Home Blog Page 79

विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि. ६ : राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि व्हिजन डॉक्युमेंटची प्रभावी अंमलबजावणी करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प आदरणीय अजित दादा पवार यांना समर्पित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले. आदरणीय दादांचे उचित स्मारक उभारण्याबरोबरच त्यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्याची घोषणा ही त्यांना अर्पण केलेली योग्य श्रद्धांजली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख आधारस्तंभांवर राज्याचा विकास साधण्याची दिशा या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येते. आदरणीय अजित दादा पवार यांनी मांडलेल्या प्रगत आणि विकासाभिमुख संकल्पनांशी सुसंगत अशी विकासाची दिशा या अर्थसंकल्पातून पुढे आली असून महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राज्याच्या विकासात शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी क्षेत्राला बळकटी देणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे, पर्यटन, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विस्तार करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
भांडवली खर्चात सुमारे २० टक्क्यांची भरीव वाढ केल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून महाराष्ट्र देशातील अग्रगण्य अर्थव्यवस्था म्हणून अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एक टक्का निधी राखून ठेवण्याचा निर्णय हा आदरणीय दादांच्या संवेदनशील विचारांचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाच्या स्मारकाचे काम यावर्षी पूर्ण करण्यात येणार असून सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली विकास आराखड्यासाठीही विशेष तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देत ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी भरीव तरतूद, एकल महिलांच्या कल्याणासाठी धोरण तसेच ‘लखपती दीदी’ उपक्रमाद्वारे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर वाढविण्यासाठीही या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ग्रोथ हब उभारण्याची योजना तसेच अमृतकालीन रस्ते विकास योजना आणि मेट्रो प्रकल्पांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत वाढ करण्यात आली असून त्यामध्ये आदरणीय दादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीसाठी बृहद आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी ३६० खाटांचे नवे रुग्णालय, नर्सिंग कॉलेज आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुक्यांमधील अवर्षणप्रवण भागांना दिलासा देण्यासाठी पाणीपुरवठा व सिंचनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतीला मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला चालना देणारा असून महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा आणि वेग देणारा ठरेल. विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


राज्याच्या अर्थसंकल्पातील पुण्याचे रस्ते नितीन गडकरींच्याही घोषणेत ..५० हजार कोटी पुण्याच्या रस्त्यांसाठी..

पुणे-केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे विभागासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती दिली. पुण्यात झालेल्या एका बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.या बैठकीत पाच प्रमुख रस्ते प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये पुणे-शिरूर कॉरिडॉरचा ५४ किलोमीटर लांबीचा प्रकल्प समाविष्ट आहे, ज्यासाठी ७ हजार ५१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा ५३ किलोमीटरचा मार्ग असून, त्यासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या प्रकल्पाची निविदा निश्चित करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, पुणे-सोलापूर मार्गावरील हडपसर ते यवत हा ३१ किलोमीटरचा प्रकल्प प्रस्तावित असून, त्यासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नाशिक फाटा ते खेड या मार्गासाठी सुमारे ७ हजार ८०८ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर सुमारे सव्वा दोन तासांत पार करता येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

पुणे शहरातील वाढती वाहतूक समस्या आणि प्रदूषण लक्षात घेऊन, शहराला वाहतूकमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या सहा प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून आवश्यक असलेल्या काही बाबींमध्ये सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. विशेषतः, वाळू, दगड यांसारख्या बांधकाम साहित्यावरील काही शुल्क माफ करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोल्हापूर परिसरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच, मुंबई ते बंगळूर दरम्यान नवीन महामार्ग उभारण्याची योजना असून, तो जवाहरलाल नेहरू पोर्ट जवळून जात पुण्यामधून पुढे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पालखी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, पुढील महिन्यात या मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. ‘मी स्वतः देहू-पंढरपूर आणि आळंदी-पंढरपूर हा पालखी मार्ग पाहणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात येईल,’ असे गडकरी यांनी सांगितले.

याशिवाय, कात्रज उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुणे रिंगरोड प्रकल्प राज्य सरकारमार्फत राबवला जात आहे. पुणे-सातारा रस्त्यासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात येणार असून, पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या सुधारणा कामालाही गती देण्यात येणार आहे. पुढील महिन्यात अनेक प्रकल्पांचे उद्घाटन होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

तिसरी व चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग अदानी अंबानीच्या फायद्यासाठी, सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पात स्थान नाही.

0

‘विकसीत महाराष्ट्र २०४७’ चे गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले.

मुंबई, दि. ६ मार्च २०२६.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विकसीत महाराष्ट्र २०४७ ची कल्पना व १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्न आहे. मागील काही वर्षात भाजपा युती सरकार अर्थसंकल्प जाहीर करते व नंतर येणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात कोट्यवधी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचे दिसून आले आहे. राज्यावरील कर्ज व कर्जाची हमी मिळून १२ लाख कोटींच्या आसपास बोजा आहे. कर्जाच्या हप्त्यापोटी ६५ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. त्यामुळे अर्थसंकल्पातील आकडे व प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती यात प्रचंड तफावत आहे. गेल्या अर्थससंकल्पात अनुसुचित जातींच्या योजनांसाठी २२ हजार ६५८ कोटींची तरतूद केली होती पण प्रत्यक्षात ६ हजार २०० कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या योजनांवर अर्थसंकल्पात मोठ मोठे आकडे जाहीर केले जातात पण प्रत्यक्षात ते खर्च केले जात नाहीत.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यासमोर सर्वात मोठे संकट बेरोजगारीचे असताना अर्थसंल्पात केवळ ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. आजपर्यंतच्या मेगा भरतीचा भाजपा सरकारचा इतिहास पाहता ही सुद्धा एक फसवी घोषणाच वाटते. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असे सांगितले असले तरी २१०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच आहे. सरकारने लाडक्या बहिणींची पुन्हा फसवणूक केली आहे. कर्जमाफीची घोषणा केली असली तरी फडणवीस सरकारने आधी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील लाखो शेतकरी आजही कर्जमाफीच्या लाभापासून वंचितच आहेत, हे पाहता आजच्या कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरु नये. लबाडाचे आवताण जेवल्याशिवाय खरे नाही असे या सरकारचे वागणे आहे. शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी काही घोषणा केलेल्या आहेत पण अमेरिकेसोबत केलेल्या व्यापारी करारापुढे आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी घटण्याचीच भिती जास्त आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यास अर्थसंकल्पातील घोषणा पुरेशा नाहीत. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडूनही राज्याचे सिंचन क्षेत्र ५६ लाख हेक्टरवरून कमी होऊन ३९ लाख हेक्टरपर्यंत आले आहे. सिंचनासोबतच पेरणीयोग्य क्षेत्रातही घट झाली आहे. यावरून सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.

तिसरी मुंबई, चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर हे अदानी व अंबानी यांच्या हितासाठी आहे, यातून सामान्य जनतेला काही फायदा होणार नाही. सरकारचे सौरउर्जा धोरणही फसवे आहे, त्यामुळे वीज ग्राहकांवर दिलासा नाही तर प्रति युनिट २६ पैसे अतिरिक्त भार पडणार आहे. स्मार्टमीटरमुळे अगोदरच वीजबिलात प्रचंड वाढ झालेली आहे. दावोसमधून २०२२ ते २०२५ पर्यंत ५० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाल्याचा दावा करण्यात आला पण आर्थिक पाहणी अहवालानुसार तर राज्यात फक्त ६ लाख कोटी रुपयांचीच गुंतवणूक आलेली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणाला प्राधान्य, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना;अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

मुंबई दि. ६ मार्च: महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महिलांच्या सक्षमीकरणापासून ते शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपर्यंत अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अर्थसंकल्पाचे मनापासून स्वागत केले असून, त्यात शाश्वत विकास, सामाजिक न्याय आणि ऐतिहासिक वारसा संवर्धनाला दिलेल्या महत्त्वाचे कौतुक केले. “हा सर्वसमावेशक आणि प्रगतिशील अर्थसंकल्प आहे, जो केंद्र सरकारच्या पावलांना अधिक प्रभावी बनवतो,” असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे महिला शेतकरी वर्ष जाहीर केले असून, त्याचा अर्थसंकल्पात समावेश करणे हे महत्वाचे पाऊल आहे. तसेच, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शताब्दी वर्ष जून २०२६ पासून सुरू होत असल्याने त्याची विशेष नोंद करणे हे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब आहे. “लाडकी बहिण” योजनेची वाढ आणि भरीव तरतूद याबाबत बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला. “मी उपसभापती या नात्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एकल महिलांचे सर्वेक्षण आणि धोरणाची मागणी दि.६मे २०२५ रोजी केली होती. आता ती ऐकली गेल्याचा आनंद आहे,” असे त्या म्हणाल्या. या योजनेचा विस्तार १३ जिल्ह्यांपर्यंत झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शाश्वत विकास उद्दिष्टांना (एसडीजी) केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्पात प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार मुख्य धाग्यांखाली विविध मुद्दे घेतले गेले आहेत. शहरी विकास, वाहतूक-मालपुरवठा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सामाजिक न्याय व कल्याण, उद्योग-सेवा, पर्यटन आणि ऊर्जा शाश्वतता यांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठीची तरतूद याबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणे हे कर्जमुक्तीच्या दिशेने अतिशय चांगले पाऊल आहे. हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरेल.”

