Home Blog Page 613

भारतीय सेना दल आणि पुनीत बालन ग्रुप संयुक्त विद्यमाने ‘युगांतर २०४७ चे’ आयोजन

  • भरती विभाग पुणे आणि पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजन
  • सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणार ”

पुणे ; प्रतिनिधी
राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकून सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतीय सैन्य दलाच्यावतीने पुण्यात युगांतर २०४७ चे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलाच्या पुणे भरती विभागाच्या वतीने आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दि. २५ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध संस्थांमधील सुमारे ३ हजार महाविद्यालयीन विद्यार्थी त्यात सहभागी होणार असून हा कार्यक्रम “युवा, योग आणि तंत्रज्ञान” या थीमवर केंद्रित असणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे प्रेरक व्याख्याने, भारतीय सैन्यात सामील होण्याबाबत माहिती सत्रे, कॅडेट्सनी त्यांच्या परिवर्तनाच्या प्रवासातील अनुभवांची देवाण- घेवाण, प्रसिद्ध वक्त्या सुश्री जया किशोरी यांचे विशेष प्रेरक व्याख्यान, आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे शस्त्र प्रदर्शन, प्रशंसित मानस तज्ज्ञ अमित कलंत्री यांचे मन वाचण्याचे सादरीकरण आणि सबली – द बँड यांचे थेट संगीत सादरीकरण यांचा समावेश असून आरजे तरुण हे कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहे.
या कार्यक्रमात ‘राष्ट्र उभारणीकडे’ या प्रेरणादायी चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचा उद्देश राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि दलातील विविध करिअर संधींवर प्रकाश टाकणे आहे. भारताच्या विकसित राष्ट्रात रूपांतरामागील प्रेरक शक्ती म्हणून तरुणांची भूमिका असल्याने, हा कार्यक्रम त्यांना ते अर्थपूर्ण योगदान कसे देऊ शकतात यासंबधीचा विचार देणार आहे.

युगांतर २०४७’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर तरुणांना भारतीय सैन्याच्या नीतिमत्तेशी जोडण्यासाठी, त्याची मूल्ये समजून घेण्यासाठी आणि राष्ट्रसेवेच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ आहे. भारताचे भविष्य घडवण्यासाठी शिस्त, नेतृत्व आणि नवोपक्रमाचे महत्त्व हा उपक्रम अधोरेखित करतो.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.

भारतीय सैन्य दल आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने पुण्यातील तरुणांसाठी युगांतर २०४७ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या तरुण पिढीला भारताच्या गौरवशाली इतिहासहाची माहिती करून देण्यासाठी एक महत्वाचा प्रयत्न आहे. या एकदिवशीय कार्यक्रमात पुण्यातील विविध शैक्षणिक संस्था मधील ३ हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेची ताकद आणि सैन्य दलाच्या वतीने आत्मनिर्भर भारतासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमात एनडीएचे विद्यार्थी त्यांचे अनुभव कथन करणार असून भारतीय संस्कृतीची झलक दाखविण्यासाठी प्रसिद्ध वक्त्या जया किशोरी यांचेही व्याख्यान होणार आहे. युवा, योग आणि तंत्रज्ञान” असा धागा असलेल्या या कार्यक्रमात आपले स्वागत असून येत्या २५ मार्च रोजी गणेश कला क्रीडा येथे सकाळी साडे दहा वाजता आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत.
– मेजर जनरल योगेश चौधरी. (व्हिएसएम, एडीजी, झेड आर ओ)

“रंग रूप” भारतीय नाट्यशास्त्रावर होणार मंथन!

तीन दिवस राष्ट्रीय परिसंवाद:

पुणे: सांस्कृतिक कार्य विभाग परिषद, महाराष्ट्र राज्य आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा नाट्य विभाग , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ रंग रूपक ‘ या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन राज्य कपूर मेमोरियल येथे मार्च २५ ते २७ दरम्यान ‘ आले आहे.

