Home Blog Page 78

जगावर वर्चस्व लादू पहाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्पने बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप

डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १९८० च्या दशकात एका १३ ते १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एपस्टिन प्रकरणातील नव्या कागदपत्रांच्या आधारे केला जात आहे. या प्रकरणातील काही कागदपत्रे आज अमेरिका सरकारने सार्वजनिक केली.

अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचार झालेल्या आणि नंतरच्या काळात त्याबाबत उघड आरोप करणाऱ्या महिलांच्या प्रसिद्ध मुलाखतींची काही कागदपत्रे माध्यमांच्या दबावानंतर अमेरिका सरकारने आज प्रसिद्ध केली. ब्रिटनमधील एका वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने २०१९ मध्ये ‘एफबीआय’च्या अधिकाऱ्यांना तिच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली होती.

१९८० च्या दशकात १३ ते १५ वर्षांची असताना तिच्यावर ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केला होता, असा आरोप महिलेने केला होता. लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली एपस्टिन याला अटक झाली होती, त्या काळात ही मुलाखत घेण्यात आली होती. या महिलेने दिलेल्या दुसऱ्या एका मुलाखतीत तिने धमक्यांचे फोन येत असल्याचे सांगितले होते. हे फोन ट्रम्प यांनी केल्याची नोंद कागपदत्रांमध्ये आहे.

रात्रीच्या त्या पाच तासात पोलिस ठाण्यात जे घडलं ? ते आक्रीत !

पुणे : रात्रीच्या त्या पाच तासात पोलिस ठाण्यात जे घडलं ? ते आक्रीतच म्हणावे लागेल, पुण्यासारख्या शहरात असं काही घडू शकेल असं जून जाणते पुणेकर यांना कधीही वाटले नसेल. पण पुणे आता बदललं आहे, पूर्वीचे शांत पुणे रात्रीच्या अंधारात ही मिळेनासे झाले आहे. पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्यात 3 मार्चच्या मध्यरात्री तरुण तरुणीने दारूच्या नशेत गोंधळ घातला. फक्त गोंधळ घालून हे दोघे शांत झाले नाहीत तर रात्री थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाच धमक्या दिल्या. मोठी बाब म्हणजे, नशेत असलेल्या तरुणीने रागाच्याभरात महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा चावा देखील घेतला. या 24 वर्षीय तरुणीने आणि तिचा मित्र युवराज निलेश परतानी (वय 24) यांनी दारूच्या नशेत गोंधळ केला आणि पोलीसांना धमक्याही दिल्या. त्यामुळे दोघांवर दारूच्या नशेत गोंधळ, धमकी, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल केला. अद्याप दोघे पोलीस ठाण्यात आलेले नाहीत.

दोघे मित्र-मैत्रिण बालेवाडी येथील रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेले होते. मद्यपानानंतर कारस्थान रचून त्यांना मारहाण झाली, असं सांगून त्यांनी रेस्टॉरंटमध्ये गोंधळ केला. हॉटेल मॅनेजरकडे सीसीटीव्ही पाहण्यासाठी विचारले असता, ‘फुटेज मुंबईत आहे, उद्या मिळेल,’ असं सांगितलं. यावरून दोघांनी थेट बाणेर पोलीस ठाण्यात जाऊन राग काढला. पोलीस ठाण्यात 3 मार्चच्या रात्री 11.45 वाजता सुरु झालेला गोंधळ 4 मार्चच्या पहाटे 5 वाजेपर्यंत सुरूच होता. बाणेर पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक समोर तरुणीने रागात बोलून पोलीस युनिफॉर्म ओढला आणि हातावर चावा घेतला. युवराजनेही धमकी दिली, ‘मी माझ्या पावरने तुमची नोकरी मिटवतो.’ दोघांनी असंही सांगितले की उद्या ठाण्यात परत येऊन पुन्हा गोंधळ करतील.युवराज निलेश परतानी मूळचा हरियाणाचा असून पुण्यात नोकरी करतो. या दोघांनी मद्यपान करून पोलीस ठाण्यात घातलेल्या गोंधळामुळे पोलीस देखील हैराण झाले होते. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत आणि पुढील कारवाई लवकरच होणार आहे.