आरोग्य क्षेत्रातील योजना, ऊसतोड कामगारांसाठी तरतुदी, कृषी संलग्न क्षेत्र आणि पायाभूत विकास यांनाही अर्थसंकल्पात स्थान मिळाले आहे. ऐतिहासिक वारसा संवर्धनाच्या बाबतीत डॉ. गोऱ्हे यांनी कुंभमेळ्याच्या तयारी, युनेस्कोने मान्यता दिलेल्या १२ किल्ल्यांचे संवर्धन, तुळापूर येथील संभाजी महाराज स्मारक आणि पानिपत येथील स्तंभ उभारणी यांचे कौतुक केले. “शासनाने ऐतिहासिक वारसाला दिलेले महत्त्व अभिमानकारक आहे,” असल्याचे सांगितले.

रस्ते विकासाच्या बाबतीत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील रस्ते व रेल्वे सुधारणेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विकासाला गती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १००० किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला काँक्रीट रस्त्यांची तरतूद केली आहे. रोजगाराभिमुख धोरणांतर्गत २०३० आणि २०४७ पर्यंतचे टप्प्यवार उद्दिष्ट ठरवले गेले आहेत. “२०४७ पर्यंतचे उद्दिष्ट साध्य करताना हे टप्पे महत्त्वाचे आहेत,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

एकंदरीत, या अर्थसंकल्पात कर वाढवण्यात आलेले नाहीत, ही बाब नागरिकांसाठी दिलासादायक आहे. उपसभापती व शिवसेना नेत्याच्या भूमिकेतून बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना देणारा आहे. मी त्याचे मनापासून स्वागत करते.”

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला काय ..वाचा सविस्तर

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना
पुणे महानगरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान ५ हजार १०० कोटी रुपयांच्या खर्चाने तिसरी आणि चौथी रेल्वेमार्गिका उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचा लाभ पिंपरी-चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव परिसराला होणार आहे.
राज्यातील मेट्रो नेटवर्क १ हजार २०० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ६ हजार किलोमीटरहून अधिक द्रुतगती मार्गांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या टप्पा-२ अंतर्गत खडकवासला–स्वारगेट–हडपसर–खराडी मार्गावर हडपसर ते लोणी काळभोर तसेच हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. रामवाडी ते वाघोली (११ कि.मी.) मेट्रो मार्गालाही मंजुरी देण्यात आली असून येरवडा ते कात्रज आणि हिंजेवाडी ते सिंहगड रोड या ५४ कि.मी. दुहेरी भुयारी मेट्रो मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. तसेच पुणे ते शिरूर ५३ कि.मी. उन्नत मार्गासाठी ७ हजार ५१४ कोटी रुपये, तळेगाव–चाकण २५ कि.मी. उन्नत मार्गासाठी ६ हजार ४९९ कोटी रुपये, चाकण–शिक्रापूर २८ कि.मी. मार्गाच्या सहापदरीकरणासाठी ५ हजार २३२ कोटी रुपये, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर १९२ कि.मी. ग्रीनफिल्ड महामार्गासाठी १४ हजार ८८६ कोटी रुपये, तसेच हडपसर ते यवत ३१.५० कि.मी. सहापदरीकरणासाठी ५ हजार २६२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

पुणे, दि.६: राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख स्तंभांवर आधारित असून प्रत्येक स्तंभांत चार उपक्षेत्रांचा समावेश करून एकूण १६ उपक्षेत्रांवर विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा, धार्मिक वारसास्थळे आणि औद्योगिक वाढ यांना चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रुपाने दिलासा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. यासोबतच बँकिंग व्यवस्था सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला पिण्याचे पाणी आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

वारसास्थळांचा विकास
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक वारसास्थळांच्या विकासालाही अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यातील शिवसृष्टी परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर येथील स्मारकाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून वढू बुद्रूक येथील समाधीस्थळाचा विकास जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.तसेच जगद्गुरु तुकाराम महाराजांचे देहू येथील जीर्ण घर व जन्मस्थान यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासकामांअंतर्गत श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास आणि भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्यात येणार आहे.

ग्रोथ हब, मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र
मुंबई महानगराच्या धर्तीवर पुण्यात ‘ग्रोथ हब’ विकसित करण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि पुणे येथे मिळून ५० अब्ज डॉलर्स क्षमतेचे मिडिया-टेक आणि एव्हीजीसी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग व कॉमिक्स) केंद्र उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून ३० लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राज्यात ४०० जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) तसेच नवउपक्रम शहरांची उभारणी करण्याची घोषणाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : २०२६ -वाचा जसाच्या तसा

विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : २०२६
एकूण चार स्तंभांवर आधारित अर्थसंकल्प प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन
प्रत्येक स्तंभात ४ उपक्षेत्र. अशा १६ उपक्षेत्रांवर आधारित हा अर्थसंकल्प
शेती
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर.
३० सप्टेंबर २०२५ रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसींनुसार कार्यवाही करणार
जून ते ऑक्टोबर २०२५ : शेतकऱ्यांना १५,४९२ कोटी रुपये वितरित
शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी १० ते १५ पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करणार
अॅग्रीस्टॅक, महावेध, क्रॉपसॅप, महाडीबीटी, को. ऑप स्टॅक इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टीम उभारणार

  • शेतीत एआयचा वापर. महाविस्तार एआय, वसुधा व्हॉईस टेलिफोनी, पुश टेलिफोनी, महाराष्ट्र अॅग्रीकल्चर डेटा एक्सचेंज, एआय सक्षम सँडबॉक्स इत्यादी उपक्रम सुरु

आता ४ कृषी विद्यापीठे एआय क्षमता आणि कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेटर सेंटरची स्थापना करणार. उत्पादन खर्चात २५ टक्के घट होऊन उत्पादकता वाढीला चालना
जानेवारी २०२६ पर्यंत १ कोटी ३१ लाख फार्मर्स आयडी तयार. आता त्यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी समाविष्ट करणार
कृषी समृद्धी योजना २०२६-२७ पासून ४ वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवणार.
नवीन प्राकृतिक शेती अभियानः ५ लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणणार
नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना : राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रिकरण करुन पशुधनात स्वयंपूर्णता, रोजगारनिर्मिती. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गो-पालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना प्रतिवर्षी १२४० कोटी रुपये देणार, २०,५९४ मासेमारांना लाभ
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार, यंदा सुमारे २०,००० कोटींची तरतूद, फेब्रुवारी २०२६ पर्यंत ३२,७५६ कोटी रुपये दिले
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : १६ हजार मे.वॅ. ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट, यातून १०० टक्के कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा, डिसेंबर २०२६ पर्यंत १० हजार मे.वॅ. क्षमता स्थापित होणार, सध्या ३३४९ मे.वॅ. क्षमता स्थापित
मागेल त्याला सौर कृषीपंप : आतापर्यंत ६,६३,३२४ सौर कृषीपंप दिले, अंमलबजावणीत महाराष्ट्र नंबर १

स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश
सिंचन/पाणी
२०४७ ची गरज लक्षात घेता ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन ५५ लिटर आणि शहरी भागात दरडोई १३५ लिटर पाण्याच्या उपलब्धतेचे लक्ष्य.
जलसंपत्तीची डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाईन माहिती प्राप्त करण्यासाठी नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र. यासाठी ७१.२० कोटी रुपये
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने २२४० कोटींचा प्रकल्प, कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भिमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवणार

  • वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प: ९४,९६८ कोटी
    वैतरणा व उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी गोदावरीत वळवणार, डीपीआर कार्यवाही सुरु
  • दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प : १३,४९७ कोटी
    नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प ७४६५ कोटी
  • दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प : २२१३ कोटी
    बारामती-पुरंदर तालुक्यातील अवर्षणप्रवण क्षेत्राला पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी निरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबविणार
    २०२६ मध्ये अल-निनोचा संभाव्य धोका तसेच मान्सूनवर विपरित परिणामाची, दुष्काळाची शक्यता लक्षात घेता पिण्याचे पाणी राखून ठेवणार, जलयुक्त शिवार, जलसंधारण योजना राबवणार. वैरण विकास उपाययोजना राबविणार.

जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरांमध्ये ५८६० कोटींचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पुनर्वापर प्रकल्प राबविणार. नागरी सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया आणि प्रभावी पुनर्वापर करणार
महिला

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भरीव तरतूद
    अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करुन लाभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार.
    एकल महिला धोरण : सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणणार.
    लखपती दिदी : राज्यात २७ लाख लखपती दिदी झाल्या, २०२६-२७ मध्ये आणखी २५ लाख लखपती दिदी करणार.
    महिला बचतगटांच्या वस्तु उत्पादन, विक्रीसाठी १३ जिल्ह्यात उमेद मॉल
    युवा-शिक्षण-क्रीडा
    एज्युसिटी : नवी मुंबईत ६ देशांचे विद्यापीठ, सर्व विद्यापीठे याचवर्षी सुरु होणार, याच धर्तीवर ८ ते १० शैक्षणिक शहरे विकसित करणार
    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी : इस्त्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी या योजनेतून
    महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अॅडव्हान्समेंट (महिमा) या संस्थेची स्थापना: परदेशी नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा, कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मार्गदर्शन
    समुपदेशन सेवा विस्तार आणि अधिक संघटित व्यवस्थेसाठी ३६ नवदिशा केंद्र स्थापन करणार

स्टार्टअप, युनिकॉर्नमध्ये महाराष्ट्र नंबर १, पुढील ५ वर्षांत १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअपला बळ देणार
मुख्यमंत्री उद्योजकता महाफंडमधून स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत, सर्वोत्तम ५० स्टार्टअप्सना नाविन्यपूर्ण प्रकल्प शासनात राबविण्यासाठी २५ लाखांपर्यंतच्या शासकीय कामाचे थेट वर्कऑर्डर्स
मिशन लक्ष्यवेध : अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग,
हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटिंग, रोईंग, सेलिंग, लॉनटेनिस, टेबल टेनिस या १२ खेळांचे राज्य स्तरावर ८ हायपरफॉर्मन्स सेंटर्स सुरु, आता आणखी ४ केंद्र सुरु करणार
विभागीय स्तरावर २५ क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर ९६ क्रीडा गुणवत्ता विकास केंद्र सुरु करणार, यासाठी निधीची तरतूद
वारसा/संस्कृती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील १२ किल्ल्यांच्या वारसा जतन करण्यासाठी उपाययोजना
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिवसृष्टी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी निधी देणार
छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथील स्मारक आणि पानिपत, हरियाणा येथील काला अंब येथील मराठा शौर्य स्मारकासाठी सहाय्य
सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा वासोटा किल्लाः मुनावळे ते वासोटे किल्ला रोपवे प्रकल्प हाती घेणार
छत्रपती संभाजी महाराजांच्या मौजे तुळापूर स्मारकाचे काम जून
२०२६ पर्यंत, मौजे वढू बुद्रूक समाधीस्थळाचे काम जून २०२७ पर्यंत पूर्णत्त्वाचे नियोजन, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर स्मारकाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात, निधी देणार

सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन, संवर्धन, जिर्णोद्धार करणार
महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंतीः ११ एप्रिल २०२६ एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबवणार, त्यासाठी निधी देणार.
महात्मा फुले यांचे जन्मगाव मौजे कटगुण, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारणार
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, चवदार स्थळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा करणार.
संत गाडगेबाबा यांचे १५० वे जयंतीवर्ष
त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी, अंतिम श्रद्धास्थान यांना एकत्रित करुन संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणार.
राज्यस्तरिय अभियाने एकत्र करुन संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविणार. ७५ गावांत एआयच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार.
महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिंचे विशेष वर्ष म्हणून २०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार.
जगदगुरु तुकाराम महाराजांचे देहू येथील जीर्ण घर आणि जन्मस्थानाच्या जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करणार
नाशिक-त्र्यंबक कुंभमेळ्यासाठी भरीव तरतूद

नवरगाव, रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करणार, महाकवि कालिदास यांचे जीवनचरित्र नव्या पिढ्यांना कळण्यासाठी चित्रपट निर्मिती करणार
रामटेक विकास आराखडा टप्पा-२ ची कामे करणार
पंढरपूर मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामे हाती घेणार
नाशिक : रामकाल पथ विकासाची कामे सुरु
५ ज्योर्तिलिंग विकासाची कामे सुरु, महानुभाव पंथीय विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुविधांसाठी निधी देणार
एमटीडीसीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५० पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा निर्मिती
मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ अन्य भाषांमध्ये तसेच अन्य भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठीत अनुवादित करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी’ स्थापन करणार
अजित पवार यांना श्रद्धांजली
अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक उभारणार
अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार.
सामाजिक न्याय व कल्याण
अनुसूचित जाती घटकासाठी २३,१५० कोटी रुपये
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आरक्षण उपवर्गीकरणाच्या शिफारसीनुसार लाभ
आदिवासी घटकांसाठी २१,७२३ कोटी रुपये
ओबीसी, धनगर, गोवारी घटकांसाठी भरीव तरतूद
सारथी, बार्टी, आर्टी, टीआरटीआय, महाज्योती, वनार्टी, अमृत, मार्टी या संस्थांसाठी भरीव तरतूद
दिव्यांगांसाठी सर्व सुविधा एका ठिकाणी आणण्यासाठी दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ, जिल्हा वार्षिक योजनेत १ टक्के निधी राखीव

तृतीयपंथियांच्या विकासासाठी स्वयंरोजगार, व्यवसायासाठी बीजभांडवल देणार
आकांक्षित जिल्हे आणि तालुके कार्यक्रमाचा विस्तार करणार. गडचिरोली, नंदूरबार, धाराशिव, वाशीम जिल्ह्यांसोबत आता हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या ६ नवीन जिल्ह्यांचा समावेश. या एकूण १० जिल्ह्यातील ७७ तालुके आणि उर्वरित जिल्ह्यातील १०० तालुक्यांचा गतिमान विकास
चर्मकला डिझाईन व उत्पादन अद्ययावत केंद्र मुंबईतील बांद्रयात स्थापन करणार
आदिवासी जमातीतील युवांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक, उद्योग निर्माते घडविण्यासाठी ‘भारत इनोव्हेशन, रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता-बिरसा’ ही योजना
आरोग्य
राज्यातील २९ महापालिका, २४७ नगरपालिका, १४७नगरपंचायतींमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आरोग्य विभागाच्या सर्व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना करणार
सार्वजनिक आरोग्याच्या सर्वंकष उन्नतीसाठी एम्स, आयआयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण आणि संशोधनासाठी नागपूर येथे ‘महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था’ स्थापन करणार. भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था यासाठी सहकार्य करणार
कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांचे निदान करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या मदतीतून ग्रामीण भागासाठी ४५०० कोटींची प्रगती योजना

राज्यात डिजिटल सार्वजनिक आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी ‘महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान’ राबविणार, रिअल-टाईम डॅशबोर्डच्या आधारे प्रभावी निर्णय आणि संनियंत्रण
राज्यात ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, ११ महाविद्यालयांची कामे विविध टप्प्यांवर
महात्मा फुले जनारोग्य योजना उपचारांची संख्या १३५६ वरुन २३९९, रुग्णालयांची संख्या १७९२ वरुन ४५३७ तसेच ९ प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी २२ लाखांपर्यंतचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीतून करण्यास मान्यता

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रिकरणासाठी बृहद आराखडा तयार करणार
बीड जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी ३६० खाटांचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज, वसतीगृहाचे काम प्रस्तावित
सातारा जिल्ह्यातील दरे येथे निसर्गोपचार केंद्र, ताणतणाव, जीवनशैलीजन्म आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसाठी
केंद्र मुंबई महानगर परिसरात सर्वांगिण आरोग्य आणि वेलनेसचे जागतिक
आर्थिक
१ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे दमदार वाटचाल, २०४७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची करणार
शेतीचा जीडीपी ५५ अब्ज डॉलर्सवरुन ५०० अब्ज डॉलर्सवर नेणार
उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न १२३ अब्ज डॉलर्सवरुन १५०० अब्ज डॉलर्सवर नेणार

सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न ३१२ अब्ज डॉलर्सवरुन ३००० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट
सहाव्या राज्य वित्त आयोगाचा अहवाल कृती अहवालासह पुढील अधिवेशनात सादर करणार, प्रशासकीय सुधारणा आणि आर्थिक विकेंद्रीकरण यातून सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ७,६९,४६७ कोटी रुपयांची तरतूद.
महसुली जमा : ६, १६,०९९ कोटी रुपये अंदाजित
महसुली खर्च : ६,५६, ६५१ कोटी रुपये अंदाजित
४०,५५२ कोटी रुपये तूट अंदाजित
राजकोषिय तूट स्थुल उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात सरकारला यश. ती नेहमीच १ टक्क्यांपेक्षा कमी
क्रेन आधारित वाहने यांच्या वाहन किंमतीवर ७ टक्के प्रमाणे एकरकमी कर होता. परंतू मोठ्या किंमतीची वाहने अन्य राज्यात नोंदणी होत असल्याने कराची कमाल मर्यादा ३० लाख प्रस्तावित
वाहन वितरकास व्यवसाय प्रमाणपत्र ५ वर्षाचे. मात्र कर १ वर्षाचा. त्यामुळे त्याच्या दरात सुधारणा प्रस्तावित
मुद्रांकांवर दस्त निष्पादित केल्यास अपराधसिद्धीनंतर सक्तमजुरी व शास्तीची तरतूद. या शास्तीच्या रकमेत फेररचना करुन ५००० वरुन १ लाख अशी वाढ. यामुळे कमी मुद्रांकावर दस्त निष्पादन करण्याचे प्रमाण नियंत्रणात येणार.
पायाभूत सुविधा
शाश्वत शहरी विकासासाठी १० हून अधिक सक्षम प्रादेशिक विकास प्राधीकरणे, ५० हून अधिक सुनियोजित, बहुपयोगी शहरी समूह विकसित करणार, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा १०० टक्के डिजिटाईज करणार
१०

जलवाहतूक : १२५ कि.मी.चे जलमार्ग जाळे ३४० कि.मी.चे
करणार, २१ जलमार्गावरील २० टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण, ११ नवीन जलमार्गावर २४ नवीन टर्मिनल्स, यासाठी ६६०० कोटी, मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करणार
वडाळा, मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी मार्गावरील तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार. विरार, बोईसर, ठाणे स्थानकाभोवती विकासाचा बृहद आराखडा तयार करणार
अटलसेतूला जोडून २०० चौरस कि.मी. क्षेत्रात तिसरी मुंबई घडवणार : कर्नाळा, साई, चिरनेर नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफिल्ड शहरे तयार करणार
वाढवण बंदर : चौथी मुंबई. लॉजिस्टीक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्र निर्माण करणार, वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार, मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर, आसपासच्या ४४ गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार
मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार
मुंबई महानगर प्रदेशात २० लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार, १० लाख परवडणारी घरांची निर्मिती करणार, नवीन झोपडपट्टी होणार नाही, यासाठी ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’ प्रणाली
वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो ११ : २३,४८७ कोटींचा संपूर्ण
भूमिगत प्रकल्प, याचा पुढे धारावी, वांद्रे स्थानक, वांद्रे टर्मिनस असा विकास

  • मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ : २२,८६२ कोटी
    तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो २ : ५५७५ कोटी
    ११

मुंबईतील भुयारी मार्ग ऑरेंज गेट, पूर्व मुक्तमार्ग ते मरीनड्राईव्ह,
गोरेगाव-मुलुंड, ठाणे ते बोरीवली, खारघर ते तुर्भे, वांद्रे-वरळी सागरी सेतू ते हायस्पीड रेल्वेस्थानक वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
मुंबई महानगरात गायमुख जंक्शन ते फाऊंटेन हॉटेल जंक्शन ते पुढे भाईंदर असा अनुक्रमे ६ आणि ९ कि.मी.चा भुयारी मार्ग
उन्नत मार्ग : शिवडी-वरळी, ऐरोली कटाई नका, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटलसेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत, ठाणे
सागरी सेतू : मुंबई ते वाढवण बंदर जोडण्यासाठी उत्तन ते विरार सागरी सेतू : ५८,७५४ कोटी, स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू तसेच वर्सोवा-दहीसर-भाईंदर ही कामे वेगाने सुरु
किनारी मार्ग : बाळकुम ते गायमुख, उलवे किनारी मार्ग
कल्याण ते लातूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग तयार करणार
पनवेल-कर्जत उपनगरीय प्रकल्प ३ बी: १४,९०७ कोटी, यातून
बदलापूर-कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई, ६९ कि.मी.चा नवीन उपनगरीय कॉरिडॉर
पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी रेल्वेमार्गिका, ५१०० कोटी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगावला लाभ
पुणे मेट्रो टप्पा २ : खडकवासला स्वारगेट-हडपसर-खराडीच्या
मेट्रोच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बसडेपो ते सासवड रोड या प्रकल्पांना मंजुरी/रामवाडी ते वाघोली या ११ कि.मी.च्या मेट्रोला मंजुरी/येरवडा ते कात्रज आणि हिंजेवाडी ते सिंहगड रोड या ५४ कि.मी.च्या दुहेरी भुयारी मार्गाचा डीपीआर तयार करण्यात येत आहे.
राज्यातील मेट्रो नेटवर्क १२०० कि.मी.वर नेणार, ६००० कि.मी. पेक्षा अधिकचे द्रुतगती मार्गाचे जाळे तयार करणार
१२

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुसऱ्या टप्प्याची कामे, पुरंदर विमानतळासाठी एसपीव्ही, गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन, लातूर, बारामती, अमरावती, यवतमाळ येथे नाईट लँडिंग, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कराड, नाशिक, शिर्डी, रत्नागिरी, अकोला, यवतमाळ विमानतळांच्या विस्ताराच्या कामांसाठी निधी
    येरवाडा ते कात्रज भुयारी मार्गाचा डीपीआर
    पुणे ते शिरुर उन्नत मार्ग: ५३ किमी. ७५१४ कोटी रुपये
    तळेगाव-चाकण उन्नतमार्ग २५ कि.मी. ६४९९ कोटी रुपये
  • चाकण-शिक्रापूर मार्गाचे सहापदरीकरण : २८ कि.मी. ५२३२ कोटी
    रुपये

    शिरुर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाचे सहापदरीकरण : १९२ कि.मी. १४,८८६ कोटी
    छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज एमआयडीसी उन्नत मार्गाचे काम दोन टप्प्यात करणार
    हडपसर ते यवत सहापदरीकरण: ३१.५० कि.मी. ५२६२ कोटी
  • सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ८४ कि.मी.चा रेल्वे मार्ग
    समृद्धी महामार्ग : नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर आणि वाढवण बंदराला जोडण्यासाठी तवा भरवीर मालवाहतूक कॉरिडॉर
    मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब
    नवीन नागपूर व्यापार व वित्तीय केंद्र
    महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना : ६२७२ कि.मी. द्रुतगती
    मार्ग, १४,९१९ कि.मी. चे राज्य आणि जिल्हा मार्ग तयार करणार
    १००० पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडणार, आशियाई बँकेच्या मदतीने ४५०० कोटींचा कार्यक्रम
    १३

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-३ : २३ हजार कि.मी.ची कामे
करणार (यापूर्वी टप्पा १ मध्ये ३० हजार कि.मी, टप्पा-२ मध्ये २४५० कि.मी.ची कामे पूर्ण)
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ४ लोकवस्तीशी न जोडलेल्या
वाड्या-वस्त्या बारमाही रस्त्याने जोडणार
५ हजार पेक्षा अधिक लोकसंख्येच्या सर्व वस्त्या आणि ४२४७कि.मी.चे ‘पर्यटन परिरथ’ने जोडणार
पवनार ते पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग
प्रधानमंत्री आवास योजना: २७.८७ लाख घरांना मंजुरी, ३.५७लाख घरे पूर्ण, पीएम-जनमन आवास योजनेत ५४,१२९ घरे
नवीन मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला मंजुरी
खादी ग्रामोद्योग संस्थांना अर्थसहाय्य देणार
उद्योग

