Home Blog Page 654

एक्स गर्लफ्रेंडला रतन टाटांच्या निधनाने धक्का, लिहिली अश्रू ढाळणारी पोस्ट


रतन टाटा यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसह अनेक नामवंत व्यक्ती भावूक झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांची जुनी मैत्रीण आणि एक्स गर्लफ्रेंड, दिग्गज अभिनेत्री सिमी गरेवाल. रतन टाटा यांचं निधन सिमी यांच्यासाठी देखील धक्कादायक ठरलं. त्यांनी सोशल मीडियावर रतन टाटा यांच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.

सिमी गरेवाल यांनी रतन टाटा यांना दिला अंतिम निरोप

रतन टाटा यांच्या निधनाची बातमी येताच जगभरातील लोकांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या शोकात सहभागी होत सिमी गरेवाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिलं, “ते म्हणतात की तू निघून गेलास… तुझं जाणं सहन करणं खूपच अवघड आहे… अलविदा माझ्या मित्रा… रतन टाटा.” या शब्दांतून त्यांनी आपल्या जुनी मैत्री आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

२०११ साली टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सिमी गरेवाल यांना रतन टाटा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी सिमी यांनी स्पष्टपणे मान्य केलं होतं की त्यांचं आणि रतन टाटा यांचं जुने संबंध होते. त्यांनी रतन टाटा यांचं कौतुक करत म्हटलं होतं, “रतन एक परिपूर्ण व्यक्तीमत्व होते, त्यांच्यात विनोदबुद्धी आणि नम्रता होती. ते एक परफेक्ट जेंटलमॅन होते. पैसा कधीही त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट नव्हतं.”

फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी फोर्डचा मालक टाटांना म्हणाला….

टाटा मोटर्सचा पॅसेंजर व्हेईकल विभाग प्रचंड तोट्यात चालला होता. टाटाच्या कार काही केल्या चालत नव्हत्या. मारुती, महिंद्राने अख्खे मार्केट काबीज केले होते. यामुळे रतन टाटा (Ratan Tata) यांनी टाटा मोटर्सची पॅसेंजर व्हेईकल डिपार्टमेंट विकायचा निर्णय घेतला होता.यासाठी ते अमेरिकेत फोर्डकडे गेले होते. तेव्हा फोर्ड फुल फॉर्मात होती. या विक्री व्यवहारावेळी फोर्डच्या मालकाने टाटा मोटर्स खरेदी करून आम्ही तुमच्यावर उपकार करत असल्याचे टाटांना ऐकविले होते. टाटांनी तिथेच व्यवहार मोडला होता व भारतात परतले होते.

तेव्हापासून टाटा मोटर्सची पॅसेंजर कार डिव्हिजन यशस्वी करण्याचा त्यांनी चंग बांधला होता. पॅसेंजर कार डिव्हिजन सुरू करण्यासाठी तुम्हाला अनुभव आणि ज्ञान नव्हते, मग तुम्ही हा निर्णय का घेतला. तुम्ही हा व्यवसाय सुरू करायचा नव्हता, असे फोर्डने ऐकविले होते. या अपमानाचा बदला अखेर टाटा यांनी घेतलाच.

यासाठी टाटांना ९ वर्षे वाट पहावी लागली होती. 2008 मध्ये अमेरिकेत मोठी मंदी आली होती. दहा वर्षांपूर्वी टाटांना त्यांच्या परिस्थितीवरून बोल सुनावणारी फोर्ड ही कंपनी मंदीच्या जात्यात अडकली होती. दिवाळखोर होते की काय अशी परिस्थीती. या फोर्डकडून रतन टाटांनी ‘जग्वार’ आणि ‘लँड रोव्हर’ खरेदी केली होती. एकप्रकारे टाटांनीच फोर्डवर मोठे उपकार केले होते.

अखेर पश्चाताप झालेला फोर्डचा मालक टाटांना म्हणाला होता. ”तुम्ही हे ब्रँड्स खरेदी करून आमच्यावर मोठे उपकार करत आहात.”, असे फोर्डचा मालक टाटांना म्हणाला होता.

बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीजचे चेअरमन वेदांत बिर्ला यांनी ट्विटरवर याबद्दल सांगितले होते. वेदांतपूर्वी, टाटा समूहाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान संपूर्ण कथा सांगितली होती. टाटा कॅपिटलचे प्रमुख प्रवीण कडले यांच्या म्हणण्यानुसार, 1999 मध्ये अमेरिकेतील डेट्रॉईट येथे झालेल्या अपमानानंतर कंपनीची टीम त्याच संध्याकाळी न्यूयॉर्कला परतली. टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा त्या तेव्हा खूप नैराश्यात होते. पण, काळाचे चक्र फिरले आणि टाटा पुन्हा यशस्वी झाले.

