Home Blog Page 77

स्त्री योगदानाच्या मानवंदनेचे प्रतीक

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि समानतेसाठी सुरू झालेल्या अविरत संघर्षाचे स्मरण देणारा हा दिवस. व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीमध्ये सर्व स्तरांवर महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. घरापासून ते देशाच्या विकासापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्या कार्यकर्तृत्वाला सानंद अभिमानाने मानवंदना देण्याचा हा दिवस आहे. २०व्या शतकाच्या सुरुवातीला महिलांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. कामाच्या ठिकाणी समान वेतन, चांगल्या कामाच्या अटी आणि मतदानाचा अधिकार यासाठी सुरवातीला महिलांनी संघर्ष केला. त्या संघर्षातूनच महिला दिनाची परंपरा सुरू झाली. आज हा दिवस केवळ एक उत्सव नसून व्यक्ती म्हणून महिलांच्या सन्मानाचा आणि समानतेचा संदेश प्रत्येकापर्यंत नेणारा दिवस आहे.

आगृहात् आयुद्धपर्यंतम् (घरापासून रणभूमीपर्यंत) जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी यशाची शिखरे गाठली आहेत. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाने केवळ ओळख निर्माण केली आहे, असे नव्हे तर अमीट असा ठसा उमटवला आहे. कित्येक महिलांनी जगाला दाखवून दिले की, संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची शिखरे उभी करतात.

तरीही आव्हाने कायम…

स्त्रियांच्या प्रगतीच्या गाथा उंचावत असतानाही अनेक आव्हाने कायम आहेत. प्रगतीचा आलेख सर्वत्र समान नाही, हे प्रमुख आव्हान आहे. समाजात अजूनही शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी, महिलांवरील अत्याचार, सुरक्षिततेचे प्रश्न आणि सामाजिक भेदभाव या समस्या अजूनही गंभीर आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांचे सर्व क्षेत्रांतील सशक्तीकरण व सक्षमीकरण समाजाच्या समतोल विकासासाठी आवश्यक आहे. महिलांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या तर आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि त्या स्वतःबरोबरच कुटुंब आणि समाजही सक्षम करतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे महिलांना समान संधी मिळणे, त्यांचा सन्मान राखणे आणि सुरक्षित भोवताल ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

समानतेच्या जाणीवजागृतीचा दिवस..

महिला दिन हा केवळ अभिनंदनाचा किंवा शुभेच्छांचा दिवस नसून, समाजातील प्रत्येक महिलेला सन्मानाने आणि समानतेने जगण्याचा अधिकार आहे, या जाणीवजागृतीचा दिवस आहे. स्त्री ही समाजाची शक्ती आहे, पण या शक्तीला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. एकेकाळी घराच्या चार भिंतींमध्ये बांधून ठेवलेली स्त्रीशक्ती जरा अवकाश मिळताच शिक्षण, विज्ञान, उद्योग, क्रीडा, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. स्त्री हे जिद्द, संघर्ष, परिश्रमांचे दुसरे नाव आहे. स्त्रीची स्वप्ने आकाशाइतकीच उंच असू शकतात. फक्त संधी मिळण्याचा अवकाश असतो. आजही समाजातील अनेक महिलांचे वास्तव कठीण आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव, आर्थिक मर्यादा आणि सामाजिक बंधने यामुळे अनेक महिलांना आपली स्वप्ने पूर्ण करता येत नाहीत. स्त्रीचा सन्मान एका दिवसापुरता मर्यादित नसावा. तो प्रत्येक क्षणी वागण्यात आणि विचारात दिसला पाहिजे. खऱ्या अर्थाने सामाजिक प्रगती साधायची असेल, तर स्त्री-पुरुष समानतेचा विचार कृतीरूप होणे आवश्यक आहे. स्त्री केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी नाही, तर ती स्वप्न पाहणारी, संघर्ष करणारी आणि समाज घडवणारी शक्ती आहे. तिच्या परिश्रमांचा, जिद्दीचा, त्यागाचा, स्वप्नांचा सन्मान करण्याची प्रेरणा जागवणे, ही महिला दिनामागची खरी भावना आहे. ते जागरण घडावे, या शुभेच्छा.

लेखक-भारत शाह

सीडब्ल्यूजी व ऑलिंपिक मध्ये भारत नंबर १वर असेल-केंद्रीय रक्षा राज्य मंत्री संजय सेठ

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाच्या द्रोणाचार्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे उद्घाटन

पुणे, दि.७ मार्च : ” २०३० मध्ये होऊ घातलेल्या सीडब्ल्यूजी व ऑलिंपिक मध्ये युवा देशातील खेळाडूंनी सर्वच क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवून भारत नंबर १ वर आणण्याचा संकल्प घ्यावा. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी सुरू केलेल्या ‘सांसद खेल महोत्सावा’ मुळे देश नक्कीच ऑलिंपिकमध्ये चमक दाखवेल. देश बदलत असतांना विकसीत भारतासाठी कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करा.” असा विश्वास केंद्रीय रक्षा राज्य मंत्री संजय सेठ यांनी व्यक्त केले. आर्थिक दुर्बल विद्यार्थ्याला पुस्तक मिळावी यासाठी सर्वत्र बूक बँक सुरू करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
एमआईटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटीच्या वतीने क्रीडा विभागासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या व नव्याने उभारण्यात आलेल्या द्रोणाचार्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे उद्घाटन केंद्रीय रक्षा राज्य मंत्री संजय सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड हे होते.
यावेळी आंतरराष्ट्रीय एयर रायफल शूटर अंजली भागवत व ग्रॅडमास्टर अभिजित कुंटे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, प्रा. विलास कथुरे व प्रा.अभिजित कचरे उपस्थित होते.
संजय सेठ म्हणाले,” द्रोणाचार्य स्पोर्टस कॉम्प्लेक्स मधून खेळाची भावना वाढवून खेळाडूंना सकारात्मक प्रेरणा दिली जाते तेव्हा नक्कीच हा देश कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलम्पिकमध्ये सर्वोच्च स्थानवर असेल. खेळाडूंमध्ये उर्जा, सकारात्मक प्रेरणा, समर्पण आणि काम प्रति अनुशासन असावी. देशात खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रेरणा मिळत आहे. तसेच यासाठी अर्थमंत्री सितारमण यांनी बजेट मध्ये तरतूद केली आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी देशात सर्वच विद्यार्थ्यांना एनसीसी लागू करु यासाठी कार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” राजकारण, शिक्षण, धर्म, मीडिया, स्पोर्टस या गोष्टी समाजासाठी अत्यंत महत्वाचे आहे. परंतू खेळ आणि खेळाच्या भावनेतून मुलांच्या व्यक्तिमत्वात महत्वाचा बदल घडून येतो आणि यातूनच सशक्त समाज निर्माण होऊ शकतो. या विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मनात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे.”
डॉ.प्रसाद खांडेकर म्हणाले,” एमआयटीच्या विद्यार्थ्यांना शिस्त व खेळाच्या माध्यमातून प्रगतीच्या करण्याच्या उद्देशाने हे विद्यापीठ कार्य करीत आहेत. येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.”
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू श्रेयशी जोशी, आंतरराष्ट्रीय व्हाॅलिबॉल खेळाडू अनया भावसार, आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू जिनेश नानल आणि आंतरराष्ट्रीय शूटिंग खेळाडू यशाया कॉन्ट्रॅक्टर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, जापनिज मार्शल आर्टस आणि मल्लखांब वरील प्रात्यक्षिक दाखविले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ. गौतम बापट यांनी केले. आभार प्रा. डॉ. अभय वाघ यांनी केले.

पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे रविवारी लोकार्पण

पुणे, दि. ७ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी (दि. ८ मार्च) सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
पीएमआरडीएकडून उभारण्यात आलेल्या या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील विधानपरिषद व विधानसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, विद्यापीठ रस्ता, पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

महिला दिनी भेट: घरगुती सिलिंडरचे दर 60 रुपयांनी वाढले

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर 60 रुपयांनी महाग केले आहे. दिल्लीत 14.2 किलोचा LPG गॅस आता 913 रुपयांना मिळेल. आधी तो 853 रुपयांना मिळत होता. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तो आता 1883 रुपयांना मिळेल. वाढलेल्या किमती 7 मार्चपासून लागू होतील.

भा ज प-मोदी सरकारचा निषेध :एकीकडे लाडक्या बहिणींचा गवगवा करणाऱ्या भाजप सरकारने महिला दिनाची ६० रुपये गॅस दरवाढ करून सर्वसामान्यांची चेष्टा केली आहे, या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवार सकाळी ११ वाजता फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर जाहीर निदर्शने आयोजित केली आहेत. आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
सौ स्वाती पोकळे
महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे देशात गॅस तुटवड्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सरकारने गॅसच्या दरात वाढ केली आहे. या परिस्थितीचा विचार करून, सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करत देशातील सर्व तेल रिफायनरी कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन सरकारने हे आदेश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, आता रिफायनरीज प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर केवळ स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील.
सर्व कंपन्यांना प्रोपेन आणि ब्युटेनचा पुरवठा सरकारी तेल कंपन्यांना करावा लागेल. सरकारी तेल कंपन्यांमध्ये इंडियन ऑइल (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांचा समावेश आहे. याचा उद्देश ग्राहकांना गॅस सिलेंडरचा अखंडित पुरवठा करणे हा आहे.

  1. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ जवळजवळ बंद होणे

भारतासाठी सर्वात मोठे आव्हान ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ बंद होणे हे आहे. हा सुमारे 167 किमी लांबीचा जलमार्ग आहे, जो पर्शियन गल्फला (इराणच्या आखाताला) अरबी समुद्राशी जोडतो. इराणमधील युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नाही. धोका लक्षात घेता कोणताही तेल टँकर तिथून जात नाहीये.

जगातील एकूण पेट्रोलियमपैकी २०% हिस्सा येथून जातो. सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसारखे देशही त्यांच्या निर्यातीसाठी यावर अवलंबून आहेत. भारत आपल्या गरजेच्या ५०% कच्चे तेल आणि ५४% एलएनजी याच मार्गाने आयात करतो. इराण स्वतः याच मार्गाने निर्यात करतो.

२. प्लांटवर ड्रोन हल्ल्यामुळे एलएनजीचे उत्पादन थांबले

गेल्या आठवड्यात अमेरिका-इस्त्रायलने इराणवर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने यूएई, कतार, कुवेत आणि सौदीसारख्या देशांमधील अमेरिकन ठिकाणे आणि बंदरांना लक्ष्य केले आहे.

इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर, भारताला गॅस पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक असलेल्या कतारने आपल्या LNG प्रकल्पाचे उत्पादन थांबवले आहे. यामुळे भारतात गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. भारत आपल्या गरजेच्या 40% LNG (सुमारे 2.7 कोटी टन वार्षिक) कतारमधूनच आयात करतो.
CNG कंपन्यांनी सरकारला पत्र लिहिले, संकटाचा इशारा

गॅसच्या तुटवड्यामुळे ‘असोसिएशन ऑफ सीजीडी एंटिटीज’ (ACE) ने सरकारी कंपनी गेल (GAIL) ला पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, जर कतारमधून येणारा स्वस्त गॅस मिळाला नाही, तर त्यांना ‘स्पॉट मार्केट’मधून महागडा गॅस खरेदी करावा लागेल.

किंमतींमधील फरक: स्पॉट मार्केटमध्ये गॅसची किंमत सध्या 25 डॉलर प्रति युनिटवर पोहोचली आहे, जी करार केलेल्या गॅसच्या दुप्पटपेक्षा जास्त आहे.
लोक EV कडे वळतील: कंपन्यांना भीती आहे की, जर CNG च्या किमती वाढल्या, तर लोक कायमस्वरूपी EV कडे वळतील, ज्यामुळे गॅस क्षेत्राचे नुकसान होईल.
सरकारच्या आदेशाचा खासगी कंपन्यांवर परिणाम

सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम खासगी क्षेत्रातील कंपन्यांवर, विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) वर होऊ शकतो. प्रोपेन आणि ब्युटेनचे डायव्हर्जन झाल्यामुळे अल्काइलेट्सच्या उत्पादनात घट होईल, ज्याचा वापर पेट्रोलची ग्रेडिंग सुधारण्यासाठी केला जातो.

तज्ज्ञ आणि व्यापार सूत्रांचे म्हणणे आहे की, प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर पेट्रोकेमिकलऐवजी LPG बनवण्यासाठी केल्यास कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल. पॉलीप्रोपायलीन आणि अल्काइलेट्ससारखे पेट्रोकेमिकल उत्पादने LPG च्या तुलनेत चांगल्या किमतीत विकले जातात.

आश्वासक बाब: भारत एकट्या होर्मुज मार्गावर अवलंबून नाही

परिस्थिती आव्हानात्मक आहे, परंतु सरकारने स्पष्ट केले आहे की घाबरण्याची गरज नाही:

रशियावरील अवलंबित्व: भारत आता आपल्या गरजेपैकी 20% कच्चे तेल रशियाकडून आयात करत आहे (फेब्रुवारीमध्ये दररोज 10.4 लाख बॅरल), ज्यामुळे होर्मुज मार्गावरील अवलंबित्व कमी होते.

पुरेसा साठा: सूत्रांनुसार, देशाकडे सध्या पेट्रोलियम आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. MRPL सारख्या रिफायनरीज बंद झाल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत.

  1. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 काय आहे

सरकारने हा आदेश अत्यावश्यक वस्तू अधिनियम म्हणजेच एसेंशियल कमोडिटी ॲक्ट 1955 (ESMA) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जारी केला आहे. यापूर्वी सरकारने युक्रेन युद्धानंतर तेल क्षेत्रात ESMA चे नियम लागू केले होते. त्यावेळी रिफायनिंग कंपन्यांना सांगण्यात आले होते की त्यांनी देशात इंधनाची कमतरता होऊ देऊ नये आणि ते बाहेर निर्यात करू नये, कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्यामुळे तेल बाहेर विकणे खूप फायदेशीर ठरले होते.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील महिलांसाठी रोजा इफ्तार पार्टी

पुणे- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भवानी पेठ येथील काशिवाडी परिसरात मुस्लिम समाजातील महिलांसाठी विशेष रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. सौ. इंदिरा अविनाश बागवे यांच्या पुढाकाराने आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. मुस्लिम समाजातील महिला भगिनींमध्ये शिक्षण ,आरोग्य ,राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोखा दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला मुक्ता फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. इंदिरा अविनाश बागवे, सेक्रेटरी फरजाना खान, पोलिस महिला पदाधिकारी राणी जाधव, हवालदार राणी राऊत, कॉन्स्टेबल आरती गायकवाड, सचिव मनीषा क्षीरसागर ,दिलशाद शेख,कोमल बावकर तसेच प्रतिष्ठानच्या ज्योती अडागळे, प्रियंका भोंडे, मालन कसबे आणि परिसरातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.

