Home Blog Page 703

औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ

पुणे,दि.१४:- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परीहार चौक, औंध, पुणे येथे एकूण ३३ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये एक हजार सहाशे शहाण्णव उमेदवारांसाठी प्रवेश प्रक्रियेतील शेवटचा टप्पा सुरु आहे. संचालनालयाने प्रवेशाची मुदत वाढवून दिलेली असुन १७ सप्टेंबर, २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये प्रत्यक्ष येवून अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी. १९ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत रिक्त जागांवर प्रवेश होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी इयत्ता दहावी पास अथवा नापास शैक्षणिक अर्हता आहे. अभ्यासक्रम एक व दोन वर्ष मुदतीचे आहेत. त्यासाठी प्रतिवर्षी साधारणपणे दोन हजार रुपये शुल्क आहे. प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये तीस टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. पुणे परीसरातील औद्योगिक आस्थापनांमध्ये महिलांना नोकरीच्या भरपुर संधी उपलब्ध असल्याने महिलांना या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष आवाहन करण्यात येत आहे. प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी आय.टी.आय, औंध, पुणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक ८८५७९८४८२२ वर संपर्क साधुन माहिती घ्यावी. रिक्त जागांचा तपशिलासाठी संस्थेस भेट द्यावी. प्रवेशासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.
००००

पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण

 – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
– सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

 
पुणे (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याला मिळालेल्या पहिल्या वंदे-भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण सोमवारी (उद्या) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार असून पुणे-हुबळी या वंदे-भारत एक्स्प्रेसला केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे स्थानकावरुन झेंडा दाखवणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकरांना प्रतिक्षित असणारी तसेच पुण्याहून सुटणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारकडून महाराष्ट्राला ३ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या असून यात पुणे-हुबळी, नागपूर-सिकंदराबाद आणि कोल्हापूर-पुणे आदी मार्गाचा समावेश आहे. या तिन्ही वंदे भारतचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
 
पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुण्याला पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मिळाली, ही पुणेकर प्रवाशांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. केवळ पुणेच नाही तर या एक्स्प्रेसचा फायदा पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण पटट्यासाठी होणार आहे. पुणे, सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूर या भागात दळणवळण भक्कम होण्यास हातभार लागणार आहे. शिवाय यामुळे अर्थकारणालाही गती मिळणार आहे.’

मोदी सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्रात आताच्या घडीला रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत ८१ हजार ५८० कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत. शिवाय यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून रेल्वेसाठी महाराष्ट्राला १५ हजार ९४० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यात १३२ रेल्वे स्थानक जागतिक दर्जांची करण्यात येत असून एकूण ८ वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात धावत आहेत, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

वंदे भारत ट्रेन चा पुण्याला नैवैद्य दाखविता काय ? प्रवासी असंतुष्ट

आठवड्यातून तीन दिवस असणार पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस

पुणे- पुण्यातून विमान सेवा थेट महत्वाच्या पर्यटनस्थळी नाहीच मुंबई आणि दिल्ली हुन दुसरे विमान करावे लागते अशा स्थितीत आता वंदे भारत ट्रेन ने गेल्या ५ वर्षापासून पुणेकरांच्या आशा पल्लवित झालेल्या असताना आता या आशांना सुरुंग लावण्याचे काम आतापर्यंत झाले आहे यामुळे पुणेकर असंतुष्ट आहेत असे असताना पुण्यावरुन मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरु आहे. त्यानंतर 16 सप्टेंबरपासून सुरु होणारी मुंबई कोल्हापूर वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. तसेच पुणे ते हुबळ ही स्वतंत्र ट्रेनही 16 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे पुण्यातून तीन तर मुंबईतून सातवी ट्रेन मिळणार आहे.यावर असंतुष्ट पुणेकरांची प्रतिक्रिया … नैवैद्य दाखविता काय ? अशीच आहे पुणे – तिरुपती , पुणे दिल्ली , पुणे जम्मू , पुणे कन्याकुमारी ,पुणे गोवा अशा मार्गांवर पुणेकरांना वंदे भारत ट्रेन हवी असताना पुणे सोलापूर आणि पुणे कोल्हापूर, हुबळी देऊन पुण्याला नैवैद्य दाखविता काय ? अशी प्रतिक्रिया उमटते आहे.

पुणे अन् मुंबईतून वंदे भारत सुरु होणार आहे. पुणे शहरातून अद्यापपर्यंत स्वतंत्र वंदे भारत ट्रेन नाही. परंतु आता पुण्यातून स्वतंत्र वंदे भारत येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. तसेच मुंबईवरुन कोल्हापूर जाणारी वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. यामुळे पुणेकरांना येत्या सोमवारपासून दोन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. मुंबईवरुन सातवी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. भारतातील सेमी हायस्पीड असलेल्या वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. यामुळे विविध ठिकाणांवरुन ही ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे.
पुणे शहरातून आणखी दोन ट्रेन सुरु होत असल्यामुळे पुण्याला तीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. यापूर्वी पुण्यावरुन मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरु आहे. त्यानंतर 16 सप्टेंबरपासून सुरु होणारी मुंबई कोल्हापूर वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. तसेच पुणे ते हुबळ ही स्वतंत्र ट्रेनही 16 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे पुण्यातून तीन तर मुंबईतून सातवी ट्रेन मिळणार आहे.पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची आज ट्रायल रन होणार आहे. सकाळी अकरा वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस पुण्याकडे धावणार आहे. आठ डब्यांची भारत रेल्वे विना प्रवासी धावणार आहे. त्यानंतर सोमवार 16 सप्टेंबरपासून ही ट्रेन सुरु होणार आहे. कोल्हापूर पुणे आणि पुणे हुबळी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता प्रवाशांना घेऊन वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने धावणार आहे. आठवड्यातून तीन दिवस असणार पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे.

