Home Blog Page 695

वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनलचा पुण्यातील पहिला वर्धापन दिन साजरा

पुणे- वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे ही केवळ शिक्षण संस्था नाही तर जगभरातील शैक्षणिक संस्थेचा ब्रँड आहे. विद्यार्थ्यांना नवी आणि निखळ जीवनदृष्टी देण्याबरोबरच त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवनातील नवी प्रयोगशीलता आणि सृजनशीलता, आदर्श आचार आणि विचारांचा परिचय देणारी हि संस्था आहे, असे वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणेचे सह-संस्थापक अनुज अग्रवाल यांनी सांगितले. पुण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल कॅम्पसमध्ये आपला पहिला स्थापना दिवस साजरा केला.

या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून वेलिंग्टन कॉलेज यूकेचे संस्थापक संचालक सर अँथनी शेल्डन, पंचशील रिॲलिटीचे संचालक रेशम चोरडिया, डॉ. मर्रे टॉड संस्थापक मास्टर, फ्रेंड्स ऑफ वेलिंग्टन ग्रुपचे सदस्य रॉबिन शहा, विद्यार्थी प्रतिनिधी मायला हेकाला उपस्थित होते.

अनुज अग्रवाल म्हणाले की, शाळेच्या संस्थापकांनी त्यांच्या दूरदृष्टीने तसेच समर्पण आणि चिकाटीने संस्थेचा मजबूत पाया तयार केला असून याचा फायदा विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी होत आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्या ज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी,  प्रयोगशीलता, कल्पकता, ज्ञानमत्ता आणि कौशल्य असलेले शिक्षक याठिकाणी आहे. फक्त हुशार विद्यार्थी न घडवता एक अष्टपैलू विद्यार्थी तयार करण्याचे ध्येय संस्थेचे आहे. त्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये आयबीडिपी अभ्यासक्रम सुरु करण्याचे आमचे ध्येय आहे. प्रत्येकाला मूल्यवान बनविण्यासाठी आणि आपली क्षमता ओळखण्यास सक्षम बनविण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.

दयाळूपणा, धैर्य, सचोटी, जबाबदारी आणि आदर हेच वेलिंग्टन कॉलेजचे मूल्य आहेत. सर अँथनी सेल्डन यांनी १५ वर्षांपूर्वी वेलिंग्टन कॉलेज यूकेने जागतिक स्तरावर जाण्याचा निर्णय कसा घेतला यावर प्रकाश टाकला आणि डब्ल्यूसीआयपीचे यशस्वी वर्ष पूर्ण झाल्याचे सांगितले.

शाळेचे संस्थापक मास्टर डॉ. मर्रे टॉड म्हणाले, पुण्यातील पहिला संस्थापक दिन साजरा करताना, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. वेलिंग्टन कॉलेजच्या जागतिक नेटवर्कला आकार देण्यासाठी ज्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी महत्त्वपूर्ण ठरली आहे, सर अँथनी सेल्डन यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती आमच्या ध्येयाचे आणि आम्ही उभारत असलेल्या रोमांचक भविष्याचे महत्त्व अधोरेखित करते.”

या कार्यक्रमात एका विद्यार्थीनीचे भाषण देखील झाले. ज्यामध्ये तीने वैयक्तिक अनुभव आणि शाळेचा तिच्या जीवनावर झालेला प्रभाव सांगितला. यामुळे वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुण्याचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला गेला.

वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शाळेची उत्कृष्टता आणि समुदायाची बांधिलकी अधोरेखित केली. शाळा तिच्या मूळ मूल्यांद्वारे आणि त्याच्या समर्पित समुदायाच्या पाठिंब्याने मार्गदर्शित, वाढ आणि यशाचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी तयार आहे.

राहुल गांधींना धमक्या देणाऱ्या तालिबानीवृत्ती विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात मीरा भाईंदर येथे आंदोलनात सहभागी

राहुल गांधींचा अपमान काँग्रेस सहन करणार नाही, वाचाळविरांना भाजपा युतीने लगाम घालावा.

