देत नसल्याबाबत राज्य सरकारला निशाना बनवीत टीकेची झोड उठविली होती . दरवेळी शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुण्यातील सर्व आय ए एस आय इ एस अधिकारी ,महापौर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस आज सभागृह नेते गणेश बिडकर देखील उपस्थित होते . लस खरेदीला परवानगी मिळावी बाबत लेखी निवेदन यावेळी बिडकर यांनी उपमुख्यमंत्री यांना दिले त्यामुळे हा विषय यावेळी उपस्थित झाला असता अजित पवार यांनी अशा परवानगीची गरज नाही असे सांगून महापालिका आयुक्तांना तुम्ही ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करा असे आदेश दिले असेही बिडकर यांनी सांगितले