Home Blog Page 614

जनसामान्यांचा विश्वास हीच माझी ताकद; हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनतेसोबत आमदार चेतन तुपे यांचा थेट संवाद

पुणे- : हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी हडपसरच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने मतदारसंघातील जनतेसोबत दुचाकी यात्रेच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या भव्य  यात्रेत हजारो नागरिकांनी उपस्थित राहून चेतन तुपे यांच्या नेतृत्वाला आपला भरभरून पाठिंबा दर्शवला. “हडपसरच्या प्रगतीला गती देण्यासाठी जनतेच्या विश्वासाचे बळ आणि पाठबळ हेच माझे खरं सामर्थ्य आहे,” असे भावनिक उद्गार आमदार चेतन तुपे यांनी या प्रसंगी काढले.या दुचाकीयात्रेची सुरुवात बी.टी.कवडे रोड पासून झाली. पुढे भीमनगर, मुंढवा, केशवनगर, झेड कॉर्नर, मांजरी गाव, महादेवनगर, 15 नंबर चौक, रविदर्शन, माळवाडी, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर, शनि मंदिर, काळेपडळ, ससाणेनगर, हडपसर गाव, चिंतामणीनगर, श्रीराम चौक, काळेपडळ, ढेरे कॉंक्रिट, श्रीराम मंदिर, सातवनगर,  श्रीराम चौक, महमंदवाडी या मार्गावरून झालेल्या या रॅलीला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व महिलांनी ठिकठिकाणी चेतन तुपे यांचे जल्लोषात स्वागत केले, औक्षण करून, पुष्पवृष्टी करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

हडपसरच्या प्रगतीसाठी रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या विकासकामांवरही तुपे यांनी या प्रसंगी प्रकाश टाकला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “हडपसरचा विकास फक्त घोषणांमध्ये मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावा म्हणून माझे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठीच या यात्रेचे आयोजन केले असून त्यातूनच हडपसरची प्रगती साधता येईल.”

याप्रसंगी महायुतीमधील सर्व सहकारी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. “माझ्या मार्गदर्शनाखाली हडपसर विधानसभा मतदारसंघातील विकास अधिक गतिमान होईल अशी मला खात्री आहे,” असे सांगून त्यांनी भावी योजनांचे वर्णन केले.“नाळ मातीशी – हडपसरच्या प्रगतीशी” हे सूत्र घेऊन चेतन तुपे यांनी या यात्रेतून जनतेपर्यंत आपली विचारधारा पोहोचवली. जनसामान्यांचा विश्वास, त्यांची साथ आणि पाठिंबा हा हडपसरच्या प्रगतीचा मुख्य आधार असून या विश्वासाच्या बळावरच हडपसर अधिक प्रगत आणि सुखी करण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

अट्टल घरफोड्या पापासिंग दयालसिंग दुधानीला पकडला

पुणे- सराईत घरफोडी करणारा व एकुण १२ गुन्हयात पाहिजे असलेल्या अट्टल घर फोड्या पापासिंग दयालसिंग दुधानीला पोलिसांनी पकडले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
दि.३०/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ हद्दीमध्ये आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने वरिष्ठांचे आदेशाने पाहिजे आरोपी यांचा शोध घेण्यासाठी युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे सुहास तांबेकर, असे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील पाहिजे आरोपी पापासिंग दयालसिंग दुधानी हा बीटी कवडे रोड, वानवडी, पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रिशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणावरून पापासिंग दयालसिंग दुधानी, वय ५० वर्षे, रा. पेरणे, बिराजदार नगर, गल्ली नं.५, हडपसर, पुणे यास ताब्यात घेतले व त्याचेकडे चौकशी करून हडपसर पो.स्टे. १) गु.र.नं. ६४०/२०२१, भा.द.वि.क. ४५४, ३८० व २) गु.र.नं. ७४६/२०२१, भा.द.वि.क. ३७९ या गुन्हयांतील सहभाग निश्चित झाल्याने त्यास पुढील तपासकामी हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.
आरोपीकडे केलेली चौकशी तसेच त्याचे पुर्व रेकॉर्ड तपासता या आरोपीवर घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सागली येथील गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपी आहे. तसेच या आरोपीवर यापुर्वी मोका कायदयान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर शैलेश बलकवडे, पोलीस उप- आयुक्त (गुन्हे), पुणे शहर निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ पुणे राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ पुणे शहर चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, समीर पिलाने, गणेश डोगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

