Home Blog Page 607

तळजाई पठारावर रंगला पहाट रंग कार्यक्रम

पहाट रंग कार्यक्रमात रसिक दंग

पुणे-तळजाई भ्रमण मंडळी यांनी तळजाई पठार येथे तळजाई माता मंदिरा शेजारील प्रांगणात  दिवाळीची औचित्य साधून  गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. सकाळच्या सुंदर अशा वातावरणामध्ये भावगीते भक्ती गीते मराठी व हिंदी चित्रपट गीते यांचा समावेश असणारा पहाटरंग राजेश दातार यांचा कार्यक्रम रसिकांकरता एक वेगळी च परवणी ठरला .जीवा शिवाची बैल जोड, कानडा राजा पंढरीचा, या जन्मावर , माझे माहेर पंढरी, मैने तेरे लिये ही, लागा चुनरी मे दाग, खैके पान बनारस वाला अशी सदाबहार गीते सादर करण्यात आली.

कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर,उल्हास दादा पवार, ,आबा बागुल ,तसेच तळजाई भ्रमण मंडळाचे सदस्य तसेच रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित होते. ढेरे काकांची नात व समूहाने सुंदर नृत्य सादर केले. थोपटे यांनी दूधवाटप , तसेच तळजाई भ्रमण मंडळाकडून लाडू पेढे व मिठाई वाटप यावेळी करण्यात आले होते.

गायिका प्रज्ञा देशपांडे आणि गायक राजेश दातार यांच्या गायनाने कार्यक्रम रंगत गेला. यावेळी तबला अभिजीत जयदे, रिदम मशीन विनोद सोनवणे, हार्मोनियम जयंत साने, कीबोर्ड मिहीर भडकमकर यांनी उत्तम साथ केली. शिल्पा देशपांडे यांचे निवेदन केले.

पथविक्रेता एकता समितीचा सिद्धार्थ शिरोळे यांना पाठिंबाः अध्यक्ष दीपक मोहिते यांची घोषणा


पुणे, दि. ५ नोव्हेंबर, २०२४ : पथारी व्यावसायिकांच्या महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढून त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी नव्हे तर सोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या सिद्धार्थ शिरोळे यांना या विधानसभा निवडणुकीत आम्ही स्वखुशीने पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा छत्रपती शिवाजीनगर पथविक्रेता एकता समितीचे अध्यक्ष दीपक मोहिते यांनी केली. शिरोळे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेत मोहिते यांनी समितीच्या वतीने शिरोळे यांना आपला संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे.

या छोटेखानी समारंभात भूमिका मांडताना समितीचे अध्यक्ष मोहिते म्हणाले की, पथविक्रेता समितीचे पाच हजारांहून अधिक सभासद आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कमला नेहरू उद्यानालगतची खाऊ गल्ली, झेड ब्रीजजवळ नटराज खाऊ गल्ली, संभाजी उद्यानालगतची खाऊ गल्ली येथे खाद्यपदार्थ विक्री केली जाते. हे फूड झोन आहेत. असे झोन असलेल्या ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर कारवाई करण्यास कायद्याने मनाई आहे. असे असतानाही महापालिका ही कारवाई करते. राष्ट्रीय पथविक्रेता धोरणानुसार सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांचे सर्वार्थाने पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असते. परंतु महापालिका पुनर्वसन तर करतच नाही उलट अशी बेकायदा कारवाई आणि दंडेलशाही करते. हा प्रश्न सिद्धार्थ शिरोळे यांनी सोडवला. त्यामुळे आता किमान सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांवरील कारवाई होत नाही. यामुळेच पक्ष न पाहता उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शिरोळे यांना पाठिंबा देत आहोत.

यावेळी समितीचे उपाध्यक्ष सुनील भादेकर, समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी निवडणुकीसाठी पाठिंबा आणि समर्थनाचे औपचारिक पत्र शिरोळे यांना सुपूर्द केले. यावेळी प्रचारप्रमुख दत्ता खाडे, अपूर्व खाडे, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेचे अधिकारी अचानक येऊन सिलिंडरवर कारवाई करतात, सिलिंडर उचलून घेऊन जातात. अगदी गर्दीच्या वेळेस धंदा बुडतो आणि मोठे नुकसान होते. सिद्धार्थ शिरोळे यांनी हस्तक्षेपामुळे परिस्थिती बदलली आहे. अशा अचानक कारवाईची चिंता दूर झाली असल्याचेही मोहिते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने सिद्धार्थ शिरोळे सध्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी पदयात्रा काढत नागरिकांच्या भेटीगाठी सुरु आहेत. आजही खिलारेवाडी म्हसोबा मंदिर, प्रभात रस्ता, डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डेक्कन बसस्थानक, कमला नेहरू पार्क, भांडारकर रस्ता, आपटे रस्ता, घोले रस्ता, पुलाची वाडी या भागांत पदयात्रा काढत नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या.