रोहित शेट्टी घराजवळ गोळीबार : शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला ताब्यात घेतले

मुंबई-बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील जुहू परिसरात घडलेल्या या घटनेने काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. या हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि हल्ल्यासाठी लागणारे पैसे प्रवीण लोणकरने पुरवले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण लोणकर याला यापूर्वीच एका वेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेने त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. त्या प्रकरणात तो आधीपासूनच पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही त्याचा संबंध असल्याचे तपासात समोर आल्यामुळे गुन्हे शाखेने न्यायालयाची परवानगी घेऊन त्याचा ताबा घेतला आहे. या प्रकरणात लोणकर बंधूंच्या सांगण्यावरूनच शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी शुभम लोणकर व्यतिरिक्त आरजू बिश्नोई नावाच्या व्यक्तीचाही या प्रकरणात संबंध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजू बिश्नोई हा अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. त्यामुळे शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई या दोघांनाही या प्रकरणात ‘वॉन्टेड’ घोषित करण्यात आले आहे. या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून त्यांच्या हालचालींबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

या हल्ल्याच्या घटनेविषयी बोलायचे झाले तर, 1 फेब्रुवारी रोजी रविवारी हा प्रकार घडला होता. त्या दिवशी काही अज्ञात व्यक्तींनी रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार केला होता. हल्ल्यापूर्वी आरोपींनी शेट्टी यांच्या घरासह संपूर्ण परिसराची सविस्तर रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे. ही रेकी त्याच स्कूटरवरून करण्यात आली होती, ज्याचा वापर नंतर गोळीबारासाठी करण्यात आला. त्यामुळे हल्ल्यानंतर आरोपींना पळून जाणे सोपे व्हावे, असा त्यांचा उद्देश होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

योजनेप्रमाणे आरोपींनी रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर पाच राउंड गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर स्कूटरवर बसून तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला. पुढे तो विलेपार्ले रेल्वे स्टेशन येथे पोहोचला आणि तिथे स्कूटर सोडून दिली. त्यानंतर रेल्वेने मुंबई सोडून फरार झाल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. आता प्रवीण लोणकरचा ताबा मिळाल्यानंतर या प्रकरणातील आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिराच्या संगीत पद्माराणी नाटकास ११ पारितोषिके

पुणे : ६४व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भरत नाट्य संशोधन मंदिराने सादर केलेल्या संगीत पद्माराणी या नाटकास सांघिक द्वितीय पारितोषिकासह एकूण ११ पारितोषिके मिळाली आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेसाठीच या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.

पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला भक्तगण श्र‌द्धेने जातात. तेथे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिरे अलग अलग आहेत. इतरवेळा विठ्ठल-रखुमाईची एकत्र मूर्ती पहातो, पण मग पंढरपुरी असे का? सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी याचा शोध घेतला आणि त्यांना माळशिरस-पंढरपूर प्रांतातील विठ्ठल-रखुमाईच्या ताटातुटीची विलक्षण लोककथा ऐकायला मिळाली. त्यांच्या ‘पैस’ या पुस्तकात ती आहे. त्या कथेवर आधारित हे नाटक आहे. स्पर्धेची अंतिम फेरी सांगली येथे आयोजित करण्यात आली होती.

भरत नाट्य संशोधन मंदिरात मिळालेली पारितोषिके : सर्वोकृष्ट नाटक : सांघिक द्वितीय : संगीत पद्माराणी.

सर्वोकृष्ट दिग्दर्शन : द्वितीय : संजय नरहर.

सर्वोकृष्ट लेखन : प्रथम : रमेश नाईक.

सर्वोकृष्ट संगीत : प्रथम : आशिष केसकर.

सर्वोकृष्ट नेपथ्य : प्रथम : विश्र्वास पांगारकर.

सर्वोकृष्ट गायन : रौप्यपदक : अजिंक्य कुलकर्णी.

सर्वोकृष्ट गायन : गुणवत्ता प्रमाणपत्र : ऐश्र्वर्या भोळे.

सर्वोकृष्ट गायन : गुणवत्ता प्रमाणपत्र : वज्रांग आफळे.

सर्वोकृष्ट अभिनय : गुणवत्ता प्रमाणपत्र : ऐश्र्वर्या भोळे.

सर्वोकृष्ट अभिनय : गुणवत्ता प्रमाणपत्र : कौशिक कुलकर्णी.

वैविध्यपूर्ण संगीत नाटकांची निर्मिती करणे हे भरत नाट्य संशोधन मंदिराचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संगीत पद्माराणी या नाटकाची निर्मिती करण्यात आली. स्पर्धेत कलाकार-तंत्रज्ञांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाला द्वितीय पारितोषिकासह एकूण ११ पारितोषिके मिळाली आहेत. सर्व कलाकारांचे अभिनंदन.