एक दिवसाचा दुखवटा जाहीर,कोणतेही सांस्कृतिक-मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई –
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) वतीने असे सांगण्यात आले आहे की, रतन टाटा यांच्या निधनामुळे सरकारने गुरुवारी (10 ऑक्टोबर) एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. सर्व सरकारी इमारतींमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार असून आज कोणतेही सांस्कृतिक-मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राहुल गांधी,मोदीआणि सुंदर पिचाई यांच्यासह उद्योगपतींनी व्यक्त केला शोक

टाटा चेअरमन चंद्रशेखर: रतन टाटा यांना निरोप देताना आमचे नुकसान झाल्याची भावना आहे. टाटा हे समूहाचे अध्यक्ष होते. माझ्यासाठी ते गुरू, मार्गदर्शक आणि मित्र होते.

राष्ट्रपती मुर्मू: भारताने कॉर्पोरेट वाढ, राष्ट्र उभारणी आणि नैतिकता यांच्यात उत्कृष्टतेचे मिश्रण करणारा एक प्रतीक गमावला आहे. पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा यांनी टाटा समूहाचा वारसा पुढे नेला आहे.

पीएम मोदी: टाटा हे एक दूरदर्शी बिझनेस लीडर, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण माणूस होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व प्रदान केले. त्यांचे योगदान बोर्डरूमच्याही पलीकडे होते.

राहुल गांधी : रतन टाटा हे दूरदृष्टीचे होते. व्यवसाय आणि परोपकार या दोन्हींवर त्यांनी अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि टाटा समुदायाप्रति माझ्या संवेदना.

मुकेश अंबानी : भारतासाठी हा अत्यंत दुःखाचा दिवस आहे. रतन टाटा यांचे जाणे केवळ टाटा समूहाचेच नव्हे तर प्रत्येक भारतीयाचे मोठे नुकसान आहे. वैयक्तिकरीत्या, रतन टाटा यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे, कारण मी माझा मित्र गमावला आहे.

गौतम अदानी : भारताने एक महान आणि दूरदर्शी माणूस गमावला आहे. टाटांनी आधुनिक भारताचा मार्ग पुन्हा परिभाषित केला. टाटा हे केवळ व्यापारी नेते नव्हते, तर त्यांनी भारताच्या भावनेला करुणेने मूर्त रूप दिले होते.

आनंद महिंद्रा: रतन टाटा यांची अनुपस्थिती मला मान्य नाही. मिस्टर टाटा विसरले जाणार नाहीत. कारण महापुरुष कधीच मरत नाहीत.

सुंदर पिचाई: रतन टाटा यांच्यासोबतच्या माझ्या शेवटच्या भेटीत त्यांचे दर्शन ऐकणे माझ्यासाठी प्रेरणादायी होते. त्यांनी एक विलक्षण व्यावसायिक वारसा मागे सोडला आहे. भारतातील आधुनिक व्यावसायिक नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि विकास करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सुप्रिया सुळेंवर टीका करताना ..महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांनी गुन्हेगारी वाढल्याचेच चक्क नाकारले ?

आरोपींच्या शोधासाठी १० लाखाचे बक्षीस ठेवावे लागले ..याचे कारण काय ?

पुणे- महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी NCRB च्या अहवालाचा दाखला देत महिला त्याचार आणि एकूणच गुन्हेगारी नाकारल्याचे दर्शविणारे वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे . अजितदादा गटात सामील झालेल्या चाकणकर यांनी , अजितदादांनी सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभे केले हि चूक झाली असा दिलेला कबुली जबाब देखील अद्याप लक्षात न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच ठेवला आहे .याबाबतचे प्रकरण आणि विषय आहे तो बोपदेव घाटात झालेल्या सामुहिक बलात्काराचा ….

कोंढवा परिसरात सासवडकडे जाणाऱ्या बोपदेव घाटामध्ये ६ दिवसांपूर्वी मध्यरात्री बारा वाजता एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्या धक्कादायक प्रकार घडला होता.याप्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची तब्बल ६० पथके कार्यरत आहेत. ५० हजार मोबाइलचा डाटा पोलिसांनी आतापर्यंत स्कॅनिंग केला असून येरवडा कारागृहातील काही कैद्यांकडे देखील गुन्ह्याबद्दल काही माहिती आहे का याची चौकशी केली. मात्र, त्यानंतरही सामूहिक बलात्कार गुन्ह्यातील आरोपींचा थांगपत्ता अद्याप पोलिसांना लागलेला नाही.त्यामुळे आरोपींच्या शोधासाठी , माहितीसाठी पोलिसांनी १० लाखाचे बक्षीसदेखील ठेवले आहे

या घटनास्थळावर मंगळवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. आपला हा देखावा कशासाठी? असा सवाल करत पुण्यात असुनही स्वत:च्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, असे म्हणत चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसोबत बोपदेव घाटातील घटना घडलेल्या जागेची पाहणी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी घाट परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पोलिसांना दिले, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले होते. सुप्रिया सुळेंच्या घटनास्थळाच्या पाहणीवरुन रुपाली चाकणकरांनी टीका केली. झोपी गेलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

संबंधित घटनेला घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून 12 टीम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी? आपल्या माहितीसाठी, चंद्रपुरमध्ये कोरपना येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार?, असेही चाकणकर म्हणाल्या.