भारतीय परंपरेतील नाम नाट्य संस्कृतीचा प्रसार व्हावा या दृष्टीने आयोजित या परिसवांदात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखित नाट्यदिग्दर्शक/नाट्यकर्त्या मार्गदर्शन करणारी मीडी माहिती एमआयटी-एयू विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.महेश चोपडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अमोल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भारत सरकारचे नागपूर येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रस्थानी आयोजित या तीन दिवसीय परिसंवादाची विषयवस्तू “भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्यशास्त्राची भूमिका” ही आहे. एनएसडी , नवी दिल्लीचे व्यावसायिक संचालक पद्मश्री वामन केंद्रे , एनएसडी दिल्लीचे कार्यकारी अध्यक्ष पद्मश्री भरत गुप्त , संगीत नाटक अकादमी , नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा , प्रसिद्ध अभिनेते , शिखर पद्मश्री चंद्रप्रकाश द्विवेदी मार्गदर्शन करणार असून नाट्यक्षेत्राच्या विकासासाठी प्राचीन नाट्यशात्रीय सिद्धांताचे मूल्य अधोरेखित करणार आहेत. तसेच प्रख्यात शास्त्रीय नर्तक पद्मश्री शशधर आचार्य , गुरुषमा भाटे , ज्येष्ठ नाट्यक्षेत्रज्ञ डॉ. संगीता गुंडेचा , पियाल भट्टाचार्य , डॉ. गौतम चार्तेजी , प्रा. संध्या रायते , डॉ. सुदिन कुमार मोहंती आणि प्रसाद भिडे नाट्यशास्त्रातील विविध पैलूंवर मार्गदर्शन करणार आहेत.

भरतमुचित रचित नाट्यशास्त्र रंगम-नाट्य-अभिनय- या सह भारतीय संस्कृतीचा पक्ष वारसा असूनही या खेळीतील भारतीय तत्वज्ञान , मानसशास्त्र आणि सद्य स्थितीतील नाट्यचळवळ देखील सखोल मंथन होणार असून विद्यार्थी नाट्यरसिक नाट्यसाधनेचे नवनीत जोडून विश्वास ठेवतात. व्यक्त करण्यात आला.

या परिसंवादास एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड , महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्यालयाचे संचालक विभीषण चवरे , एमआयटी एडीटी विद्यापीठ कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र , गुजरात आस्था बोले कार्लेकर विधानसभा गोड विरुद्ध आहे. तर कुलसचिव डॉ. महेश चोपडे , सिनेनाट्य अधिष्ठाता डॉ. मुकेश शर्मा आणि संस्कार अखिल भारतीय संघ भारत अभिजीत गोखले मंत्री मार्गदर्शन मार्गदर्शन आहे.

या परिसंवादाचे आयोजक डॉ. अमोल देशमुख आणि समन्वय प्रा. सुनीता नागपाल , प्रा. निखिल शेटे , प्रा. अनिर्बन बाणिक आणि प्रा. किरण पावसकर कार्यक्रमाच्या यशासाठी अथक प्रयत्न आहेत.

नाट्य सादरीकरणाने रंगत!या परिवादात प्रख्यात नाट्यगृहाचे विद्यार्थी साधक संवाद साधणार आहेत. या भाषाच प्रथितयश नाट्यकर्मींद्वारे नाट्य सादरीकरण होणार आहे. नाट्यतंत्र , नाट्य-जाणिवा विकसित करण्यासाठी “रंग रूपक” पर्वणी ठरणार आहे.

पुणेकर अनुभवणार शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भभूत आविष्कार

नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटेंना ५०० पेक्षा जास्त नृत्यांगनांची आदरांजली

२२- २३ रोजी कोथरुडमधील शुभारंभ लॉन्स मध्ये भव्य आयोजन

पुणे-पुणेकरांना कथ्थक, सत्रीय, ओडिशी आदी शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भूत अविष्कार अनुभवायला मिळणार असून, जवळपास ५०० पेक्षा जास्त नृत्यांगना नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटे यांना आदरांजली वाहणार आहेत. येत्या २२ आणि २३ मार्च रोजी कोथरुडमधील शुभारंभ लॉन्स येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शास्त्रीय नृत्य हा भारतीय सांस्कृतिचा अविभाज्य भाग आहे. प्रचीन काळापासून भारतातील शास्त्रीय नृत्य प्रकारांना एक शिस्त आणि कलेच्या माध्यमातून ईश्वराला समर्पित करण्याचा मार्ग म्हणून शास्त्रीय नृत्य कलेला ओळखले जाते. कथ्थक, भरतनाट्यम्, कुचीपुजी, ओडिसी, कथकली, मोहिनीपट्टणम्, मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्याच्या विविध शैली असून, या सर्व शैली पुणेकरांना एकाच व्यासपीठावर अनुभवता येणार आहेत.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था पुणे यांच्या माध्यमातून कोथरुडमध्ये २२ आणि २३ मार्च रोजी सायं. ५.३०. वा. शुभारंभ लॉन्स पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हैदराबादच्या ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना पद्मश्री आनंद शंकर जयंत आणि कथ्थक उस्ताद निरुपमा आणि राजेंद्र आदींसह जवळपास ५०० पेक्षा जास्त शास्त्रीय नृत्य कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