गुडनाइट आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने महाराष्ट्राच्या बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेत डासांमुळे होणाऱ्या रोगांविरुद्धच्या लढाईत प्रतिबंधाला दिले महत्त्व

पुणे, 05 नोव्हेंबर: गुडनाइट हा भारतातील अग्रगण्य मॉस्किटो रिपेलेंट ब्रँड, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (IAP) सोबत, महा पेडिकॉन 2024 मध्ये, नागपुरात झालेल्या प्रमुख बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेत डासांपासून होणाऱ्या रोगांविरुद्धच्या लढ्यात प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. महापेडिकॉनमध्ये आयोजित पॅनल चर्चेत याच गोष्टीवर भर देण्यात आला. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स(IAP) द्वारे आयोजित या परिषदेत पेडियाट्रिक केअरच्या भविष्यावर चर्चा करण्यासह सर्जनशीलता, सहयोग आणि काळजी याबद्दल मंथन करण्यासाठी 1,300 हून अधिक बालरोगतज्ज्ञ आणि बालआरोग्यतज्ज्ञ एकत्र आले. सिकलसेल, टाइप 1 मधुमेह आणि मोबाइलचे व्यसन यांसारख्या बालआरोग्याच्या गंभीर समस्या सोडविण्याबरोबरच, परिषदेने डासांमुळे होणारे आजार आणि त्याचा सतत धोका यावरही लक्ष केंद्रित केले.

नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल (NCVBDC) नुसार ऑगस्ट 2024 पर्यंत भारतात 1,83,610 मलेरिया आणि डेंग्यूची प्रकरणे नोंदविली गेली. मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या वेक्टर-जनित रोगांचा वाढता धोका आता केवळ पावसाळ्यापुरताच मर्यादित नाही, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी वर्षभर चिंता निर्माण होते, विशेषत: मुलांमध्ये जे सर्वात असुरक्षित आहेत. मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित न झाल्यामुळे त्यांना जास्त धोका असल्याने, त्यांचे संरक्षण सुनिश्चित करणे ही तातडीची प्राथमिकता बनते. अशा प्रकारे गुडनाइटने प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता वाढविण्यात बालरोगतज्ज्ञांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सने आयोजित केलेल्या महापेडिकॉनसोबत सहयोग केला.

बालआरोग्यावरील चर्चेदरम्यान, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. नितीन शहा, डॉ. विजय येवले, डॉ. गणेश कुलकर्णी आणि डॉ. सुरेंद्रनाथ, तसेच गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि.च्या (GCPL) आरअँडडी (घरगुती कीटकनाशके)च्या जागतिक प्रमुख डॉ. रीना बिबल्स यांच्यासह डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांमध्ये चिंताजनक वाढ व घरांमध्ये सुरक्षित आणि प्रभावी प्रतिबंधक धोरणे अवलंबण्याचे महत्त्व यावर चर्चा करण्यासाठी एका पॅनेलमध्ये भाग घेतला. चर्चेचे सूत्रसंचालन आयएपीचे राष्ट्रीय अध्यक्ष-निर्वाचित डॉ. वसंत खलाटकर आणि विकासात्मक बालरोगतज्ज्ञ आणि आयएपीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. समीर दलवाई यांनी केले. पॅनेलने घरगुती कीटकनाशक उत्पादनांच्या अत्यावश्यक सुरक्षेच्या पैलूंवर चर्चा केली, ज्यात सरकार-मान्यता, कायदेशीर आणि सुरक्षित पर्याय कसे ओळखायचे, तसेच कौटुंबिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार वापरासाठी सर्वोत्तम पद्धतींचा समावेश आहे.

पॅनल डिस्कशनमध्ये बोलताना गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि.च्या ग्लोबल हेड – आरअँडडी (घरगुती कीटकनाशके) रीना बिबल्स म्हणाल्या, “इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या सहकार्याने आमच्या उपक्रमाची दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिले म्हणजे, डासांपासून होणारे रोग टाळण्यासाठी प्रभावी उपायांचा वापर करण्याबद्दल घरांमध्ये जागरूकता वाढविणे. गुडनाइट सर्वेक्षण अहवालानुसार, 58% भारतीय ते कोणत्या प्रकारचे मॉस्किटो रिपेलेंट्स वापरतात, याविषयी अतिशय विशिष्ट आहेत, त्यांना प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूक करणे खूप महत्वाचे आहे, जे योग्य नियामक अनुपालनांतर्गत मार्केट पोस्टमध्ये उपलब्ध आहेत. 

रीना बिबल्स पुढे म्हणाल्या की, “आमचा दुसरा फोकस वैद्यकीय व्यावसायिकांना नियामक अनुपालनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि बाजारात उपलब्ध असलेल्या विश्वासार्ह ब्रँड्सच्या डासांपासून बचाव करणाऱ्या उत्पादनांच्या सुरक्षित वापरावर आहे. हे त्यांना त्यांच्या रुग्णांना सर्वोत्तम प्रतिबंधात्मक काळजी आणि मार्गदर्शन प्रदान करण्यास सक्षम करेल. एक श्रेणीचा लीडर म्हणून गुडनाइट हे प्रयत्न चालविण्यास वचनबद्ध आहे, डास नियंत्रणाचा उत्तम उपाय आणि योग्य प्रतिबंधात्मक उपायांबद्दल अधिक जागरूकता या दोन्ही गोष्टींना चालना देण्यासाठी.