गेल्या तीन वर्षांपासून महिलांसाठीच या इफ्तार कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात येत असून, महिलांमध्ये ऐक्य, स्नेह आणि परस्पर संवाद वाढावा हा त्यामागील उद्देश आहे. याशिवाय सौ. इंदिरा बागवे यांनी मुक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभागातील सर्व जातीधर्मांच्या महिलांसाठी विविध लघुउद्योग व व्यवसाय सुरू करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही केले आहे.

या उपक्रमाबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त करत या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करीत महिला दिनाच्या पूर्व संध्येला उत्सव साजरा केला .

मोदी सरकार, “मराठी भाषा अभिजात दर्जा”चे कोट्यवधी’चे अनुदान कधी देणार..?

“मराठी भाषा व सांस्कृतिक धोरणा”ची केंद्र व राज्य सरकार कडून अक्षम्य अवहेलना..!
– वरीष्ठ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची टिका ..

मुंबई -दि ७ मार्च २६
तत्कालीन काँग्रेस सरकारने २०१४ साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे कारकिर्दीत ‘मराठी भाषेस अभिजात दर्जा देणे बाबत’ पाठवलेला प्रस्ताव ‘राज्यातील विधानसभा निवडणूकी’च्या तोंडावर मतांच्या अभिलाषेपोटी मंजूर केला खरा मात्र तब्बल १॥ वर्षे उलटूनही मराठी च्या संवर्धनासाठी ‘अभिजात दर्जा’चे देणे लागत असलेले ५०० कोटी मात्र अद्यापही केंद्र सरकार कडून देण्याची नियत नसल्याची टीका काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, मराठी भाषा अभिजात दर्जा मान्य करतांना एकप्रकारे मराठी भाषा स्वतंत्र निर्मित आहे, असे केंद्र सरकारने जाहीर करूनही, पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली येथील अ भा मराठी साहित्य संम्मेलनाच्या उद्घाटन भाषणात मात्र मराठी (स्वतंत्र नसून) संस्कृत भाषेतून निर्माण झाली (?) आहे असे द्वयार्थी विधान केले, म्हणजे एक प्रकारे मराठी भाषा अभिजात नाही, असेच यातून सुचवायचे होते काय..? असा सवाल ही काँग्रेस’नै केला.
अभिजात दर्जा जाहीर झाला तरी, स्वतंत्र उत्कृष्ट अध्ययन केंद्र (Centre of Excellence) स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे अद्याप पडून आहे.
कोणतीही भाषा अभिजात घोषित झाली तर केन्द्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय त्या भाषेच्या संवर्धन, विकास आणि अभ्यासासाठी भरीव अनुदान देते, मात्र अभिजात मराठी साठी अद्याप अनुदान दिले नसल्याची वास्तवता आहे.
तसेच.. महायुती सरकारने २०२४ साली (निवडणूकीपुर्वी) स्वतःचे सांस्कृतिक धोरण घोषित केले. त्यात ऐतिहासिक संपत्ती आणि स्त्रोतांचे संरक्षण यापासून ते सांस्कृतिक विकासामध्ये वाढ अशी १७ उद्दिष्टे घोषित करून, त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल असे ही घोषीत केले होते.
तसेच संग्रहालये, नाट्यगृहे, ग्रंथालये यांचा विकास करण्यासाठी गुंतवणूक करणे हे सांस्कृतिक धोरणाने मान्य केले होते, मात्र वास्तव हे आहे की तीच ग्रंथालये शासनाच्या उदासीनतेमुळे बंद पडत असून, ‘साहित्य संस्कृती’ने शेवटची घटिका मोजणे सुरु केले आहे.
नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्येही या ध्येयधोरणाच्या पूर्तीसाठी कसलीही तरतूद केलेली नसल्याची प्रखर टिका ही काँग्रेस ने केली.
महाराष्ट्रात, असंख्य नाट्यगृहांची अवस्था शोचनीय असून स्वच्छताग्रुहे, आसने, रंगमंचाची अवस्था ही बिकट आहे. कॉंग्रेसकाळातील धोरणच् आज कसेबसे राबवले जात असुन त्यास आधुनिक काळातील कसलाही स्पर्श दिला गेलेला नाही.
मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत असतानाही त्या कशा सुरु राहतील वा कशा वाढतील या दिशेने प्रत्यक्ष कोणतेही पाउल उचललेले नाही.
काँग्रेस प्रवक्ते पुढे म्हणाले की, या सरकारला मुळात सांस्कृतिक धोरण नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि ती खरेच अभिजात आहे हे सिद्ध करण्यासाठीची ईच्छा शक्ती नाही. सांस्कृतिक धोरण आणि त्यावरील तरतुदी मराठी संस्कृतीचा अपमान करणारी आहेत अशी प्रखर टिका ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या विषयी प्रसिद्धीस दिलेल्या प्रकटनात केली.

‘सावित्री जत्रा’ महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे, दि.७ मार्च: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने पावन झालेल्या भूमीत, त्यांच्या नावाने सुरु असलेली ‘सावित्री जत्रा’ हे केवळ एका प्रदर्शनाचं नाव नाही तर महिलांना स्वावलंबी करणारी एक चळवळ आहे, यामधील महिला बचत गटाच्या उत्पादनाला जागतिक पातळीवर होणारी मागणी ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्यच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषद, पुणे आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यावतीने
कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर येथे आयोजित ‘मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आणि यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, उपायुक्त नितीन माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या सदिच्छादूत शिवाली परब आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, सावित्री जत्रा हे नाव सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना, त्यांच्या सक्षमीकरणाच्या कार्याला समर्पित आणि साजेसे आहे. सावित्रीबाईंनी शिक्षण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा मार्ग दाखवला, त्याच विचारांची जत्रा आज ग्रामीण भागातील शेकडो महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होत आहे.

येथील प्रदर्शनात सुमारे १५० महिला स्वयंसहायता समूह सहभागी झाले असून ग्रामीण कला, परंपरा व संस्कृतीची ओळख असणारी महिला उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत, ही स्तुत्य बाब आहे. प्रत्येक वस्तूमध्ये ग्रामीण भागातील भगिनीची मेहनत, स्वप्न आणि एक जिद्द सुध्दा आहे. सर्व पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, अधिकाधिक वस्तूची खरेदी करून कुटुंबाच्या संसाराला हातभार लावावा.

बचत गटांना एकाच दिवशी ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप

गत वर्षीसुद्धा मिनी सरस सावित्री जत्रेत बचत गटांना एकाच दिवशी जवळपास १९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले; आज देखील एकाच दिवशी ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप बचत गटांना करण्यात आले. यामाध्यमातून गेल्या एक वर्षात साधारणपणे ४०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून यामुळे ‘सरस सावित्री जत्रा’ कार्यक्रमाचा दर्जा दरवर्षी सरस होत चालला आहे, हेच यामधून सिद्ध होत आहे. यापुढे आपण एकत्रितरित्या तो अजून सरस करण्याचा प्रयत्न करुया.