तसेच, या महोत्सवानिमित्त नृत्य गुरु शमा भाटे, गुरु मनीषा साठे, गुरु सुचेता चापेकर या देखील मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

शास्त्रीय नृत्य हा भारतीय सांस्कृतीचा कलेचा अविभाज्य भाग असल्याने जागतिक स्तरावर ही भारतीय शास्त्रीय नृत्याला एक आदराचे स्थान आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या परदेश दौऱ्यावेळी देखील भारतीय शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत केले जाते. तसेच, अनेक परदेशी नागरिक देखील भारतीय शास्त्रीय नृत्य कलेवर अध्ययन करत आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे आणि शास्त्रीय नृत्य कलेचे अद्भूत दर्शन अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. तरी सदर कार्यक्रमास पुणेकरांनी अवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ना. पाटील यांनी यानिमित्ताने केले आहे.

जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठकीत केलेल्या सूचनांची प्रशासनाच्यावतीने दखल

प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

पुणे, दि. २१: जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत करण्यात येणाऱ्या सूचनांची प्रशासनाच्यावतीने दखल घेण्यात आली असून सर्व संबंधित विभागाने याबाबत वेळेत कार्यवाही करुन त्या निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी या बैठकीत विविध विषयांबाबत सूचना केल्या. त्यावर संबंधित विभागांच्यावतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा आगामी बैठकीत घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डूडी म्हणाले.

बैठकीत अशासकीय सदस्य यांनी प्रामुख्याने महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महावितरण या विभागातील ग्राहकांच्या व नागरिकांच्या समस्या निराकरण करण्याच्या सूचना केल्या.
0000

डॉ. विश्वनाथ कराड हे लाल मातीतील कुस्ती जगविण्यासाठी प्रयत्नशील- हिंदकेसरी दीनानाथ सिंग

राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेचे उद्धाटन

पुणे, दि.२१ मार्च: “आधुनिक काळातही लाल मातीवर प्रेम करणारे डॉ. विश्वनाथ कराड हे खर्‍या अर्थाने कुस्ती जगविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत.  असे विचार हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ संत एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून लातूर येथील रामेश्वर (रुई) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी आमदार रमेश अप्पा कराड हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, शिवछत्रपती पुरस्कार विष्णुतात्या जोशीलकर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, पैलवान बंडा पाटील रेटरेकर, नजरूद्दीन नाइकवडी, शिवछत्रपती पुरस्कार दिनेश गुंड, रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, डॉ. हनुमंत कराड, श्री. राजेश कराड , ऋषिकेश कराड  व प्रा. विलास कथुरे उपस्थित होते.
दिनानाथ सिंग म्हणाले, ” डॉ. कराड हे पुनम का चाँद आहेत. त्यांनी पैलवानांना जो आधार दिला आहे त्यातून खेळाप्रती प्रेम दिसून येते. ही स्पर्धा सतत अशीच चालत राहावी यासाठी पुढील पिढी तयार आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे ॥’ अशी परंपरा असलेल्या रामेश्वर (रुई) या छोट्याशा गावात जागतिक स्तरावरील पैलवान येत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. आमच्यावर विश्वास ठेऊन येथे येणार्‍या पैलवानांसाठी आम्ही काबिल ठरण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा खेळ परंपरेचा असून लोकांना जोडणारा असून भावी जीवनाला दिशा देणारा आहे. ही स्पर्धा १८ वर्षापासून सुरू आहे. तसेच येथे सर्वधर्मांचे मंदिर असल्याने हे गांव संपूर्ण जगभर मानवता तीर्थ म्हणून ओळखले जात आहे. मराठवाडा हा साधु संतांची भूमिका आहे. या पुढील काळात भारत देश संपूर्ण जगासमोर विश्वगुरू म्हणून उदयास येणार आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा संदेश स्वामी विवेकानंद यांनी जगासमोर ठेवला आहे. ते आता सत्यात उतरतांना दिसत आहे.”
विष्णुतात्या जोशीलकर म्हणाले, ” वारकरी हे धारकरी अशा उक्ती प्रमाणे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेतली जाणारी ही स्पर्धा अद्वितीय आहे. संपूर्ण राज्यात अशा प्रकाराचा कार्यक्रम होत नाही. हे गांव सर्वधर्म समावेशक असून संपूर्ण लोकांना घेऊन वाटचाल करीत आहे.”
प्रा.विलास कथुरे यांनी प्रास्ताविकेत कुस्ती संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. तसेच या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून पैलवान आले आहेत. यात एकूण २०० पैलवान लात मातीत उतरणार आहेत.
उदघाटनाची कुस्ती कोल्हापुरचा अभिषेक जोगदंड व रामेश्वर रूई येथील जुणेद पठाण  यांच्यात झाली. या मध्ये जुणेद पठाण हा विजयी झाला.
तसेच पुणे येथील भालचंद्र कुंभार व पुण्याचाच सोनु कोलाटकर यामधील स्पर्धेत भालचंद्र कुंभार हा चितपटाने विजयी झाला.
कुस्ती स्पर्धेचे धावते वर्णन समालोचक बाबा निम्हण यांनी केले.
डॉ. महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विलास कथुरे यांनी आभार मानले.