मुंबई, दि. १९ सप्टेंबर
विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवघेण्या धमक्या देणाऱ्या सताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या बेताल नेत्यांविरोधात काँग्रेसने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना भाजपा-शिवसेनेने आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मीरा भाईंदर येथे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेटट्वार, माजी मंत्री सतेज बंटी पाटील, हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप यांच्यासह नेते, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भाजपाच्या तालिबानी वृत्तीचा निषेध केला. मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथीस घरासमोर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती गेटवर शिवसेना आमदार संजय गायकवाड, भाजप नेते अनिल बोंडे, तरविंदर सिंग मारवाच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बाजार समिती सभापती संजय जाधव, शहर अध्यक्ष नंदकुमार कोतवाल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील आकाशवाणी चौकात शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (UBT )व राष्ट्रवादी काँग्रेसचे(SP) नेतेही आंदोलनाला उपस्थित होते. यावेळी भाजपाचा तरविंदर मारवा, रवनीत बिट्टू, अनिल बोंडे व शिंदे गटाचा संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे जळगावच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोके आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटीस जितेंद्र देहाडे, जगन्नाथ काळे, योगेश मसलगे, इब्राहिम पठाण, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
नागपूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन वाचाळविरांचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी केली.
नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनेही आंदोलन करून वाचाळविरांचा निषेध केला. कोल्हापुर काँग्रेस कमिटीनेही आंदोलन करून धमक्या देणाऱ्यांचा धिक्कार केला.

‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे केंद्र सरकारचे आदेश

0
  • केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आदेश
  • ⁠सामान्य ठेवीदारांच्या तक्रारींची गंभीर दखल

नवी दिल्ली (प्रतिनिधी)

ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींची गंभीर दखल केंद्र सरकारने लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन निर्देश दिले आहेत.

‘ज्ञानराधा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत. याबाबत तक्रारींची संख्या मोठी असल्याने यावर केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे तातडीच्या बैठका घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह केंद्रीय सहकार मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होती.

याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘MSCS कायदा 2002 च्या कलम 86 अंतर्गत सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला 15 दिवसांच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत आहे. अधिनियमाच्या कलम 89 अंतर्गत या प्रकरणात एका लिक्विडेटरची नियुक्ती अधिनियमाच्या नियम 28 आणि 29 नुसार सोसायटीच्या दायित्वांचे वितरण करण्यासाठी केली जाईल’.

‘प्रस्तुत लिक्विडेटर सोसायटीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करेल आणि मालमत्तांच्या उपलब्धतेनुसार सोसायटीच्या सदस्यांना/ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने त्यांची रक्कम परत करेल. यामुळे समाजातील गरीब सभासद आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास आणि त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल’, असेही केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET 2024) साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वरील वेबसाईटवर देण्यात आला आहे, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.

0000

देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या: रमेश चेन्नीथला

राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’: नाना पटोले

भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून महाराष्ट्रात मविआचा मुख्यमंत्री होणार: बाळासाहेब थोरात.

कोकणात काँग्रेस पक्ष वाढवण्यावर भर द्या, विधानसभेला कोकणातून जास्तीत जास्त जागा जिंका: विजय वडेट्टीवार.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदरमध्ये संपन्न.

मुंबई, दि. १९ सप्टेंबर
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली आहे. नरेंद्र मोदी व आरएसएस विरोधात लढणारे देशातील ते एकमेव नेते असून राहुल गांधी भाजपासमोर मोठे आव्हान बनले आहेत त्यामुळेच घाबरलेला भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाचे नेते त्यांना सातत्याने जीवघेण्या धमक्या देत आहेत, पण राहुलजी गांधी अशा धमक्यांना घाबरत नाहीत असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC मेंबर व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, आमदार भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, जोजो थॉमस, महेंद्र घरत, दयानंद चोरघे, समीर वर्तक, मनोज शिंदे, अविनाश लाड, अनिकेत म्हात्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते.

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आज काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे, विधानसभा निवडणुका मविआ एक होऊन लढणार आहे. कोकण विभागात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून या भागात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल व नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरवात महाराष्ट्रातून होईल असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी सातत्याने हिंसेचा विरोध करून ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ सुरु केली. केंद्र सरकारने देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले असताना राहुल गांधी यांनी ४००० किमीची पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलवून टाकले. देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी ही यात्रा काढली. राहुल गांधी हे संयमी नेते आहेत पण भाजपा त्यांच्यावर जीवावर उठले आहे, त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, ईंट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा पटोले यांनी दिला.

विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महायुती सरकारला सत्तेचा अंहकार झाला आहे, सर्वसामान्य जनतेला गाडीखाली चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे, आजही वाड्या वस्त्यावर ५० खोके एकदम ओके, हे विसरले नाहीत. भ्रष्ट युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यालाच चार दिवसांनी सरकारमध्ये घेतले व तिजोरीच्या चाव्या दिल्या. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाऱ्यांनीच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतले. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, ऍम्ब्युलन्स खऱेदीत घोटाळा केला आहे. हे सरकार कमीशनखोर, खोकेबाज, धोकेबाज सरकार असून या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबईतील कोट्यवधी रुपयांची जागा अदानीला विकली जात आहे. भाजपा युती सरकारने महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. विरोधी पक्षेते राहुल गांधी यांना जिवघेण्या धमक्या देणाऱ्यांचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला तसेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन कोकणात काँग्रेस पक्ष वाढवण्यावर भर द्या, जिद्दीने कामाला लागा व कोकणातून जास्तीत जास्त जागेवर विजय मिळवा असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

यावळी बोलताना विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदलले आहे. भाजप सरकारच्या काळात लोकांचे जगणे मुष्कील झाल आहे. जनता त्रस्त आहे. जनतेला आता बदल हवा आहे. राज्यात सध्या काँग्रेसमय वातावरण आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार लोकापर्यंत पोहोचवा व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणा.

राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली- अरविंद शिंदे

पुणे- गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गावगुंड आमदार संजय गायकवाडने राहुल गांधीची जीभ कापणाऱ्यास बक्षीस जाहीर केले भाजपाचा खा. अनिल बोंडेने त्यांच्या जीभेला चटके देण्याचे वक्तव्य केले आहे. या गंभीर धमक्या असून सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.

      यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी. राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम चालवत आहेत. राहुल गांधी कधीही आरक्षण बंद करू असे म्हटले नाहीत. उलट आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ज्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवू असे म्हटले आहेत. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पिलावळ साततत्याने अफवा पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तर त्यापुढे जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार या गुंडावर काहीच कारवाई करत नाही, त्यामुळे देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपाच्या गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडला आहे?

      भाजपाचे केंद्रिय मंत्री रवनित बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. शिंदेच्या शिवसेनेचे गावगुंड आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ कापणाऱ्यास ११ लाखाचे बक्षीस जाहिर केले आहे. तर भाजपाच्या राज्यसभा खासदार अनिल बोंडे याने राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असे वक्तव्‍य केले आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांची ही वक्तव्‍ये अत्यंत गंभीर असून राहुलजींच्या जिवीताला यांच्यापासून धोका आहे हे झाले आहे. त्यामुळे हे सर्व जाणिवपूर्वक सुरू आहे हे स्पष्ट झाले आहे. राहुलजी गांधी सातत्याने संसदेत आणि देशभरात सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद करत आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून दलित, आदिवासी, ओबीसींची हिस्सेदारी वाढवण्याची मागणी केली आहे. या गोष्टींना ज्याचा विरोध आहे ते लोक सातत्याने राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्‍ये करण्याची, जीवे मारण्याच्या धमक्या देण्याची सुनियोजित मोहिम चालवत आहे.  

     संजय गायकवाड सारख्या अडाणी लोकांना राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले ते माहित तरी आहे का? राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. संजय गायकवाड सारख्या गावगुंडांच्या धमक्यांना ते थोडेच घाबरणार आहेत. आमच्यासारखे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका.’’ यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभयजी छाजेड, माजी महापौर सौ. कमलताई व्यवहारे,नगरसेवक अविनाश बागवे,युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष सौ. संगीताताई तिवारी,अजित दरेकर, रफिक शेख, सुजाता शेट्टी,मुख्तार शेख, वैशाली मराठे, , अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, उस्मान तांबोळी, भीमराव पाटोळे, नितीन परतानी, राजेंद्र भुतडा, विनोद रणपिसे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, सुजित यादव, रविंद्र माझीरे, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, विशाल जाधव, आसिफ शेख, रमेश सकट, प्रदिप परदेशी, संदिप मोकाटे, रवि आरडे, श्याम काळे, विल्सन चंदवेल, भरत सुराणा, नुर शेख, वाहिद निलगर, राज अंबिके, हर्षद हांडे, भगवान कडू, कृष्णा सोनकांबळे, विश्वास दिघे, संगीता पवार, छाया जाधव, शोभना पण्णीकर, ज्योती परदेशी, सोनिया ओव्‍हाळ, वैशाली रेड्डी, सुंदरा ओव्‍हाळ, पपिता सोनावणे इत्यादी उपस्थित होते.