देशाचे नागरिक भारतीय सैनिकांच्या मागे उभे राहतात याचा गर्व-निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सैन्य दलातील अधिकाऱ्यांची धान्यतुला

 शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ तर्फे आयोजन 
पुणे: नागरिक नेहमीच भारतीय सैनिकांच्या मागे उभे राहतात त्याबद्दल मला गर्व आणि अभिमान वाटतो. नागरिक जेव्हा कौतुक करतात तेव्हा सैनिकांना स्फूर्ती मिळते, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) यांनी केले. 
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या वतीने कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘कथा प्रेरणेची गौरव गाथा विजयाची’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात मंडळातर्फे दहा दिवस दहा उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत भारतीय सैनिकांप्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैन्य दलातील पाच अधिकाऱ्यांची धान्य तुला करण्यात आली. यावेळी निंभोरकर आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते सैनिकांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक सारंग पासकंटी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, पराग ठाकूर, शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, रोहन जाधव, वैभव वाघ, योगेश पासलकर खजिनदार अमर लांडे, विक्रांत मोहिते, सचिन सासने, उमेश कांबळे, यावेळी उपस्थित होते.
नायब सुभेदार विलास दामगुडे, नायब सुभेदार रामधन मिरगे, नायब सुभेदार दत्ता मोझर, बी.व्ही. गुरव, बजरंग निंबाळकर यांचा सन्मान आणि धान्य तुला करण्यात आली. आपले घर, लुई ब्रेल अपंग कल्याण संस्था, बचपन वर्ल्ड फोरम, संतुलन पाषाण, सेवाधाम या संस्थांना धान्य देण्यात आले.
राजेंद्र निंभोरकर म्हणाले, मी मेजर जनरल म्हणून काश्मीर खोऱ्यात आतंकवादाचा सामना करण्यासाठी इन्चार्ज होतो. तेव्हा २०१२ साली तिथे गणपतीची स्थापना केली आणि झेलम च्या तीरावर विसर्जन देखील केले. त्यावेळी अनेकांनी तिथे मुस्लिम आहेत काहीतरी विरोध होईल असे सांगितले, परंतु आपण आपला धर्म का सोडायचा आपल्या देशात सर्व धर्म समभाव आहे आपल्या देशात जर धर्म पाळला नाही तर कुठेही पाळू शकत नाही. 
पांडुरंग बलकवडे म्हणाले, कारगिल विजय दिन आणि कारगिल स्मारक या देखाव्याच्या माध्यमातून देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले अशा शूरवीर सैनिकांचा सन्मान करण्यात आला आहे, आगळ्यावेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा मंडळांनी जपली आहे. 
आनंद सराफ म्हणाले, सैनिक हे मातृभूमीचे सच्चे सेवक असतात. भारत मातेची सेवा केल्यानंतर पदक त्यांच्या छातीवर विराजमान होतात, अशा पाच प्रातिनिधिक वीरांचा फुलांच्या तराजूमध्ये सन्मान करण्यात आला. अनेक चांगले उपक्रम सेवा मित्र मंडळाचे कार्यकर्ते राबवत असतात. सार्वजनिक उत्सवाला सामाजिक कार्याची साथ मंडळाच्या वतीने देण्यात येते. विक्रांत मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.

विधानपरिषद उपसभापतीं डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले मोरगावच्या श्री मयुरेश्वराच्या दर्शनास !

अष्टविनायकांची पहाणी करून प्रलंबित प्रश्नांची पाठपुरावा करण्याचा संकल्प!

मोरगाव, पुणे दि. १३: अष्टविनायकांपैकी श्री मयुरेश्वर, मोरगाव, जि. पुणें यांचे दर्शन डॅा.निलम गोऱ्हे, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेता यांनी घेतले. यावेळी अथर्वशीर्ष व गणपतींची आरती म्हणुन संकल्पसिद्धीसाठी श्रीफलांचे तोरण अर्पण करण्यात आले. तसेच देवस्थानास २१००० रुपयाचा चेक सुपुर्द करण्यात आले. यावेळी संस्थांच्या वतीने महावस्त्र व मयुरेश्वर यांची प्रतिमा देऊन डॉ.गोर्हे यांचा सत्कार केला.

यावेळी मा.ना.नरेंद्र मोदीजी तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले व एनडीएचे सरकार निवडुन आले त्याबद्दल आभार मानले. यावेळी अष्टविनायकाच्या प्रत्येक देवस्थानांच्या विकासाच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा त्यांनी विचार व्यक्त केला.

यावेळी नीलमताईंची बहिण जेहलम जोशी व ऊपसभापती कार्यालयाचे अधिकारी अरविंद माळी, योगेश जाधव, प्रतिभा राऊत, सामाजिक कार्यकर्ते युवराज सुर्यवंशी, शिवसेना पुणें पदाधिकारी युवराज शिंगाडे , राजु तम्मा विटकर ऊपस्थित होते .