–    पं. पांडुरंग मुखडे, अध्यक्ष, भरत नाट्य संशोधन मंदिर

कलाकार कट्टा उध्वस्त कराल तर … रोहित पवारांनी दिला इशारा

कलाकार कट्ट्याचा त्रास , व त्याबाबत तक्रारी पोलिसांकडेही नाहीत -बाबा पाटील
पुणे- राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष यांनी पोलिसांकडून RTI खाली मिळालेल्या माहितीचा हवाला देत कलाकार कट्ट्याचा कोणालाही उपद्रव नसल्याचे स्पष्ट केल्यावर आज कलाकार कट्ट्याला आमदार रोहित पवार यांची भेट देऊन त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले उगाचच पुण्याच्या सांकृतिक आणि सामाजिक चळवळीला चिरडण्यासाठी कलाकार कट्टा उध्वस्त करण्याचा अगर स्वार्थासाठी अशी महत्वपूर्ण जागा नाहीसी करण्याचा असा प्रयत्न आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हाणून पाडतील .

कर्नाटक सरकारची 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरास बंदी घालण्याची घोषणा

बेंगलोर – कर्नाटक सरकारने शुक्रवारी 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरास बंदी घालण्याची घोषणा केली. कर्नाटक असे करणारे देशातील पहिले राज्य आहे.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले की, मुलांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर वेगाने वाढत आहे, ज्यामुळे त्यांच्यावर चुकीचा परिणाम होत आहे. त्यांनी म्हटले,या बंदीची अंमलबजावणी कशी केली जाईल, याची तयारी सुरू आहे आणि लवकरच नियम बनवले जातील.
तर आंध्र प्रदेश सरकार देखील 13 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली.
सिद्धरामय्या म्हणाले की, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी आणि त्यांचे भविष्य घडवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थांची समस्या रोखण्यासाठी सरकार पावले उचलेल.

यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाईल. तसेच, विद्यार्थी अंमली पदार्थांपासून दूर राहावेत यासाठी कठोर नियम लागू केले जातील. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मदत आणि समुपदेशन केंद्रेही उभारली जातील, जिथे ते त्यांच्या समस्या मोकळेपणाने सांगू शकतील.
16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचा प्रस्ताव डेटा सुरक्षा कायदा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023 (DPDP) आणि पर्सनल डेटा प्रोटेक्शन रूल्स 2025 शी देखील संबंधित आहे.
या अंतर्गत, मुलांना खाते तयार करण्यापूर्वी पालकांची परवानगी आणि वयाची पडताळणी आवश्यक असेल. यासाठी सरकारी ओळख प्रणाली किंवा डिजिटल लॉकरचा वापर केला जाऊ शकतो.


ऑस्ट्रेलिया सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये बंदी घातली

ऑस्ट्रेलिया सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये ‘ऑनलाइन सेफ्टी अमेंडमेंट बिल’ मंजूर केले होते. या कायद्याचा उद्देश मुलांना ऑनलाइन हानिकारक सामग्री आणि सायबर धोक्यांपासून वाचवणे हा आहे. यात 16 वर्षांखालील मुलांना TikTok, X (ट्विटर), फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, यूट्यूब यांसारख्या मोठ्या सोशल मीडिया साइट्सपासून दूर ठेवण्याची तरतूद आहे.

या प्लॅटफॉर्म्सना अल्पवयीन मुलांची खाती हटवण्याची आणि वयाची कठोर पडताळणी (एज व्हेरिफिकेशन) करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, मात्र, या कायद्यावरून तेथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डिजिटल अधिकारांवर वादविवादही सुरू आहे.
किशोरवयात सोशल मीडियाकडे जास्त कल

किशोरवयात ‘सामाजिक मान्यता’ खूप महत्त्वाची असते. सोशल मीडिया किशोरवयीन मुलांना असे व्यासपीठ देतो, जिथे ते आपली ओळख निर्माण करू शकतात आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी जगासोबत शेअर करू शकतात. हे त्यांच्यासाठी केवळ मनोरंजन नाही, तर एक आभासी जग आहे, जिथे ते आपले अस्तित्व शोधतात.

यासोबतच, येथे मिळणारे तात्काळ प्रतिसाद (लाइक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज) त्यांना हे जाणवून देतात की लोक त्यांना पाहत आहेत आणि हे महत्त्वाचे आहे. किशोरवयीन मुलांच्या सोशल मीडियाकडे आकर्षित होण्याची अनेक कारणे असू शकतात.

सोने 3 दिवसांत 8,000 ने स्वस्त, चांदी 26,000 ने घसरली

आज म्हणजेच 6 मार्च (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून ₹1,58,750 वर आला आहे. यापूर्वी गुरुवारी याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,60,586 रुपये होता. सोनं 3 दिवसांत 8,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

तर, एक किलो चांदी 902 रुपयांनी घसरून ₹2,60,723 वर आली आहे. यापूर्वी याचा भाव प्रति किलो ₹2,64,212 रुपये होता. हे 3 दिवसांत स्वस्त झाले आहे. सोने-चांदीच्या दरातील ही घसरण प्रॉफिट बुकिंगमुळे झाली आहे.