प्रमुख विकासात्मक बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स (IAP) चे वरिष्ठ सदस्य डॉ. समीर दलवाई म्हणाले, “डासांचा सर्वांवर परिणाम होत असला, तरी लहान मुले डासांपासून होणा-या आजारांना सर्वाधिक बळी पडतात. त्याच वेळी डासांमुळे होणा-या रोगांच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबांवर सामाजिक-आर्थिक भारही वाढतो. म्हणूनच डासांपासून होणा-या रोगांचा सामना करण्यासाठी आणि देशाच्या एकूण आरोग्याचे प्रमाण सुधारण्यासाठी प्रतिबंध हा एक मूलभूत, परंतु महत्त्वाचा पैलू आहे. कायदेशीर आणि वैद्यकीय मान्यताप्राप्त प्रतिबंध उपायांचा वापर करणे ही एक महत्त्वपूर्ण संरक्षण यंत्रणा आहे. प्रतिबंधास प्राधान्य देणे आणि मंजूर उपायांचा अवलंब करणे हे सुनिश्चित करते की, त्यांनी कठोर चाचणी घेतली आहे, सुरक्षित आणि प्रभावी म्हणून प्रमाणित केले आहे व आमचे कल्याण धोक्यात न आणता आम्हाला स्वतःचे संरक्षण करण्यास अनुमती देते.”

बालरोगतज्ज्ञांच्या पॅनेलने असे मत व्यक्त केले की, डासांमुळे होणारे रोग रोखण्यासाठी वैयक्तिक संरक्षण, पर्यावरण नियंत्रण आणि सामुदायिक प्रयत्नांचा समावेश असेल. मुख्य उपायांमध्ये कीटकनाशक, मच्छरदाणी आणि बाष्पीभवक यांसारखी तिरस्करणीय उत्पादने यांचा समावेश होतो. प्रजनन स्थळे कमी करण्यासाठी साचलेले पाणी काढून टाकणे आणि अळ्यानाशकांचा वापर करणे हे आवश्यक पर्यावरणीय उपाय आहेत. खिडकीचे पडदे बसविणे आणि फ्युमिगेशन मोहिमांमध्ये भाग घेणेही डासांची संख्या नियंत्रित करण्यात मदत करते. जनजागृती मोहिमा आणि प्रमाणित, सुरक्षित उत्पादनांचा वापर प्रभावी प्रतिबंध सुनिश्चित करतात, तर नैसर्गिक भक्षकांचा परिचय करून देण्यासारखे जैविक नियंत्रण दीर्घकालीन व्यवस्थापनास समर्थन देतात. संपूर्ण भारतातील डासांमुळे होणाऱ्या रोगांचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार, संस्था आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारी आवश्यक आहे, यावर पॅनेलने भर दिला.

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीला मतदान न करण्याची घेतली प्रतिज्ञा-डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय पुणेच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार

आमचे मत निळा झेंडा, आंबेडकरी विचारांना आणि स्वाभिमानाला !

पुणे –

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमचे मत निळा झेंडा आणि बाबासाहेबांच्या विचारांना आहे. सन्मानपूर्वक वागणूक न देणाऱ्या महायुतीला मतदान करणार नाही, असा निर्धार पुणे शहरातील आरपीआय (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने आरपीआय (आठवले) पक्षाला एकही जागा न दिल्याच्या निषेधार्थ आरपीआय पुणे येथील पदाधिकाऱ्यांनी महायुतीला मतदान न करण्याची प्रतिज्ञा घेतली. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना ही शपथ दिली.

पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ऍड. आय्युब शेख, आरपीआयच्या पुणे महापालिकेच्या माजी गटनेत्या फरजाना शेख, मौलाना कारी मोबशीर अहमद, हनुमंत गायकवाड, तानाजी गायकवाड, ईश्वर ओव्हाळ, विशाल बोर्डे, विजय कांबळे, गजानन जागडे , रविंद्र चाबुकस्वार , सोमनाथ नरवडे , निखिल कांबळे, रोहित कासारे, संदीप ससाणे, मिठू वाघमारे, विशाल घोक्षे, नितीन जगताप, शिलरत्न जगताप, समीर आगळे, ढेपे नाना , अशिष वानखेडे ,रजनी वाघमारे, कविता गाडगे, शीतल कांबळे, मालती धीवार, रवी चव्हाण, असिफ शेख, शेखर शेंडे आदीसह आरपीआयचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सुमारे २५० पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, महायुतीने आरपीआय पक्षाला सन्मानपूर्वक जागा देणे अपेक्षित होते. मात्र ते झाले नाही. राज्यात एकही जागा दिली नाही. याची खदखद सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांच्या अनुयायांमध्ये आहे. त्यांची ही खदखद सातत्याने माझ्याकडे व्यक्त केली जात होती. त्यांचा प्रतिनिधी या नात्याने आज महायुतीला मतदान न करण्याची शपथ सर्वांनी घेतली आहे. ही खदखद आरपीआय पक्षासह पुणे शहरातील तसेच राज्यातील सर्व आंबेडकरी अनुयायांमध्ये आहे. ती उफाळून येत आहे. पुणे शहरातील अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात आहे.

ऍड. आय्युब शेख म्हणाले की, निवडणूक जवळ आली की मतदानासाठी आरपीआय पक्षाचा, दलित आणि मुस्लिमांचा वापर केला जातो. मतदान झाल्यानंतर मात्र या सर्वसामान्य घटकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा रोष आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. तसेच सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांना मानणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे प्रतिज्ञा घेताना जातीयवादी शक्तींना सत्तेत बसू देणार नसल्याचा निर्धार सर्वांनी केला आहे.