मध्य रेल्वे पुणे विभाग उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार

0

पुणे-

उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
१.  पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एसी स्पेशल (२४ ट्रिप)

गाडी क्रमांक ०१४६९ एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पुण्याहून १५.५० वाजता, दर मंगळवारी ०८.०४.२०२५ ते २४.०६.२०२५ पर्यंत सुटेल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी (१२ फेऱ्या) ०६.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४७० एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल नागपूरहून दर बुधवारी ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ या कालावधीत ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (१२ फेऱ्या) पुण्यात २३.३० वाजता पोहोचेल.

रचना: तीन एसी 2 टियर, 15 एसी 3-टायर, 1 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.

२.  पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२४ सहली)

गाडी क्रमांक ०१४६७ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल पुण्याहून १५.५० वाजता, दर बुधवारी ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ पर्यंत सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (१२ फेऱ्या) ०६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४६८ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक गुरुवारी १०.०४.२०२५ ते २६.०६.२०२५ या कालावधीत नागपूरहून रात्री ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (१२ फेऱ्या) पुण्यात २३.३० वाजता पोहोचेल.

रचना: एक फर्स्ट एसी, एक एसी 2-टायर, दोन एसी 3-टायर, 5 स्लीपर क्लास, 6 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन.

०१४६९/०१४७० आणि ०१४६७/०१४६८ :- उरुळी, दौंड चोर मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

३) दौंड-कलबुर्गी अनारक्षित स्पेशल – आठवड्याचे ५ दिवस (१२८ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01421 अनारक्षित स्पेशल दौंड येथून 05.00 वाजता, आठवड्यातून 5 दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) 05.04.2025 ते 02.07.2025 पर्यंत सुटेल आणि त्याच दिवशी 11.20 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. (६४ सहली)

गाडी क्रमांक 01422 अनारक्षित स्पेशल कलबुर्गी येथून 05.04.2025 ते 02.07.2025 पर्यंत आठवड्यातून 5 दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) 16.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22.20 वाजता दौंडला पोहोचेल. (६४ सहली)
 
४) दौंड-कलबुर्गी अनारक्षित स्पेशल – द्वि-साप्ताहिक (५२ ट्रिप)

गाडी क्रमांक ०१४२५ अनारक्षित स्पेशल दौंड येथून दर गुरुवार आणि रविवारी ०३.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ या कालावधीत ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.२० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. (२६ सहली)

गाडी क्रमांक 01426 अनारक्षित स्पेशल कलबुर्गी येथून 03.04.2025 ते 29.06.2025 पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी 20.30 वाजता सुटेल आणि दौंडला दुसऱ्या दिवशी 02.30 वाजता पोहोचेल. (२६ सहली)

01421/01422 आणि 01425/01426:, 10 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅनसाठी रचना

०१४२१/०१४२२ आणि ०१४२५/०१४२६ साठी थांबे: भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अकलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गणागापूर.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01421,01422,01425,01426, 01469, 01470, 01467 आणि 01468 साठी विशेष शुल्कावर बुकिंग 24.03.2025 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उघडेल.   

सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासासाठी सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांची तिकिटे UTS द्वारे बुक केली जाऊ शकतात.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नियुक्त्या अवघ्या 8 तासात रद्द ; युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण?

पुणेः युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या. राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी रात्री १२ वाजता नवीन नियुक्त्यांची यादी अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर जाहीर केली. मात्र, भारतीय युवक काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयाने सकाळीच या नियुक्त्या रद्द केल्याचे पत्र प्रसिद्ध केले. या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले की, नियुक्त्या कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय केल्या गेल्याने त्या अवैध ठरविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला.

या मध्ये २० प्रदेश उपाध्यक्ष, ८ कार्याध्यक्ष व अन्य अनेक नियुक्त्या होत्या. या घटनेनंतर प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणामागे रहायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद यातून उघड झाले.

केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी केंद्रीय समितीची मान्यता लागते. राऊत यांनी अशी कोणताही मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे केंद्रीय समितीने तातडीने दिल्लीहून पत्रक प्रसिद्ध करून फक्त ८ तासांमध्ये या सर्व नियुक्त्या रद्द करून टाकल्या. केंद्रीय समितीमध्ये राष्ट्रीय सचिव असलेल्या अजय चिंकारा,एहसान खान, कुमार रोहित यांच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. याच पत्रकात त्यांनी कोणत्याही मान्यतेशिवाय कोणाचीही नियुक्ती करणे ही गंभीर व शिस्तभंग करणारी गोष्ट आहे असे म्हटले आहे. तसेच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या, त्याचा शोध घेऊन संबधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.

पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअरचे काम मे 2025 अखेर पूर्ण होणार  – नगरविकास राज्यमंत्री माधुरी  मिसाळ 

मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के आपला हिस्सा देतात. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रोजेकटला गतिमान करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्यासाठी एकत्रित काम करणारे सॉफ्टवेअर आवश्यक होते. या इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअरचे काम मे 2025 मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी  मिसाळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.

आमदार अमित गोरखे आणि आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर  देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होतया.

आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने  जीआयएसईआरपीच्या दृष्टीने 112 कोटी रुपयांची वेगळी निविदा का काढली ?  काम संथ गतीने होत असल्याने 92 लाख रुपयांचा दंड ठोठावला अशा परिस्थितीत कंपनीकडे असलेला डेटा किती सुरक्षित आहे? असा प्रश्न विचारला होता, त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की. 2019 साली अटॉस इंडिया ला काम देण्यात आले आहे, स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे सर्व विभाग यांना एकत्र आणण्याचे ट हे काम आहे, पूर्वी महापालिकेच्या सर्व विभागाचे काम स्वतंत्रपणे चालत असे आता ते सर्व विभाग एकत्रित येतील आणि स्मार्ट सिटी शी सुद्धा कनेक्ट असतील.  पूर्वीच्या सॉफ्टवेअर मध्ये जीआय तंत्रज्ञान नव्हते नवीन मध्ये आहे आणि ते 320 लेयर मध्ये काम करते यामुळे महापालिकेचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल. प्रॉपर्टी टॅक्स साठी या सॉफ्टवेअर मार्फत सर्वे करण्यात आला, यात ई ऑफिस सुविधा आहे. यात प्रत्येकाचे डॅश बोर्ड आणि लोंग इन वेगळे असल्याने सुरक्षा, गोपनीयता अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी अटॉस इंडिया प्रा. लि. ला गुजराती कंपनी नसेंट टेक्नॉलॉजी सोबत का निविदा भरावी लागली? असा प्रश्न उपस्थित करत यात घोटाला असल्याचा आरोप केला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, निविदेच्या अटी शर्ती प्रमाणे या दोन कंपन्या एकत्र आलेल्या आहेत. तीन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र झाले नाही यामुळे दंड आकाराला असून काम मे 2025 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्रात गुजरातमधून गुटखा येतो,सहज सर्वत्र मिळतो – विजय वडेट्टीवार

मुंबई-राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा हा गुजरातमधून येतो. आज गुटख्यामुळे अनेक लोक मरत आहेत. सरकारने एकतर कडक कारवाई करावी किंवा गुटख्यावरील बंदी उठवावी, असे वक्तव्य विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यामुळे सभागृहात गदारोळ झाल्याचे दिसून आले. तर राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी गुटखा व्यापऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी आज विधानसभेत गुटख्यावरून लक्षवेधी मांडली. त्यांनी म्हटलं की, साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये महीम नावाचा गुटखा आपल्या शेजारच्या राज्यातून येतो. सकाळी तीन ते पाच या दरम्यान आठवड्यातून दोन वेळेस मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. हे खरे आहे का आणि असल्यास याच्यावर कारवाई का केली नाही घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बीट चौकीच्या बाजूला दहा मीटरवर गुटखा आणि अंमली पदार्थ विकले जातात, हे पोलिसांना दिसत नाही का? त्याच्या समोरच्या जागेत सात लोकांचं रॅकेट आहे, त्या ठिकाणी काही कारवाई होणार का हिरानंदानी ही उच्च वस्ती आहे. हिरानंदानी कॉलेजच्या परिसरात दहा मीटरवर पान स्टॉल सुरु आहे. या स्टॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विकले जातात, यावर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, विलास लांडे यांच्या मतदारसंघात फईम अहमद शेख नावाच्या व्यक्तीचे त्याच्या भावाच्या नावाने दुकान आहे. गुटख्याच्या विक्रीमध्ये या व्यक्तीला अगोदर देखील अटक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे. त्याची तडीपारी देखील करण्यात आली होती. परंतु, हायकोर्टातून तरीपारी रद्द करण्यात आली. कोणीही अनधिकृतपणे व्यवहार करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे जे पण माहिती उपलब्ध आहे ती माहिती मला द्यावी, नक्कीच यावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले.