अर्थसंकल्पातही महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने पाऊल

राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण, ‘लखपती दीदी’ उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात येत आहेत.

येत्या आर्थिक वर्षात २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १३ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारण्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे महिला बचत गटाच्या आमच्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ तयार करण्यात आली आहे. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे, ही महत्वाची बाब असल्याचे त्यांनी नमुद केले.

ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणात ‘उमेद’ महत्वाची भूमिका

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी उमेद या अभियानाने महत्वाची भूमिका बजावली आहे. या अभियानामुळे ग्रामीण महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्यांची समाजात प्रतिष्ठा वाढल्याचे सांगून
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. महिलांना स्थायी व्यवसाय मिळून त्यातून मोठी बाजारपेठ निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासनामार्फत भव्य ‘उमेद मार्ट’ मंजूर झाला असून त्याचे कामही सुरु आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात २६ पुण्यश्री सुपर मार्केट, ४ पुण्यश्री उपहारगृह, आंबेगाव येथे सावित्री दुकान देखील कार्यरत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सावित्री दालन आहे. मागील वर्षी जिल्ह्यात १ लाखांहून अधिक लखपती दीदी झाल्या असून मार्च अखेरपर्यंत आणखी ३० हजार महिला लखपती दीदी करण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

पुणे जिल्ह्यात उमेद अभियानाअंतर्गत सुमारे २७ हजार स्वयंसहायता समूह असून त्यामध्ये ३ लाखांपेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या आहेत, या अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहांना १ हजार ६८७ कोटी इतका कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाचा नेहमीच ध्यास घेतला होता. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. अनेक योजना राबवल्या आणि अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतुदी केल्या, जिल्हा नियोजन समितीच्या
(डिपीडीसी) माध्यमातून भरघोस निधी दिला. त्यांचा हा विकासाचा वारसा आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचे असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सरपंच, उपसरपंच आणि अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, चांगली कामगिरी करावी आणि आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव आपण उंचवावे, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलाकरिता विविध योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ४ कोटी पेक्षा अधिक घरे उपलब्ध देण्यात आली असून महिलांच्या नावे घर करुन देण्यात येत आहे. मुद्रा योजनेत ६० टक्के महिला लाभार्थी आहेत. रेल्वे स्थानक, विमानतळावर बचत गटाच्या महिलांकरिता स्टॉल बघायला मिळतात. विदेशात देखील वस्तूला मागणी होत असून त्यांचा कर्तृत्वाचा जागतिक पातळीवर दखल घेतली जात आहे. महिलांच्या उत्पादनाला भाव मिळवून देण्यासाठी ‘उमेद माल’ उभारणीचे काम सुरु आहेत, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.

श्री. वाघमारे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना शहरी बाजार पेठेशी जोडण्याचा उपक्रम आहे. ग्रामीण संस्कृती, बाजार पेठेला वाव देण्यासोबतच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा उत्सव आहे. जिल्ह्यात दोन लाखपेक्षा अधिक लखपती दीदी झाल्या आहेत. सावित्री जत्रा पाच दिवस चालणार असून पुणेकरांनी अधिकाधिक वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले.

श्रीमती पवार यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना कर्ज वितरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी कार्यक्रमस्थळी स्टॉलला भेट देऊन उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली आणि महिला बचत गटांच्या सर्व भगिनींचे कौतुक केले.

भारत-इंग्लंड उपांत्य फेरीदरम्यान आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026चा जिओहॉटस्टारवर नवा जागतिक स्ट्रीमिंग विक्रम

जिओहॉटस्टारवर भारत विरुद्ध इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला एकाच वेळी 65.2 दशलक्ष प्रेक्षकांची पसंती 
दुसरा उपांत्य फेरी सामना हा जागतिक स्तरावर सर्वाधिक स्ट्रीम केला गेलेला लाइव्ह कार्यक्रम आहे
डिजिटल प्लॅटफॉर्मवर 619 दशलक्ष व्ह्यूजची नोंद – टी20 साठी आतापर्यंतचे सर्वाधिक व्ह्यूज

दुबई / मुंबई, 7 मार्च 2026:

क्रीडा, प्रसारमाध्यमे आणि स्ट्रीमिंगच्या जगात आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 जागतिक स्तरावर नवनवीन बेंचमार्क स्थापित करत आहे. 5 मार्च रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामन्यातील डिजिटल प्रेक्षकांच्या संख्येने एक ऐतिहासिक जागतिक टप्पा गाठला आहे.

भारतातील आघाडीचा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारने या महत्त्वाचा सामन्यादरम्यान अभूतपूर्व 65.2 दशलक्ष प्रेक्षकांची नोंद केली. जगातील कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरील लाइव्ह इव्हेंटसाठी आतापर्यंत मिळालेली ही सर्वोच्च प्रेक्षक संख्या आहे. या सामन्याला जिओहॉटस्टारवर 619 दशलक्ष व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वाधिक स्ट्रीम केलेला टी20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.

या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून 499 धावा झाल्या. या रोमांचक सामन्याने भारत आणि परदेशातील चाहत्यांची मने जिंकली. मुंबईतील या महत्त्वाच्या सामन्याने नोव्हेंबर 2024 मधील एका आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने स्थापित केलेल्या 65 दशलक्षांच्या आधीच्या जागतिक विक्रमाला मागे टाकले. वास्तविक,  वेगवेगळ्या मार्केटमधील एकत्रित प्रेक्षकसंख्येद्वारे हा आकडा साध्य झाला आहे. तर, दुसरीकडे जिओहॉटस्टारने केलेला हा विक्रम पूर्णपणे एकाच कार्यक्रमाचा होता. यामुळे थेट स्ट्रीमिंगमधील त्यांचे स्थान ठळकपणे स्पष्ट झाले आहे. तसेच लाइव्ह कार्यक्रमाचा आनंद देताना मोठ्या प्रमाणावरील मागणी हाताळण्याची त्याची क्षमता देखील सिद्ध करतो. हा विक्रम भारतीय संघाची लोकप्रियता, उपांत्य फेरी जिंकलीच पाहिजे, ही भावना आणि मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे प्रेम या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे आयसीसीच्या या स्पर्धेची लोकप्रियता सिद्ध होते.

लिनियर टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर, उपांत्य फेरी पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 320 दशलक्षांपेक्षा जास्त होती. तर स्क्रीन पाहण्याचा वेळ हा आश्चर्यकारकरित्या 23 अब्ज मिनिटांपेक्षा जास्त होता. यामुळेच तो आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला टी20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले: “आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना एकत्र आलेले पाहणे खूप आनंददायी आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या उपांत्य सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या उल्लेखनीय संख्येवरून केवळ क्रिकेट चाहत्यांचा उत्साहच दिसून येत नाही, तर हा खेळ सर्वांसाठीच सहज उपलब्ध आणि आकर्षक बनवण्यात झालेली प्रगती देखील दिसून येते. हा विश्वचषक जेवढा मैदानावरील खेळासाठी लक्षात राहील तितकाच तो खेळाची भावना साजरी करण्यासाठी एकत्र आलेल्या लाखो चाहत्यांमुळेही लक्षात राहील.” 