मौलाना म्हणाले की, केवळ निवडणुकीत वापर केला जातो. देशाच्या हिताला बाधा होणारे निर्णय घेतले जातात. सध्याचे सत्ताधारी देश हिताला बाधा पोचेल असेच कृत्य करत आहेत. या निवडणुकीत देशाचा विचार करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

ही घेतली प्रतिज्ञा -सर्व आंबेडकरी विचारांच्या मतदारांना जाहीर आवाहन. आम्ही आंबेडकरी विचार चे भारतीय नागरिक प्रतिज्ञा करतो की, रिपब्लिक कार्यकर्ते व चळवळीला दुय्यम समजणाऱ्या व सन्मानाची वागणुक न देणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार नाही व आमचे मत या वेळेस निळा झेंडा व आंबेडकरी विचारांच्याच पक्षाला देणार. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.

राज्यातील महायुतीच्या सरकारने आरपीआय पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यांची खदखद त्यांचा प्रतिनिधी या नात्याने मी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने तर एकही जागा दिली नाही. त्यामुळे आम्ही केवळ सतरंगी उचलायच्या का ? का असा संतप्त सवाल आंबेडकरी जनता उपस्थित करत आहे. आंबेडकरी विचारांचा अनुयायी या नात्याने महायुतीला मतदान न करण्याची प्रतिज्ञा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मी दिली. तसेच महायुतीच्या या अपमानास्पद वागणुकीमुळे मी पक्षाचा राजीनामा देऊन महायुतीचा निषेध व्यक्त केला आहे.

  • डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर.

जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघात ३५ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्र

तर १० विधानसभा मतदारसंघात ५३ मतदान केंद्रांचे नाव आणि २९ मतदान केंद्राच्या जागांमध्येही बदल

पुणे, दि. ५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ८ मतदारसंघात ३५ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्र आणि १० विधानसभा मतदारसंघात ५३ मतदान केंद्राच्या नावात तर २९ मतदान केंद्राच्या जागेत बदल करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, दौंड, बारामती, पुरंदर, चिंचवड, भोसरी, वडगावशेरी, खडकवासला आणि हडपसर अशा १० विधानसभा मतदारसंघातील साहाय्यकारी मतदान केंद्रे, मतदान केंद्राच्या नावात आणि जागेत बदल करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. ३४१ मतदान केंद्र असलेल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ५ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्र वाढली असून एकूण मतदान केंद्रांची संख्या ३४६ इतकी झाली आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघातील ४५७ केंद्रांमधील १९ मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे.

दौंड विधानसभा मतदारसंघात ३१० मतदान केंद्रात ३ साहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ झाली असून एकूण ३१३ मतदान केंद्र असतील. बारामती विधानसभा मतदारसंघातील ३८६ मतदार केंद्रातील २ मतदान केंद्राच्या जागेत बदल करण्यात आला आहे. ४१३ मतदान केंद्र असलेल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात ५ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्राची वाढ झाली असून एकूण संख्या ४१८ इतकी झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५६१ मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये ३ साहाय्यकारी मतदार केंद्राची वाढ झाली असून २१ मतदान केंद्राच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता ५६४ मतदान केंद्र झाली आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघात ४८३ मतदान केंद्रामध्ये ९ साहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ होऊन एकूण ४९२ मतदान केंद्र असतील. वडगावशेरीमध्ये ११ साहाय्यकारी मतदान केंद्राची वाढ झाली असून एकूण मतदान केंद्र ४४८ इतकी झाली आहे. ५०५ मतदान केंद्र असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये २ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्रे झाली असून आता ही संख्या ५०७ इतकी झाली आहे. तर ८ मतदान केंद्रांच्या नावात आणि २७ मतदान केंद्रांच्या जागेमध्ये बदल करण्यात आला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात ५२५ मतदान केंद्रे होती, त्यात ७ साहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ झाली असून आता ५३२ मतदान केंद्रे असणार आहेत, अशी माहितीही निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात मायक्रोऑबझर्व्हर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मायक्रोऑबझर्व्हर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रशिक्षण कक्षातर्फे करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, किरण सुरवसे आणि सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मायक्रोऑबझर्व्हर्सना त्यांच्या जबाबदाऱ्या, निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या भूमिकेची माहिती तसेच आवश्यक कौशल्यांची शिकवण दिली जाणार आहे.
मायक्रोऑबझर्व्हर्स निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मतदारांना कोणतीही असुविधा न होता सुरक्षित व पारदर्शक मतदान प्रक्रिया राबवली जावी, यासाठी मायक्रोऑबझर्व्हर तैनात केले जातात. मतदान केंद्रावर घडणाऱ्या प्रत्येक बाबींवर ते बारीक लक्ष ठेवून, नियमांचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्याचे काम करतात. निवडणूक दरम्यान कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होत असल्यास त्वरित अहवाल देणे हे देखील त्यांचे कर्तव्य आहे.
या प्रशिक्षण सत्रात प्रा.तुषार राणे व प्रा. माधुरी माने हे मायक्रोऑबझर्व्हर्सना तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्यांचे मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान मतदान यंत्रणांची तपासणी, मतदारांची पडताळणी, मतदान प्रक्रियेतील नियमांचे पालन, आणि निवडणुकीच्या शिस्तीची माहिती दिली जाईल.
मनुष्यबळ विभागाचे सहाय्यक अधिकारी साहीर सय्यद यांनी या प्रशिक्षणाच्या आयोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, “मायक्रोऑबझर्व्हर्स निवडणूक प्रक्रियेचे एक महत्त्वाचे अंग असून त्यांच्या प्रशिक्षिततेवरच निवडणुकीची पारदर्शकता व यशस्वीता अवलंबून आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व सुरक्षित ठेवण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.”
या प्रशिक्षणामुळे खडकवासला मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुलभ व पारदर्शकतेसाठी एक पाऊल पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आ. महेश लांडगे म्हणजे विधायक कामाचे बादशहा – सुरेश म्हेत्रे यांचे प्रतिपादन