‌ ‌‘झुमका गीरा रे‌’ पासून , ‌‘मोगरा फुलला‌’ आणि ‘रुक जा रात ठेहेर जा रे चंदा‌,सारख्या गीतांनी सजविली गणेशाची संगीत मैफिल

21 कलाकारांचा गायनसेवेतून श्री गणेशाला स्वराभिषेक

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांची उपस्थिती

पुणे : अभंग, भक्तीगीते, भावगीते, हिंदी-मराठी चित्रपटांमधील सुप्रसिद्ध गीतांद्वारे पुण्यातील 21 कलाकारांनी श्री गणेशाला स्वराभिषेक केला. कलाकरांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत अन्‌‍ सुरात सूर मिसळत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सहकारनगर क्र. दोनमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध आणि नवोदित कलाकारांनी गायनसेवा सादर केली. ‌‘माझे माहेर पंढरी‌’, ‌‘भाग्यदा लक्ष्मी‌’, ‌‘कमोदिनी काय जाणितो‌’, ‌‘आज कुणी तरी यावे‌’, ‌‘मी राधिका मी प्रेमिका‌’, ‌‘मोगरा फुलला‌’, ‌‘दिल का हाल सुने दिलवाला‌’, ‌‘मी वाऱ्याच्या वेगाने आले‌’, ‌‘रुपेरी वाळूत‌’, ‌‘बदन पे सितारे लपेटे हुएं‌’, ‌‘ऐ री पवन‌’, ‌‘तुमको पिया दिल दिया‌’, ‌‘झुमका गीरा रे‌’, ‌‘रुक जा रात ठेहेर जा रे चंदा‌’, ‌‘तेरे मेरे बिचमे‌’, ‌‘कागज के दो पंख लिए‌’, ‌‘नैंनोमें बदरा छाए‌’, ‌‘मोहे रंग दो लाल‌’, ‌‘आईए मेहेरबां‌’ आदी गीते सादर करण्यात आली. रुपेरी पडद्यावरील मराठी-हिंदी गीतांद्वारे रसिकांनी चित्रपट गीतांचा सुवर्णकाळ अनुभवला.
प्रमोद रानडे, गफार मोमीन, दत्ता थिटे, जितेंद्र भुरुक, चैत्राली अत्रे, श्रुती देवस्थळी, ऋचा महामुनी, भाग्यश्री अभ्यंकर, तन्वी अभ्यंकर, प्राजक्ता आपटे, निवेदिता सहा, अस्मिता मुखर्जी, विवेक पांड्ये, अनघा नवरे, सारंग कुलकर्णी, रुचिरा गुरव, मृदुला मोघे, संपदा वाळवेकर, भाग्यश्री गोसावी, मंजिरी रणदिवे आदी कलाकारांनी गीते सादर केली. योगेश सुपेकर यांनी मिमिक्रीद्वारे कलावंत, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या आवाजातून विविध किस्से सादर केले.
विवेक परांजपे, केदार परांजपे, (सिंथेसायझर), प्रसन्न बाब (संवादिनी), अभिजित जायदे (तबला) यांनी साथसंगत केली.
सहकारनगरमधील माजी नगरसेवक आबा बागूल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी श्रींचे दर्शन घेतले. सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित उपक्रमांचे कौतुक करून आबा बागुल म्हणाले, विविध कार्यक्रमांद्वारे सहकारनगर परिसराला सांस्कृतिक चेहरा मिळाला आहे. गुलाल आणि डीजेचा वापर न करता उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मंडळ सुसंस्कारीत पिढी घडवित आहेत. नंदकुमार गायकवाड यांनी सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले.
समीर सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी तालपरिक्रमा हा कार्यक्रम सादर केला. शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच हिंदी चित्रपट गीतांमध्ये तबला, बासरी, सतार, जेंबे आदी वाद्यांचा वापर केला जातो. अशा विविध वाद्यांच्या सादरीकरणातून एकताल, तीनताल, दादरा, रुपक, केरवा, अद्धा, दीपचंदी यांचे सादरीकरण करण्यात आले. आकाश मोरे, वेदांग ठोंबरे, स्वप्निल दीक्षित, आकाश निमसाखरे, आदित्य देशपांडे, अझरुद्दिन शेख, गणेश बोज्जी, आलाप श्रीवास्तव आदींनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश दातार यांनी केले.
कलाकार आणि मान्यवरांचा सत्कार सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, उत्सव समितीचे प्रमुख विनय कुलकर्णी, पंडित अतुलकुमार उपाध्ये, अमर दबडे, मंदार मोघे, सुयश साबडे, निखिल शिरगावकर, अभिजित वेरेकर, प्रिती जावडेकर, जगदिश यादव, राजेश दातार, अर्चना जोशी, स्मीता पाटील, अमित शहाणे, शंतनू शर्मा यांनी केला. निवेदन प्राजक्ता मांडके यांनी केले.