बनावट गुड नाइट उत्पादनांचा साठा असलेल्या स्टोअरेज युनिटवर छापे

0

मुंबई१९ सप्टेंबर २०२४ – गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (जीसीपीएल) या प्रसिद्ध गुड नाइट ब्रँडच्या उत्पादक कंपनीने नुकताच नागपूरमहाराष्ट्र येथे बेकायदेशीर स्टोअरेज युनिटवर बनावट गुड नाइट उत्पादनांचा साठा केल्याबद्दल छापा घातला. नियमित दर्जा तपासणीच्या दरम्यान जीसीपीएलला बनावट गुड नाइट उत्पादने महाराष्ट्रात विकली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या.

ही माहिती मिळाल्यानंतर तपासणी पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांसह संबंधित रिटेलवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान बनावट गुडनाइट उत्पादनांची ७९ युनिट्स जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात सेक्शन ५१ आणि कॉपीराइट कायदा १९५३६३ सेक्शनअंतर्गत एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) दाखल करण्यात आली आहे. हे सेक्शन्स बनावटी माल आणि कॉपीराइट उल्लंघनाशी संबंधित आहेत.

पोलिस सध्या या बनावटी उत्पादनांसाठी जबाबदार असलेल्या वितरण नेटवर्कचा तपास करत असून, त्याद्वारे महाराष्ट्रात डुप्लिकेट उत्पादन विक्रीला आळा घालण्याचे लक्ष्य आहे. या कृतीमुळे बनावटी उत्पादने विकणाऱ्या वितरकांपर्यंत ठोस संदेश जाईल आणि ग्राहकांना सुरक्षित व अस्सल गुड नाइट उत्पादने मिळतील.

या समस्येविषयी गोदरेज कन्झ्युमर उत्पादन लि. (जीसीपीएल) कंपनीच्या होम केयर विभागाचे प्रमुख शेखर सौरभ म्हणाले, ‘देशभरात बनावट उत्पादनांचा होत असलेला प्रसार एफएमसीजी उद्योगापुढचे मोठे आव्हान आहे. बनावट उत्पादने बेकायदेशीर असतातच, शिवाय मानवी आरोग्यासाठी धोकादायक आणि घातक असतात. जीसीपीएलद्वारे आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्यासाठी व त्याद्वारे ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी वापरले जातात. घरगुती कीटकनाशक विभागात गुडनिट आघाडीवर आहे, हे असे एक उदाहरण आहे. आम्ही वितरण नेटवर्क, स्थानिक अधिकारी व ग्राहकांच्या मदतीने सातत्याने आमच्या उत्पादनांचा दर्जा तपासत असतो. नागपूर पोलिस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने राज्यात बनावट गुड नाइट उत्पादनांची विक्री करणारे स्थानिक रिटेलर्स, उत्पादक आणि वितरकांना चाप बसेल.’

बाजारपेठेत बनावट गुड नाइट उत्पादने उपलब्ध असल्याने ग्राहकांनी सतर्क राहाणे आवश्यक असून, प्रामाणिक विक्रीची खात्री करावी. ग्राहकांना बनावट गुड नाइट उत्पादने आढळल्यास किंवा त्यांची विक्री करणारे घाऊक किंवा रिटेलर विक्रेते माहिती झाल्यास ही बाब जीपीसीएलच्या निदर्शनास आणून द्यावी. त्यासाठी किंवा care@godrejcp.com वर ईमेल करता येईल आणि 1800-266-0007 वर संपर्क करता येईल.