यानंतर विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. गुजरात मार्गे सर्रासपणे महाराष्ट्रात हा गुटखा विकला जातो. इतर राज्यांमध्ये याला बंदी नाही. पोलिसांनी मनात आणलं तर एक सुद्धा गुटख्याची पुडी पण कोणी विकू शकत नाही. अनेक लोक यात मरत आहेत. शासनाने कारवाई करावी नाहीतर ही बंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर गुटखा लॉबीला मदत करण्यासाठी आपण बंदी उठवा, असे म्हणता का? असा सवाल अनिल साटम यांनी उपस्थित केला. यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, गुटख्यावर कारवाई होत नाही असे नाही. मागच्या वर्षात आपण 150 कोटी पेक्षा जास्त गुटखा पकडला आहे. गुटखा व्यापऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले.

जळगाव:कानसवाडा गावात एकनाथ शिंदे गटाच्या माजी उपसरपंचावर चॉपर-चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या

जळगाव -जिल्ह्यातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्येची घटना आज सकाळी समोर आली. या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. युवराज कोळी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते होते. तसेच ते कानसवाडा या गावचे माजी उपसरपंच देखील होते. त्यांच्या या हत्येमुळे आता जळगाव जिल्हा चांगलाच हादरला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताच आजा जळगाव जिल्ह्यातील आणखी एक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर चॉपर आणि चाकूने हल्ला केला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही. जळगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच रहिवासी असलेल्या तीन आरोपींनी सकाळी आठ वाजता युवराज कोळी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये चाकू आणि चॉपर यांच्या माध्यमातून कोळी यांच्यावर सपा-सपा वार करण्यात आले. हे वार वर्मी लागल्याने युवराज कोळी जागीच कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेनंतर गावातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. युवराज कोळी यांच्या नातेवाइकांनी आक्रोश व्यक्त करत या प्रकरणातील दोषी व्यक्तींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. मात्र युवराज कोळी यांचा नेमका खून कोणत्या कारणामुळे झाला? हे अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्यांनी संतप्त नागरिकांना शांत केले आहे. तसेच अधिक तपास सुरू आहे.

नामांकित शिक्षण संस्थाचालकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करेल धमकी देऊन २५ लाखांची मागणी-५ तासात आरोपी गजाआड

पुणे- नामांकीत शिक्षण संस्था चालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणा-या गुन्हेगारास ०५ तासांचे आत सिंहगड रोड पोलीसां कडून अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’सिंहगड रोड पोलीस ठाणे हद्दीमधील नामांकीत शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष यांना त्यांचे मुलाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन त्यांचेकडून २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा त्यांच्याच शिक्षण संस्थेमधील माजी कॅमेरा व संगणक तज्ञ तथा आरोपी सुदर्शन कांबळे याचे विरुद्ध तक्रारदार यांनी दिनांक २०/०३/२०२५ रोजी तक्रार दिल्याने सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे शहर, येथे गुन्हा रजि नं. १५५/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०८ (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत चौकी अधिकारी तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे प्रभावी मार्गदर्शनाखाली नमुद आरोपीबाबत केवळ जुजबी माहिती प्राप्त असताना, गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करुन, केवळ ०५ तासांचे आत आरोपीस त्याचे धायरेश्वर मंदीराजवळील घराजवळून ताब्यात घेऊन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पो.स्टे.चे दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), उत्तम भजनावळे, सपोनिरी समीर चव्हाण, पोउपनिरी सुरेश जायभाय, संतोष भांडवलकर, सागर पवार, पोलीस अंमलदार तारु, केकाण, शिंदे, बांदल, मोहिते, पांडोळे, पाटील, भोरडे यांचे पथकाने केली आहे.

तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेवून सुखरुप दिले पालकांच्या ताब्यात:भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

पुणे- अपहृत केलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात भारती विद्यापीठ पोलीसांनी सुखरुप सोपविले आहे
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात इसमांनी फुस लावुन पळुन नेले बाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे दाखल होते . पिडीत अपहृत मुलींचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सावळाराम साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पो. अंमलदार यांनी शोध घेतला.ती प्रकरणे पुढील प्रमाणे
१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६५/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) या गुन्हयातील पिडीत अपहृत मुलीचा अंमलदार मंगेश ढोमसे, केतन लोखंडे, सागर कोंडे, महीला अंमलदार सोनल कामठे यांनी शोध घेतला असता ती आधोली, आंध्रप्रदेश, येथे सुखरुप मिळुन आली असुन तिस तिचे पालकांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे.
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०७/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) या गुन्हयातील अपहृत मुलीचा पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी, बंडु सुतार, सचिन गाडे, महेश बारवकर यांनी शोध घेतला असता ती आळंदी, पुणे, येथे सुखरुप मिळुन आली असुन तीस सुरक्षिततेच्या कारणास्तव महीला सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे.
३. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १५३/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १३७ (२) या गुन्हयातील अपहृत मुलीचा सपोनि कदम, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण यांनी शोध घेतला असता ती घणसवंगी, जालना येथे सुखरुप मिळुन आली असुन तिस तिचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,प्रविणकुमार पाटील,.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त, मिलींद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो. निरीक्षक भारती विदयापीठ पो.स्टे. कडील सावळाराम साळगांवकर, पो. निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, सपोनि समीर कदम, सपोनि समीर शेडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

‘तरंग’ बंटा गोळयांची विक्री करणाऱ्या राजस्थानी किराणा दुकानदारास पकडले

‘तरंग विजयावटी आयुर्वेदिक औषधी नावाने भांगेच्या गोळ्यांची शहरात विक्री

पुणे- तरंग या नावाने भांगयुक्त बंटा गोळयांची विक्री करणा-यास पुणे पोलिसांनी अटक केली आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
पुणे शहरामध्ये भांगयुक्त बंटा गोळयांची विक्री होत असले बाबत माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंलदार असे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना साई सृष्टी रेसिडेन्सी समोर देशमुखवाडी, कॅनोलरोड, शिवणे पुणे या ठिकाणी सार्वजनीक रोड लगत इसम नामे दिनेश मोहनलाल चौधरी वय ३० वर्षे, रा. राधा कृष्ण, अर्पाटमेंन्ट, देशमुखवाडी, शिवणे पुणे याचे ताब्यात १०,८००/-रु किमतीचे पांढ-या नायलॉन पोत्यामध्ये भांगयुक्त बंटयाच्या गोळया असलेले एकुण २४ पॅकेट प्रत्येकी पाकीटाचे वजन २०० ग्रॅम असा एकुण ४ किलो ८०० ग्रॅम वजनाचा प्रोव्हिबीशनचा ऐवज अवैधरित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचा इसम हा मुळचा राजस्थान राज्यातील असुन पुणे शहरामध्ये गेले पाच वर्षा पासुन किराणा मालाचे दुकान चालवित आहे. त्याने सदरच्या भांगयुक्त बंटा गोळया कोठुन आणल्या व कोठे विक्री करीत होता याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, सचिन माळवे, संदिप शिर्के, विपुन गायकवाड, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

शेजारी राहणाऱ्या कामवाल्या महिलेचे घर फोडले ,सव्वादोन लाखाची चोरी करणारी ३१ वर्षीय तरुणी २४ तासात गजाआड