जनता आ. लांडगे यांना पुन्हा संधी देईल आणि हॅट्रिक होईल
पिंपरी, पुणे (दि. ५ नोव्हेंबर २०२४) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे म्हणजे विधायक कामाचे बादशहा आहेत. जी कामे वर्षानुवर्ष प्रलंबित होती ती कामे त्यांनी मार्गी लावली असे प्रतिपादन माजी नगरसेवक व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
सुरेश म्हेत्रे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अनधिकृत बांधकामांना शास्ती कर लावण्यात आला. शास्ती कराचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. तो आमदार महेश दादा लांडगे यांनी मार्गी लावला. मोशी येथे कचऱ्याचा डोंगर झाला होता. विद्युत प्रकल्प सारखे विविध प्रकल्प राबवून तिथल्या लोकांचे जगणे सुकर केले. दुर्गंधीही कमी झाली. तरुण पिढीमध्ये संत साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी संत पिठाची स्थापना केली. चिखली मध्ये संत तुकाराम महाराज नाट्यगृह उभारले. अनेक भागात डीपी रस्ते करून घेतले. त्यात चिखली ते देहू आळंदी रस्त्याला मिळणारा 24 मीटर रस्ता, देहू आळंदी रोड ते शुद्धीकरण प्रकल्पाकडे जाणारा 24 मीटर रस्ता, बग वस्तीकडे जाणारे दोन डीपी रोड अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
आमदार महेश लांडगे यांनी चिखली येथे गाव जत्रा मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली. तात्पुरत्या स्वरूपात बैलगाडा घाट, कुस्ती आखाडा झाला आहे. येत्या पाच वर्षात आणखी विकास होणार आहे. त्यामुळे चिखलीकर खुश आहेत असे सुरेश म्हेत्रे यांनी सांगितले.
या मतदारसंघात चिखली ते तळवडे ,मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, ताम्हाणे वस्ती, सोनवणे वस्ती ज्योतिबा नगर, शेलार वस्ती येथे अडीच हजार ते तीन हजार लघुउद्योग आहेत. प्रत्येकाची गुंतवणूक एक कोटीची आहे. अडीच हजार कोटीची गुंतवणूक झाली आहे. ५० हजार पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यावरचे कुटिर उद्योग लक्षात घेता लाखभर लोकांना रोजगार मिळाला आहे. तात्पुरते शेड उभारून लघु उद्योगाची संधी मिळाल्याने गुंतवणूक वाढली आहे. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे वाहतुकीची समस्या काही प्रमाणात आहे. त्यासाठी ही आमदार महेशदादा लांडगे यांनी पावले उचलली आहेत.
मतदार संघात काही भागात केबल जळतात विद्युत पुरवठा खंडित होतो अशा तक्रारी होत्या. सन २०१४ मध्ये आमदार महेश दादा लांडगे यांनी महापारेषण सोबत बैठक घेतली. त्या त्या भागानुसार केबल डिझाईन करून अंडरग्राउंड केले. मात्र नंतर लोकवस्ती वाढत गेली. तीन ते चार मजली घरे झाली. दोन किलो वॅटचा ताण दहा किलो वॅट वर गेला. त्यामुळे केबल टिकत नाही हे लक्षात घेऊन आमदार महेशदादा लांडगे यांनी वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन ८०० कोटीचा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून आणला. त्यातून आता केबल टाकण्यात येणार आहेत. ज्यादा क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर उभारण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हे काम मार्गी लागेल. महापालिका एकदमच खोदाईला परवानगी देणार नाही. टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात येणार आहे. औद्योगिक कंपन्यांबाबत बोलायचे झाले तर मशीन अनेक असतात .त्यामुळे केबल वर ताण येतो फ्युज जाणे, ट्रान्सफॉर्मर जळणे असे प्रकार घडतात. कोणाचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीनेच आमदार महेशदादा लांडगे आजवर मार्ग काढत आले आहेत. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी अशीच पावले टाकली आहेत असे म्हेत्रे यांनी सांगितले.

नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड नियोजित पुलाला आमदार महेश दादा लांडगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंजुरी आणली आहे. एकूणच महेशदादा लांडगे हे विधायक कामाचे बादशहा आहेत. त्यांनी विधायक कामे केली नसती तर आता निवडणुकीत सर्वत्र गाजरांचे फ्लेक्स लागले असते. मात्र त्यांनी केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत त्यामुळेच यावेळी जनता आ. लांडगे यांना पुन्हा संधी देईल आणि लांडगे यांची हॅट्रिक होईल असा विश्वास सुरेश म्हेत्रे यांनी व्यक्त केला.