महाराष्ट्र राज्यातील गो शाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार

 महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा ; राज्यातील गोशाळा संचालकांची आढावा बैठक पुण्यात संपन्न
पुणे : राज्यातील गोशाळा या केवळ पशुधनाची सेवा आणि विकास करीत नाहीत, तर त्या एक प्रकारे राज्याचे सांस्कृतिक रक्षण आणि संवर्धन करीत आहेत. गोशाळा या आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी गोवर्धन गोवंश योजने सारख्या अनेक योजना राबवून या गोशाळांना सक्षम करण्यात येणार आहे, असे मत महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत ३४ जिल्ह्यातील ३२४ तालुक्यातील १३५ गोशाळांना महाराष्ट्र राज्य व गोसेवा आयोगाच्या मार्फत १७ कोटी २१ लाख रुपये अनुदान या प्रसंगी देण्यात आले. या गोशाळा संचालकांची आढावा बैठक पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालय औंध येथे महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सुनील कुमार देवरे, आयोगाचे सदस्य संजय भोसले, दीपक भगत, सुनील सूर्यवंशी, गिरीश शहा, महेंद्र संगु, जयेश शहा, नितीन मार्कंडेय आणि सनत गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. पुण्यासह गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, अमरावती, नागपूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, सिंधुदुर्ग, हिंगोली, बीड, धाराशिव आदी विविध जिल्ह्यातील गोशाळा संचालक या बैठकीला उपस्थित होते.

शेखर मुंदडा म्हणाले, सध्याच्या परिस्थितीमध्ये गो  शाळा चालविणे ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी बाब नसून त्यामुळेच गोशाळांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, हे महाराष्ट्र राज्य व गोसेवा आयोगा समोरील प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी गोवर्धन गोवंश योजना, गोआधारित शेती गोमय मूल्य संवर्धन योजना आदी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. गाईच्या शेण आणि गोमूत्र यांपासून तयार करण्यात येणारे उत्पादन यांचे मार्केटिंग करून गोशाळांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करता येऊ शकेल.

सुनील कुमार देवरे म्हणाले, गोवंश संवर्धनासाठी पशुसंवर्धन विभाग कटिबद्ध आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य गोसेवा  आयोगाला आवश्यक सर्व मदत पशुसंवर्धन विभागातर्फे निश्चितच देण्यात येणार आहे. गोसेवा आयोग स्थापन झाल्यापासून त्याचे अतिशय चांगले परिणाम दिसून येत आहेत त्यामुळे गोशाळा निर्मिती करण्यासाठी अनेक शेतकरी पुढाकार घेतील आणि त्या मधून अधिकाधिक गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सुनील सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र राज्य  गोसेवा आयोगाने घालून दिलेल्या सर्व अटी मध्ये राहून गोशाळा संचालकांना वितरित करण्यात आलेला अनुदानाचा वापर करावा तसेच सर्व व्यवहार कागदोपत्री करण्यात यावेत, हे सर्व व्यवहार पारदर्शक असावेत यासाठी कटिबद्ध असावे. यामधूनच पात्र असणाऱ्या गोशाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

डॉ.विश्वनाथ कराड ‘विश्वशांती प्रकाश दीप पुरस्कार’ ने सन्मानीत

पुणे, १९ सप्टेंबर ः भारतात प्रथमच लाइटिंग टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटमध्ये इंडस्ट्री ओरिएंटेड टेक्निकल मॅनेजरियल पीजी प्रोग्रॅम सुरू केल्या बद्दल इंडियन सोसायटी ऑफ लाइटिंग इंजिनिअर्स (आयएसएलई), पुणे लोकल सेंटर यांच्या वतीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘विश्वशांती प्रकाश दीप पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले.
कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या परिसरात इंडियन सोसायटी ऑफ लाइटिंग इंजिनिअर्स (आयएसएलई), पुणे लोकल सेंटर आणि महा मेट्रो यांच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय ‘प्रकाश २०२४’ या कार्यक्रमात डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार ने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी व्हॉसकॉमचे सीएमडी वासुदेवन, पुणे मेट्रोचे  संचालक विनोद अग्रवाल, अतुल गाडगीळ, प्रकाश बडजात्ये, जयंत इनामदार, हर्षा जोशी आणि विरेन्द्र बोराडे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “जगाला योग्य प्रकाश देण्यासाठी शांती ही अत्यंत महत्वाची आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘सत् चित् आंनद’ या दोन गोष्टींनी सृष्टीवरील प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि सुखी राहु शकतो. वर्तमान काळात विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय महत्वाचा आहे. स्वामी विवेकानंद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारत विश्वगुरू होईल  व ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल.”
व्हॉसकॉमचे सीएमडी वासुदेवन म्हणाले,”प्रकाश हे आपले शहरी जीवनमान आकारण्याचे महत्वपूर्ण साधन आहे. या मुळे नागरिक जीवन प्रभावित होते. नवीनतम प्रकाश तंत्रज्ञान शहरांच्या अधोसंरचनेला कसे परिवर्तीत करू शकतात हे महत्वाचे आहे. नागरिकांच्या सहभागातून ऊर्जा कार्यक्षम आणि सुरक्षित सार्वजनिक क्षेत्रे कशी निर्माण केली जाऊ शकतात यावर लक्ष देणे गरजेचे आहे.”
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी स्वागत पर भाषण केले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची किमया २७४८ घरांचे मासिक वीजबिल झाले शून्यवत

पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२४: घरगुती वीजग्राहकांना मासिक ३६० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये पुणे परिमंडलात १३.७३ मेगावॅट क्षमतेचे २ हजार ७४८ छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून संबंधित घरगुती वीजग्राहकांचे मासिक वीजबिल देखील शून्यवत झाले आहे. तर आणखी ४६० छतावरील सौर प्रकल्पांचे काम वेगाने सुरु आहे.

घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यासोबतच सौर नेटमीटर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

घरगुती व गृहसंकुलांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या आणि सुमारे २५ वर्ष मोफत वीज देणाऱ्या सूर्यघर योजनेत पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत घरगुती वीजग्राहकांचे १३ हजार ६७७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे शहरात १३९१, पिंपरी चिंचवड शहरात ७७१ आणि मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांत ५८६ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. घरगुती ग्राहकांनी या योजनेत अधिकाधिक संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.

या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेत आहे व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

मंगळवारी रास्तापेठमध्ये प्रदर्शनी व प्रशिक्षण – महावितरण, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ व ‘मास्मा’च्या संयुक्त सहकार्याने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची नागरिकांना माहिती देण्यासाठी प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या या प्रदर्शनीला नागरिकांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच महावितरणचे ३६० अभियंते व ५० एजन्सीचे प्रतिनिधी यांना सौर प्रकल्पांबाबत एक दिवसीय ९ सत्रांत विविध तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि.१९: छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन फॉर फोर्ट’ मॅरेथॉन स्पर्धेचे २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे; या स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

याअनुषंगाने यूनेस्कोची समिती २७ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ल्यांना भेटी देणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित किल्ल्यांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

‘चला होऊ जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार’ मोहिमेअंतर्गत आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेला फर्ग्युसन महाविद्यालय येथे शुभारंभ होणार आहे. बीएमसीसी रस्ता- सेनापती बापट रस्ता- कुसाळकर रस्ता-दीप बंगला चौक- कॅनाल रस्ता – एफसी रस्ता मार्गे फर्ग्युसन महाविद्यालय येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘क्यूआरकोड’द्वारे ऑनलाईनपद्धतीने विनामूल्य नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

जनरल एस.एफ. रॉड्रिग्ज स्मृतीप्रित्यर्थ ‘राष्ट्रीय सुरक्षा @2047’ या विषयावर परिसंवाद