आपल्या सोशल मीडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे, पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत, पोलिस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार? कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला, जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत, यांच्याविरोधात आंदोलन, पत्रकार परिषद कधी घेणार? असा सवाल चाकणकरांनी विचारला आहे. झोपी गेलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना नाही, म्हणून आपल्या माहितीसाठी NCRB चा काल प्रकाशित झालेला अहवाल देत आहे, असे म्हणत रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे.

40 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू:जेरबंद करण्यासाठी 30 पिंजरे, 15 कॅमेरे – ट्रॅप लावला


पुणे- जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वनपरिक्षेत्र ओतूर अंतर्गत पिंपरी पेंढार गावातील नगर- कल्याण रस्त्यापासून जवळच आपल्या शेतात असणाऱ्या घरालगत सुजाता रवींद्र डेरे ( वय- 40 वर्षे) या बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घराच्या समोरील बाजूस प्रातःविधीस गेल्या होत्या. त्याचवेळी लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्यांच्यावर अचानक प्राण घातक हल्ला केला. त्यावेळेस घराच्या अंगणात असलेले त्यांचे पती रवींद्र डेरे यांनी आरडा- ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने त्याना न जुमानता सुजाता यांना सुमारे 20-25 फूट सोयाबीनच्या शेतात फरपटत नेले. त्यावेळेस गावातील नागरिकांना समजले असता, गावकरी त्याठिकाणी येऊन वन विभागाला सदर घटनेची सर्व माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून पाहणी करून शोध घेतला असता सुजाता यांचा बिबट हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दिसून आले.

त्यानंतर मयत सुजाता यांचे शव शवविच्छेदनाकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र, आळे येथे पाठविण्यात आले. याबाबत महिती समजताच घटनास्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. सदर ठिकाणी हल्ला केलेल्या बिबट्याला पकडण्या करिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 30 पिंजरे, 15 कॅमेरा ट्रॅप लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

जुन्नरचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर यांनी तात्काळ ओतूर व आळे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचेसह उपस्थित राहून परिस्थिती हाताळली.त्याचवेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व जुन्नर विधान सभेचे आमदार अतुल बेनके यांनी प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यास मदत केली.

कुकडी व घोड नदीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांची असलेली मोठी संख्या लक्षात घेता, शेतातील व लगतच्या प्रत्येक घराभोवती भरपूर प्रकाश दिवे लावणे, घराभोवतीचे व शेत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे संपूर्ण गवत काढून टाकणे, घरातील शौचालयाचा वापर करणे, दिवस उगवण्यापूर्वी आणि मावळल्यानंतर शक्यतो घराबाहेर न पडणे, अपरिहार्य असल्यास सोबत टॉर्च व मोठी काठी बाळगणे या सुचनांचे गांभीर्याने पालन ग्रामस्थ यांनी करावे असे कळकळीचे आवाहन जुन्नर वन विभागाकडून जुन्नर, शिरूर आंबेगाव व खेड तालुक्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.

ख्यातनाम लौकिकप्राप्त उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

टाटांनी देशासाठी दिलेलं योगदान मोलाचं,संस्मरणीय-शरद पवार

मुंबईदेशातील ख्यातनाम लौकिकप्राप्त प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.

वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

टाटांनी देशासाठी दिलेलं योगदान मोलाचं, संस्मरणीय -शरद पवार

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

-शरद पवार (ज्येष्ठ राजकीय, सामाजिक नेते )

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा यांना वयाच्या २१ व्या वर्षी १९९१ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. त्यांनी २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. १९९६ मध्ये टाटांनी दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बाजारात ‘लिस्टेड’ झाली. चेअरमन पदावरून पायउतार झाल्यानंतर टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.

\ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी X वर लिहिले, ‘श्री रतन टाटा जी एक दूरदर्शी व्यापारी नेते, एक दयाळू आत्मा आणि एक विलक्षण मानव होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व प्रदान केले. याव्यतिरिक्त, त्याचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेले. त्यांची नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजात सुधारणा करण्याची अटळ बांधिलकी यामुळे ते अनेकांना प्रिय झाले.