हा प्रगती आणि स्थगिती यांतील सामना!भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा महाविकास आघाडीवर हल्ला बोल

पुणे – विधानसभेसाठी महाराष्ट्रात होऊ घातलेली आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार असून राज्याच्या विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार सत्तेवर हवे याचा निर्णय मतदारांना करावयाचा आहे. गेल्या पाच वर्षांतील पहिल्या अडीच वर्षांत जनतेने स्थगितीचा अनुभव घेतला, व अलीकडच्या अडीच वर्षांत वेगवान प्रगतीचाही अनुभव घेतला, त्यामुळे निर्णय करणे आता सोपे झाले असून महायुतीला कौल देऊन जनता प्रगतीच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.भाजपा पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. यावेळी अमोल कविटकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते.भांडारी पुढे म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राज्याच्या प्रगतीला खीळ बसली, आणि सर्वच क्षेत्रांत राज्याची पीछेहाट झाली. मुंबईतील आरे-कुलाबा मेट्रो प्रकल्पाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झालेले असताना हा प्रकल्प थांबविल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्याचे १४ हजार कोटींचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाले, अन्य अनेक जनहिताचे प्रकल्प रोखल्याने शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि गरीब जनता सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहिली. मुंबईचा किनारी मार्ग, अटल सेतू, मेट्रो, नवा विमानतळ, झोपडपट्टी योजना, अशा अनेक सुविधांना महायुती सरकारने पुढे राबविल्या आणि बिघडलेला महाराष्ट्राचा मार्ग रुळावर आणला.समृद्धी महामार्गास महाविकास आघाडीने विरोध केला होते, मराठवाडा वॉटरग्रीड योनजेतून मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांनाही ठाकरे सरकारने खीळ घातली. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या जनहिताच्या आणि राज्यहिताच्या एका तरी कामाचा दाखला द्यावा, असे आव्हान भांडारी यांनी दिले. ठाकरे सरकारने प्रकल्प रोखले, आणि महायुती सरकारने त्यांना गती दिली. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी केवळ सत्तेसाठी निवडणुका लढवत आहे, तर आमची महायुती विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, आणि काम दाखवून मते मिळविण्यासाठी निवडणुका लढवत आहे.सरकारने ठरविले, तर विकासाचे शानदार उपक्रम सरकार राबवू शकते, हे महायुती सरकारने सिद्ध केले आहे. विकासासोबत समाजजीवनाचा स्तर उंचावण्याच्या योजनाही राबविण्याची गरज ओळखून लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी अशा अनेक घटकांसाठी महायुती सरकारने आखलेल्या योजनांमुळे राज्याच्या सामाजिक विकासालाही गती मिळाली आहे, असा दावा भांडारी यांनी केला. पटोले-पवार-ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने आपल्या सत्ताकाळात अनेक घोषणा केल्या, अनेक आश्वासने दिली, पण त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही, एकही घोषणा अमलात आणली नाही, असे सांगून भांडारी यांनी महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाचा पाढाच पत्रकार परिषदेत वाचला. त्यांच्याच सत्ताकाळात एसटी कर्मचाऱ्यांची परवड झाली, वेतनही न मिळाल्याने १२० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, एमपीएससी परीक्षार्थींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडले, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीच्या घोषणेला हरताळ फासला, अनुसूचित जातिजमातींकरिता आयोग नेमण्यात दिरंगाई केली, अतिवृष्टी आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन पाने पुसली, कर्जमाफीच्या वारेमाप घोषणा करूनही अमलबजावणी केलीच नाही, आरक्षणाचा प्रश्न अधिक जटिल केला, प्रकल्प रखडले, उद्योगांना हिरवा कंदिल दाखविण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करून महाराष्ट्राची औद्योगिक प्रतिष्ठाही घालविली, अशा आरोपांची जंत्रीच भांडारी यांनी पत्रकारांसमोर वाचली.याउलट महाविकास आघाडीने गेल्या सव्वादोन वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा प्रगती पुस्तकाद्वारे महाराष्ट्रासमोर मांडला असून सामाजिक, औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांमुळे राज्याचा बदललेला चेहरामोहरा आ जनतेसमोर आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नावाचा मुखवटा पांघऱून राज्याच्या विकासाचा विनाश करणाऱ्या अभद्र आघाडीला जनतेने नाकारले पाहिजे, असेही भांडारी म्हणाले.

चंद्रकांतदादांचा ‘तो’ निर्णय ‘गेमचेंजर’ !

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. विशेष करून पुणे महानगरपालिकेकडून १९७० पासूनच्या मिळकतकराचा विषय चंद्रकांतदादा पाटील यांनी हाताळल्याने त्याची चर्चा मतदारसंघात आताही सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. चंद्रकांतदादा पाटील यांना भाजपा – महायुती कडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे महापालिकेकडून १९७० पासून मिळकतकरात ४० टक्‍के सवलत दिली जात होती. पण, राज्य सरकारने केलेल्या ऑडिटमुळे ही सवलत काढण्याचा महापालिकेकडून निर्णय झाला. त्यामुळे २०१९पासून १०० टक्के करवसुली सुरू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका कसबा आणि कोथरुडमधील नागरिकांना बसत होता. ही सवलत पुन्हा लागू करावी, अशी मागणी जोर धरत होती. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी या विषयात जातीने लक्ष घालून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन ही सवलत पुन्हा लागू करुन घेतली. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, २०१९ पासून नवीन आकारनी झालेल्या सुमारे १.६५ लाख मिळकतींना पूर्ण दराने करआकारणी होत आहे. तसेच त्यापूर्वी आकारणी झालेल्या मिळकतींकडूनही ४० टक्क्यांची सवलत रद्द करूनच आकारणी केली जात आहे. यामुळे शहरातील हजारो मिळकतधारकांना सवलतीच्या थकबाकीसह मोठ्या रकमांची देयके आली आहेत. त्यानंतर पुणे महापालिकेत २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना मिळकतींना ४० टक्क्यांची सवलत देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर या सर्व नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. परंतु, योग्य पाठपुरावा केल्यानंतर आता या गावांना देखील ४० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांची कामगिरी कोथरूडकरांना समाधानकारक वाटली असून ते ज्या सोसायटीमध्ये जात आहेत, तेथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मतदारही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा मनोदय व्यक्त करीत आहेत.