गट केंद्र, सीआरपीएफ, पुणे यांच्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे, 6 मार्च 2026

सीआरपीएफ स्थापना दिनाच्या निमित्ताने गट केंद्र, सीआरपीएफ, पुणे येथे सहस्थित सर्व संस्थांच्या सहकार्याने कॉम्पोझिट हॉस्पिटल (CH), पुणे येथे दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आज उद्घाटन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराला दलातील अधिकारी व जवानांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वयंप्रेरणेने रक्तदान करून मानवतेची सेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री वैभव निंबाळकर, आयपीएस, उपमहानिरीक्षक (DIG), गट केंद्र, सीआरपीएफ, पुणे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवानांसह रक्तदान करून या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.

या प्रसंगी बोलताना श्री वैभव निंबाळकर यांनी सांगितले की रक्तदान हे अत्यंत पवित्र व मानवतेच्या सेवेसाठीचे महान कार्य आहे आणि सीआरपीएफचे अधिकारी व जवान देशसेवेबरोबरच समाजसेवेतही नेहमीच पुढे असतात.

हे रक्तदान शिबीर उद्याही (शनिवारी) सुरू राहणार असून सुमारे 200 रक्तदात्यांकडून रक्त संकलन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे स्थापना दिनाच्या उत्सवाला सेवाभावाची प्रेरणा मिळणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी एकूण 180 जागांवर होणार नियुक्ती

देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली, दि. ६ : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या  नागरी सेवा परीक्षा -2025 मध्ये  देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात राज्यातील 60 हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे.\केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष 2025 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे.  ऋषीकेश आलासे 61 ,आकाश त्रिवेदी यांनी 73, गौरव चोपडा यांनी 83, सायली पगार यांनी 87, वा तर दिक्षा पाटकर यांनी 88 वा क्रमांक पटकावला आहे.

यशस्वी उमेदवारांची यादी

हृषीकेश आलासे (६१) आकाश त्रिवेदी (७३) गौरव चोप्रा (८३) सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१)

केंद्र सरकारच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी ऑगस्ट 2025 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  डिसेंबर  2025- फेब्रुवारी 2026 दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 958 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –317, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 104, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 306, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 158, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 73  उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 258 उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 129, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 26,  इतर मागास वर्ग -86, अनुसूचित जाती- 08, अनुसूचित जमाती – 06  उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण तीन दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 74, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 18इतर मागास वर्ग (ओबीसी) –47, अनुसूचित जाती (एससी) – 28, अनुसूचित जमाती (एसटी) 13  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण – 55 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 22, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 6,  इतर मागास वर्ग (ओबीसी) – 15, अनुसूचित जाती (एससी) – 8, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 4 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – 150 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 15,  इतर मागास प्रवर्गातून – 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 22, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 11  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 507 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 211, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 48 , इतर मागास प्रवर्गातून -141, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 73 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –34  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 195   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 79, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  17 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 61, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 27 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -11 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 348 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

नवी मुंबईत ९ मार्चपासून ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव’

मुंबई, दि. ०६ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून ९ मार्च ते १३ मार्च, २०२६ या कालावधीत ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम ९ मार्च ते १३ मार्च, २०२६ या कालावधीत सायंकाळी ६.३० वा. सिडको सेक्टर ५, गांवदेवी मैदान, सानपाडा, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. ९ मार्च,२०२६ रोजी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.नाराणगांव, जि.पुणे; १० मार्च, २०२६ रोजी संगीताची राणी कमल अनिल कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.आगाशिवनगर, दांगटवस्ती, ता.कराड, जि.सातारा; ११ मार्च, २०२६ रोजी वगसम्राट मा.शांताराम चव्हाण दहिवतकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.दहिवत, ता.अमळनेर, जि.जळगांव; १२ मार्च,२०२६ रोजी तमाशा महर्षी आनंदराव महाजन लोकनाट्य तमाशा मंडळ, आसोदा रोड, शनिपेठ, जळगाव; १३ मार्च,२०२६ रोजी तमाशा सम्राट तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.नारायणगांव, जि.पुणे यांचे सादरीकरण होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ढोलकीफड तमाशा महोत्सव पार पडणार आहे. हा महोत्सव रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, नवी मुंबई परिसरातील रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,: राज्यातील विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून ही भरती प्रक्रिया कालबद्ध नियोजन करून पूर्ण करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू व प्र-कुलगुरूंची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी २०२०) अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू, प्र-कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारीत (रँकिंग) वाढविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठांनी कालबद्ध नियोजन करून शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनवृद्धी, अध्यापनातील नावीन्य आणि प्रशासकीय कार्यक्षमता यांना प्राधान्य द्यावे. गुणवत्ता वृद्धीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील रिक्त पदांची माहिती संकलित करून नियमानुसार भरती प्रक्रिया राबवावी, असे निर्देश देण्यात आले. सर्व संबंधित संस्थांनी प्राध्यापक भरती प्रक्रिया जून २०२६ पर्यंत पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

निर्धारित मुदतीपर्यंत प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांतील पदसंख्या कमी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही मंत्री पाटील यांनी दिला.