  • इन्व्हेस्ट महाराष्ट्र या एकसंध डिजिटल व्यासपीठाची निर्मिती करणार
    १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार
    प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग केंद्र स्थापन करणार, यातून ५० लाख रोजगारनिर्मिती होणार
    दोन नवे आयुक्तालय
    सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उपक्रम आयुक्तालय तसेच सेवा आयुक्तालय निर्माण करणार
    रत्ने व आभूषणे धोरणातून १ लाख कोटींची गुंतवणूक, ५ लाख रोजगारनिर्मिती करणार
    बांबू विकास प्रकल्प: ५०,००० कोटींची गुंतवणूक करुन ५ लाख
    रोजगारनिर्मिती करणार, औष्णिक विद्युत प्रकल्पात ५ ते ७ टक्के बांबू बायोमासच्या वापराचे उद्दिष्ट. जीआयएस, एमआयएस, ब्लॉकचेन, ड्रोन इत्यादीतून बांबू मूल्यसाखळीचा विकास करणार
    १४

गडचिरोली स्टिल हब : २.६१ लाख कोटींची गुंतवणूक, ७०,८९५ रोजगार निर्मिती. जैवविविधता संवर्धनासाठी ५ कोटी वृक्षलागवड
मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र बनविणार, ३० लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसाठी नवीन ४०० जीसीसी (जागतिक क्षमता केंद्र) तसेच नवउपक्रम शहरांची उभारणी करणार
सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना आणखी ३ वर्षासाठी राबविणार. कोकण विभागातील साकव बांधणी, दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम
हरित महाराष्ट्र
राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेणार
२०२९ पर्यंत ५० टक्के आणि २०३५ पर्यंत ६५ टक्के हरित ऊर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट, ३ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज महाराष्ट्र देशात दुसरा, ४.५७ लाख घरगुती ग्राहकांकडून १७३५ मे.वॅ. रुफटॉप सोलार स्थापित, ३२०० कोटी रुपये सबसिडी प्राप्त. आता शून्य ते १०० युनिट वीज वापरणाऱ्यांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासिय रुफटॉप सोलार योजना मंजूर, यात ५ लाख लाभार्थ्यांना ६३५ कोटींचे अनुदान देणार
५५ उदंचन प्रकल्पांसाठी करार, ७८,२१५ मे.वॅ. वीजनिर्मिती अपेक्षित, १.२८ लाख कोटींची गुंतवणूक. ६ प्रकल्पांचे काम सुरु, यातून १०,३०० मे.वॅ. वीजनिर्मिती क्षमता निर्माण
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सागवान वारशाचे जतन, संशोधन, जनजागृतीसाठी ‘टिंबर म्युझियम व झायलॅरियम’ उभारणार
जुने वाहन निष्कासित करुन नवीन वाहन खरेदी केल्यास मोटार वाहन करात १५ टक्के सूट
१५

नवीन वाहने खरेदी करताना बीएस-४ व त्यावरील प्रदूषण मानके असलेल्या वाहनांना मोटर वाहन करात १६ टक्के, बीएस-३ आणि त्याखालील प्रदूषण मानके असलेल्या वाहनांना मोटर वाहन करात ३० टक्के सूट
बीएस-४ व त्याखालील वायूप्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खाजगी संवर्गातील वाहनांमुळे वायु प्रदूषण होत असल्याने अशा वाहनांवर पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनावर २००० रुपयांवरुन ४००० रुपये, हलकी मोटर वाहने ३००० वरुन ६००० रुपये, डिझेल हलकी मोटर वाहनांवर ३५०० वरुन ७००० रुपये करवाढ प्रस्तावित
सुशासन/गतिमानता
पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सेवाप्रवेश नियमांचे एकत्रिकरण, प्रमाणीकरण, सुलभीकरण
महायुती सरकारमध्ये आतापर्यंत १ लाख २० हजार पदभरती, आता आणखी ७५,००० पदभरती करणार
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि एआय विभाग स्वतंत्रपणे स्थापन करणार. त्याला सहाय्यक म्हणून आयुक्तालय देणार, स्वतंत्र माहिती-तंत्रज्ञान संवर्ग करणार
शासकीय पातळीवर विविध टप्प्यांवर सुलभता यावी यासाठी आपले सरकार २.०, मैत्री २.०, महाडीबीटी २.० हे पोर्टल नव्याने विकसित
नागरिकांच्या मालमत्तांमधील वाद कमी करणे, मालमत्ता हस्तांतरणामधील गैरव्यवहारांना प्रतिबंध करणे आणि मालमत्तांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र भूमी मालकी हक्कधारी अधिनियम आणणार
जमिनीचे १०० टक्के व्यवहार संगणीकृत करणे, १०० टक्के ई-ऑफिस, कागदविरहित कामकाजाचे नियोजन
१६

एआय, क्लांटम संगणन, ड्रोन, स्वयंचलित वाहन, डीपटेकसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला जागतिक केंद्र म्हणून विकसित करणार, यासाठी विशेष धोरण आखणार
सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्जतेसाठी राज्याचे सायबर सुरक्षा धोरण तयार करणार
राज्याच्या सार्वभौम डेटा, अनुप्रयोगांची सुरक्षितता यासाठी नागपूर येथे अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर स्थापन करणार
राज्यात महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अप्लिकेशन सेंटरची स्थापना करणार
अमरावती जिल्ह्यातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकत्रित आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाची उभारणी करणार
सुरक्षा
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानावर आधारित पोलिस व्यवस्था, १०० टक्के डिजिटायझेशन, सक्षम सीसीटीव्ही, सर्व जिल्ह्यांत प्रगत न्यायसहाय्यक केंद्र, आयटीएमएससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणार
बॉडी वॉर्न कॅमेरा : स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने बॉडी वोर्न कॅमेरे
राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मिहान नागपूर येथे, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे सौम्यीकरण संशोधन, अभ्यासपूर्ण व्यवस्थापनासाठी.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या ४ नवीन तुकड्या
१७

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात वापरलेली शेरोशायरी आणि कविता
१) जब इरादा बना लिया उंची उडान का, फिर देखना फिझूल है कद आसमान का…
२) डर मुझे भी लगा फासला देख कर, पर मैं बढता गया रास्ता देख कर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई, मेरी मंजिल मेरा हौसला देख कर
३) प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन या चार सूत्रांना घेऊन कविता
युग नवे प्रगतीचे, शाश्वत अन् दमदार विकासाचे, सुशासन अन् सर्वसमावेशकतेचे, नाविन्यतेचे अन् पारदर्शी प्रामाणिकतेचे, सूत्र हेच विकसित महाराष्ट्राचे !
१८

शिक्षण क्षेत्रात देशात प्रथमच उभारण्यात आलेल्या‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’चे उद्घाटन १२ मार्च ला

विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी महत्वपूर्ण

पुणे, दि. ६ मार्च : ‘व्यक्तीचा (आत्म्याचा) मातीशी संबध जोडणे’ हा मुख्य धागा पकडून देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये केलेला प्रयोग म्हणजे ‘जीवन परिवर्तन केन्द्र’  (लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर). याची उभारणी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे करण्यात आली आहे. स्व.उर्मिला वि. कराड यांच्या स्मृतिप्रित्यार्थ उभारण्यात आलेल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर (एलटीसी) चे उद्घाटन गुरूवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.०० वा. होणार आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. अशी माहिती एलटीसीचे संकल्पक व निर्माते युवा शिक्षण तज्ज्ञ डॉ. राहुल वि. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एलटीसीच्या उद्घाटन प्रसंगी पतांजली योगपीठाचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू स्वामी रामदेव बाबा आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ले. जनरल धिरज सेठ (पीव्हीएसएम, एव्हीएसएम) जनरल ऑफिस कमांन्डिंग इन चीफ साउथन कमांड आणि राजीव गांधी खेल रत्न अवॉर्डी रंजन सोधी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्याच प्रमाणे आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अ‍ॅड. राहुल कुल, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड, सरपंच नंदकिशोर पाचपुते, महाराष्ट्र स्टेट ग्राम पंचायत ऑफिसर्स युनियनचे अध्यक्ष संजीव निकम आणि पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 कृषी(शेती)आणि प्रकृति (Agriculture and Nature ), शारीरिक स्वास्थ्य आणि खेळ (Physical Fitness and Sports ), संघ निर्माण आणि नेतृत्व (Team Building and Leadership), देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण (Patriotism and Nation Building ), व अध्यात्म आणि शांती (Spirituality and Peace ) या ५ स्तंभावर आधारित या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य जोपासण्या बरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील मैलाचा दगड असलेला प्रयोग आहे.
सशक्त भारत आणि विश्वाच्या निर्मितीसाठी प्रत्येक युवकामध्ये परिवर्तन घडविण्याचे मुख्य लक्ष्य निर्धारित करून एलटीसीचे निर्माते व युवा शिक्षण तज्ञ डॉ. राहुल कराड यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल या ठिकाणी १५० एकरपेक्षा अधिक कार्यक्षेत्रामध्ये या केंद्राची स्थापन केली आहे. येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आत्म शोधासाठी मदत करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी परिसंस्था आहे. आत्म्याचा मातीशी संबंध जोडणे या तत्वावर आधारित ही संकल्पना आहे.
या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिले जाणारे प्रशिक्षण हे अनुभवाधारित असेल. जीवनातील प्रत्यक्ष आव्हाने समजून घेऊन त्यावर आधारित म्हणजे समस्या आधारित शिक्षण दिले जाईल. देशाचा सजग नागरिक बनण्यासाठी व पर्यावरणाभिमुख शिक्षण दिले जाईल.
आधुनिक जगात प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल व सोशल मिडियाच्या प्रभावाखाली असून तो अत्यंत गतिमान जीवनशैली व्यतीत करीत आहे. त्यामुळे रोजच्या जीवनात ताण-तनाव निर्माण झाला आहे. या सेंटरमध्ये ‘किमानता’ हे एक महत्वाचे उद्दिष्ट्ये असून येथे साधी राहणी, अनावश्यक गोष्टी कमी करुन किमान अत्यावश्यक गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करण्यास शिकविले जाईल.
आजच्या डिजिटल युगात वेगावान जीवनशैली, सततची माहितीची गर्दी आणि स्पर्धेचा ताण यामुळे तरुणांचा निसर्ग, समाज अणि स्वतःच्या अंतर्मनाशी असलेला संबंध कमी होत असल्याची जाणीव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एलटीसी तरुणांना थोडे थांबवून, स्वतःकडे आणि जीवनाकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहण्यासाठी प्रवृत्त करते. साधेपणा मितव्ययिता आणि जागरुक जीवनपद्धती या संकल्पना येथे अनुभवातून रुजविण्याचा प्रयत्न केला जातो.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, डॉ. दत्ता दंडगे आणि डॉ. श्रुती निगुडकर उपस्थित होते.

जेराई फिटनेस व प्लस फिटनेस इंडिया यांची भारतभरात १०० जिम सुरू करण्याची विस्तार योजना

फ्रँचायझीचा जागतिक अनुभव आणि भारतीय उत्पादन कौशल्य
एकत्र आल्याने देशभरात संघटित फिटनेस क्षेत्राच्या वाढीला वेग

मुंबई४ मार्च २०२६ : भारतातील फिटनेस उद्योग आता वाढीच्या टप्प्यात वेगाने प्रवेश करीत आहे. या पार्श्वभूमीवर जेराई फिटनेस लि. आणि प्लस फिटनेस इंडिया यांनी देशभरात १०० जिम सुरू करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीत प्लस फिटनेस इंडियाचा जागतिक फ्रँचायझी व्यवस्थापनाचा अनुभव आणि जेराई फिटनेसचा तीन दशकांहून अधिक काळाचा वारसा एकत्र येत आहे. त्यामुळे जिम व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी एक मजबूत आणि सहाय्यकारी व्यवस्था तयार होणार आहे. भारत अधिक निरोगी आणि तंदुरुस्त बनवणे ही या दोन्ही संस्थांची समान भूमिका या सहकार्यामागे आहे.

या सहकार्यामुळे फ्रँचायझी आणि जिमची उपकरणे एकत्र देणारी नवी पद्धत सुरू होत आहे, त्यामुळे जिम सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. फ्रँचायझीसाठीचे सहाय्य आणि उपकरणांची खरेदी या दोन्ही गोष्टी एकाच व्यवस्थेत मिळाल्यामुळे नवीन उद्योजकांना वेगवेगळ्या पुरवठादारांशी समन्वय साधण्याची गरज कमी होईल आणि जिम सुरू करण्यातील विलंबही टळेल. तसेच, यामुळे व्यवसायाचा विस्तार करणे सोपे होईल, ब्रँडची एकसंध ओळख टिकून राहील आणि जिमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकाऊ पद्धतीने वाढू शकेल.

जेराई फिटनेस लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेश राय म्हणाले, “जिमसाठी लागणारी बहुतांश उपकरणे आम्ही स्वतःच्या कारखान्यात तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ‘जेराई फिटनेस’च्या वाढीत मोठी मदत झाली आहे. देशातच उत्पादन केल्यामुळे दर्जावर चांगले नियंत्रण ठेवता येते, खर्च कमी राहतो, आयातीवरील अवलंबन कमी होते आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमालाही चालना मिळते. आमचा विश्वास असा आहे की फिटनेस उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक गंभीर उद्योजकासाठी फिटनेसच्या पायाभूत सुविधा सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या असाव्यात.”

जेराई फिटनेस लि. आणि प्लस फिटनेस इंडिया यांच्यातील सहकार्यातून जागतिक फ्रँचायझीचा अनुभव आणि भारतीय उत्पादन कौशल्य यांचा संगम घडून आला आहे. यातून दोन्ही संस्थांना फिटनेस क्षेत्रातील विस्ताराच्या लाटेत आघाडीवर राहण्यास मदत होणार आहे. या भागीदारीमुळे देशभरात संघटित जिम व्यवसायाचा विस्तार अधिक वेगाने होईल. तसेच टियर-१, टियर-२ आणि टियर-३ शहरांतील उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, उच्च दर्जाच्या फिटनेस सुविधांपर्यंत अधिक लोकांना पोहोचता येईल आणि देशभरात दीर्घकालीन आरोग्याविषयी जागरूकताही वाढेल.

जेराई फिटनेस लि. ही कंपनी फिटनेससाठीची उपकरणे तयार करणारी अग्रगण्य उत्पादक म्हणून ओळखली जाते. अनेक वर्षांच्या अनुभवातून या कंपनीने उत्पादन प्रक्रिया, साठा व्यवस्थापन, वितरण व्यवस्था आणि ग्राहक सेवा अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत मजबूत व्यवस्था उभी केली आहे. ही कंपनी स्वयंचलित उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. रोबोटिक वेल्डिंग, पूर्णपणे स्वयंचलित असेंब्ली लाईन, तसेच तुर्की आणि जपानी आधुनिक यंत्रसामग्री यांचा वापर करून कंपनी उत्पादन करते.

प्लस फिटनेस इंडियाचे मास्टर फ्रँचायझी सिराज लालानी यांनी सांगितले,“मेट्रो शहरांबरोबरच वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठांमध्येही एक सुबक आणि व्यावसायिक पद्धतीने चालणारे जिमचे जाळे उभारणे हा ‘प्लस फिटनेस इंडिया’चा दीर्घकालीन उद्देश आहे. देशभरात १०० जिम सुरू करण्याची ही योजना भारतात वाढत असलेल्या व्यवस्थित आणि दर्जेदार फिटनेस सुविधांच्या मागणीला पूरक आहे.

प्लस फिटनेस इंडियाच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख फैझ सुपारीवाला म्हणाले, “जेराई फिटनेस’सोबतच्या या भागीदारीमुळे आमची जागतिक दर्जाची फ्रँचायझी व्यवस्था भारतातील विश्वासार्ह उपकरण उत्पादकाशी जोडली गेली आहे. फक्त जिम सुरू करणे हा आमचा उद्देश नाही, तर फ्रँचायझी भागीदारांसाठी नफा मिळवून देणारे आणि दीर्घकाळ टिकणारे व्यवसाय उभे करणे हा आहे. त्याचबरोबर देश अधिक निरोगी बनवण्यासही आम्ही हातभार लावत आहोत.”

‘प्लस फिटनेस इंडिया’ही आंतरराष्ट्रीय जिम फ्रँचायझी क्षेत्रातील वेगाने वाढणाऱ्या ब्रँडपैकी एक म्हणून ओळखली जाते. या ब्रँडचे जगभरात ३५०पेक्षा जास्त जिम क्लब आहेत. ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत या देशांत, तसेच आशिया-पॅसिफिक प्रदेशातील अनेक देशांमध्ये चालतात. २४ तास प्रवेशाची सुविधा, जागतिक स्तरावर एकसारखी पायाभूत रचना आणि तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्थापन प्रणाली यामुळे या ब्रँडला विविध देशांमध्ये सातत्यपूर्ण आणि चांगली कामगिरी साधता आली आहे.