राज ठाकरे मोदी-शहांची तळी उचलतात:त्यांना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाहीत


मुंबई:राज ठाकरे यांनी गॅलरीत बघून बोलू नये, त्यांनी सभागृहात, मुख्य मैदानात काय चालले आहे, यावरून बोलावे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची होती. तर हीच शिवसेना एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी – शहा कोण? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित करायला हवा होता. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे मोदी शहांची तळी उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरेंनी यावर बोलायला हवे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.शिवसेना कोणाची हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज राज ठाकरे फडणवीस, अमित शहा आणि मोदी यांना आपले नेते मानतात. त्यांनीच ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदे यांना दिली आहे. त्याच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आपण महाराष्ट्रात करायला निघाला आहात? अशी टीका राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे कधीही माफ करणार नाही, अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे हे मोदी आणि शहा यांच्या पालख्या वाहत असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे हे मूळ मुद्दा सोडून बोलत आहेत. राज ठाकरे काय बोलतात, यावर महाराष्ट्र चालत नाही. राज ठाकरे यांना महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे. आणि तोच महाराष्ट्राचा शत्रू असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात, याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दादर, माहिम, प्रभादेवी हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार सावंत हे दहा ते पंधरा हजार मतांनी विजयी होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या मतदार संघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांचा परभव होणार असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.

सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर…; ‘भाईजान’ला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी

मुंबई-अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने आता सलमान खानला धमकी दिली आहे. सलमान खाननं माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आला आहे. धमकी देणाऱ्याने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवला आहे.

वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये लारेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असल्याचं सांगत धमकी देण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे. सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामध्ये आरोपी आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे या प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमक्या देण्यास सुरुवात केली. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे. न दिल्यास आम्ही त्याला जीवे मारू. आमची गॅग आजही सक्रिय आहे. असा धमकीवजा मेसेज मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला सोमवारी मध्यरात्री आला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. या प्रकरणी तपास सुरु आहे.

श्रीमंत दगडूशेठ बाप्पाला ११०० नारळांचा महानैवेद्य

कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व

पुणे – गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. अंतःकरणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच् प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना ११०० नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले. पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त, पहाटे ४ ते सकाळी ६ दरम्यान गायिका रसिक कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम झाला त्यांना तबला साथ अक्षय भडंगे यांनी तर ऑक्टपॅड वादन साथ यश जवळकर यांनी केली आणि सकाळी ८ वाजता गणेश याग देखील पार पडला.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनिलभाऊ रासने म्हणाले, देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला. त्याला जिवंत केले. पुढे त्याचे आणि शंकरांचे युद्ध झाले. भगवान शंकरांनी त्या मुलाचे मस्तक उडविले. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेले गज मस्तक बसविण्यात आले. त्यांना श्री गजानन असे म्हटले आहे. ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे. या अवतारात भगवान श्री गणेशांचे नाव आहे उमांगमलज.

ते पुढे म्हणाले, उमा म्हणजे देवी पार्वती. तिच्या अंगावरील मळापासून ज म्हणजे जन्माला आलेला. असा याचा शब्दशः अर्थ. हा जशाला तसा लागू पडतच नाही. देवी पार्वतीच्या अंगावर पुतळा म्हणण्याइतका मळ असेल तरी कसा? तर लक्षात घ्यायला हवे की या सर्व कथा अध्यात्माचे निरूपण करण्यासाठीच असतात.

आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे. तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे. हा अहंकार आणि ममत्व दूर झाले की ज्या मोरयांची प्राप्ती होते त्यांना उमांगमलज असे म्हणतात.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वाहनाचे टायर जाळण्याच्या प्रयत्नामागे निवडणुकीचे कारण नाही- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. ४: चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खासगी वाहनाचे टायर जाळण्याचा केलेला प्रकार हा संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिगत ताण तणावामुळे घडल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले आहे. या घटनेमागचे कारण विधानसभा निवडणुकीशी संबंधित नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

पोलीसांच्या प्राथमिक चौकशीनुसार विनायक सोपान ओव्हाळ (वय ४५ वर्षे) या दिव्यांग व्यक्तीने आज दुपारी ४.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या ब्रेझा वाहनाचे टायर जाळण्याचा प्रयत्न केल्याची नोंद झाली आहे. या घटनेमागचे कारण विधानसभा निवडणुकीशी संबंधित नाही. आरोपीने रमाई आवास घरकुल योजना आणि रसवंती दुकानासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडे अनेकदा अर्ज केले होते. परंतु, महापालिका अधिकाऱ्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने आजचे हे कृत्य केले असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे.