रतन टाटा आपल्या प्रोफेशनल लाइफबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींवरूनही बरेच चर्चेत होते. रतन टाटांनी सांगितलं होतं की, ते एकदा नव्हे तर चारदा प्रेमात पडले होते. एकदा तर ते बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात होते. त्यांनी आपल्या प्रेमाबाबत २०११मध्ये सांगितलं होतं. वर्ष १९७०मध्ये त्यांचे आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांची रिलेशनशिप चांगलीच चर्चेत होती.
विशेष म्हणजे सिमी ग्रेवाल यांनीही एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्यात खूप घट्ट नातं होतं. दोघांना अनेकदा एकत्र बघितलं गेलं होतं. दोघेही एकमेकांशी विवाह करू इच्छित होते, परंतु त्यांच्या नशीबात एकमेकांशी विवाहाच योग नव्हता. दोघांनीही आपल्या अफेरबाबत सर्वांसमोर मान्य केलं होतं. त्यानंतर पुढे सिमी ग्रेवालने रतन टाटांशी ब्रेकअप झाल्यानंतर रवी मोहन यांच्याशी विवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तसेच त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, रतन टाटा एक परफेक्ट जंटलमन आहेत, ते खूप विनम्र आहेत आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर खूप चांगला आहे
.

ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र होते. रतन टाटांचे शालेय शिक्षण मुंबई झाले होते. त्यांनी कॉर्नेल यूनिवर्सिटीतून आर्किटेक्चर बीएस आणि हार्वर्ड बिजेनसस्कूलमधून अ‍ॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम असं शिक्षण घेतलं होतं.रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहासोबत आपले करिअर सुरू केलं होतं. ते १९९१मध्ये जेआरडी टाटा यांच्यानंतर समूहाचे पाचवे अध्यक्ष बनले होते. रतन टाटा यांना वर्ष २०००मध्ये पद्मभूषण आणि २००८मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. रतन टाटांनी टेटली, जग्वार लॅण्ड रोव्हर आणि कोरस सारख्या कंपन्यांचे टाटा समूहात अधिग्रहण केले होते. त्यांनी नॅनो सारखी कार बनवून सर्वसामान्यांचं कार घेण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं होतं. याशिवाय त्यांनी इंडिका सारखी प्रसिद्ध कारही बाजारात आणली होती.रतन टाटा हे जेव्हा टाटा समूहात आले होते, तेव्हा कंपनीची एकूण उलाढाल एक हजार कोटी रुपये होती. तर २०११-१२मध्ये समूहाचा महसूल ४७५.७२१ कोटी रुपये झाला होता. टाटाने विकसित देशांमधील अनेक अशा कंपन्यांचे अधिग्रहण केले ज्या त्यांच्या देशात सुपर ब्रॅण्ड होत्या. आज टाटा समूहाचे जाळे जगभरात पसरलेले आहे. रतन टाटा यांनी त्यांचा दोन दशकांहून अधिकच्या कारकिर्दित टाटा समूहाला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात त्यांचे पंचतारांकीत हॉटेल लक्ष्य केले गेले होते, तेव्हा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सढळ हाताने मदत केली होती. ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर रतन टाटा स्वत: तिथे पोहचले होते. ते जखमी कर्मचाऱ्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला होता. त्यांनी केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच नाहीतर आसापासच्या हातगाडीवाल्यांनाही मदत केली होती. २००२मध्ये वयाच्या ६५व्या वर्षी रतन टाटांनी पहिल्यांदा निवृत्ती घेण्याचे जाहीर केले होते, मात्र तेव्हा त्यांना कंपनीने निवृत्त होवू दिले नव्हते. त्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती आल्यावर कंपनीने सेवानिवृत्तीचे वय ७५ वर्षे केले होते. त्यानंतर २८ डिसेंबर २०१२ रोजी निवृत्त झाले होते.

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरमधून शुभारंभ

जिल्ह्यातील पात्र ४० हजार २२० लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे निधी वर्ग होणार

कोल्हापूर, दि. ०९ : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना
वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी, कोल्हापूरमधून शुभारंभ करण्यात आला.

या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी ३०००/- रुपयांच्या मर्यादित अनुदान देय आहे. राज्यात आज अखेर १७ लाख २३ हजार ३० इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ४० हजार २२० लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे निधी वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेचा गारगोटी या ठिकाणी शुभारंभ झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

या अनुदानातून ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक असलेले सहाय्य उपकरणे खरेदी करावे तसेच मनस्वास्थ्य केंद्र युवोपचार केंद्र इत्यादी द्वारे शिबिरामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन मुख्यमंत्री महोदय यांनी केले. कोल्हापुरातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेची आता राज्यभरातील सर्व जिल्ह्यामधून अंमलबजावणी सुरू होत आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामदेव गोपाळ भोसले व कांचन अप्पासो रेडेकर यांना तीन हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते सुपुर्द करण्यात आला.