पुण्यात नवले ब्रीज परिसरात क्रेन-ट्रकची धडक:अपघातात एकजण ठार, दोघे जखमी

पुणे-
मुंबई -बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नवले ब्रीज परिसरात बुधवारी एक क्रेन (एमएच०६ एएल ४१३५) व ट्रक (एमएच २५ एजी १००५) या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. या दोन वाहनात दोन व्यक्ती अडकल्याची माहिती पीएमआरडीए नांदेड सिटी अग्नीशामक केंद्रास मिळाली. त्यानुसार अग्नीशामक दलाच्या जवानांनी रेसक्यु वाहनासह घटनास्थळी धाव घेत स्प्रेडर कटर व कटावणीच्या सहाय्याने एक मयत व्यक्ती व दोन व्यक्तींना जखमी अवस्थेत बाहेर काढले.

रुग्णवाहिका व पोलिसांच्या मदतीने दोन जणांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.यावेळी घटनास्थळी दोन क्रेन व पीएमसी अग्नीशामक दलाची तीन वाहने उपस्थित होते. अग्नीशामक दलाच्या जवानांना जखमी व्यक्तीने सांगितले की, ट्रकचा वाहनाचा ब्रेक झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या क्रेन वाहनाला जाऊन धडकून भीषण अपघात झाला. अग्नीशामक दलाचे जवान प्रेमसागर राठोड, मंगेश साळुंखे, प्रतीक शिरसाट, साईनाथ मिसाळ , शुभम माळी हे जवान उपस्थित होते.

पर्वती महविकास आघाडी मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न.

पुणे, दि. ३० ॲक्टो. – पर्वती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – कांग्रेस – शिवसेना आणि मित्र पक्ष महाविकास आघाडी उमेदवार सौ.अश्विनी नितीन कदम यांच्या पर्वतीतील निवडणूक कचेरीचे उद्घाटन आणि महाविकास कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी मुख्य कचेरीचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष राजाराम कांबळे, आपचे उपाध्यक्ष कुमार घोंगडे आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार अनंतराव गाडगीळ, काँग्रेस नेते अभय छाजेड, माजी नगरसेवक अण्णा माळवतकर, अजित दरेकर, बाळासाहेब ओसवाल अशोक हरणावळ, बंडू नलावडे, राहुल तुपेरे, राष्ट्रवादी ऍड सेलचे भगवानराव साळुंखे, पंडितराव साबळे, नरेंद्र व्यवहारे, सुनील जगताप, किशोर कांबळे, स्वाती पोकळे, मृणालिनी वाणी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी निवडणुकीतील वाढता प्रचार आणि जनतेची असलेली अपेक्षा पाहता, यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट करत निवडणुकीतील विजयी रणनीती आणि एकजुटी संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना महाविकास आघाडी आणि फ्रंट इंडिया उमेदवार
अश्विनी नितीन कदम बोलताना म्हणाले की, मी जन्माने आणि कर्माने पर्वतीकर आहे. पर्वतीकारांचे प्रश्न, त्यांचे मूलभूत हक्क अधिकार, समस्यांची जाण आणि शिक्षिकेचा धर्म असल्याने नगरसेवक या नात्याने माझ्या परिसराचा कायापालट करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. पंधरा वर्षात 15 ही कामे नागरीकांना दाखवता येतील असे विद्यमान लोकप्रतिनिधीना करता आले नाहीत. करोनासारख्या महामारीत कुटुंब संकटात असताना घरात न बसता कार्यकर्त्यांच्या साथीने आणि मदतीने नागरिकांसाठी अहोरात्र धावून गेले. मागील निवडणुकीत पराभव झाला तरीही माझ्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी अखंडपणे कार्यरत आहे. परंतु विद्यमान लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या प्रश्नापेक्षा ज्या कामात फायदा आहे असेच कामे मार्गी लावणे जमत. मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आम्हालाही मोठ्या प्रमाणात अमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु निष्ठेला महत्त्व असल्याने पितृतुल्य पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच पक्षाने पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी यावेळी शिवसेना सोबत असल्याने महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाची एकजूट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या साथीने इतिहास घडणार परिवर्तन होणार.

यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक काँग्रेस अध्यक्ष शशिकांत तापकीर यांनी केले. महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाचे सुक्ष्म नियोजन -जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निरीक्षकांकडून जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

पुणे, दि. ३०: पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने सुक्ष्म नियोजन केले असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची खबरदारी सर्व मतदारसंघात घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निरीक्षक (जनरल) आणि निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत डॉ. दिवसे बोलत होते. यावेळी निवडणूक पोलीस निरीक्षक राजेश सिंह यांच्यासह निवडणूक निरीक्षक नाझिम खान, मनवेश सिंह सिद्दु, के. हिमावती, निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मिना, अमित कुमार, उमेश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, पुणे आणि पिंपरी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, विविध कक्षांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते. तर पुणे ग्रामीणमधील सर्व विधानसभांचे निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात असलेल्या सर्व २१ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासनाने नियोजन केले असून निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची माहिती डॉ. दिवसे यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, निवडणूक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली असून मतमोजणीच्या ठिकाणीदेखील कडेकोट सुरक्षा व्यवस्था राहिल यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान यंत्रांची सरमिसळ नियोजित वेळापत्रकानुसार पार पाडली जात आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. मतदान जागृती उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक ती सर्व तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे विशेष मतदान केंद्रेदेखील स्थापित केली जाणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रासाठी आवश्यक उपाययोजना आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने योग्य ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचनादेखील सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांची मतमोजणी शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा स्तरामध्ये होणार असून भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी या ठिकाणी तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील कामगार भवनमध्ये होणार आहे. पर्वती, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, हडपसर, पुणे कॅन्टोंन्मेंट आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम येथे होणार आहे. तर ग्रामीण भागातील मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय त्या भागात होईल, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी यावेळी दिली.

वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे-डॉ. दिवसे

यानंतर पार पडलेल्या अंमलबजावणी यंत्रणा संदर्भातील बैठकीत माहिती देतांना डॉ. दिवसे म्हणाले, उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल यावर लक्ष देण्यासह निवडणूक खर्चाची पडताळणी करावी. नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने जिल्ह्यात परवानाधारक शस्त्र जमा केली आहेत. त्यांची यादी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय निवडणूक निरीक्षकांना देण्यात यावी. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सी-व्हीजील, खर्च, माध्यम संनियंत्रण समिती यांच्यासह इतर अहवाल वेळोवेळी द्यावेत, आदी सूचना यावेळी डॉ. दिवसे यांनी दिल्या.

निवडणुकीत रोकड, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करावी, अशाही सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.

यावेळी निवडणूक प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजन आणि कामकाजाबद्दल निवडणूक निरीक्षक मनवेश सिंह सिद्दु यांनी निवडणूक प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकांत महावरकर, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, आयकर विभागाचे आयुक्त जयेश आहेर, वस्तु व सेवा कर अतिरिक्त आयुक्त एम.एस. पन्हाळकर, पुणे प्रधान टपाल कार्यालयाचे अधीक्षक सुकदेव मोरे, मुख्य वनसंरक्षक राम धोत्रे आदी उपस्थित होते. परवानाप्राप्त शस्त्र जमा करण्याची कार्यवाही, मद्य, रोकड जप्तीची कारवाई, कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताबाबत यावेळी निवडणूक निरीक्षकांना दिली.