यापूर्वी याच व्यक्तीने १५ ऑगस्ट २०२४ रोजी ध्वजारोहण समारंभाप्रसंगी महापालिका आयुक्तांच्या शासकीय वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. विनायक ओव्हाळ या व्यक्तीने विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्जही सादर केला आहे. पोलीस या व्यक्तीविरोधात कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करत आहेत.
0000

पुण्यातील 21 लढती…

पर्वती
आबा बागुल, अपक्ष
आमदार माधुरी मिसाळ,भाजप
अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
पुणे कॅन्टोन्मेंट
रमेश बागवे,काँग्रेस
आमदार सुनील कांबळे,भाजप

कसबा
आमदार रवींद्र धंगेकर,काँगेस
हेमंत रासने,भाजप
गणेश भोकरे,मनसे
कमल व्यवहारे,काँग्रेस बंडखोर,स्वराज्य पक्षातून निवडणूक लढवणार
छत्रपती शिवाजीनगर
आमदार सिद्धार्थ शिरोळे,भाजप
दत्ता बहिरट, काँग्रेस
काँग्रेस बंडखोर मनीष आनंद अपक्ष

कोथरूड
आमदार चंद्रकांतदादा पाटील,भाजप
चंद्रकांत मोकाटे,उबाठा शिवसेना
किशोर शिंदे,मनसे
खडकवासला
आमदार भीमराव तापकीर, भाजप
सचिन दोडके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
मयुरेश वांजळे,मनसे
हडपसर
आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
साईनाथ बाबर, मनसे

जिल्ह्यातील लढती

बारामती

1. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. युगेंद्र पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
3. अभिजीत बिचुकले, अपक्ष

इंदापूर

1. हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
2. दत्ता भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. प्रवीण माने, अपक्ष (बंडखोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)

भोर वेल्हा मुळशी

1. संग्राम थोपटे, काँग्रेस
2. शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. किरण दगडे पाटील, अपक्ष (बंडखोर भाजप)
4. कुलदीप कोंडे, अपक्ष (शिवसेना बंडखोर)

पुरंदर

1. संजय जगताप, काँग्रेस
2. विजय शिवतारे, शिवसेना
3. संभाजीराव झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (मैत्रीपूर्ण लढत)

मावळ

1. सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. बापूसाहेब भेगडे, अपक्ष (बंडखोर भाजप)

जुन्नर

1. अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
3. आशा बुचके, अपक्ष (बंडखोर भाजप)
4. शरद सोनवणे, अपक्ष (शिवसेना)

शिरूर हवेली

1. अशोक पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
2. माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

खेड आळंदी

1. दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. बाबाजी काळे, शिवसेना उबाठा

आंबेगाव

1. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. देवदत्त निकम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

दौंड

1. राहुल कुल, भाजप
2. रमेशआप्पा थोरात, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

पिंपरी

1. अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. सुलक्षणा शीलवंत,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

चिंचवड

1. शंकर जगताप, भाजप
2. राहुल कलाटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

भोसरी

1. महेश लांडगे, भाजप
2. अजित गव्हाणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

नियोजनबद्ध विकासकामांच्या जोरावर मोठा विजय मिळवू :आ. माधुरी मिसाळ

पुणे : मेट्रो, स्वारगेट मल्टिमोडल हब, बिबवेवाडीतील ईएसआयसीच्या जागेत 500 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय, कोरोना काळात केलेले मदतकार्य, समान पाणीपुरवठा योजना, पु. ल. देशपांडे उद्यानात दिल्ली हटच्या धर्तीवर कलाग्राम, आनंददायी शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, पर्वती टेकडीचे सुशोभिकरण, तळजाई वन आराखडा, पूरग्रस्त भागातील सिमाभिंतींचे बांधकाम, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना आणि प्राधान्यक्रमाने 176 कोटी रुपयांच्या आमदार आणि विशेष निधीचा विनियोग या विकासकामांच्या जोरावर मोठा विजय मिळवू असा विश्वास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय (ए) आणि महायुतीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी ओटा, बिबवेवाडी गाव, पापळ वस्ती, महेश सोसायटी, लोअर अप्पर इंदिरानगर परिसरात आज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दीपक मिसाळ, करण मिसाळ, मानसी देशपांडे, अनुसया चव्हाण, श्रीकांत पुजारी, संतोष नांगरे, अविनाश गायकवाड, सुभाष जगताप, शिवाजी गदादे-पाटील, बाबुराव घाटगे, अनुसया चव्हाण, मनोज देशपांडे, प्रशांत दिवेकर, रघुनाथ गौडा, विशाल पवार, प्रीतम नागपुरे, नवनाथ वांजळे, अजय भोकरे, शिवम देशपांडे, ज्ञानेश्वर मानकर, राजेंद्र बिबवे, नितीन बेलदरे, अरुण वीर, प्रभावती जागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, पर्वती विधानसभा मतदारसंघात गेली 15 वर्षे आमदार म्हणून गतीमान आणि शाश्वत विकास केला. त्यामुळे मतदारांचे प्रेम व विश्वास संपादन केले. म्हणूनच महायुतीने सलग चौथ्यांदा मला उमेदवारी दिली. या मतदारसंघात महायुतीचे संघटन भक्कम असून आम्ही एकसंघ आहोत. या उलट महाआघाडीत बिघाडी झाली असून, त्यांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या वेळी विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास वाटतो.