घरखरेदीदारांसाठी जगातील पहिले एआय प्रॉपर्टी सर्च इंजिन ‘CREDAIBILITY.AI’ चे लॉन्च

पुणे, ६ मार्च २०२६ : रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रणी संस्था क्रेडाई पुणे यांच्या वतीने रिअल इस्टेट डेव्हलपर्स
असोसिएशनकडून विकसित करण्यात आलेले जगातील पहिले एआय-आधारित प्रॉपर्टी सर्च प्लॅटफॉर्म
‘CREDAIBILITY.AI’ लाँच करण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म ६ मार्च रोजी शेरेटन ग्रँड, पुणे येथे आयोजित
क्रेडाई पुणेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. प्रॉपटेक कंपनी रिलाटा यांच्या भागीदारीत विकसित
करण्यात आलेले हे अ‍ॅप पुण्यातील घरखरेदीदारांच्या प्रॉपर्टी शोध प्रक्रियेची सुरुवात क्रेडाईच्या
इकोसिस्टीममध्येच व्हावी, यासाठी तयार करण्यात आले आहे. यामुळे अधिक पारदर्शक आणि डेव्हलपर-
नेतृत्वाखालील डिजिटल प्रॉपर्टी मार्केटप्लेस तयार होण्यास मदत होणार आहे.
सध्या या अ‍ॅपवर ४०० हून अधिक प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली असून, लवकरच ही संख्या ८०० पेक्षा
अधिक प्रकल्पांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहरासाठी एक सर्वसमावेशक प्रॉपर्टी
शोध प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. काळानुसार एआय आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत या अ‍ॅपमध्ये आणखी
एआय-आधारित सुविधा, बाजारपेठेतील अंतर्दृष्टी (मार्केट इन्साइट्स) आणि घरखरेदीदारांसाठी सहाय्यक
साधने समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
Credaibility.AI पारंपरिक रिअल इस्टेट सर्च इंजिनपेक्षा अधिक विश्वासार्ह का?

  1. ग्राहकांच्या विद्यमान समस्यांवर प्रभावी तोडगा
    अनेक प्रॉपर्टी पोर्टल्सवर आढळणाऱ्या बनावट लिस्टिंग, एकाच प्रकल्पाच्या अनेक नोंदी, स्पॅम कॉल्स आणि
    डेटाचा गैरवापर यांसारख्या समस्यांवर या अ‍ॅपमुळे नियंत्रण मिळते. तसेच एकाच प्रकल्पाची वेगवेगळ्या
    ब्रोकरकडून होणारी पुनरावृत्ती टाळल्यामुळे ग्राहकांची गोंधळाची शक्यता कमी होते.
  2. फक्त पडताळणी केलेल्या डेव्हलपर्सच्या प्रकल्पांची नोंद
    या प्लॅटफॉर्मवर केवळ क्रेडाई पुणेच्या पडताळणी झालेल्या सदस्य डेव्हलपर्सचेच प्रकल्प दाखवले जातात.
    प्रत्येक प्रकल्पाची अधिकृत आणि एकमेव लिस्टिंग थेट डेव्हलपरकडून प्रकाशित केली जाते.
  3. डेव्हलपरशी थेट संपर्क
    या प्लॅटफॉर्ममुळे प्रॉपर्टी शोध प्रक्रियेत मधले अनावश्यक दुवे कमी होतात. त्यामुळे घरखरेदीदारांना थेट
    डेव्हलपरकडून अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळते.
  4. एआय-आधारित स्मार्ट सर्च सुविधा

या अ‍ॅपमध्ये आपल्या सोप्या भाषेत शोध घेण्याची सुविधा आहे. उदाहरणार्थ, “बाणेरमध्ये मेट्रो जवळ ९०
लाखांखाली २ बीएचके” अशा साध्या वाक्यात शोध घेतल्यास एआय तंत्रज्ञान बजेट, जीवनशैली, लोकेशन
आणि कनेक्टिव्हिटीच्या आधारे योग्य प्रॉपर्टी सुचवते.