उद्योग विभागांतर्गतच्या आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश

पुणे, दि. ३०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

यासंदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने परिपत्रक जारी केल्याची माहिती डॉ.दिवसे यांनी दिली आहे. या परिपत्रकानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. मतदानासाठी मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0000

माणुसकीची दिवाळी सर्वत्र जावो :हेमंत रासने

श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट (तुळशीबाग)ने केला १८० निराधार बालकांचा पाहुणचार !
दिवाळीच्या नव्या कपड्यांची भेट

पुणे :

दिवाळीचा मुहूर्त साधून श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट (तुळशीबाग) ने नागरी वस्तीतील १८० निराधार बालकांचा अल्पोपहार देऊन दिवाळी पाहुणचार केला आणि नवीन कपडे भेट दिले.हेमंत रासने,आशिष शहा,ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल दहिभाते हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते.श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट (तुळशीबाग) चे अध्यक्ष सागर सुनिल दहीभाते यांनी स्वागत केले.बुधवार,दि.३०ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अगत्य हॉटेल (तुळशीबाग) येथे हा कार्यक्रम झाला.या उपक्रमाचे हे आठवे वर्ष होते.अरविंद तांदळे,सिद्धार्थ सातपुते,गजानन शालगर,नरेश तडका,रुपेश व्हावळ,प्रताप बिराजदार आणी तुळशीबाग परिवारातील सदस्य उपस्थित होते.सोमनाथ भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हेमंत रासने म्हणाले,’श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट,(तुळशीबाग) हे समाजकार्यात अग्रेसर असलेले मंडळ आहे.यांच्या वतीने सलग ८ व्या वर्षीही १८० निराधार लहान मुलांसोबत माणुसकीची दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.त्यातून प्रेम-आपुलकी-जीव लावल्यावर समाजात अतूट विश्वास निर्माण होतो.हाच विश्वास समाजात एक धैर्य-शक्ती-धाडस निर्माण करतो.आपली येणारी पिढी देशाची अमुल्य संपत्ती आहे.आपले सण, परंपरा जपताना समाजातला शेवटचा कोणताही घटक वंचित राहता कामा नये अशी काळजी जी मनं घेतात,त्यांच्याच हातुन राष्ट्राची उदंड सेवा एका समर्पित भावनेने घडते.’
‘माणूस म्हणुन जगताना वेगवेगळ्या वाटांवर समोर आलेल्या पीडितांना सोबत घेऊन पुढे जात राहणं हाच आपला मुळ धर्म, मुळ कर्तव्य आहे.तुळशीबाग परिवारातील सदस्यांनी माणुसकीचा धर्म पुढे नेताना आपल्या घासातील एक घास उपेक्षीतांना देतांना एक समजूतदारपणाची भुमिका  सर्व सहकारी घेतात,याचा  विलक्षण आनंद आहे असेच काम श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट वतीने होत राहो’,अशा शुभेच्छा  आशिष शहा,ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल दहिभाते यांनी दिल्या.

मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. ३०: मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी २१ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे.

छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.

मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

“पर्वती विधानसभा निवडणुकीत अश्विनी कदम नावाचे तीन उमेदवार ” विरोधकांची खेळी असल्याचा मविआ उमेदवाराचा आरोप

महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी सांगितले की, ” पर्वतीकरांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा ज्यांना संधी दिली अश्या लोकप्रतिनिधीला एक ही ठोस काम करता आले नाही. पंधरा वर्षातील त्यांच्या एकाही कामावर त्यांनाच विश्वास नसल्याने अशा नावात साम्य असलेल्या उमेदवारांना पुढे करण्याचा डाव रचला आहे. पंधरा वर्षात नागरिकांची कामे केली असती तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती. अशा कृत्यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आपल्या पर्वती मतदारसंघातील जनता सुज्ञ आणि चाणक्ष असल्याने असला रडीचा डाव ते हाणून पडणार आणि मला न्याय देणार असा मला आत्मविश्वास आहे. कारण विधानसभेची ही निवडणूक मी लढवत नसून पर्वती मतदार संघातील जनता लढवत असल्याने परिवर्तन अटळ आहे. तरीही, निवडणूक आयोगाकडून मतदारांना सावधानतेने मतदान करण्याचा सल्ला देण्यात यावा अथवा वेगळा काही उपया करता येईल, जेणेकरून एकसारख्या नावामुळे कोणताही गोंधळ होणार नाही. याची काळजी घ्यावी. मतदारांनी मतदान करताना नीट लक्ष देऊन उमेदवाराचे पूर्ण नाव, पक्ष, व चिन्ह तपासून मतदान करावे, असे महाविकास आघाडीच्या अश्विनी नितीन कदम यांनी आवाहन केले आहे.

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवारांचे २२ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत त्यामध्ये अवैध असून २० नामनिर्देशन पत्र वैध स्वरूपात प्राप्त झाले आहेत अशी माहिती, पर्वती निवडणूक अधिकारी कार्यालयातून मिळाल्याचे नितीन कदम यांनी येथे सांगितले . आजपर्यंत आलेल्या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

नितीन कदम म्हणाले,’ पर्वती विधानसभा अंतर्गत दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीन उमेदवार एकाच नावाने समोर आल्याचे नामनिर्देश अर्जातील यादीनुसार दिसून आले. अश्विनी नितीन कदम नावाच्या २ उमेदवार आणि अश्विनी अनिल कदम नावाचे १ उमेदवार असल्याचे दिसले . एकाच नावाचे तीन उमेदवार निवडणूकीला सामोरे जात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशी समोरासमोर लढत असताना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या नावाला साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘ तुतारी ‘ चिन्हाचा ‘ पिपाणी ‘ या चिन्हाने अनेकांचा खेळ बिघडवला होता. तिन्ही उमेदवारांचे नाव आणि आडनावही एकच असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो. पर्वती विधानसभा मतदारसंघांत एक सारख्या वाटणाऱ्या नावांचा घोळ नेमका योगायोग की जाणून – बूजून आखलेला राजकीय डाव ? हे लवकरच सिद्ध होईल.

कॉंग्रेस भवनातूनच केला आबा बागुलांनी प्रचाराचा शुभारंभ..

अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

  • काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या
    पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा शुभारंभ

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी बुधवारी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या प्रचार रॅलीचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरवात केली. यावेळी उपस्थितांनी बागुल यांचा प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रारंभी पासून काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या श्री बागुल यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी, त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात काँग्रेस भवन येथूनच केली. अजय खुडे, विश्वास दिघे,इंदिरा आहिरे,जयकुमार ठोंबरे, शोभा पण्णीकर, संतोष गेळे, बेबी राऊत, गोरख मरळ, अशोक नेटके, सुमन इंगवले, ज्योती आरवेन, नीता नेटके, शाम काळे, दीपक ओव्हाळ, छाया गाडे, ताई कसबे, नंदा ढावरे, प्रकाश आरणे, रावसाहेब खवळे, जावेद शेख, माहेबूब शेख, अल्ताप सौदागर, नितीन निकम, मनीषा गायकवाड, सुनील ओव्हाळ, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री आबा बागुल यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीचे बुधावरी सकाळी आयोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता शिवदर्शन येथील राजीव गांधी ई लर्निग स्कूल येथून ही दुचाकी रॅली सुरू झाली. या रॅलीत तरुणाई बरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी आबा बागुल हम तुम्हारे साथ हे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान पर्वती मतदार संघातील काँग्रेसचे शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. आबा तुम्ही घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. आम्ही आपल्या मागे खंबीरपणे उभे आहोत, तुमचा विजय निश्चित आहे, आशा भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या.
ही बाईक रॅली राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग – लक्ष्मी नगर – पर्वती गाव – जनता वसाहत – हिंगणे – महादेवनगर – आनंदनगर – विठ्ठलवाडी – दत्तवाडी – गणेशमळा -पानमळा – दांडेकर पूल – निलायम ब्रिज येथून पुढे पर्वती दर्शन येथे समाप्त झाली. वाहतुकीला अडथळा येऊ नये अशा पद्धतीने रस्त्यावरून या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात होते.पर्वती मतदार संघातील परिवर्तनासाठी या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अशा भावना श्री आबा बागुल यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण काँग्रेसचे विचार जे महात्मा गांधी यांनी दिले ते कायम पुढे ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.