रसिकांना हसविण्याचे काम नाटकाद्वारे सदैव करू : संकर्षण कऱ्हाडे

संवाद, पुणे, प्रबोधन विचारधारा आयोजित कोथरूड गणेश फेस्टिवलचे उद्घाटन

पुणे : आयुष्यात घडणारी पहिली गोष्ट नेहमीच खास असते. मी लिहिलेल्या ‌‘तू म्हणशील तसे‌’ या व्यावसायिक नाटकाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. पुण्यात आज होत असलेला 388वा प्रयोग आहे. कोथरूड गणेश फेस्टिवल अनेक वर्षे सुरू रहावा अशी सदिच्छा देत या फेस्टिवलमध्ये सहभागी होता यावे अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी व्यक्त केली. कोथरूडकरांना हसविणे अवघड आहे, पण नाटकाच्या माध्यमातून हसविण्याचे काम प्रामाणिकपणे करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ‌‘तू म्हणशील तसे‌’ या नाटकाच्या प्रयोगाला रसिकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला.
संवाद, पुणे व प्रबोधन विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोथरूड गणेश फेस्टिवलला ‌‘तू म्हणशील तसे‌’ या नाटकाच्या प्रयोगाने आज (दि. 14) सुरुवात झाली. फेस्टिवलचे उद्घाटन संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते रसिकांशी संवाद साधताना बोलत होते. कोथरूडचे प्रथम आमदार चंद्रकांत मोकाटे, फेस्टिवलचे निमंत्रक, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे,महेंद्र काळे, हर्षद झोडगे, पार्थ टाकळकर आदी मंचावर होते. सोमनाथ पाटील (दुबई) यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. कोथरूड गणेश फेस्टिवलचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
रसिकांशी संवाद साधताना संकर्षण कऱ्हाडे यांनी ‌‘आद्य दैवत गणरायाला परंपरेचा आहेर, संस्कृतीने नटलेले हे विद्येचे माहेर, सप्तसूरांच्या शर्यतीतही नवे तितकेच कैक जुने, सिद्ध होईल आज पुन्हा हे पुणे तेथे काय उणे‌’ ही कविता सादर केली. त्यास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
प्रास्ताविकात फेस्टिवलचे निमंत्रक सुनील महाजन यांनी संवाद, पुणेच्या उपक्रमांची माहिती दिली. कोथरूड परिसरातील चोखंदळ रसिकांसाठी विविध कार्यक्रमांचे संस्थेच्या माध्यमातून नियमित आयोजन करण्यात येते. कोथरूड गणेश फेस्टिवल हा उपक्रमही रसिकांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे. कोथरूडकरांचे निखळ मनोरंजन व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
चंद्रकांत मोकाटे म्हणाले, कोथरूडकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी या हेतूने संवाद, पुणे व प्रबोधन विचारधारा या संस्थांच्या माध्यमातून कोथरूड गणेश फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.
मान्यवरांचे स्वागत सुनील महाजन, निकिता मोघे, महेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले. संकर्षण कऱ्हाडे यांचा सन्मान चंद्रकांत मोकाटे यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी महाजन-बोरकर यांनी केले तर आभार निकिता मोघे यांनी मानले.

फोटोमध्ये : संवाद, पुणे व प्रबोधन विचारधारा आयोजित कोथरूड गणेश फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) सुहास नाडगौडा, महेंद्र काळे, निकिता मोघे, प्रविण बढेकर, चंद्रकांत मोकाटे, संकर्षण कऱ्हाडे, हर्षद झोडगे, सुनील महाजन.

राहुल गांधी हे संविधान विरोधी- शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

पुणे- लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण रद्द करण्याबाबत मांडलेल्या भुमिकेबाबत पुणे शहर शिवसेना(एकनाथ शिंदे गट ) आक्रमक झाली असून शिवसेना शहर प्रमुख प्रमोद यांना भानगिरे यांच्या नेतृत्वात पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करून राहुल गांधी यांनी समस्त भारतीयांची माफी मागावी अशी मागणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी महिला शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त केला.


लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या अमेरिकेतील खासगी दौऱ्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशातील आरक्षण कमी करत संपवण्याची वेळ आल्याची विधान केले होते.त्यामुळे अनसुचित जाती जमाती, आणि इतर मागासवर्गीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मुलभुत हक्क या घटकात कलम १७ आणि १८ अन्वये समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण दिले आहे असे असताना आरक्षण रद्द करण्याचे विधान संतापजनक आहे. तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनीच जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे सांगत सामाजिक सलोखा बिघडेल असे विधान केले होते‌. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे पुढे म्हणाले की राहुल गांधी यांनी वेळोवेळी संविधान विरोधी विधाने केली असून, लोकसभा प्रचारादरम्यान माध्यमांमध्ये त्यांनी उघडपणे पत्रकार परिषदेत या पत्रकार परीषदेत किती वार्ताहर मागास प्रवर्गातील आहेत?किती छायाचित्रकार मागास प्रवर्गातील आहेत असे प्रश्न विचारून आपण संविधान विरोधी आहोत हे दाखवून दिले आहे. विरोधी पक्षनेता हे अत्यंत जवाबदारीचे काम आहे‌, वेळोवेळी राहुल गांधी यांनी विनाकारण सामाजिक सलोखा बिघडेल असे विधान केले आहे. पुणे शहर शिवसेना राहुल गांधी यांच्या या आरक्षण विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून राहुल गांधी यांनी जर माफी मागितली नाही तर अत्यंत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुनाईत, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, उपशहर प्रमुख सचिन थोरात, विकास भांबुरे,सुधीर कुरुमकर,संतोष राजपूत,विकी माने, संजय डोंगरे, शहर समन्वयक नवनाथ निवंगुणे, जिल्हा उपसंघटक पंकज कोद्रे, शहर संघटक श्रीकांत पुजारी,आकाश रेणूसे,अविनाश खेडेकर, महेंद्र जोशी योगेश जोशी,गणेश काची, अभिजीत बोराटे,उद्धव कांबळे, सुरेखाताई पाटील,सुवर्णताई शिंदे, संजय तुरेकर, सुहास कांबळे, आशुतोष शेंडगे, मार्तंडराज धुंदुके व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बँकेवर दराेडा घालणाऱ्या टाेळीस माेक्का अंर्तगत जन्मठेपची शिक्षा