आरोग्याविषयीची वाढती जागरूकता, कॉर्पोरेट वेलनेस कार्यक्रम आणि बदलती जीवनशैली यामुळे येत्या काही वर्षांत भारतामध्ये फिटनेस क्षेत्रातील बाजार मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज आहे. वझीर अॅडव्हायजर्स या संस्थेच्या एका अहवालानुसार, भारतातील फिटनेसच्या उपकरणांचा बाजार २०२४ मध्ये सुमारे २,५०० कोटी रुपयांचा होता. तो २०२९ पर्यंत सुमारे ४,६०० कोटींवर जाण्याची शक्यता असून या काळात दरवर्षी त्यात सुमारे १३ टक्के वाढ अपेक्षित आहे.

जिमचा विस्तार करण्याची ही योजना भारतातील फिटनेस क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. ‘जेराई फिटनेस’ची स्वयंचलित उत्पादन क्षमता आणि प्लस फिटनेस इंडिया या ब्रँडची जागतिक विश्वासार्हता यांचा संगम या सहकार्यामुळे घडत आहे. त्यामुळे जिम सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी एक सर्वंकष, विस्तारक्षम आणि नफ्याचे व्यावसायिक मॉडेल उपलब्ध होणार आहे. आरोग्याविषयी अधिक जागरूक अशा समाजाकडे भारत वाटचाल करीत असताना, देशभरात जागतिक दर्जाच्या फिटनेस सुविधा अधिक सहज, परवडणाऱ्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने सोप्या करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने सफाई कामगाराच्या मुलीच्या उपचाराचा मार्ग मोकळा

पुणे :
पुणे महानगरपालिका अंतर्गत वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील गोसावी आरोग्य कोटी येथे कार्यरत कंत्राटी सेवक नितीन कमलापुरे यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलीला कानाचा गंभीर आजार असल्याने तातडीने ऑपरेशन करणे आवश्यक होते. हे ऑपरेशन जर वयाच्या चार वर्षाच्या आत नाही केले तर कायमचा मूक बधिर पणा येऊ असे डॉक्टरांनी सांगितले ..
या उपचारासाठी सुमारे ३७ लाख रुपयांचा खर्च सांगितला होता.
मात्र संबंधित ठेकेदाराकडून ईएसआय (ESI) कार्ड देण्यात आले नव्हते तसेच ईएसआयचे पैसेही भरले गेले नसल्यामुळे या उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.
ही बाब कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या निदर्शनास आल्यानंतर संघटनेने याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्या.
महापौरांच्या पुढाकारामुळे संबंधित कामगाराला ईएसआय कार्ड मिळाले असून त्यांच्या मुलीच्या उपचार व ऑपरेशनचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शरद भाकरे व जनरल सेक्रेटरी मनीषभाई शेठ यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांचे आभार मानले.

378 वा बीज सोहळा:तुकोबांच्या नामगजराने देहूनगरी दुमदुमली

0

पुणे-जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकडा आरती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ, हरिनामाचा गजर आणि भाविकांची अलोट गर्दी अशा भक्तिमय वातावरणात ३७८ वा बीज सोहळा झाला.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठगमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. देहूनगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले होते. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आणि विश्वस्तांच्या हस्ते झाल्या.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठगमन स्थान मंदिरात पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांना थोपवण्यासाठी खास पोलिस पथक तैनात करण्यात आले होते. इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून स्थानिक जीवरक्षकांचे पथक तैनात करण्यात आले होते. सोहळ्यामुळे आळंदीमार्गे येणारी वाहतूक विठ्ठलवाडी येथे थांबवली होती.

अजित पवार मृत्युप्रकरणी व्हीएसआर कंपनी मालकाची सीआयडीकडून 8 तास चौकशी:अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात ?

पुणे -दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी सुमारे आठ तास चौकशी केली. काही संशयास्पद बाबी आणि व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या आकस्मिक मृत्यूविषयी अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात, असा संशय व्यक्त केला जात असतानाच आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन काही गंभीर आरोप केले होते.

कंपनीचे संचालक आणि व्ही. के. सिंग यांचा मुलगा रोहित सिंग हा विमानाच्या कॉकपिटमध्ये झोपल्याचा व्हिडिओ जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही अनियमितता असल्याची तक्रार तपास यंत्रणेला मिळाली आहे. त्या अनुषंगाने सीआयडीने चौकशी सुरू केली असून कंपनीच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक नोंदी व काही करारपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान व्ही. के. सिंग यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती घेतली आहे.

या आकस्मिक मृत्यूविषयी अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात, असा संशय व्यक्त केला जात असतानाच आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन काही गंभीर आरोप केले होते. डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) व त्‍याबरोबरच एएआयबी यांच्‍या तपासाच्‍या पार्श्वभूमीवर गुरुवारी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, व्ही. के. सिंग हे गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्‍यांचा मुलगा रोहित सिंग याच्‍यासह सीआयडीच्या पाषाण रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. विमानाची ऑपरेशन प्रक्रिया, मेंटेनन्स रेकॉर्ड, तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचे पालन तसेच अपघाताशी संबंधित इतर मुद्द्यांबाबत त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदार रोहित पवार यांनी सातत्याने व्हीएसआर व्हेंचर्स आणि डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) यांच्यावर आरोप केले आहेत.

“चालू” ठेकेदारांना जोरदार झटका: स्थायी समितीचे नवे धोरण

”महापालिकेकडून केली जाणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पण खूप कमी दराने निविदा येत असल्याने कामाची गुणवत्ता राखली जात नाही. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षापासून यावर कडक धोरण आणले जाणार असून, त्यावर आयुक्तांकडून कामे केले जात आहे.’तसेच एका ठेकेदाराला किती कामे द्यायची यावर मर्यादा घालण्याचे आदेश दिले आहेत.

  • श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती

पुणे:अनेक कामे लाटणाऱ्या अन् कमी दराने टेंडर भरून दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारांना स्थायी समितीने जोरदार धक्का देणारे धोरण अंगीकारले आहे.महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन विभाग, मलनिःसारण विभाग यासह अन्य विभागात एकाच ठेकेदाराला अनेक कामे मिळत आहेत. त्यांची मक्तेदारी झाली असून, ती मोडून काढली जाईल. एका ठेकेदाराला मर्यादीत काम मिळेल असे धोरण आणले जाणार आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
ठेकेदारांमध्ये काम मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये महापालिकेने निश्‍चित केलेल्या पूर्व अंदाजपत्रकाच्या तुलनेत४० ते ५० टक्के कमी दराने निविदा भरल्या जात. त्यामुळे कामाची गुणवत्ता राहात नसल्याने पैसे वाया जात . आता यावर अंकुश म्हणून महापालिका प्रशासनातर्फे बंधने घातली जाणार असून, एका ठरावीक मर्यादेपेक्षा कमी दराच्या निविदा आल्यास त्या फेटाळून लावण्यात येणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज (ता. ५) यावर चर्चा झाली.

पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी देखभाल दुरुस्तीची कामे आणि नवीन भांडवली कामे करण्यासाठी हजारो निविदा काढल्या जातात. त्यामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे २७५० कोटीची कामे केली जातात. तर सुमारे ५५०० कोटी पेक्षा जास्त रकमेची नवीन कामे सुचविली जातात. महापालिका प्रशासनाकडून या कामांसाठी किती खर्च होऊ शकतो याचा अभ्यास करून तसेच शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार पूर्वगणनपत्रक तयार केले जाते. त्यास पूर्वगणनपत्रक समितीची मान्यताही मिळालेली आहे. पण या निविदा मिळविण्यासाठी ठेकेदारांमध्ये असलेल्या प्रचंड स्पर्धेमुळे ठेकेदार कमी दराची निविदा भरतात. यामध्ये पूर्वणगनपत्रकाच्या १ टक्के कमी दरांपासून ते ५०-५५ टक्क्यांपर्यंत कमी दाराच्या निविदा गेल्या वर्षभरात आलेल्या आहेत.

महापालिकेकडून कामाच्या खर्चाचा अंदाज बांधताना बाजारातील वस्तूंचे दर पाहून त्यानुसार एखाद्या कामासाठी किती तरतूद लागणार आहे हे निश्चित केले जाते. पण असे असताना हे ठेकेदार बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीमध्ये काम करण्याची तयारी दर्शवत आहेत. त्यांना काम मंजूर होऊन त्यांची बिले देखील काढली जात आहेत. त्यावर आज स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रश्‍न उपस्थित केले .