जिओस्टारचे उपाध्यक्ष उदय शंकर म्हणाले: “हे जसे जिओस्टारच्या तांत्रिक आणि सर्जनशील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. तसेच ते क्रिकेटला आणखी मोठे बनवण्याच्या आयसीसीच्या वचनबद्धतेचेही प्रतीक आहे. दर तीनपैकी एका भारतीयाने गुरुवारी झालेला दुसरा उपांत्य सामना पाहिला. आणि जेव्हा लाखो लोक अशा पद्धतीने सामना पाहतात तेव्हा तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करावा लागतो. मनोरंजनाचे भविष्य असेच असेल.”

दोन्ही संघांच्या आकर्षक खेळाच्या पार्श्वभूमीवर, सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या 619 दशलक्ष व्ह्यूजने 2024च्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक अंतिम सामन्यादरम्यान नोंदवल्या गेलेल्या 533 दशलक्ष व्ह्यूजच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

अंतिम सामना अजून खेळला जाणे बाकी असताना, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026ने डिजिटल आणि ब्रॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर आधीच अनेक बेंचमार्क स्थापित केले आहेत.

आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 8 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळवला जाणार आहे. या संपूर्ण सामन्याचा आनंद प्रेक्षक जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे थेट घेऊ शकतात.

धायरी येथील बेनकरवस्ती रस्त्याचे काम रखडले,अपघात, प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिकांचे हाल

पालिकेचा गलथान कारभार

पुणे:
धायरी येथील सर्वात दाट लोकवस्तीच्या बेनकरवस्ती मुख्य रस्त्याच्या कामासाठी एक महिन्यापुर्वी एका बाजूचा दहा फूट रुंदीचा व अर्धा किलोमीटर लांबीचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दररोज अपघात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.त्यामुळेनागरिकांचे अतोनात हाल सुरू आहे.या गंभीर समस्येकडे आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रस्त्याचे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. एक महिना होऊनही रस्ता खोदलेल्या अवस्थेत आहेत.
खोदलेल्या खड्ड्यात स्कूल बस, रिक्षा, वाहने कोसळुन अपघात होत आहेत.रस्त्याचे काम कधी सुरू झाले, ते कधी पुर्ण होणार आहे, या कामाचा ठेकेदार कोण आहे, किती रक्कम मंजूर आहे आदीची माहिती देणारा फलकही पालिकेने कामाच्या ठिकाणी लावला नाही.
त्यामुळे या कामात काहीतरी गौडबंगाल आहे असा आरोप धनंजय बेनकर यांनी केला आहे.
बेनकरवस्ती येथील मारीगोल्ड बेकरी ते काळुबाई मंदिर रस्ता चौक पर्यंत मुख्य रस्ता खोदला आहे. खोदलेल्या खड्ड्यात दगड मुरुमही टाकला नाही. ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने रस्त्याच्या कामात मनमानी सुरू आहे.
प्रचंड वाहतूक कोंडी सुरू असतानाही वाहतूक विभाग ठप्प पडला आहे. ठेकेदार खाजगी वार्ड नेमून वाहतूक नियमन करत नाही त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे तर वाहतूक कोंडीत अडकुन पडलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेला वेळेवर पोहचता येत नाही.

पुण्यात पशुवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

पशुसंवर्धन विभागाच्या यशोगाथा सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचवा; महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्याची आवश्यकता – उपसभापती डॉ. गोऱ्हे

पुणे.दि.७: पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ पशुवैद्य, तज्ज्ञ आणि प्रगतशील पशुपालकांचा सन्मान करण्यासाठी ‘ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र’च्या वतीने आयोजित गौरव पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील औंध येथे पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध श्रेणींमधील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रमेश वझरकर यांनी सांगितले की, २०११ मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वडील ज्येष्ठ पशुवैद्य डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांनी संशोधक प्राध्यापकांसाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती. वडिलांच्या या इच्छेनुसार डॉ. गोऱ्हे यांनी त्वरित आर्थिक मदत दिली आणि त्यातूनच ‘डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे पुरस्कृत उत्कृष्ट पशुवैज्ञानिक पुरस्कार’ सुरू झाला. यंदा हा पुरस्कार मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र जयवंत झेंडे यांना देण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, “माझ्या वडिलांनी BAIF संस्थेत तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ग्रामीण विकासासाठी अतुलनीय योगदान दिले. संकरित पैदास कार्यक्रम आणि पशुधनासाठी लस निर्मिती क्षेत्रात त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. फूट अँड माऊथ डिसीजवरील औषध शोधण्यात त्यांचा मोठा वाटा होता.”

परदेशातील पाळीव प्राण्यांच्या डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता भारतातील पशुवैद्यकीय सेवेचे महत्त्व अधोरेखित करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, परदेशात अपॉइंटमेंट मिळणे कठीण झाले आहे, तर भारतात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा चांगली आहे. पण या व्यवसायाला अजून पुरेसे महत्त्व मिळालेले नाही. शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार (SDG) पशुसंवर्धन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पुरवणी मागण्यांमध्ये पशुसंवर्धन विभागासाठी बजेटमध्ये काय तरतुदी आहेत, यावर माझे विशेष लक्ष असून विभागाच्या प्रस्तावाला चालना देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाने यशोगाथा आणि शासकीय योजनांची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करत त्यांनी आगामी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने यंदाचे वर्ष ‘महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे होत असल्याचे सांगितले. महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा निधी दिला. तसेच वडिलांनी लिहिलेले ‘माझ्या जीवन लहरी’ हे पुस्तक डॉ. प्रविणकुमार देवरे यांना भेट दिले.

यंदाचे पुरस्कारप्राप्त मानकरी:

  • जीवनगौरव पुरस्कार: डॉ. लक्ष्मण सांडूजी वाणी
  • उत्कृष्ट पशुवैद्य: डॉ. सचिन वंजारी (सांगली), डॉ. पल्लवी कुरुंदकर (कोल्हापूर)
  • प्रगतशील पशुपालक: श्री. शिवानंद होनमोटे (सोलापूर – पशुपालन), श्री. सचिन लाखे (धाराशिव – कुक्कुटपालन), श्रीमती जयश्री गाढवे (पुणे – शेळीपालन), श्री. अमोल पवार (सातारा – मेषपालन)

कार्यक्रमात पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. श्री. मुकणे, डॉ रमेश वझरकर, श्रीमती जेहलम जोशी, श्रीमती रश्मी जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘दूध’ या विषयावरील स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. आभार उपाध्यक्ष डॉ. विवेक क्षीरसागर यांनी मानले.

जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्या:अण्णा हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

0

मध्यपूर्वेतील तणावावर व्यक्त केली चिंता
पुणे-इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे मानवतेला धोका निर्माण झाला असून, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अण्णांनी या पत्राद्वारे केली आहे. गेल्या आठवडाभरात मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढला असून, युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

गेल्या आठवड्यापासून मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. आठवडा उलटूनही हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. आता या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत उपरोक्त आवाहन केले आहे.