  1. कमी स्पॅम कॉल्स आणि डेटा सुरक्षितता
    या प्लॅटफॉर्मची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की अनावश्यक लीड्स आणि अवांछित कॉल्स कमी
    होतात. त्यामुळे घरखरेदीदारांसाठी अधिक सुरक्षित आणि गोपनीयता जपणारा संवादाचा पर्याय उपलब्ध
    होतो.
  2. डेव्हलपर-आधारित पारदर्शक इकोसिस्टीम
    डेव्हलपर्सच्या मालकीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे थर्ड-पार्टी पोर्टल्सवरील अवलंबित्व कमी होते. यामुळे
    मार्केटिंगमधील अकार्यक्षमता कमी होऊन प्रॉपर्टी शोध प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वास वाढण्यास मदत
    होते.
    या लॉन्चबाबत बोलताना क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री. मनीष जैन म्हणाले, “अलिकडच्या काळात प्रॉपर्टी
    पोर्टल्सवर बनावट लिस्टिंग, एकाच प्रकल्पाच्या अनेक नोंदी, स्पॅम कॉल्स आणि डेटाचा गैरवापर या बाबींबाबत
    अनेक तक्रारी समोर येत आहेत. घरखरेदीदारांनी ऑनलाईन आपली माहिती दिल्यानंतर त्यांना अनेक
    अनावश्यक फोन कॉल्स येतात. तसेच एकाच प्रकल्पाची अनेक दलालांकडून स्वतंत्र नोंद केल्यामुळे गोंधळ आणि
    चुकीची माहिती पसरते. दुसरीकडे डेव्हलपर्सनाही अपात्र किंवा बनावट लीड्समुळे विपणन खर्च वाढण्याचा
    सामना करावा लागतो, ज्याचा परिणाम शेवटी ग्राहकांवर होतो. या सर्व दैनंदिन अडचणींवर उपाय म्हणून
    आम्ही ‘CREDAIBILITY.AI’ ची निर्मिती केली आहे.”
    तसेच क्रेडाई पुणेचे उपाध्यक्ष अरविंद जैन म्हणाले, “Credaibility.AI हे केवळ तांत्रिक प्लॅटफॉर्म नाही,
    तर प्रॉपर्टी शोध प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता आणण्याच्या क्रेडाई पुणेच्या
    वचनबद्धतेचे प्रतीक आहे. डेव्हलपर्सच्या मालकीचे एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करण्याचा आमचा उद्देश आहे,
    ज्यामुळे विश्वसनीयता सुनिश्चित होईल आणि प्रॉपर्टी शोधाशी संबंधित सर्व गरजा एका छताखाली उपलब्ध
    होतील. घरखरेदीदारांसाठी एआय-आधारित प्रॉपर्टी सर्च इंजिन विकसित करणारी आम्ही जगातील पहिली
    संस्था असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक लोकांना लाभ होईल आणि त्यांची
    प्रॉपर्टी शोध प्रक्रिया अधिक सुलभ व सहयोगी होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
    या उपक्रमाच्या माध्यमातून क्रेडाई पुणे प्रॉपर्टी शोध प्रक्रियेला नव्याने आकार देण्याचा प्रयत्न करत आहे.
    पडताळणी केलेल्या डेव्हलपर्सच्या प्रकल्पांची नोंद, घरखरेदीदार आणि डेव्हलपर यांच्यातील थेट संवाद तसेच
    एआय-आधारित स्मार्ट सर्च या सुविधांचा पारदर्शक आणि इकोसिस्टीम-आधारित चौकटीत समावेश करून ही
    प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
    बनावट लिस्टिंग, स्पॅम कॉल्स आणि चुकीची माहिती यांसारख्या दीर्घकाळापासून असलेल्या समस्यांवर तोडगा
    काढत हे प्लॅटफॉर्म घरखरेदी प्रक्रियेत अधिक विश्वास, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता निर्माण करण्याचे उद्दिष्ट

ठेवते. तसेच तंत्रज्ञानावर आधारित रिअल इस्टेट सर्चसाठी एक नवे मानदंड निर्माण करण्याचा प्रयत्न या
उपक्रमातून करण्यात येत आहे.

सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प-विद्याधर अनास्कर

पुणे, दि. ६: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणे, पायाभूत सुविधांचा विस्तार करणे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे या चार प्रमुख उद्दिष्टांचा समावेश असल्याने यंदाचा अर्थसंकल्प हा योग्य ती अंमलबजावणी झाल्यास राज्याला गतीमान विकासाकडे नेणारा ठरेल असा विश्वास दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक लि. चे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला.