आज झालेल्या स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर कल्याणीनगर, येरवडा परिसरात मलवाहिनी टाकणे ३३ टक्के कमी दराने, घोले रस्ता रॅम्प येथे शेड उभारणे २४.९९ कमी दराने, समाविष्ट गावात कलव्हार्ट बांधणे ३३.७८ टक्के कमी दराने, वाघोली येथे २३.७८ टक्के कमी दराने निविदा आली आहे. अशा प्रकारे आजच्या कार्यपत्रिकेवर अन्य नऊ निविदा या कमी दराने आल्या होत्या. त्या सर्व मंजूर केल्या आहेत. मात्र, सर्वच निविदा कमी दराने कशा काय आल्या यावर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कमी दराने निविदा येत असल्याने कामाची गुणवत्ता राहत नसल्याचे मान्य केले. महापालिकेने तयार केलेले पूर्वगणनपत्रक हे योग्य असून, ठेकेदार ३० टक्के, ४० टक्के, ५० टक्के कमी दराने निविदा येत आहेत. यावर निर्बंध आणणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य धोरण तयार करून ते स्थायी समितीच्या बैठकीत मांडले जाईल असे स्पष्टीकरण स्थायी समितीला आयुक्तांनी दिले.कमी रकमेच्या निविदा भरण्यामध्ये मलनिःसारण विभाग, पथ विभाग आघाडीवर आहे. मलनिःसारण विभागात तर ठरावीक ठेकेदार रिंग करत असून, त्यांना राजकीय अभय मिळत आहे. त्यामुळे हे ठेकेदार ३० टक्क्यांपेक्षा कमी दराने निविदा भरत आहे. नाले सफाई, पावसाळी गटार स्वच्छता याच्या निविदा तर ५० टक्क्यापेक्षा कमी दराने मान्य केल्या जात आहेत. त्यामुळे हे ठेकेदार अवघे चार महिने काम करून वर्षभराचे बिल काढतात. पथ विभागातही याच पद्धतीने कामकाज केले जात आहे. तसेच भवन, पाणी पुरवठा, भांडार, घनकचरा, क्षेत्रीय कार्यालये यासह अन्य विभागात याच पद्धतीने निविदा मान्य केल्या जात आहेत.

ज्योतिषशास्त्र हे कालसापेक्ष तरी त्याची मूलतत्त्वे स्थिर-ज्येष्ठ पंचांगकर्ते मोहन दाते

: गीता धर्म मंडळ आणि ग्रंथ पारायण दिंडी यांच्यावतीने ‘नवीन वर्ष नवीन पंचांग’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
पुणे : ज्योतिषशास्त्र हे कालसापेक्ष असले तरी त्याची मूलतत्त्वे स्थिर आहेत. ग्रह तेच आहेत, परंतु त्यांच्या योगांनुसार काळ बदलत जातो. त्यामुळे ज्योतिषशास्त्र बदलत नाही, तर त्याचे आकलन काळानुसार पाहावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करताना नक्षत्रे आणि ग्रह यांना अत्यंत महत्त्व आहे. कालाच्या कसोटीवर त्यांचे निरीक्षण करूनच योग्य निष्कर्ष काढले जातात, असे मत ज्येष्ठ पंचागकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केले.

गीता धर्म मंडळ आणि ग्रंथ पारायण दिंडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोहन दाते यांचे ‘नवीन वर्ष नवीन पंचांग’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळात करण्यात आले होते. यावेळी गीता धर्म मंडळाचे मुकुंद दातार, ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे उपस्थित होते. पंचांग क्षेत्रातील योगदानाबद्दल दाते यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. सण आणि उत्सव तसेच रुढी परंपरा याविषयावर सुध्दा मार्मिक विवेचन केले,

मोहन दाते म्हणाले, घड्याळानुसार रात्री १२ वाजल्यानंतर वार बदलतो. हा इंग्रजी पद्धतीनुसार ठरवलेला वार आहे. परंतु पंचांगानुसार एक वार हा एका सूर्योदयापासून पुढील सूर्योदयापर्यंत मानला जातो. संपूर्ण पृथ्वीवर वेळेत फरक असला तरी खगोलीय घटना मात्र एकसमान असतात.

ते पुढे म्हणाले, पूर्वी सर्व व्यवहार पंचांगानुसारच चालत होते. पुढे कॅलेंडर पद्धती प्रचलित झाली. ऋतूंशी सुसंगती ठेवण्यासाठी सौर वर्ष (३६५ दिवस) स्वीकारले गेले, तर पंचांगातील चांद्र वर्ष साधारणतः ३५४ दिवसांचे असते, असेही त्यांनी सांगितले.



अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना  स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली माहिती

पुणे – शहरात अनधिकृत बांधकामे उभी राहात असताना प्रशासनाचे त्याकडे लक्ष जात नाही.  ही बांधकामे उभी राहिल्यानंतर त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचा पाया घातला जात असतानाच ही बांधकामे थांबवा. अनधिकृत बांधकामे  होत असलेल्या हद्दीतील महापालिकेच्या अभियंत्यांवर  जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश  स्थायी समितीने महापालिका प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी दिली. स्थायी समितीची बैठक गुरुवारी  भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भिमाले यांनी ही माहिती दिली. महापालिकेतर्फे बुधवारी लोहगाव, विमाननगर  परिसरात कारवाई करत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त  करण्यात आली. यात  अनेक बांधकामे चार-पाच मजल्यांहून अधिक मोठी होती. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत  स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली.  ‘शहरात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. चार पाच मजली बांधकामे होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांचे त्याकडे लक्ष कसे जात नाही. अधिकाऱ्यांचे आपल्या हद्दीत रोज लक्ष असणे गरजेचे आहे.  आपल्या हद्दीत अनधिकृत बांधकामे उभी राहिल्यास अधिकारी दोषी ठरतात. त्यामुळे अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी,अशी सूचना प्रशासनाला केली आहे,’असे भिमाले म्हणाले.  ‘बांधकाम विभागातील अधिकारी, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नियमित आपापल्या हद्दींची पाहाणी करावी. सर्वेक्षण करावे आणि दर पंधरा दिवसांनी त्याचा अहवाल सादर करावा.  बांधकाम विभागाने हा अहवाल स्थायी समितीला सादर करावा. लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला कोणीही विरोध करणार नाही,’असे भिमाले यांनी नमूद केले.  

महापालिकेच्या हद्दीतील समाविष्ट गावांमधील वृक्षगणना करण्यासाठीच्या ३५ कोटी रुपये  खर्चाच्या निविदेला स्थायी समितीने स्थगिती दिली आहे. वृक्षगणनेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्याची आवश्यकता नाही. महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी  संस्था, खासगी संस्थांची मदत घेऊन कमी खर्चात हे काम करता येईल, अशी भूमिका स्थायी समितीच्या सदस्यांनी मांडली. तसेच  यासाठी निविदा सादर केलेल्या कंपनीबाबतचे आक्षेप लक्षात घेता या निविदेला स्थगिती देण्यात आली आहे, असे श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या कामांसाठीच्या अनेक निविदा या  पूर्वगणनपत्रापेक्षा ३०-४० टक्क्यांपेक्षा कमी दराने (बिलो) सादर केली जातात. त्या ठेकेदारांना काम दिले जाते.त्यामुळे कामाचा दर्जा योग्य राहीलच याची खात्री देता येत नाही. या पार्श्वभूमीवर आगामी आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून ३०-४० टक्के  कमी दराने आलेल्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत. १० -१५ टक्क्यांपर्यंत कमी दराने आलेल्या निविदांचा विचार केला जाईल. सध्याच्या निविदा प्रशासक काळातील असल्याने कमी दराने आलेल्या निविदांना मान्यता देण्यात आली आहे. यापुढे अशा निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रशासक काळातील निविदांमध्येही गडबड आढळल्यास त्या रद्द केल्या जातील, असेही स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले.

महापालिकेत आता ३ शहर अभियंता, सह शहर अभियंत्याकडे बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रणाचा कार्यभार

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम हे महापालिका सेवेतून २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शहर अभियंता निकम यांच्या कडील विविध विभागांचा कार्यभार तात्पुरता स्वरूपात महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता मनोज सेठिया आणि सुनील भागवानी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, याबाबतचे आदेश आज निर्गमित केलेले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशानुसार मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या पाणी पुरवठा व प्रकल्प विभागासह स्थापत्य विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सह शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या स्थापत्य मुख्य कार्यालय विभागासह उद्यान व क्रीडा स्थापत्य, शहरी दळणवळण या विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.


तसेच सह शहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या विभागासह बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.