००००

दहशतीचे नऱ्हे: रस्ता रोखून एकाला पट्ट्यांने मारहाण

पुणे : पुण्यातील गुन्हेगारीवर आता अंकुश उरला की नाही?असा प्रश्न ही करू नये अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत. काही जणांनी गंधर्व चौक मानाजी नगर नऱ्हे येथे एका नागरिकाला पट्ट्याने मारहाण करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे कारस्थान केल्याचा आणि त्यासाठी अर्धा तास गाड्या रोखून धरण याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे.

हे सारे होत असताना कोणीही सोडवायचा प्रयत्न अगर मध्यस्थी करताना दिसलेले नाही. नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते आहे.

दिवाळीच्या सुमारास खासगी बस गाड्यांच्या भाड्यावर नियंत्रण ठेवा

आरटीओकडे मागणी:माजी आमदार मोहन जोशी

पुणे : दिवाळीच्या सुमारास परगावी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्यांचे भाडे नियंत्रित ठेवले जावे, याकरिता ठोस उपाययोजना करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ)बैठकीत आज बुधवारी केली.

या आणि अन्य मागण्यांसाठी आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड आणि अधिकाऱ्यांसमवेत मोहन जोशी यांची बैठक झाली.यावेळी ड्रायव्हिंग स्कूल क्लासचे १००प्रतिनिधी तसेच काँग्रेसचे चेतन आगरवाल, सुरेश कांबळे,आदी उपस्थित होते.दिवाळी सणामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते.त्याचा फायदा उठविण्यासाठी खासगी बस गाड्यांचे भाडे अवाच्या सव्वा आकारले जाते,अशा तक्रारी आहेत.याकरिता आरटीओने आतापासून उपाय योजना आखून भाडे दर नियंत्रित आणि निश्चित ठेवावेत,दरपत्रक वर्तमान पत्रात जाहीर करावे,ॲप तयार करावे, त्याद्वारे प्रवाशांशी संपर्क ठेवावा ,अशा मागण्या मोहन जोशी यांनी केल्या.

प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो स्थानकांना जोडणारी रिक्षा वाहतूक सुरू व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.त्याकरिता फिडर रिक्षा सेवा तातडीने सुरू करावी,असेही त्यांनी सुचविले.

महिला आणि शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी चेकिंग आणि स्कूल बस मध्ये महिला कर्मचारी तैनात करावयास लावावे याची कडक अंमलबजावणी करावी, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकाराला आळा घालण्यासाठी दिवस रात्र तपासणी व्हावीअशीही मागणी करण्यात आली.

रिक्षा परवाना शुल्क दहा हजार रूपये आहे आणि परमिट ट्रान्स्फर शुल्क पंचवीस हजार रुपये आहे.ही विसंगती अन्यायकारक आहे. तरी दोन्ही शुल्क समान म्हणजे दहा हजार रुपये इतकेच ठेवावे, असे मोहन जोशी यांनी बैठकीत

तसेच पुणे शहरातील विविध ब्लॅक स्पॉट व त्या ठिकाणी होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने आरटीओ पुणे व वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या वतीने संयुक्तरीत्या प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी ब्लॅक स्पॉट शोधून त्या ठिकाणी अपघात कमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे
सारथी 4.0 व वाहन 4.0 या पोर्टलवर वाहनधारक व वाहन चालक येणाऱ्या मोबाईल नंबर अपडेट च्या संदर्भात आवश्यक त्या सुधारणा परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या मान्यतेने एन आय सी यांना कळवून योग्य ते बदल नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात येईल असे ठरले
फेसलेस सेवा 58 प्रकारच्या परिवहन विभाग भारत सरकार यांनी सप्टेंबर 2022 पासून लागू कराव्यात वरील 58 प्रकारच्या फेसलेस सर्विसेस लागू करण्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करण्याचे ठरले
फेसलेसलर्निंग मध्ये रिलेटिव्ह नेम नॉट फाउंड तसेच फेसलेस एन्डोर्समेंट शिकाऊ लायसन्स प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने याची अंमलबजावणी त्वरित करण्याचे ठरले
सारथी 4.0 या संकेतस्थळावर सहा कोटीपेक्षा जास्त वाहन चालकांची नोंद झालेली आहे त्यांना दुसऱ्या प्रवर्गासाठी शिकाऊ लायसन्स काढावयाचे असेल त्यांना हे लायसन घरून काढता आले पाहिजे व ही सेवा त्वरित लागू करण्यात यावे
वाहन चालक व वाहन मालकांच्या विविध प्रश्नांवर सदर प्रसंगी चर्चा करण्यात आली.
.
या बैठकीला विठ्ठल मेहता ,राजू घाटोळे,विजयकुमार दुग्गल, नितीन भांबुरे, एकनाथ ढोले, महेश शेळमकर, यशवंत कुंभार, अनंत कुंभार, विनोद वरखेडे, निलेश गांगुर्डे आदी मोटार ड्रायव्हींग स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी आस्थित होते