पुणे, 19 सप्टेंबर 24

रेजिमेंट ऑफ आर्टलरी आणि सेंटर फॉर लँड
वॉरफेअर स्टडीज यांच्या सहयोगाने जनरल एस.एफ. रॉड्रिग्ज स्मृतीप्रित्यर्थ परिसंवादाची दुसरी आवृत्ती 19 सप्टेंबर 2024 रोजी जनरल बिपीन रावत ऑडिटोरियम, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. माजी लष्करप्रमुख एस.एफ. रॉड्रिग्ज यांना आदरांजली म्हणून आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची संकल्पना ‘राष्ट्रीय सुरक्षा @2047’ अशी होती.
लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या भाषणाने परिसंवादाला सुरुवात झाली. भारतीय लष्कराचा लेखाजोखा आणि अमृत काळ – पुढील दिशा (क्षमता बांधणीचा आराखडा) या विषयांवर सत्रे घेण्यात आली. तसेच, एअर मार्शल (डॉ.) दिप्तेंदू चौधरी (निवृत्त) , यांनी आत्मनिर्भरता या विषयावर विशेष भाषण केले. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेची उद्दीष्टे गाठण्यासाठी स्वावलंबी होण्याचा मुद्दा केंद्रस्थानी होता.
परिसंवादात राष्ट्रीय सुरक्षेबाबत लष्कर, आर्थिक आणि मुत्सद्देगिरीच्या अंगाने सविस्तर चर्चा झाली. प्रतिष्ठीत अनुभवी वक्त्यांनी आपल्या वैविध्यपूर्ण अनुभवाधारे चर्चेत मोलाची भर घातली आणि त्यातून भविष्यात अंमलात आणण्याजोगे पर्याय समोर आले. कार्यक्रमात विद्यमान आणि निवृत्त अधिकारी, तज्ञ व अभ्यासू आदी प्रतिष्ठीत व्यक्तिंचा सहभाग होता.
आर्टिलरी महासंचालक आणि आर्टिलरी रेजिमेंटचे वरिष्ठ कर्नल कमांडन्ट लेफ्टनंट जनरल अदोष कुमार यांनी समारोपाच्या भाषणात परिसंवादात सहभागी झालेले प्रतिष्ठित वक्ते, श्रोते आणि आयोजकांचे आभार मानले. राष्ट्रीय सुरक्षेविषयी क्लिष्ट आव्हानांना सामोरे जाण्याप्रती नव्या उत्साहाने वचनबद्धतेसह परिसंवादाचा समारोप झाला.

सरहद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी करणार तब्बल दहा हजार कोरफड रोपांची लागवड

सरहद मधील १५०० विद्यार्थिनी २१ सप्टेंबर रोजी करणार विक्रम : इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार नोंद

पुणे : कात्रज येथील सरहद कॉलेजमधील १५०० विद्यार्थिनी एकाच दिवशी तब्बल १० हजार कोरफड रोपांची लागवड करून विक्रम करणार आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरफड ही वनस्पती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचे औचित्य साधून सरहद महाविद्यालयाच्या वतीने शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सरहद महाविद्यालय कात्रज येथे हा उपक्रम होणार आहे, अशी माहिती सरहद महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संगीता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना चव्हाण इंग्लिश विभागाच्या प्रमुख डॉ. अनुपमा वाटकर, वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. वर्षा निंबाळकर  उपस्थित होते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये यांची नोंद होण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत.

संगीता शिंदे म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण पूरक अशा कुंडीमध्ये कोरफडीचे रोप लावण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थिनी हे रोप घेऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरात, घरी सोसायटीमध्ये  लावणार आहेत.

कोरफड वनस्पतीची वाढ ही सावलीत, कमी पाण्यात देखील होते आणि त्याची देखभाल दररोज करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे याची लागवड आणि निगा राखणे हे तुलनेने सोपे आहे त्यामुळे कोरफड  रोपाची निवड करण्यात आली आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने कोरफडीची लागवड करण्यात येत आहे.

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे जी वेगवेगळ्या आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. कोरफड तशी दिसायला लहान असली तरी औषधी उपयोगाच्या दृष्टिने फार महत्वाची आहे. हवा शुद्ध करण्याचे काम कोरफड करते. महिलांसाठी मासिक पाळीच्या त्रासामध्ये ही वनस्पती अत्यंत उपयोगी ठरते. यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई सह कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे या बहुगुणी रोपाची निवड लागवडीसाठी करण्यात आली.

समन्वयाने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील असेल- आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे आश्वासन


महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन

पुणे, दि. १९ सप्टेंबर, २०२४ : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शिवाजीनगर पोलीस ग्राउंड येथील रिक्रिएशन सभागृहात आज करण्यात आले होते, त्यावेळी शिरोळे बोलत होते. पोलीस प्रशासन, वर्तमान पोलीस कर्मचारी आणि सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय सत्राचे आयोजन करावे अशी सूचना यावेळी शिरोळे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव, महासचिव महादेव पवार, पुणे शहर अध्यक्ष पद्माकर घनवट आदी यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने आयोजित यावर्षीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेसाठी राज्यभरातून ३६ जिल्ह्यांमधून सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असलेले अध्यक्ष व इतर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वतीने यावेळी शिरोळे यांना सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागणीचे पत्रही देण्यात आले.