या रॅली दरम्यान नागरिकांनी ही आपल्या भावना व्यक्त करून, पर्वती विधानसभा मतदार संघातील न झालेल्या विकास कामाबद्दल खंत व्यक्त केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार चुकला आसून, अजूनही वेळ गेलेली नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकाने पडून आपली क्षमता दाखवून देणार आहे. त्यापेक्षा महाविकास आघाडीने आबा बागुल यांना पाठींबा द्यावा असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निरीक्षकांकडून आढावा

पुणे, दि. ३० : खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक संजीव कुमार यांनी आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड टेक्निकल कॉलेज येथील निवडणूक कार्यालयास भेट देवून आढावा घेतला.

निवडणुकीसाठी उभारलेल्या प्रत्येक कक्षाच्या कामकाजाबद्दल आणि कार्यपद्धतीबाबत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्याकडून श्री. संजीव कुमार यांनी माहिती घेतली. निवडणुकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष्य ठेवण्याच्या अनुषंगाने महत्वाचे असणारे सुरक्षाव्यवस्था तसेच संवेदनशील मॅपिंग कक्ष आणि निवडणूक प्रचाराविषयक आवश्यक परवानग्या देणाऱ्या एक खिडकी कक्षाचा देखील श्री. संजीव कुमार यांनी आढावा घेतला. प्रत्येक कक्षासाठी निवडणूक आयोगानी आखलेले कार्ये व त्या संबंधित सर्व कागदपत्रे परिपूर्ण ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे, नायब तहसिलदार सचिन आखाडे, एक खिडकी कक्ष समन्वयक स्वाती नरुटे, माध्यम कक्ष समन्वयक विजयेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

हडपसर, पुणे कॅन्टोनमेंट व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी भीम सिंग यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

पुणे,दि.३० :- हडपसर, पुणे कॅन्टोनमेंट व कसबा पेठ विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने श्री.भीम सिंग यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

निवडणूक निरीक्षक श्री. भीम सिंग यांचा निवासाचा पत्ता ए- ३०५ व्हीव्हीआयपी-१ सर्किट हाऊस, (ग्रीन बील्डींग)२४, क्वीन्स् गार्डन, कॅम्प, पुणे असा आहे. संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९२२६५७३६४६ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांचा संपर्क क्रमांक ९७६५९४११६६ असा आहे. निवडणूक निरीक्षक भीम सिंग यांना व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे भेटण्याची वेळ सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.

श्री.भीम सिंग यांनी हडपसर, पुणे कॅन्टोनमेंट व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन,तेथील निवडणूक कामकाज प्रक्रियेचा आढावा घेतला. सर्व नोडल अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि सुचना केल्या. .तदनंतर पुणे कॅन्टेांमेंट विधानसभा नामनिर्देश प्रक्रिया पाहणी केली.
०००

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल स्पेनच्या पंतप्रधानांकडून महाराष्ट्राची प्रशंसा

मुंबई, दिनांक ३० ऑक्टोबर

महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ (Pedro Sanchez) यांनी प्रशंसा केली आहे. विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्याशी काल (दि २९) येथील राजभवनमध्ये चर्चा करतांना श्री सांचेझ यांनी डॉ गोऱ्हे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासासाठी जिल्हा स्तरावर कोणकोणत्या प्रकल्पांना उत्तेजन दिले जाते, याबद्दलही माहिती घेतली.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी बेगोना गोमेझ (Begona Gomez) तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबई भेटीवर आलेले स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांचे काल (मंगळवार) शासनाच्यावतीने राजभवन येथे स्वागत केले. यावेळी सांचेझ यांच्या पत्नी बेगोना गोमेझ तसेच उच्चस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित होते.