श्री. अनास्कर म्हणाले, महाराष्ट्राच्या आर्थिक रचनेत सहकार क्षेत्राचे विशेष स्थान आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न दिसत असल्याने कृषी प्रक्रिया, ग्रामीण वित्तीय सेवा आणि लघू उद्योगांना चालना देण्यासाठी सहकारी संस्थांचा विशेष उपयोग होऊ शकतो. योग्य ते धोरणात्मक पाठबळ मिळाल्यास राज्याचे सहकार क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकते, यामुळे सहकार क्षेत्रासाठी ही संधी उपलब्ध होऊ शकते.

अर्थसंकल्पात कृषी प्रक्रिया उद्योग, शीत गृहे व्यवस्था, साठवणूक व मूल्यवर्धन यावर भर देण्यात आला आहे. या क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरु शकते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रक्रिया, उद्योग, निर्यात व विपणन यामध्ये सहकारी संस्थांद्वारे अधिक संघटित व्यवस्था उभारता येऊ शकेल.

नागरी सहकारी बँका, राज्य बँक व जिल्हा सहकारी बँका या ग्रामीण व लघू उद्योग क्षेत्रासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या संस्था आहेत. एम.एस.एम.ई. स्टार्टअपस् कृषी प्रक्रिया यांना कर्ज पुरवठा करण्यामध्ये सहकारी बँकांनी अधिक सक्रिय भूमिका घेण्याची संधी आहे. योग्य नियामकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सहकारी बँका आर्थिक समावेशनात मोठे योगदान देऊ शकतात. अर्थसंकल्पातील ग्रामीण उद्योग विकासाच्या योजनांमुळे सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.

थोडक्यात अर्थसंकल्पात ग्रामीण विकास, कृषी प्रक्रिया आणि उद्योग विकासावर दिलेला भर सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा आहे. राज्यातील सहकारी संस्था जर योग्य व पारदर्शी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान यांचा स्वीकार करतील तर राज्याच्या आर्थिक विकासात सहकार क्षेत्राची भूमिका प्रभावी ठरु शकते, असेही श्री. अनास्कर म्हणाले.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?

मुंबईतील २० लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार असून एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारली जाणार आहेत. तसेच नवीन झोपडपट्टी होणार नाही यासाठी ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’ प्रणाली राबवली जाणार, अशी घोषणा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुंबई, दिनांक ०६ मार्च २०२६

सन २०२६-२७ या वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज ०६ मार्च २०२६ रोजी विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाचे बहुतांश तयारी ही स्व. अजित पवार यांनी केली होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला.

अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी स्व. अजित पवार यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना, अजित दादांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. आज त्यांच्या जागी हा अर्थसंकल्प सादर करताना माझं अंतःकरण जड झालं आहे. लवकरच त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं भव्य स्मारक उभारलं जाईल. तसेच गतिमान नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जाईल. अशी घोषणा केली. तसेच, या वर्षाचा हा अर्थसंकल्प मी अजित पवार यांना समर्पित करतो. त्यांच्या करड्या स्वभावामुळे कायमच शिस्त पाळली गेली. कामाचा माणूस अशी त्यांची ओळख होती आणि त्यांच्या जाण्याने कधीही भरुन न निघणारी पोकळी तयार झाली आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे घेऊन जाणारा असून यात मुंबई शहरासाठी विशेष सोईसुविधांचा समावेश करण्यात आला आहे. तिसरी मुंबई म्हणून उरण परिसरात विकास केला जाणार आहे. तसेच मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय मुंबईतील, मेट्रो, रस्ते, विमानतळ, बुलेटट्रेन यासाठीही विशेष तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?

  • मुंबईमध्ये वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गाची आणखी एक भुयारी मेट्रो प्रस्तावित
  • मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ : २२, ८६२ कोटी
  • तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो २ : ५५७५ कोटी.
  • दक्षिण मुंबई २०२८ पर्यंत समृद्धी महामार्गासह जोडली जाणार
  • मुंबईमध्ये २०२९ पर्यंत १६५ कि.मी.च्या मेट्रोच्या मार्गिका तयार केल्या जाणार
  • अटल सेतू थेट मुंबई विमानतळाला जोडणार
  • मुंबईसह राज्यभरात १ हजार २०० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारणार
  • ६ हजार कि.मी. चे द्रुतगती मार्ग विकसित करणार
  • वर्सोवा-भाईंदर सागरीकिनारा मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार
  • पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार
  • मुंबई महानगर परिसरात सर्वांगिण आरोग्य आणि वेलनेसचे केंद्र उभारणार
  • मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टीचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करणार
  • मुंबई ते वाढवण बंदर जोडण्यासाठी उत्तन ते विरार सागरी सेतू
  • मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार
  • वडाळा, मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब तयार करणार
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी मार्गावरील तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार. विरार, बोईसर, ठाणे स्थानकाभोवती विकासाचा बृहद आराखडा तयार करणार
  • मुंबईतील भुयारी मार्ग : ऑरेंज गेट, पूर्व मुक्तमार्ग ते मरीनड्राईव्ह, गोरेगाव-मुलुंड, ठाणे ते बोरीवली, खारघर ते तुर्भे, वांद्रे-वरळी सागरी सेतू ते हायस्पीड रेल्वेस्थानक वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
  • मुंबई महानगरात गायमुख जंक्शन ते फाऊंटेन हॉटेल जंक्शन ते पुढे भाईंदर असा अनुक्रमे ६ आणि ९ कि.मी.चा भुयारी मार्ग
  • उन्नत मार्ग : शिवडी-वरळी, ऐरोली-कटाई नका, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटलसेतू ते मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग, छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत, ठाणे