नेमके काय म्हणाले अण्णा हजारे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी जगातील सध्याच्या परिस्थितीवर सखोल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, “सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. विविध देशांमधील संघर्षामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले आहे. युद्धात निष्पाप महिला, मुले आणि कुटुंबांना सोसाव्या लागणाऱ्या यातना अत्यंत वेदनादायक आहेत. भारताची संस्कृती ही अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. आपण नेहमीच जगाला संवादाचा मार्ग दाखवला आहे, त्यामुळे या कठीण काळात भारताने शांततेचा संदेश देणे गरजेचे आहे.”
शस्त्रे नव्हे, संवाद हवा

अण्णा हजारे यांनी पत्रात संवादाच्या महत्त्वावर भर दिला आहे. “आज जगाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची नाही, तर एकमेकांवरील विश्वासाची आणि संवादाची गरज आहे. युद्धामुळे केवळ विनाश होतो, मात्र संवादातूनच कायमस्वरूपी समाधान आणि स्थिरतेचा मार्ग निघू शकतो. भारताने एक जबाबदार आणि मोठी लोकशाही म्हणून जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही माझी नम्र प्रार्थना आहे,” असे त्यांनी नमूद केले.

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. या संवेदनशील वेळी जर भारत माणुसकी आणि शांततेच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला, तर ते संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल,” अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे.

“बाई म्हणे देवा, नको सोन्याचा हार,मान द्यावा जगाने, तोच माझा श्रृंगार”

लोकपरंपरेतील बाईपण ते आत्मभान देणारं आजचं माणूसपण…!!

“बाई म्हणे देवा, नको सोन्याचा हार,मान द्यावा जगाने, तोच माझा श्रृंगार”
या ओवीतील शब्दांतून स्त्रीच्या सन्मानाच्या अपेक्षा पूर्वीपासून वारंवार व्यक्त होताना दिसतात. या अपेक्षापूर्तीसाठी सामाजिक जाणिवेच्या भावनेतून राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहेत. चूल आणि मुल या चौकटीत अडकलेल्या स्त्रीला आत्मविश्वासाने माणूस म्हणून जगण्याचा हमरस्ता उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली. जुन्या लोकपरंपरागत गीतांमधून व्यक्त होणाऱ्या तिच्या कोंडलेल्या श्वासापासून ते लोकशाही व्यवस्थेत तिला मिळालेल्या बळापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख….!!

भारतीय ग्रामीण जीवनाचा विचार केला, तर स्त्रीचे आयुष्य अनेकदा श्रम, जबाबदाऱ्या आणि कुटुंबाच्या अपेक्षांनी वेढलेले दिसते. घर, शेत, कुटुंब आणि नातेसंबंध यांची जबाबदारी सांभाळत ती शांतपणे आयुष्याची वाट चालत होती. बाहेरून पाहताना तिचे जगणे सहनशीलतेचे आणि मूक स्वीकाराचे वाटत असले, तरी लोकपरंपरेच्या अंतरंगात डोकावले की ग्रामीण स्त्रीचे वेगळेच रूप समोर येते. विशेषतः ओव्या, श्रमगीते आणि जात्यावरच्या गाण्यांमध्ये तिच्या मनातील भावना, अनुभव आणि न्यायाची जाणीव स्पष्टपणे व्यक्त होताना दिसते.

पूर्वीच्या ग्रामीण जीवनात स्त्रीचा दिवस पहाटेपासून सुरू होत असे. घरातील कामे उरकताना, विशेषतः जात्यावर दळण दळताना स्त्रियांच्या ओठांवरून ओव्या उमटत. दळणाच्या तालासोबत शब्दांची लय जुळत जाई आणि त्या लयीमध्ये तिच्या मनातील भावना व्यक्त होत असत.
“जात्यावर दळते मी ज्वारी,माझं मन गेलं माहेरच्या दारी”
या ओवीतून माहेराविषयीची ओढ आणि सासरीच्या आयुष्याची जाणीव सहजपणे व्यक्त होते.

ग्रामीण जीवनात स्त्रीची भूमिका केवळ घरापुरती मर्यादित नव्हती. शेतात निंदणी, कापणी, रोप लावणी यांसारख्या विविध कामांमध्ये स्त्रिया सक्रियपणे सहभागी होत. एकत्र काम करताना त्या गाणी म्हणत आणि त्या गाण्यांतून आपल्या आयुष्याविषयीच्या भावना व्यक्त करत.
“निंदणीची ओळ लांब, ऊन माथ्यावरती,बाईच्या जीवाला वेळ कुठे विश्रांती…”
या ओवीतून स्त्रीच्या कष्टमय जीवनाची आणि तिच्या अखंड श्रमांची जाणीव दिसून येते. लोकपरंपरेतील ओव्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या स्त्रीच्या अनुभवांना आणि विचारांना अभिव्यक्ती देतात. अनेकदा या ओव्यांमधून स्त्री आपल्या आयुष्यातील प्रश्नही मांडताना दिसते.
“सासू म्हणे काम कर,नणंद म्हणे ते नको हे कर, या बाईच्या जीवाला बघा कोण विचारं?
या ओवीतून घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना स्त्रीला भेडसावणाऱ्या परिस्थितीचे प्रतिबिंब दिसते.

प्रसिद्ध लोकसाहित्य अभ्यासक ताराबाई भावळकर यांनी ग्रामीण स्त्रियांच्या ओव्यांचा अभ्यास करताना नमूद केले आहे की या ओव्या केवळ मनोरंजनासाठी नसून त्या स्त्रियांच्या अंतर्मनातील अनुभवांचे आणि भावविश्वाचे प्रतिबिंब आहेत. ग्रामीण स्त्रीला समाजात उघडपणे बोलण्याची संधी कमी मिळत होती; त्यामुळे ती ओव्यांच्या माध्यमातून आपल्या वेदना, प्रश्न आणि न्यायाची जाणीव व्यक्त करत असे.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत जात्यावर दळण दळणे किंवा शेतात सामूहिकपणे गाणी म्हणण्याच्या परंपरा कमी झाल्या असल्या तरी या ओव्यांमध्ये जपलेली स्त्रीची संवेदना आणि अनुभव आजही लोकस्मृतीत जिवंत आहेत. लोकपरंपरेतील या ओव्या म्हणजे ग्रामीण स्त्रीच्या आयुष्याचा मौखिक इतिहासच मानता येईल.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या लोकपरंपरेतील ओव्यांकडे पाहिले, तर स्त्रीच्या वेदनांना अभिव्यक्ती देणारी परंपरा आपल्या समाजात पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे दिसून येते. या ओव्या केवळ लोकसाहित्याचा भाग नसून त्या स्त्रीच्या भावना, श्रम आणि आत्मसन्मानाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत.

आधुनिक काळात बाईपणाला मानवी मूल्य प्राप्त करून देण्यासाठी शासनाने स्त्रियांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी विविध लोकाभिमुख योजना राबवून महिलांना आत्मभान आणि स्वावलंबनाची नवी दिशा दिली. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वयं-सहाय्यता गटांची चळवळ उभी केली. या गटांमुळे लाखो महिलांना बचत, कर्जसुविधा आणि लघुउद्योगांच्या संधी उपलब्ध झाल्या.
महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करून राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य योजना, मातृत्व सहाय्य योजना तसेच ग्रामीण भागात सुरक्षित प्रसूतीसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती आणि निवासी वसतिगृहे यामुळे अनेक मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान’ प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांचे स्वयं-सहाय्यता गट तयार होऊन बचत, उत्पादन, विपणन आणि लघुउद्योगांना चालना मिळत आहे. यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनासोबतच सामाजिक नेतृत्वाची संधीही मिळू लागली आहे.