पुणे-शेजारी भाड्याने राहणाऱ्या एका कामवाल्या महिलेचे घर फोडून तिच्या घरातील सोने आणि रोख रक्कम असा सुमारे सवादोन लाखाच्या ऐवजाची चोरी करणारी ३१ वर्षीय तरुणी पुणे पोलिसांनी २४ तासात गजाआड केली .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ फिर्यादी ह्या आपले घर सोसायटी, खराडी, पुणे येथे भाड्याचे राहण्यास असून त्या एका खाजगी कंपनीमध्ये हाऊस किपींगचे काम करून आपला उदनिर्वाह करतात फिर्यादी यांनी कष्ट करून थोडे थोडे करून घेतलेले सुमारे आडीच तोळे सोने व ३० हजार रु. रोख रक्कम ही त्यांनी त्यांचे घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेली होती.
फिर्यादी ह्या दि.१७/०३/२०२५ रोजी नेहमी प्रमाणे सकाळी १०:१५ वा.चे सुमारास त्यांचे हाऊस किपींगचे कामा करीता घरातील लोखंडी कपाट व घराचे दरवाजास कुलुप लावून कामावर निघुन गेल्या. त्यानंतर त्या रात्री ८:०० वा. चे सुमारास घरी परत आल्या असता त्यांना घराचे दरवाजाचे कुलुप तुटलेले व घरातील लोखंडी कपाट कशाचे तरी सहाय्याने उचकटल्याचे दिसल्याने त्यांनी कपाटातील सोन्याचे दागीणे व रोख रक्कम पाहिली असता त्यांचा ऐवज तेथे नसल्याचे दिसल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घरामध्ये चोरी केल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्याबाबत खराडी पो.स्टे. येथे गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ),३३१ (३),३३१ (४) नोंद आहे.
दाखल गुन्हया बाबत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पो.स्टे. संजय चव्हाण यांनी खराडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रमुख पो.उप.निरी . राहुल कोळपे. व डि.बी. स्टाफला तपासा बाबत सुचना दिल्या त्या अनुषंगाने खराडी पो.स्टे.चे तपास पथकातील पोलीस हवालदार सुरेंद्र साबळे यांना त्यांचे खास बातमीदाराने बातमी दिली कि एक महिला खराडी परिसरामध्ये सोने विकण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानुसार सुरेंद्र साबळे यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, यांना दिली असता त्यांनी डि.बी.स्टाफ मधील पोलीस आधिकारी व पो. अमंलदार व पो. महिला अमंलदार यांची एक टिम तयार करून त्यांना रवाना करुन सदर महिलेस शिताफीने ताब्यात घेतले. तिला तिचे नाव विचारले असता तिने आपले नाव अनिता शषीराव नवसागर, वय ३१ वर्षे, रा. आपले घर सोसा. खराडी, पुणे. असे असल्याचे सांगीतले. तिचेकडे असलेल्या सोन्याबाबत विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता तिने सांगीतले की, ती फिर्यादी राहत असलेल्या बिल्डींगमध्ये राहण्यास असून फिर्यादी यांचे कामाची वेळ तिला माहित असल्याने फिर्यादी बाहेर जाताच तिने कुलुप तोडून व कपाट उचकटुन कपाटातील सुमारे आडीच तोळ्याचे सोन्याचे दागीने व रोख ३० हजार रु. चोरल्याची कबुली देऊन तो ऐवज पोलीसांना काढुन दिल्याने तो पोलीसांनी गुन्ह्याचे पुरावे कामी जप्त केला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, हिंम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पो.स्टे संजय चव्हाण, पो.उप.निरी श्री. राहुल कोळपे. तपास पोलीस अमंलदार सुरेद्र साबळे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे अमित जाधव, सचिन रणदिवे, सचिन पाटील, मुकेश पानपाटील, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, म.पो. अंमलदार थोरात, वाघमारे, मालवडे यांचे पथकाने केली आहे.

विधानसभा अध्यक्ष मुंबईतील रस्त्यांवर नाराज,सोमवारी दुपारी मुंबईतील आमदारांची लावली बैठक

मुंबईमुंबईतील रस्त्यांच्या मुद्यावर शुक्रवारी विधानसभेत चर्चा झाली. त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाचे उदाहरण देत मुख्यंमत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागेल अशी आजची स्थिती असल्याचे परखड मत व्यक्त केले. विधानसभेत आज सत्ताधारी व विरोधी पक्षांतील आमदारांनी मुंबईतील रस्त्यांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामावरून प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पण या कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम झाले. काम रेंगाळले. यंत्रणा काहीच काम करत नव्हती, असे भातखळकर म्हणाले.

त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे ते म्हणाले. सामंत यांच्या या उत्तरानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाराजीचा सूरात आपली भूमिका मांडली. मला या विषयात बोलायचे नव्हते, पण मला बोलावे लागेल, असे ते म्हणाले.माझ्या मतदारसंघात दोन-अडीच वर्षांपूर्वी पहिले टेंडर निघाले. पण कंत्राटदाराने कोणतेही काम केले नाही. त्यानंतर 6 महिन्यांपूर्वी पुन्हा टेंडर काढले. पण अजूनही काम सुरू झाले नाही. सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून काढले. त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दंड आकारण्यात आला. पण महापालिकेने दंड वसूल करण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी बाब नार्वेकरांनी निदर्शनास आणून दिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत होते. पंरतु, प्रशासनाकडून ज्या प्रकारची कारवाई होत आहे, ती पाहता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला निश्चितपणे गालबोट लागेल अशी परिस्थिती आज आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

राहुल नार्वेकर यांच्या या विधानानंतर भाजप आमदार अमित साटम यांनीही मुंबईतील रस्त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. या कामामु्ळे आमच्या नाकीनऊ आलेत. अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे. मुंबईकरांची क्वालिटी ऑफ लाईफ काय? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. त्यानंतर अमित देशमुख, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांनीही रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. अखेरीस अध्यक्षांनी सोमवारी दुपारी 3 वाजता त्यांच्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील आमदारांची बैठक घेण्याचे जाहीर केले.