मुलींच्या शासकीय वसतिगृहात विविध पदांसाठी सेवा पुरवठादारांना निविदा सादर करण्याचे आवाहन

वसतिगृहात अल्पसंख्यांक मुलींच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

पुणे, दि.९ : शासकीय तंत्रनिकेतन पुणे, येथील अल्पसंख्यांक मुलींच्या शासकीय वसतिगृहात कंत्राटी पद्धतीने नोंदणीकृत सेवा पुरवठादारांकडून अधीक्षक, लिपिक, शिपाई, सफाईगार व पहारेकरी (वॉचमॅन) या पदांच्या भरतीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. इच्छुक पुरवठादारांनी निविदा अणूविद्युत व दूरसंचार विभाग, शासकीय तंत्रनिकेतन पुणे, येथे २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सादर कराव्यात.

अल्पसंख्यांक वसतिगृह योजनेंतर्गत या समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या (मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, ज्यू व पारशी) विद्यार्थिनींसाठी भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे येथे वसतिगृह सुरू करण्यात आले असून प्रवेश प्रक्रिया सुरूवात करण्यात आली आहे.

मुलींच्या प्रवेशासाठीचा अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे व निवडीचे निकष www.gppune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाचे पूर्ण भरलेले अर्ज योग्य कागदपत्रांसह २४ ऑक्टोबर पर्यंत अणुविद्युत व दुरसंचार विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे जमा करून अधिक माहितीसाठी ९९२२२७९४७४ या क्रमांकावर संपर्क करावा. सेवा पुरवठादार यांच्यासाठी निविदांसाठीचे विहित नमुन्यातील अर्ज व इतर प्रपत्रे शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे उपलब्ध आहेत, असे तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा सदस्य सचिव अल्पसंख्यांक वसतिगृह डॉ. राजेंद्र पाटील यांनी केले.
0000

राज्यातील गुन्हेगारी कमी केली तर फडणवीस यांना मीच पहिला हार घालेन अन् ओवाळेलही – सुप्रिया सुळे

पुणे- राज्यात पुण्याची ओळख गुन्ह्याची राजधानी अशी होत चालली आहे. ती फडणवीस यांनी कमी केली तर मीच त्यांना पहिला हार घालेल व ओवाळेलही असे येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे , महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह सेट केले. त्याला हरियानातील जनतेने विधानसभा निवडणुकीत उत्तर दिले असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस थोर आहेत, त्यांनी गृहमंत्री म्हणून राज्यात थोडे तरी लक्ष द्यावे म्हणजे इथला क्राईम रेट कमी होईल अशीही टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सुळे, आणि अमोल कोल्हे तसेच खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राज्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दररोज सुरू आहे. बुधवारी झालेल्या मुलाखतींनंतर माध्यमांशी संवाद साधताना बोलताना खासदार सुळे यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. हरियानातील जनतेने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला उत्तर दिले या फडणवीस यांच्या वक्तव्यावर सुळे म्हणाल्या, प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगवेगळे असतात. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली आहे. अर्थखात्यानेच सरकारला आता तुम्ही कोणताही खर्च करू शकत नाही असा अहवाल दिला असल्याची माझी माहिती आहे. राज्यावर ४५ हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे व सरकार ४८ हजार कोटी रूपयांच्या रिगरोडच्या कामाच्या निविदा काढत आहेत. ठेकेदार त्यांची बिले निघत नसल्याने ओरडत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला हे सरकार काय करते आहे याची पूर्ण माहिती आहे.

आमच्या पक्षाकडे वाढता ओघ आहे असा दावा करून सुळे म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असे एकूण १६०० अर्ज आले होते. स्वत: शरद पवार बहुतेकांबरोबर बोलले. त्यांचे आम्हाला सांगणे आहे की फक्त उमेदवारी अर्ज केला त्यांचाच नाही तर त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे. आम्ही काही सर्वांना उमेदवारी देऊ शकणार नाही, पण आमच्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांना संघटनेत, सत्ता आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, सहकारी संस्थांमध्ये सामावून घेऊ. कामाची संधी प्रत्येकाला मिळायला हवी. आमचा विचार राज्यातील जनतेने स्विकारला आहे हेच आमच्याकडे येणाऱ्यांच्या संख्येवरून दिसते आहे.