महामहिम राज्यपालांनी श्री सांचेझ व त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राजभवन येथे स्नेहभोजन आयोजित केले होते. याप्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग नोंदवला. डॉ गोऱ्हे यांनी श्रीमती बेगोना गोमेझ यांच्याशी संवाद साधला. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या योजना, विविध शासनातर्फे करण्यात येत असलेले सांघिक प्रयत्न याबद्दल डॉ गोऱ्हे यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (United Nations) लिंग समानता आणि महिला विषयक समानतेच्या मुद्द्यावर स्पेन सरकार काय काम करते याबद्दलची माहिती श्रीमती बेगोना गोमेझ यांनी डॉ गोऱ्हे यांना दिली.

महाराष्ट्र शासनाचे सामाजिक उपक्रम, वेगवेगळ्या जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न तसेच जिल्हा स्तरावर हे उपक्रम राबवण्यासाठी देण्यात येत असलेले प्रोत्साहन हे ऐकून श्रीमती बेगोना गोमेझ अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांनी ही बाब पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पंतप्रधान श्री
सांचेझ यांनीही डॉ गोऱ्हे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्र सरकार राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल उत्सुकता दाखवली आणि प्रशंसा केली.

यावेळी राज्य शासनातील उच्चपदस्थ अधिकारीदेखील उपस्थित होते.

आता थायलंड मध्ये प्रति ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर

संपूर्ण मंदिरासोबतच हुबेहूब मूर्तीची देखील स्थापना : रवाई बीच समोर फुकेत ९ मध्ये ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ लवकरच भाविकांसाठी खुले होणार

पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा केवळ पुण्यातच नाही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ह्याच लाडक्या गणपती बाप्पांची केवळ मूर्तीच नाही तर हुबेहूब मंदिरच आता थायलंड मधील फुकेत येथे उभारण्यात आले आहे आणि या मंदिरात दगडूशेठ गणपती बाप्पांची विधिवत स्थापना व पूजन देखील करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने फुकेत मध्ये स्थापन होत असलेल्या दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीची मिरवणूक नुकतीच लाल महाल ते दगडूशेठ गणपती मंदीर अशी काढण्यात आली.

पुण्यात झालेल्या विधिवत पूजन कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण राजूशेठ सांकला, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मूर्तीचे विधिवत पूजन करण्याकरिता फुकेत ९ रियल इस्टेट कंपनी लिमिटेड च्या चेअरमन उद्योजिका पापा सॉन मिपा व त्यांचे सहकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्योजिका पापा सॉन मिपा यांच्या पुढाकाराने व स्व खर्चाने हे मंदिर उभे रहात आहे. ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी चेतन लोढा यांनी याकरिता समन्वय व विशेष सहकार्य केले.

मिस पापा सॉन मिपा म्हणाल्या, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने आम्हाला देखील शक्ती मिळते. फुकेत मध्ये मंदिर उभारणे हे अशक्यप्राय वाटत होते. मात्र, दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि भारतीयांच्या सहकार्यामुळे हे आज शक्य होत आहे. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आमचे प्रधानमंत्री देखील फुकेत मध्ये सुरु असलेले मंदिराचे कार्य पहात आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, थायलंड मध्ये बाप्पांच्या मंदिर आणि मूर्तीच्या स्थापनेने भारतीय संस्कृती आणि परंपरेचा गौरव यानिमित्ताने होत आहे. तेथे तब्बल ५० फूट मंदिर उभारण्यात आले आहे. हे गणपती मंदिर लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय या नावाने रवाई बीच फुकेत मध्ये आहे. यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन आता थायलंड सह आजूबाजूच्या गणेशभक्तांना देखील घेता येणार आहे.