पुणे-पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यावत शाखेवर दरोडा घालणाऱ्या ७ जणांच्या टोळीला शिवाजीनगर न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

यवत पाेलीस स्टेशनच्या हद्दीत १०/९/२०१६ राेजी दाैंड तालुक्यात राहु या गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत सशस्त्र दराेडा टाकून बँकेतून ६५ लाख रुपयांची राेख रक्कम दराेडेखाेरांनी लुटली हाेती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखे व यवत पाेलिसांनी तपास करत, सतीश अाप्पासाहेब इथापे टाेळीस अटक केली. त्यांच्यावर माेक्का अंर्तगत दहा अाराेपींवर कारवाई करण्यात अाली हाेती. याबाबतची सुनावणी शिवाजीनगर न्यायालयात हाेऊन विशेष न्यायालयाने चार अाराेपींना जन्मठेपची व प्रत्येकी दहा लाख रुपये दंडाची व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली अाहे. तर, तीन अाराेपींना सात वर्ष सक्तमजुरी व १० लाख रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी शिक्षा सुनावण्यात अाली अाहे.

सचिन अाप्पा ऊर्फ अाप्पासाहेब ऊर्फ भाऊसाहेब इथापे ऊर्फ शिवाजी अाप्पा पाटील (वय-२८,रा. चाळीसगाी, जळगाव, मु.रा.काेंडेगव्हाण, ता.श्रीगाेंदा, अहमदनगर), रामदास ऊर्फ पप्पु ऊर्फ झिंग्या ऊर्फ समीर यशवंत ढगे (२७,रा.चांबुर्डी, ता.श्रीगाेंदा, नगर), पृथ्वीराज ूर्फ पतंग दत्तात्र्य माने (२७,रा. कन्हेरगाव, ता.माढा, साेलापूर), मारुती ऊर्फ पिंटया शिवाजी सरडे (२३,रा.कन्हेरगाव, ता.माढा,साेलापूर ) या अाराेपींना जन्मठेप शिक्षा सुनावण्यात अाली अाहे. तर, सतीश अाप्पा इथापे ऊर्फ सतीश अाप्पा पाटील (३०,रा.चाळीसगाव, जळगाव), मंगल अाप्पा इथापे (४६,रा.चाळीसगाव, जळगाव), प्रियंका ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली लाेकरे ऊर्फ प्रियंका दिपक देशमुख (२४,रा.चाळीसगाव, जळगाव) या अाराेपींना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात अाली अाहे.

याप्रकरणात तुषार शिवाजी सरडे (रा.कन्हेरगाव, ता.माढा, साेलापूर)ल ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगन्नाथ लाेकरे ऊर्फ दिपक दादासाे देशमुख (रा.चाळीसगाव, जळगाव. मु.रा.टेंभुणी, साेलापूर), बबलु ऊर्फ बिसेट साळवे (रा.अहमदनगर) या अाराेपींवर गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता तेव्हापासून साळवे व लाेकरे फरार झाले अाहे.तर, तुषार सरडे यास न्यायालयाने निर्दाेष साेडले अाहे. या गुन्हयाचा तपास तत्कालीन एलसीबीचे पाेलीस निरीक्षक राम जाधव, त्यांचे तत्कालीन सहकारी , यवत पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण, एपीअाय विलास नाळे, पाे.हवा.महेश बनकर यांनी गुन्हयाचा तपास करुन गुन्हयाचे तपासात गाेपनीय माहिती काढून व तांत्रिक विश्लेषण करुन अाराेपी नावे निष्पन्न करत त्यांच्यावर अटक कारवाई केली.

याबाबत सदर टाेळीवर माेक्का कारवाई देखील करण्यात अाली हाेती. सन २०१७ मध्ये याप्रकरणात न्यायालयात अाराेपपत्र दाखल करण्यात अाले हाेते. सरकारी वकील चंद्रकिरण साळवी व पाेलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले अशी माहिती पुणे ग्रामीण पाेलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन

पुणे, दि. १४: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत ‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ स्वाक्षरी मोहिमेचे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (१३ सप्टेंबर) आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत, त्याअनुषंगाने प्रचार प्रसारासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य पुरातत्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, डेक्कन महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार (दि. १२ सप्टेंबर ) रोजी रागुरूनगर (ता. खेड) येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू वाडा स्मारक येथे ‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. काल जिल्हाधिकारी कार्यालयात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी या मोहिमेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या स्वाक्षरीसाठीच्या फ्लेक्सवर स्वाक्षरी केली.

‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या १२ किल्ल्यांमध्ये जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. नामांकनादरम्यान किल्ल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यापैकी हा एक उपक्रम आहे, असे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी सांगितले.

कांदा, बासमती तांदळावरील निर्यातमूल्य हटविण्यासह खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत

0

देशातील सोयाबीन, बासमती तांदळासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा;
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह सहकार मंत्री अमित शहा यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार

मुंबई, दि. 14 : देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. कांद्यासह बासमती तांदळावरील निर्यात मूल्य रद्द करण्याबरोबरच खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे सातत्याने केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

देशांतर्गत अन्नधान्याच्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी कांदा आणि बासमती तांदळावर निर्यात मूल्य लावले होते. काल (शुक्रवारी) केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोयाबीनच्या किंमती वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वीच (दि. 11 सप्टेंबर) मंत्रालयातील त्यांच्या दालनात विशेष बैठक घेतली होती. कांदा, सोयाबीन आणि बासमती तांदळाच्या प्रश्नासंबधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने कार्यवाही सुरु करण्यात आली होती. केंद्र सरकारने कांदा आणि बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटवावे तसेच खाद्य तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीला यश आले आहे. केंद्राने घेतलेल्या या निर्णयाचा देशातल्या कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी हिताच्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले आहेत.

पुणे:वाढत्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारे आंदोलन!

पुणे-पुणे राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या वतीने डेक्कन येथील गुडलक चौकात कलाकार कट्ट्यालगत शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी वाहनचालक यांची जनजागृती आणि या समस्येचे निराकरण न करणाऱ्या सत्ताधार्यांचा व प्रशासनाचा निषेध करण्यात आला.या अनुषंगाने सदर आंदोलन छेडण्यात आले असता महाराष्ट्र अर्बन सेलचे सरचिटनीस नितीन जाधव, पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने, पुणे अर्बन सेलचे सदस्य राहुल पोटे, नीता गलांडे, मदन वाणी, वसंतकुमार भाटिया, युसुफ शेख, प्रमोद शिंदे, सचिन यादव, महेश कनेरकर, अमित भगत, गणेश ठोंबरे, सुरज शिंदे, पृथ्वीराज बेलदरे,प्रियांका तांबे, मीनल धनवटे, मच्छिंद्र उत्तेकर, अद्वैत कोंढरे, अमित गोडांबे, पुष्कर भिलारे, ऋषिकेश मारणे तसेच अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.

यावेळी स्वप्नील दुधाने म्हणाले,’ आजमितीस पुणे शहर हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असून वाढती लोकसंख्या आणि खासगी वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज बनली असून प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आज हे डोळ्यांत अंजन घालणारे आंदोलन करण्यात आले. यावेळी सिग्नलला थांबून खास पुणेरी पाट्या हातात घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

आजमितीस ६० ते ६५ लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या शहरातील एकूण RTO नोंदणीकृत वाहनांची संख्या ४४ लाख असून शहरात दरवर्षी सरासरी २ लाख वाहनांची भर पडत आहे. या व्यतिरिक्त शहरामधे दररोज हजारो वाहने इतर शहरामधुन ये-जा करित असतात. पुणे शहरातील रजिस्टर्ड वाहनांची अंदाजे संख्या दुचाकी ३५ लाख, कार ७.५ लाख, रिक्षा ८८ हजार, कॅब्स ३७ हजार अशी वाहन संख्या आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी असणाऱ्या वाहतुक पोलीस बांधवांची संख्या अत्यंत नगण्य अर्थात ११०० आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण येत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुविधांचा अभाव व मर्यादित बस संख्येमुळे नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करीत नाहीत. पुणे शहरातील अकार्यक्षम सिग्नल ट्रॅफिक यंत्रणा, सार्वजनिक पार्किंग स्टेशनची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात, वाढत्या वाहनानुसार व शहरीकरणाच्या विस्तारानुसार नवीन रस्त्यांची निर्मिती व अस्तित्वातल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यास पुणे महानगरपालिकेची अकार्यक्षम यंत्रणा या काही महत्त्वाच्या गोष्टींमुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

मुस्लिम समाज भाजपच्या राजवटीमध्ये भीतीच्या वातावरणात, धर्मांध राजकारण देशाला घातक-अबू आजमी म्हणाले , हडपसर सह १२ जागा आम्ही लढू

 एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश

भाजपने हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करून देशाला मागे टाकले

देवेंद्र फडणविसांच्या आशीर्वादानेच नितेश राणेंच्या मुस्लिमांना धमक्या

पुणे (कोंढवा)  प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध राजकारण देशाला घातक आहे. मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये भीतीच्या वातावरणात जगत असून सर्वधर्मसमभावाची भावना ठेवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी सोबत आहोत. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये समाजवादी पक्षाची ताकद असून या मतदार संघात उमेदवार उभा केल्यास निश्चितच येथून समाजवादी पक्षाचा आमदार निवडून येईल अशी आशा व्यक्त करतानाच समाजवादी पक्ष हडपसर विधानसभा मतदार संघा सह महाराष्ट्रात विधानसभेच्या 12 जागा लढवणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी दिली.
समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनिस अहमद यांच्या हडपसर विधानसभा मतदार संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अबू आजमी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सलीम मुल्ला, हबीब शेख, इमरान शेख, असिफ शेख यांसह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सलीम मुल्ला यांच्यासह शेकडो एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अबू आझमी यांच्या उपस्थितीत झालेल्या जनसंवाद सभेमध्ये समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला.