डॉक्टर, वकिल, प्राध्यापक असा समाजातील बुद्धीवंत वर्ग आमच्या पक्षाकडे येतो आहे असे उमेदवारी अर्जावरून दिसते आहे. त्यातही उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. महिला आरक्षणाचे विधेयक आम्ही संसदेत बहुतमाने मंजूर करून दिला आहे. आता केंद्र सरकारने त्याची पुढील कार्यवाही करावी.- सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील घटना

पुणे-  वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सरची धडक बसल्याने रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणीचा येथे मृत्यु झाला. कोथरुड बसस्टँडसमोर आज सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला.आरती सुरेश मनवाने (वय २३, रा. एरंडे होस्टेल, भेलके नगर, कोथरुड) असे या तरुणीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरती मनवाने ही मुळची अमरावतीची राहणारी आहे. कर्वे पुतळा पासून पुढे डहाणूकर कॉलनीपर्यंत कर्वे रोडवर सुतार बसस्टँँड समोरुन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न आरती करत होती. त्याचवेळी डहाणुकर कॉलनीकडून कर्वे पुतळ्याच्या दिशेने एक सिमेंट मिक्सर वेगाने येत होता. त्याची धडक आरतीला बसली. त्यामुळे ती खाली पडून मिक्सरचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यु झाला. मिक्सर चालकाने काही अंतरावर मिक्सर थांबून तेथून पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सावधान… अनधिकृत बांधकामाप्रकरणी आता थेट पोलिसात गुन्हे नोंद सुरु:लोणीकंदमध्ये पाच जणांवर गुन्हे दाखल

पीएमआरडीएकडून धडक कारवाई \

पुणे / पिंपरी (दि.८) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हवेतील तालुक्यातील लोणीकंद भागातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे नोंदव‍िण्यात आले. संबंध‍ित अनधिकृत बांधकाम थांबव‍िण्याबाबत संबंध‍ितांना काही द‍िवसांपुर्वी नोटीस द‍िली होती. पण त्याचे अनुपालन न झाल्याने पीएमआरडीएकडून आता धडक कारवाई होत असून सोमवारी (दि.७) संबंध‍ितांवर गुन्हे नोंदव‍िण्यात आले.

लोणीकंद (ता. हवेली येथील) येथील स.नं. १६७ मध्ये अनधिकृत बांधकाम करणारे किशोर सुर्यकांत ढमढरे, लक्ष्मण श्रीपती ढमढरे, रफिक इक्बाल शेख, सागर दामोदर धोत्रे, अनिता संजय जोशी ( सर्व रा. लोणीकंद, ता. हवेली) यांचे विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. संबंध‍ित बांधकामधारकांना पीएमआरडीएने वेळोवेळी अनधिकृत बांधकाम थांबवण्याबाबत नोटीस द‍िली होती. पण याचे अनुपालन न केल्याने संबंध‍ितांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 54(2) अन्वये लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदव‍िण्यात आले.

पीएमआरडीए हद्दीतील मालमत्ताधरकांनी परवानगी घेवूनच बांधकामे करत सुरु असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. गुन्हे दाखल करण्याची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, तहसीलदार सचिन मस्के, रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभ‍िनव लोंढे यांनी केली. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 नुसार अनधिकृत बांधकाम धारकास अनधिकृत बांधकाम थांबविणेची नोटीस दिल्यानंतर सदर बांधकाम न थांबविल्यास तीन वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

विविध घटकांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम होतोय

धीरज शर्मा यांचे मत; ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचा अजित पवार यांना देशभरात पाठिंबा

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देशभरात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. सलमानी समाजासह बंजारा समाज, कामगार वर्ग, अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहत असल्याने पक्ष अधिक सक्षम होत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यापक होत आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी बुधवारी सांगितले.

ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचे संमेलन घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात आयोजिले होते. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. जरीफ अहमद सलमानी, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. आफताब आलम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रियाज आलम सलमानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हसमत अली सलमानी, पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे, राकेश कामठे, परबजित सिंग, जावेद इनामदार, मोहसीन शेख आदी उपस्थित होते.

धीरज शर्मा म्हणाले, “विकासाच्या मुद्यांवर अजितदादा महायुतीसोबत गेलेले आहेत. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह आणलेले इतर अनेक उपक्रम महाराष्ट्रातील जनतेत लोकप्रियता मिळवत आहेत. त्यामुळे सध्या जे वातावरण निर्माण केले जात आहे, त्याचाच कोणताही फटका महायुतीला बसणार नाही. हरियाणामध्येही अशीच वातावरण निर्मिती केली गेली. मात्र, तिथे भाजपने बहुमत मिळवले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

दीपक मानकर म्हणाले, “सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांचे नेतृत्व आहे. दलित, मुस्लिम, आदिवासी, वंचित अशा अल्पसंख्याक समुदायांना अजित पवार यांनी नेहमीच मानसन्मान दिला आहे. येत्या निवडणुकीतही अल्पसंख्याकांना १० टक्के जागा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सलमानी समाजाच्या सर्व अडचणी सोडवण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस येत्या काळात भर देईल.”