ते पुढे म्हणाले, दगडूशेठ गणपतीच्या मुख्य मूर्ती सोबत पंचधातूची छोटी मूर्ती, त्याचबरोबर सिद्धी माता, बुद्धि माता, श्री लक्ष, श्री लाभ या मूर्ती देखील तेथील मंदिरात कायमस्वरूपी प्रतिस्थापना होणार आहे. तसेच पुण्यातील मंदिरात जसे शंकराचे मंदिर आहे तसेच फुकेत येथील मंदिरात देखील असेल. दगडूशेठ गणपती बाप्पांची हुबेहूब मूर्ती पुण्यात साकारण्यात आली. तीमूर्ती बनवण्यासाठी १ वर्ष २० दिवस इतका कालावधी लागला आहे. गणपती बाप्पा जगभरातील भक्तांचे आराध्य दैवत आहे. थायलंडमधून अनेक भाविक पुण्यात येतात. आता भाविकांना तेथे बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. तब्बल ९ कोटी रुपये खर्च आता पर्यंत मंदिराकरिता झालेला आहे.

सुमारे १५ महिन्यात मंदिराचे काम पूर्ण
या मंदिराचे भूमी पूजन जुलै २०२३ रोजी करण्यात आले व सुमारे १५ महिन्यात ह्या मंदिराचे काम जवळ जवळ पूर्ण होत आहे . त्यांनी तेथील मूर्तीमध्ये सुद्धा गणेश यंत्र आपल्या बाप्पाच्या मंदिरात सिद्धि करून त्याचे विधीवत पूजन करून बसवली आहे. फूकेत मध्ये सुद्धा बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठा करून लवकरच मंदिर सर्व भाविकांना दर्शना करिता खुले करण्यात येणार आहे. संपूर्ण मंदिर व गणेश मूर्ती व सर्व गणेश परिवार देवांच्या मूर्ती सह दागिने देखील करण्यात आले आहेत.

मनसुख हिरेनची हत्या त्यांनीच घडवून आणली:अनिल देशमुखांचा थेट देवेंद्र फडणवीसांवर आरोप

मुंबई-देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे तिघेही एकच आहेत. फडणवीसांच्या जवळचे असणारे परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना मनसुख हिरेनच्या हत्येची माहिती होती, त्यांनीच हत्या घडवून आणली, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. हे दोघे काय करत असतात हे फडणवीस यांना माहीत असल्याचे देखील अनिल देशमुख म्हणाले आहेत.

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, मानसुख हिरेन यांची हत्या झाल्यावर त्यांचा मृतदेह सकाळी सापडला. जोपर्यंत मृतदेहाची घरच्यांकडून ओळख पटत नाही तोपर्यंत त्याबाबत माहिती देता येत नाही. फडणवीस यांना एवढेही ज्ञान नाही याचे मला आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांचा गृहमंत्रीपदाचा किती अभ्यास आहे हे यातून दिसत असल्याची टीका अनिल देशमुख यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीला बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना एक प्रश्न विचारला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले, माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना माझा एकच प्रश्न आहे. मला माहीत आहे याचे उत्तर ते देणार नाहीत आणि तशी अपेक्षा देखील माझी नाही. मात्र त्यांना केवळ एकच सवाल आहे. मनसुख हिरेनची हत्या होणार, हे अनिल देशमुख यांना माहीत होते की नाही? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणाबाबत सदनात मी का शंका घेतली? त्यावेळी मनसुख हिरेन यांना गायब करण्यात आले होते आणि त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत उत्तर द्यावे. ते यावर बोलणार नाहीत. मात्र याचे उत्तर नक्कीच कधी ना कधी बाहेर येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.