याशिवाय राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणर आहे. त्यामुळे शहरी सेवा डिजिटल करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं काम २०२७ पर्यंत पूर्ण केलं होणार आहे. तिसरी मुंबई म्हणून येत्या काळात उरण परिसराचा विकास केला जाणार असून या तिसऱ्या मुंबईमध्ये कर्नाळा, साई, चिरनेर नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीन फिल्ड शहरे म्हणून विकासित केली जाणार आहेत. तसेच मुंबईमध्ये बेकायदेशीर बांधकामांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

चौथी मुंबई वाढवण येथे विकसित केली जाणार आहे. लॉजिस्टीक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्र निर्माण करणार, वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार, मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर, आसपासच्या ४४ गावात कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार.

भांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव; दिगंबर जैन राष्ट्रसंतांचा दुर्मिळ समागम

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना खास निमंत्रण

पुणे, दि. ६ मार्च : दौंड तालुक्यातील भांडगाव (यवत) येथील भक्तामर कलश तीर्थ येथे ११ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत ‘१००८ आदिजिन पंचमेरू मानस्तंभ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भक्तामर कलश तीर्थ परिसरात कलशाकार मंदिर, नवग्रह रत्नमय प्रतिमा, नद्यावर्तात १०८ आदिनाथ जिन प्रतिमा, भक्तामर ध्यान केंद्र व हीलिंग सेंटर, भक्तामर शास्त्र मानस्तंभ, महाद्वार, नवधा भक्ति भोजनालय, संत निवास व यात्रेकरू विश्रामालय, आरोग्य धाम (अस्पताल) तसेच पूजन साहित्य उपलब्ध करून देणारे भांडार अशा विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या महोत्सवाच्या यानिमित्ताने दिगंबर जैन राष्ट्रसंतांसह अनेक आचार्य, उपाध्याय, साधू-साध्वींचा दुर्मिळ संतसमागम येथे होणार आहे.

महोत्सवात १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता ‘भक्तामर ज्योतिष सम्मेलन’, १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता ‘भक्तामर हीलर महोत्सव’ तसेच ४८००० मीटर हस्तलिखित भक्तामर वस्त्रांची विशेष झांकी सादर केली जाणार आहे. याशिवाय ‘जैन अल्पसंख्याक योजना – सरकारी योजना आणि संधी’ या विषयावर ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अमेरिकेतून पूर्वा सारंग शहा निर्मित भक्तामरवर चित्रफितीचे सादरीकरण होणार आहे.

या महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राजू शेट्टी, आमदार राहुल कुल यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आल्याची माहितीही यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी पत्रकार परिषदेत श्री. किशोर जिनदत्त शहा (चंदूकाका सराफ), डॉ. सारंग शरद कुमार शहा, श्रीमती सुजाता निरंजन शहा, ॲड. डॉ. स्वप्निल महावीर शहा (पुणे), श्री मिलिंद फडे आणि श्री. चेतन शहा (बारामती), वीरकुमार शहा, सुरेंद्र बडजात्या उपस्थित होते. विश्व संत डॉ. आचार्य श्री प्रणाम सागर जी गुरुदेव यांच्या प्रेरणेने तसेच दीक्षा गुरु पूज्य आचार्य श्री पुष्पदंत सागर जी यांच्या आशीर्वादाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

आचार्य प्रणाम सागर जी हे गेल्या २९ वर्षांपासून अखंड भक्तामर साधनेत लीन असून त्यांच्या सान्निध्यात अनेक कुटुंबांना आध्यात्मिक शांती व तीर्थानुभूती लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यात प्रथमच जगतगुरु अष्टांग निमित्त ज्ञानी गणधराचार्य श्री कुंथु सागर जी, राष्ट्र संत आचार्य श्री गुणधरनंदी जी, पूज्य आचार्य श्री प्रसन्न ऋषि जी यांसह अनेक आचार्य, उपाध्याय, साधू-साध्वींचा दुर्मिळ संतसमागम होणार आहे.