भारतीय जनता पक्षाने हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करून देशाला मागे टाकले आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी केली त्याचाच परिणाम म्हणून चारशे पार चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्ष केवळ 240 जागा मिळवू शकला. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही समाजवादी पक्षाचा मतदार आहे. आगामी विधानसभा मतदारसंघासाठी मुंबईतील तीन विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्र मध्ये पक्ष 12 जागांवर उमेदवार उभे करणार आहे आणि त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे.

भारतीय जनता पक्षातील आमदार नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांनी मुस्लिमांविरोधात भूमिका घेऊनही भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही? याचाच अर्थ त्यांच्या बोलण्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस असल्याचे दिसून येते. परंतु मुस्लिम समाज अशी वक्तव्य कदापी सहन करणार नाही असा इशाराही अबू आजमी यांनी यावेळी दिला. मुस्लिम बांधवांचा एमआयएम पक्षावरील विश्वास कमी होत आहे. एमआयएम पक्ष हा केवळ मुस्लिम बांधवांना राजकारणासाठी वापर करून घेतो आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो हे मुस्लिम बांधवांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील लाखो मुस्लिम बांधव हे एमआयएम सोडून समाजवादी पक्षाकडे आकर्षित होत आहे. त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होईल असा विश्वासही अबू आजमी यांनी यावेळी व्यक्त केला.

अनिस अहमद म्हणाले, हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये समाजवादी पक्षाला अतिशय अनुकूल वातावरण आहे. या मतदारसंघांमध्ये पूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. तसेच येथील जनतेला समाजवादी पक्षावर विश्वास आहे. त्यामुळेच यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून समाजवादी पक्षाचा आमदार हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये निवडून येईल याची आम्हाला खात्री वाटते.

सलीम मुल्ला म्हणाले, एमआयएम पक्ष पुण्यामध्ये स्थापन करण्यात आणि वाढविण्यात माझ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे, परंतु एमआयएम पक्षाने आमची फसवणूक केली आहे. पक्षाने मुस्लिम बांधवांची मते केवळ राजकारणासाठी वापर करून घेतली आणि त्यांनी नंतर समाजाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले या त्यांच्या वापरा आणि फेकून द्या या नीतीमुळेच शेकडो मुस्लिम बांधव हे एमआयएम सोडून समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहे.

मोदी म्हणाले- जम्मू-काश्मीर तीन कुटुंबांनी उद्ध्वस्त केले:पीडीपी, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स

भाजपने 90 पैकी 62 जागांसाठी उमेदवार जाहीर केले
भाजपने जम्मू-काश्मीरमधील 90 पैकी 62 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने जम्मू विभागातील सर्व 43 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काश्मीरमध्ये पक्ष 47 पैकी 19 जागांवर निवडणूक लढवत आहे.2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ने 28 जागा जिंकल्या होत्या, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC) ने 15 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसने 12 जागा जिंकल्या होत्या.

दोडा -जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी शनिवारी (१४ सप्टेंबर) डोडा येथे पोहोचले. रॅलीला संबोधित करताना ते पुढे म्हणाले – आम्ही आणि तुम्ही मिळून सुरक्षित काश्मीर बनवू, ही मोदींची हमी आहे. यावेळी जम्मू-काश्मीरच्या निवडणुका भविष्याचा फैसला करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले- जम्मू-काश्मीरला काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी घराणेशाहीने उद्ध्वस्त केले. या तिन्ही कुटुंबांनी मिळून तुमच्यावर जे केले ते पापापेक्षा कमी नाही. अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीरच्या बरबादीला तिन्ही कुटुंबे जबाबदार आहेत.

या रॅलीतून मोदी चिनाब खोरे, डोडा, किश्तवाड आणि रामबन या तीन जिल्ह्यांतील 8 विधानसभा जागांवर भाजप उमेदवारांना मतांचे आवाहन करणार आहेत. 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात या 8 जागांसह 24 जागांवर मतदान होणार आहे.

42 वर्षात पंतप्रधानांची डोडा येथे ही पहिलीच भेट असणार आहे. यापूर्वी 1982 मध्ये इंदिरा गांधी यांनी डोडाला भेट दिली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी किश्तवाडला गेले होते. डोडापासून ते 58 किलोमीटर अंतरावर आहे.

परिवारवादावर : मोदी म्हणाले- तीन कुटुंब एका बाजूला, काश्मीरचे तरुण त्यांच्यासमोर
परिवारवादाबद्दल पीएम मोदी म्हणाले – जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक तीन कुटुंब आणि जम्मू-काश्मीरच्या तरुणांमध्ये आहे. एका बाजूला तीन कुटुंबे, तर दुसऱ्या बाजूला स्वप्ने घेऊन निघालेली तरुण मंडळी. एक कुटुंब काँग्रेसचे, एक कुटुंब नॅशनल कॉन्फरन्सचे आणि एक कुटुंब पीडीपीचे आहे. या तिन्ही कुटुंबांनी मिळून तुमच्याशी जे केले ते पापापेक्षा कमी नाही. अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीरच्या बरबादीला तिन्ही कुटुंबे जबाबदार आहेत. या तीन कुटुंबांनी येथे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. जमीन हडप करणाऱ्या टोळ्यांना प्रोत्साहन दिले. तुम्हाला छोट्या सुविधांसाठी तळमळ करायला लावली होती. या तिन्ही कुटुंबातील लोकांनाच सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती करण्यात आले.