ऍड. जरीफ अहमद सलमानी म्हणाले, “महाराष्ट्रात जवळपास ७३ मतदारसंघात सलमानी समाज वास्तव्यास आहे. अजितदादांचे नेतृत्व विकासाभिमुख आणि सर्व समाजाच्या हितासाठी कार्यरत असणारे आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सलमानी समाज पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहील. पक्षाने एखाद्या जागेवर निवडणूक लढण्याची संधी दिल्यास त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

स्प्लिट एअर कंडिशनर्सवर कोणतीही छुपी किंमत नसलेली 5 वर्षांची व्यापक वॉरंटी

मुंबई, 9 ऑक्टोबर 2024 : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज आणि बॉयसच्या अप्लायन्सेस बिझनेसने ग्राहकांसाठी सणासुदीच्या ऑफर्सची घोषणा केली आहे. उत्पादनांपासून ते ब्रँडच्या सणासुदीच्या ऑफरपर्यंत “थिंग्ज मेड थॉटफुली” हे तत्वज्ञान यातून पुढे घेऊन जाण्याचे काम करण्यात आले आहे. ब्रँडने आपल्या उत्सवाच्या वचनाच्या केंद्रस्थानी वापरकर्त्यांचा अनुभव ठेवला आहे.

एकीकडे, उत्तम वित्तपुरवठा पर्यायांसह, ग्राहक प्रिमियम उपकरणांमध्ये अपग्रेड आणि गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत आणि उपकरणांचे आयुष्य घटले आहे; दुसरीकडे, संशोधन असे सूचित करते की उपकरणे खरेदी करताना ग्राहकांसाठी हमी, टिकाऊपणा आणि विक्रीनंतरची सेवा हे महत्त्वाचे घटक आहेत. उच्च तापमानामुळे देशात मोठ्या प्रमाणावर वापर होत असलेल्या एअर कंडिशनर्ससारख्या श्रेणींमध्ये औद्योगिक वार्षिक देखभाल करार (AMC) वाढत्या प्रमाणाचे द्योतक आहे. दुर्दैवाने, बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक वॉरंटींमधील छुपे शुल्क आणि जटिल अटी ग्राहकांच्या दीर्घकालीन अनुभवापासून वंचित राहतात.
ही गरज लक्षात घेऊन गोदरेज अप्लायन्सेसने स्प्लिट एअर कंडिशनर्ससाठी अतिरिक्त खर्च नसलेली 5 वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणली आहे. ₹7990/-किमतीची ही मोफत वॉरंटी, कोणतेही लपविलेले शुल्क, कोणतीही नोंदणी न करता संपूर्ण कव्हरेज देते, ग्राहकांना गॅस चार्जिंग, तंत्रज्ञांच्या भेटी इत्यादी अतिरिक्त खर्चापासून संरक्षण दिले जाते याची खात्री करते. चिंतामुक्त, आनंददायक सेवा प्रदान करणे उत्पादनाच्या संपूर्ण आयुष्यातील अनुभव देणे असे कंपनीचे ध्येय आहे.

याशिवाय ब्रँडने रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन यांसारख्या उत्पादनांवर विस्तारित वॉरंटीही जाहीर केली. ब्रँड ₹12000/- पर्यंतच्या कॅशबॅक योजना आणि विनाखर्च EMI आणि शून्य डाउन पेमेंटसह फ्लेक्सिबल वित्तपुरवठा पर्यायांसह त्याच्या श्रेणीमध्ये रोमांचक ऑफरही देत आहे.

गोदरेज अप्लायन्सेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख कमल नंदी यांनी यावर भाष्य करत सांगितले की, गोदरेज अप्लायन्सेसमध्ये, आम्ही केवळ उत्कृष्ट उत्पादनेच नव्हे तर अतुलनीय सेवा आणि ग्राहक मूल्य देखील ऑफर करण्यावर विश्वास ठेवतो. स्प्लिट एअर कंडिशनर्सवर 5 वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीची आमची प्रामाणिक ऑफर हे आमचे ग्राहक दीर्घकालीन आरामाचा आनंद घेऊ शकतात याची खात्री करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कोणत्याही छुप्या खर्चापासून मुक्त मनःशांतीसह.

मोहिमेव्यतिरिक्त, गोदरेज अप्लायन्सेस कार्यप्रदर्शन ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि सुविधा वाढविण्यासाठी डिझाइन केलेले, प्रीमियमच्या ट्रेंडमध्ये टॅप करणारे उच्च-क्षमतेचे मॉडेल आणि ग्राहकांना निवडण्यासाठी नवीन आकर्षक डिझाइन असलेले एआय-चालित उपकरणे आणले आहेत.