याशिवाय महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही विशेष महत्त्वाची ठरत आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात असून त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यास मदत होते. या योजनेमुळे महिलांच्या हातात थेट आर्थिक बळ मिळून त्यांचे आत्मभान आणि स्वावलंबन अधिक दृढ होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना दिलेल्या आरक्षणामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळत आहे. त्यामुळे समाजाच्या विकासात महिलांचे नेतृत्वही अधिक प्रभावीपणे पुढे येत आहे. या सर्व उपक्रमांमुळे आजची स्त्री केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती राजकारण, विज्ञान, उद्योग, प्रशासन, क्रीडा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. तिच्या कार्याचा समाजात गौरव होत आहे आणि तिच्या योगदानाला योग्य तो बहुमानही मिळत आहे.

लोकपरंपरेतील ओव्यांतून उमटलेली स्त्रीची न्यायाची जाणीव आणि आत्मसन्मानाची भावना आजच्या लोकाभिमुख शासन व्यवस्थेनी राबविलेल्या विविध योजनामुळे अधिक व्यापक स्वरूपात प्रत्यक्ष परिवर्तीत होऊन पुढे येताना दिसते आहे. लोकपरंपरेतील मूक वेदना, संघर्ष आणि आत्मसन्मानाचा शोध घेत चालणारी स्त्री आज शासनाच्या विविध योजनांच्या बळावर अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी बनत आहे.
म्हणूनच लोकपरंपरेतील बाईपणापासून आत्मभानाने उभ्या राहिलेल्या आधुनिक स्त्रीपर्यंतची ही वाटचाल केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याची कथा नाही; ती महाराष्ट्राच्या सामाजिक प्रगतीची दिशा आहे.

लोकपरंपरेतून उमटलेला तिचा मूक आवाज आज सन्मान, अधिकार आणि समानतेच्या नव्या पर्वात रूपांतरित होत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजघडणीत आपले योगदान देणारी ही नवी स्त्री आज अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी बनत आहे. म्हणूनच आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इतकेच म्हणावेसे वाटते…
“बाईच्या कष्टांना मान, तिच्या स्वप्नांना आकाश,
समानतेच्या वाटेवरच समाजाचा खरा विकास.”

— युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

महिला सक्षमीकरणाचा ‘पुणे पॅटर्न’: परिवर्तनाची सक्षम वाटचाल

महिला दिन विशेष

महिला सक्षमीकरण हा केवळ घोषणांचा विषय नाही; तो सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. महिला दिनाच्या निमित्ताने ‘पुणे पॅटर्न’कडे पाहिले, तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते…समन्वय, सातत्य आणि स्थानिक गरजांनुसार आखलेले सुयोग्य नियोजन यामुळेच महिलांच्या आयुष्यात ठोस आणि दीर्घकालीन बदल घडू शकतात. परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम लाभलेल्या पुणे जिल्ह्याने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात राज्यात आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल २२ हजार महिला बचत गट जिल्ह्यात कार्यरत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. लघुउद्योग, घरगुती उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रातील व्यवसाय अशा विविध माध्यमांतून महिलांनी केवळ स्वतःचे उत्पन्न वाढवले नाही, तर कुटुंबाच्या आणि गावाच्या अर्थचक्रालाही गती दिली आहे.

पुणे जिल्हा ही संतांची, विचारांची आणि शौर्याची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अध्यात्मिक वारशाने समाजमन घडवले; तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत स्त्रीशक्तीचा सन्मान अंतर्भूत होता. राजमाता जिजाऊ यांनी घडवलेल्या संस्कारांची परंपरा आजही प्रेरणादायी आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशातूनच महिला सन्मान आणि सक्षमीकरणाची बीजे रुजली आहेत. ‘पुणे पॅटर्न’ची हीच खरी ताकद आहे. पुणे जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागामार्फत विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, कौशल्यविकास प्रशिक्षणातून रोजगारनिर्मिती तसेच अंगणवाडी सेवांद्वारे पोषण आणि आरोग्य या सर्व बाबी एकत्रितपणे हाताळण्याचा प्रयत्न ‘पुणे पॅटर्न’मध्ये दिसून येतो. विशेषतः ग्रामीण भागात स्वयं-सहायता बचत गटांनी महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा दिली आहे. सूक्ष्म वित्तपुरवठा, उत्पादन-विक्री साखळी, स्थानिक बाजारपेठांशी जोडणी आणि डिजिटल व्यवहारांचे प्रशिक्षण यामुळे महिलांनी छोट्या उद्योगांपासून सेवा क्षेत्रापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध गटांनी कृषी प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय आणि हस्तकला या क्षेत्रांत यशस्वी पावले टाकली आहेत.
याचबरोबर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, पोषण अभियान तसेच किशोरी विकास कार्यक्रमांद्वारे मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यावर विशेष भर दिला जात आहे.

किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी, रक्तक्षय निर्मूलन मोहीम आणि मार्गदर्शन शिबिरे यांमुळे आरोग्यविषयक जागरूकता वाढत आहे. ‘पुणे पॅटर्न’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, भोर आणि वेल्हा हे डोंगरी तालुके. या भागात आदिवासी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. या भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा परस्पर समन्वय ठेवून कार्यरत आहेत. ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, बँका, उद्योग संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील सहकार्यामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली आहे. महिला उद्योजिकांसाठी मार्गदर्शन, विपणन सहाय्य आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे हीदेखील महत्त्वाची पायरी ठरली आहे.

महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व निर्माण करणे आणि सामाजिक सन्मान मिळवून देणे होय. पुणे जिल्ह्यातील अनेक महिला सरपंच, उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या या बदलाचे प्रतीक ठरल्या आहेत. आज गरज आहे ती या मॉडेलचा अधिक विस्तार करण्याची. डिजिटल साक्षरता, हरित उद्योजकता आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवणे हे पुढील टप्प्यातील उद्दिष्ट आहे. महिला सक्षम झाल्यास कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाल्यास समाज सुदृढ होतो—हीच ‘पुणे पॅटर्न’ची प्रेरणा आहे.

महिला दिन हा केवळ उत्सव नसून कृतीची नवी दिशा देणारा दिवस आहे. ‘पुणे पॅटर्न’च्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासाची वाट अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. बचत गट हे केवळ आर्थिक व्यवहारांचे व्यासपीठ नसून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामूहिक निर्णयक्षमतेची शाळा ठरत आहेत. ग्रामीण भागातील अनेक महिला आज ग्रामसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विकास समित्यांमध्ये ठामपणे आपले मत मांडताना दिसतात. महिलांना केवळ मदत करण्यापेक्षा त्यांना सक्षम बनवणे हीच खरी सक्षमीकरणाची प्रक्रिया आहे.