दहशतवादावर: मोदी म्हणाले- जुन्या सरकारमध्ये गृहमंत्री लाल चौकात जायलाही घाबरत होते
पंतप्रधान म्हणाले- जम्मू-काश्मीरमधील तीन कुटुंबांनी येथे फुटीरतावाद आणि दहशतवादासाठी मैदान तयार केले. याचा फायदा देशाच्या शत्रूंनी घेतला. त्यांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय चालू राहावा यासाठी हे लोक दहशतवादाला खतपाणी घालत होते. त्यांच्या गुन्ह्यांमुळे आमच्या मुलांना जीव गमवावा लागला. ही चंद्रभागा दरी वर्षानुवर्षे चाललेल्या दहशतवादाच्या कालखंडाची साक्षीदार आहे. दिवस उजाडताच अघोषित कर्फ्यू लागू करण्यात आला होता तो काळ आठवा. सर्व दुकाने ठप्प झाली, सर्व कामे ठप्प झाली. तेव्हा केंद्र सरकारचे गृहमंत्रीही लाल चौकात जाण्यास घाबरत होते.

दगडफेक करणाऱ्यांवर:
येथे दहशतवाद आता शेवटचे श्वास मोजत आहे. गेल्या 10 वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये जो बदल झाला आहे तो स्वप्नापेक्षा कमी नाही. पूर्वी पोलिस आणि सैन्यावर दगडफेक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडांनी नवीन जम्मू-काश्मीर तयार होत आहे. हे सर्व कोणी केले आहे? मोदींनी हे केले नाही, तुम्ही जम्मू-काश्मीरच्या लोकांनी हे केले आहे. तुमचा हा विश्वास पुढे नेत जम्मू-काश्मीर भाजपने तुमच्यासाठी अनेक संकल्प केले आहेत.

काश्मिरी पंडितांवर- मोदी म्हणाले- भाजपने काश्मिरी पंडितांसाठी आवाज उठवला.
काश्मिरी पंडितांबद्दल पंतप्रधान म्हणाले- तीन दशकांहून अधिक काळ झाला, या दिवशी आमचे काश्मिरी पंडित टिकलाल टपलू यांना दहशतवाद्यांनी शहीद केले. त्यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांवर अत्याचाराची न संपणारी मालिका सुरू झाली आहे. भाजपने काश्मिरी पंडितांसाठी आवाज उठवला आणि त्यांना पाठिंबा दिला. काश्मिरी हिंदूंच्या वापसी आणि पुनर्वसनासाठी टपलू योजना बनवण्याचे काम करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या रॅलीपूर्वी डोडामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधान मोदींचा दौरा आणि खोऱ्यातील अलीकडच्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर डोडा आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. किश्तवाड, भदेरवाह आणि डोडा येथून येणाऱ्या गाड्या दोडा पुलाजवळ थांबवण्यात आल्या आहेत. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जात आहे. स्टेडियमच्या आजूबाजूच्या घरांच्या छतावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 90 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 7 अनुसूचित जाती आणि 9 अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा १८ सप्टेंबरला, दुसरा टप्पा २५ सप्टेंबरला आणि तिसरा टप्पा १ ऑक्टोबरला होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार येथे 88.06 लाख मतदार आहेत.

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह व भाजपा विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन नेमके कशासाठी? : बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२४
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा दिल्लीतील भाजपचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून भाजपाचा निषेध केला तसेच तरविंदसिंह मारवाला अटक करावी अशी मागणी करण्यात आली.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करून भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजपावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी तरविंदसिंह मारवाच्या विधानावर भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.
नागपूरमध्ये व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करुन भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्यासह शेकडो महिलांनी नारेबाजी करून रस्ता रोको केला, पोलीसांनी यावेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना अटक केली.नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने भाजपचा जाहीर निषेध करण्यात आला. राज्यातील इतर भागातही काँग्रेसने आंदोलन करून भाजपाचा धिक्कार केला.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात भाजपाच्या आंदोलनावर ट्वीट करत म्हणाले की, “आरक्षण बंद करणार असे खासदार राहुल गांधी कधीही बोललेले नाहीत, त्यामुळे भाजपावाले नेमके कशासाठी आंदोलन करत आहेत? भाजपा स्वत:च फेक न्यूज पसरवून आंदोलनाच्या नौटंक्या करत आहे. भाजपाचे नेते सत्यता पडताळून पाहण्याची तसदीही घेत नाहीत, त्यांना अज्ञानात आनंद घेण्याची सवय लागली आहे. भाजपाच्या या फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही. भाजपाच संविधान आणि आरक्षणविरोधी आहे हे सत्य जनतेला माहित आहे”. असे थोरात म्हणाले.