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असून हा गुंता सोडवायचा प्रयत्न करायचा असल्यास सहज शक्य असलेल्या मुद्द्यांपासून सुरुवात करून लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास शिरोळे यांनी उपस्थितांना दिला.

आजवरच्या राजकीय जीवनात मला कधीही पोलिसांचा वाईट अनुभव आला नाही असे सांगत शिरोळे म्हणाले, “माझे वडील व पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे हे दीर्घ काळ राजकीय जीवनात कार्यरत असल्याने अनेकदा त्यांचा पोलिसांशी संबंध यायचा. एक व्यक्ती, नागरिक म्हणून त्यांच्या मनात पोलिसांबद्दल असलेला आदर, जवळीक मी अनुभविली आहे. तेच भाव माझ्याही मनात आहेत. पोलिस करत असलेले काम कायम स्मरणात असल्याने त्यांच्या भूमिकेचा मी आदर करत आलो आहे. राज्य सरकारच्या पोलीस कुटुंबीय समस्या निवारण समन्वय समितीच्या सदस्यपदी झालेली माझी निवड हे एक नागरिक म्हणून पोलीस दलासाठी काहीतरी करीत कृतज्ञतेने परतफेड करण्याची संधी आहे असे मला वाटते.”

राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायमच पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी व त्यांच्यासाठी काम करण्याची तळमळ असते. पोलीस विभागातील नियम व सुविधांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासंदर्भात ते कायमच सकारात्मक असतात, त्यामुळे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवू, असेही शिरोळे यांनी सांगितले.  

आपल्या मागण्या सरकार दरबारी मान्य व्हाव्यात यासाठी आपण सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एकीचे बळ दाखवायला हवे. सेवेत असताना आम्ही एखादी तक्रार उशीरा घेतली की लागलीच आमच्यावर कारवाई होते पण निवृत्तीनंतर कित्येक महिने रखडलेल्या आमच्या मागण्या पूर्ण करताना उशीर का होतो असा सवाल यावेळी अध्यक्ष संपत जाधव यांनी उपस्थित केला. शिरोळे कुटुंबीय हे पोलिसांशी नाळ जुळलेले कुटुंब असून त्यांना आपल्या अडीअडचणी यांची माहिती व जाण आहे असेही जाधव यांनी नमूद केले.

महादेव पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सदाशिव भगत यांनी सूत्रसंचालन केले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणांवर चाकूने वार

पुणे -शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याचे कारणावरुन झालेल्या वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा वार केल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. याप्रकरणी आराेपी विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी, तसेच लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक परिसरात देखील अशाचप्रकारे दोन जणांवर वार करण्यात आले.

कुणाल परमेश्वर बनसोडे (वय 23, रा. चंदन हाॅस्पिटलसमोर, डायस प्लाॅट, गुलटेकडी, पुणे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. स्वप्नील मंगेश मोरे (वय 23, रा. चंदन हाॅस्पिटलसमोर, डायस प्लाॅट, गुलटेकडी,पुणे) याने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल आणि स्वप्नील टिळक रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत नृत्य करत होते. त्यावेळी गर्दीत धक्का लागल्याने एका अनोळखी तरुणाबरोबर मोरे आणि बनसोडेचा वाद झाला. त्यानंतर बनसोडेला आरोपीने गर्दीतून बाहेर ओढून त्याला शिवीगाळ केली. बनसोडेचा मित्र मोरे याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अनोळखी तरुणाने बनसोडेच्या पोटावर चाकूने वार केले.

तर,भवानी पेठेतील कासेवाडी भागात मिरवणुकीत किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. निखिल अविनाश चौधरी (वय 25, रा. भगवा चौक, कासेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जईद तांबोळी, बिलाल खान, लतीफ शेख, चुव्वा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. निखिल कासेवाडीतील राजीव गांधी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत नाचत होता. त्यावेळी झालेल्या वादातून निखिल याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले.

स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या डाेक्यात कठीण वस्तूने प्रहार करण्यात आला. मनोज नाथ मिझार (वय 23, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मोहन भगत सोनार आणि राकेश भगत सोनार (दोघे रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.