आज पुणे जिल्ह्यातील महिला केवळ घराच्या चौकटीत मर्यादित न राहता शिक्षण, उद्योग, सामाजिक कार्य आणि प्रशासन या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि स्थानिक नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे ‘पुणे पॅटर्न’ अधिक परिणामकारक ठरला आहे. महिला दिन हा केवळ गौरवाचा दिवस नसून पुढील वाटचालीचा संकल्प करण्याचा क्षण आहे. महिला सक्षमीकरणाच्या या सक्षम वाटचालीतून ‘पुणे पॅटर्न’ राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठीही प्रेरणादायी ठरत आहे. महिलांचा सन्मान, स्वावलंबन आणि नेतृत्व यांवर आधारलेले हे परिवर्तन अधिक व्यापक करण्याची हीच योग्य वेळ आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच विविध लोककल्याणकारी योजना तसेच सामाजिक कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. समाजातील गरजू , संकटग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे. अधिक माहितीसाठी १०९१ आणि १०९८ या टोलफ्री क्रमांक तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

— रोहिणी ढवळे
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे

12 तास काम केल्यावरही मिळेना महिलांना साडेनऊ हजाराचा पगार

पुणे-इथे घराची सरासरी किंमत देखील तब्बल 78 लाख असल्याचे सांगून देशातील सर्वात परवडणारे शहर असा लौकिक असल्याचा ढोल पिटविला जात असताना ,अवघ्या साडेनऊ हजाराच्या मानधनावर 12/ 12 तास काम करून देखील सुमारे 2 हजार महिलांना याच सर्वात परवडणाऱ्या, राहण्यायोग्य असा ढोल पिटविला गेलेल्या शहरात 5/5 महीने पगार मिळालेला नाही, महापालिकेतील सुरक्षा रक्षक असो,आरोग्य खात्यातील सेविका असो वा शहरातील 15 ते 35 हजारावर काम करणाऱ्या लाखों युवकांच्या नागरिकांच्या मग ते कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असो त्यांच्यासाठी इथे घर घेणे एक महादिव्य ठरतं आहे. आर्थिक विषमतेच्या वेगवान हल्ल्याने पेन्शनरांचे ,शांत पुणे आता गर्भश्रीमंतांच्या जबड्यात जणू अडकल्याचे यावरून स्पष्ट होते आहे.

महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन हजार आशासेविकांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांना संसार कसा चालवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेकडून दररोज १२ तास काम करून घेतले जात आहे, शासनाच्या आरोग्याचे उपक्रम राबविले आहेत. पण मानधन मिळत नसल्याने आशासेविका हवालदिल झाल्या आहेत. शासनाकडून निधी न आल्याने आम्ही मानधन देऊ शकणार नाही, असे महापालिकेने म्हटले आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान राबविण्यासाठी आणि शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये आशासेविकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. घराघरात जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेणे, गर्भवती महिलांची नोंदणी करणे, लसीकरणासाठी जनजागृती करणे, नवजात बालक आणि मातांची काळजी घेणे तसेच विविध साथीच्या आजारांबाबत माहिती देणे, अशा अनेक जबाबदारी आशा सेविका पार पाडतात. कोरोना, स्वाइन फ्लू यांसारख्या साथीच्या काळातही या सेविकांनी मोठ्या प्रमाणावर काम केले होते.

एवढे महत्त्वाचे काम करूनही गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानासाठी राज्य सरकारकडून महापालिकेला निधी प्राप्त होतो. पण हा निधी न मिळाल्याने मानधन देता आलेले नाही.आम्ही पाठपुरावा करत आहोत असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.मानधनाअभावी अल्प उत्पन्न गटातील आशासेविकांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

आशासेविका सकाळी सात ते सायंकाळी सात असे जवळपास १२ तास काम करतात. त्यांना दररोज किमान ५० घरांना भेटी देणे आवश्‍यक असते. या कामासाठी त्यांना प्रति महिना सुमारे नऊ हजार ५०० रुपये इतके मानधन मिळते. कामाच्या तुलनेत हे मानधन अपुरे असताना त्यात वाढ करावी, अशी मागणी आशा सेविकांची आहे. ही मागणी मान्य करण्याचे तर सोडाच पण केलेल्या कामाचाही मोबदला मिळण्यास पाच महिने थांबावे लागत आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ज्या एक महिलाच आहेत त्या पवनीत कौर यांनी असे म्हटले आहे की,’आशासेविकांचे मानधन महापालिका देत नाही, तर राज्य शासनाकडून दिले जाते. पण महापालिकेला ही रक्कम अजून मिळालेली नाही. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. रक्कम मिळताच मानधन दिले जाईल.

महिलांसाठी PMPML च्या दिवसभराच्या 6 सफरी ..चॉइस महिलांची,अवघ्या 500 रुपयांत एक सफर

पुणे-जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) महिला आणि पर्यटकांसाठी विशेष भेट जाहीर केली आहे. स्वारगेट मुख्य बस स्थानकावरून येत्या ८ मार्च रोजी ८ प्रसिद्ध पर्यटन मार्गांवर विशेष वातानुकूलित ई-बस सेवा सोडण्यात येणार आहेत. अवघ्या ५०० रुपयांत पर्यटकांना दिवसभर निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांची सफर घडणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेता यावा, यासाठी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. या पर्यटन बससेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनानिमित्त खास ८ बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

असे आहेत विशेष पर्यटन मार्ग…

मार्ग क्र. १

(हडपसर गाडीतळ) : कानिफनाथ गड, मोरगाव गणपती, जेजुरी आणि सासवड दर्शन. (वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ६)

मार्ग क्र. २

(हडपसर गाडीतळ) : सासवड (संगमेश्वर मंदिर), नारायणपूर (दत्त मंदिर), म्हस्कोबा मंदिर (कोडीत). (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

मार्ग क्र. ५

(पुणे स्टेशन) : फ्लॉवर पार्क, पानशेत धरण, जंगल सफारी आणि पक्षी संग्रहालय. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

मार्ग क्र. ७

(पुणे स्टेशन) : वाडे बोल्हाई, तुळापूर (संभाजी महाराज समाधी), रांजणगाव गणपती, मोराची चिंचोली आणि पाबळ. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

मार्ग क्र. १२

(पुणे स्टेशन) : भुलेश्वर मंदिर, माळशिरस, प्रति त्र्यंबकेश्वर, सासवड (संगमेश्वर, चांगावटेश्वर) आणि बनेश्वर. (वेळ: सकाळी ८.३० ते रात्री ७).

मार्ग क्र. ११

(स्वारगेट) : एकवीरादेवी मंदिर, कार्ला लेणी आणि लोणावळा परिसर. (वेळ: सकाळी ९ ते रात्री ७.३०).

मार्ग क्र. ९

(स्वारगेट) : पौडगाव, श्री सत्य साईबाबा आश्रम, हाडशी, चिन्मय विभूती आणि कोळवण. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३०).

मार्ग क्र. ६

(पुणे स्टेशन) : रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, दरेकर वाडा आणि यवत. (वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३०).

येथे करता येईल बुकिंग

पर्यटन बससेवेसाठी प्रतिप्रवासी ५०० रुपये तिकीट दर असून, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, महापालिका भवन, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी आणि निगडी बसस्थानक येथील पास केंद्रांवर बुकिंग करता येईल.